हँडपेंटेड ज्वेलरी बॉक्स

Submitted by अल्पना on 6 November, 2013 - 05:57

गेल्या महिन्यात मला एका क्राफ्ट सामानाच्या दुकानात एक छोटसं दागिन्यांचं कपाट मिळालं होतं. स्वतःसाठी घरी आणून ते रंगवल्यानंतर एंड प्रॉडक्ट खूपच आवडला.
मग दिवाळीमध्ये जावांना भेट देण्यासाठी मुद्दाम परत त्या दुकानातून पाच कपाटं आणली. (खरंतर आम्ही सात जणी आहोत. मला सहा कपाटं हवी होती, पण पाचच मिळाल्यानी माझं कपाट पण मी भेटवस्तूंमध्ये दिलं. आता माझ्यासाठी नविन कपाट आणून रंगवायचं आहे.)

गावाला जायच्या आधी आठवडाभरात ती पाची कपाटं रंगवून (एक कोट प्रायमरचा, दोन कोट बेस कलरचे आणि मग त्यावर डीझाइन आणि सगळ्यात शेवटी एक हात वॉर्निशचा) तयार केली.

पॅक करताना घाईघाईनी इथे दाखवण्यासाठी फोटो काढून ठेवले होते.

कपाट १. : मधुबनी स्टाईल
समोरुन
DSCN1578-001.JPG
वरून
DSCN1579.JPG
बाजूने
DSCN1580.JPG

कपाट २: वारली स्टाइल
समोरुन
DSCN1581.JPG

वरून
DSCN1584.JPG

दोन्ही बाजूने : वारलीमध्ये दोन्ही बाजूंना वेगवेगळी चित्रं काढली होती.
DSCN1585.JPGDSCN1587.JPG

कपाट ३: सनमायका /फोरमायका रंगामध्ये तांब्याच्या रंगाचे मेटल पिसेस चिटकवून
समोरून
DSCN1588.JPG

वरूनः
DSCN1589.JPG
या कपाटावर बाजूने काहीही डिझाइन रंगवलं नाही. फक्त शेडेड बेस कोट दिला.

कपाट ४ : बारीक कलाकुसर
समोरून
DSCN1591.JPG

वरून
DSCN1592.JPG

बाजूने:
DSCN1593.JPG

कपाट ५: व्हिक्टोरियन चार्म्स चिटकवून

समोरूनः
DSCN1594.JPG

यावर वरच्या बाजूला आणि साइडना दोन्ही बाजूंना सारखीच डिझाइन आहे.
DSCN1595.JPG

आधी रंगवलेलं कपाट :
DSCN1541-001.JPGDSCN1542.JPG

हे दोन टी कोस्टर्सचे सेट - जावेच्या माहेरी भाऊबीजेला देण्यासाठी

DSCN1596.JPGDSCN1598.JPG

या ज्वेलरी बॉक्सची साइझ ६.५" * ६* * ३" आहे. हे बॉक्सेस एमडीएफ चे बनवलेले आहेत. टी कोस्टर्स पण एमडीएफ चेच आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख झालय रंगकाम. मला पण मधुबनी, वारली आणि सर्वात शेवटी जे मेंदी टाइपचं डिझाइन आहे सगळ्यात जास्ती आवडली

ते शेवटचं मेंदीसारख्या डिझाइनवाल्या निळ्या कपाटासाठी डिजेचे आभार. तिच्या कँडल्स वरचा मोर वापरलाय त्यात. Happy

सगळीच छान झालीत. ते वारली पेंटिंगवालं मला जास्त आवडलं. Happy

मी असं एक (न रंगवलेलं...ते डेअरिंग नाही आहे एनिवे) कपाट भाचीला दिलंय. तिची चित्रकला चांगली आहे. तिला तुझी आयडीया दिली तर चालेल नं?

अफलातुन!

काय सुंदर झालेत हे ज्वेलरी बॉक्सेस!!! Happy

अल्पना... तुस्सी ग्रेट हो Happy घर, लहान मुलगा, येणं-जाणं, नोकरी सगळं सांभाळून तु हल्ली काय काय कलत्मक गोष्टी करत असतेत्स गं.... Happy

पेंट केलेले सहाफुटी कपाट आणि वॉल लवकर बघायला मिळू देत Happy

वेका, अगं नक्की सांग भाचीला रंगवायला आणि तिने रंगवल्यावर इथे दाखव पण. Happy

लाजो, Happy मध्यंतरी अचानक बर्‍यापैकी रिकामा वेळ मिळाला म्हणून मग मिळेल त्या वस्तूंवर रंगवायला सुरवात केली होती.इतकं मस्त वाटायचं. Happy त्यामूळे आता मुद्दाम वेळ काढतेच. आवडत्या कामासाठी आपोआप मिळतो वेळ. Happy

कित्ती सुंदर केलयसं... मस्त!
टी कोस्टर्स तर एकदम नाजुक डिझाइन्स मधे क्युट दिसतायत.. Happy

अल्पना.खूप छान कलाकार आहेस तू ..किती नाविन्यपूर्ण कपाटे केली आहेस.स्वता,कल्पकतेने कपाटे रंगवुन ,तयार करुन जावांना दिल्याने त्यांच्या कौतुकास पात्र ठरली असशील.दिल्ली हाट /चांदनी चौक/पहाडगंज रेल्वे स्टॅशनबाहेर टोपल्यात मातीच्या अगदी लहान लहान अर्धा इंच ते एक ईच उंचीच्या सपाट बेस असलेल्या --जेणेकरुन चिकटवता येतील अशा खूप छान मुर्ती,फळ-फुले-कार्टुन कॅरेक्टर मिळतात.."बारी किंवा मातीच्या तवा/तावडीवर चिकटवतात व नंतर त्यावर रंग्काम करतात.त्याचाही तुला वापर करता येईल.

Pages