हँडपेंटेड ज्वेलरी बॉक्स

Submitted by अल्पना on 6 November, 2013 - 05:57

गेल्या महिन्यात मला एका क्राफ्ट सामानाच्या दुकानात एक छोटसं दागिन्यांचं कपाट मिळालं होतं. स्वतःसाठी घरी आणून ते रंगवल्यानंतर एंड प्रॉडक्ट खूपच आवडला.
मग दिवाळीमध्ये जावांना भेट देण्यासाठी मुद्दाम परत त्या दुकानातून पाच कपाटं आणली. (खरंतर आम्ही सात जणी आहोत. मला सहा कपाटं हवी होती, पण पाचच मिळाल्यानी माझं कपाट पण मी भेटवस्तूंमध्ये दिलं. आता माझ्यासाठी नविन कपाट आणून रंगवायचं आहे.)

गावाला जायच्या आधी आठवडाभरात ती पाची कपाटं रंगवून (एक कोट प्रायमरचा, दोन कोट बेस कलरचे आणि मग त्यावर डीझाइन आणि सगळ्यात शेवटी एक हात वॉर्निशचा) तयार केली.

पॅक करताना घाईघाईनी इथे दाखवण्यासाठी फोटो काढून ठेवले होते.

कपाट १. : मधुबनी स्टाईल
समोरुन
DSCN1578-001.JPG
वरून
DSCN1579.JPG
बाजूने
DSCN1580.JPG

कपाट २: वारली स्टाइल
समोरुन
DSCN1581.JPG

वरून
DSCN1584.JPG

दोन्ही बाजूने : वारलीमध्ये दोन्ही बाजूंना वेगवेगळी चित्रं काढली होती.
DSCN1585.JPGDSCN1587.JPG

कपाट ३: सनमायका /फोरमायका रंगामध्ये तांब्याच्या रंगाचे मेटल पिसेस चिटकवून
समोरून
DSCN1588.JPG

वरूनः
DSCN1589.JPG
या कपाटावर बाजूने काहीही डिझाइन रंगवलं नाही. फक्त शेडेड बेस कोट दिला.

कपाट ४ : बारीक कलाकुसर
समोरून
DSCN1591.JPG

वरून
DSCN1592.JPG

बाजूने:
DSCN1593.JPG

कपाट ५: व्हिक्टोरियन चार्म्स चिटकवून

समोरूनः
DSCN1594.JPG

यावर वरच्या बाजूला आणि साइडना दोन्ही बाजूंना सारखीच डिझाइन आहे.
DSCN1595.JPG

आधी रंगवलेलं कपाट :
DSCN1541-001.JPGDSCN1542.JPG

हे दोन टी कोस्टर्सचे सेट - जावेच्या माहेरी भाऊबीजेला देण्यासाठी

DSCN1596.JPGDSCN1598.JPG

या ज्वेलरी बॉक्सची साइझ ६.५" * ६* * ३" आहे. हे बॉक्सेस एमडीएफ चे बनवलेले आहेत. टी कोस्टर्स पण एमडीएफ चेच आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, खुपच मस्त झाले आहेत सगळे.... मधुबनि तर फारच मस्त, तु मधुबनी मधे अजुन काम कर नक्कि.

धन्यवाद.

अजून काही कपाटं, ट्रे, पेनस्टँड इ. बनवतेय आता. यावेळेला दागिन्याच्या /बांगड्यांच्या संदुका पण रंगवणार आहे टेक्क्श्चरींग करून.

Pages