पणत्या

Submitted by तृप्ती आवटी on 31 October, 2013 - 19:50

तुम्हाला आणि तुमच्या आप्तस्वकीयांना दिवाळी निमित्त फराळी शुभेच्छा!!!

गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं(*)-

photo(1).JPGpaNatyaa.jpg

माझ्या सारखे कुणी लेमन आणि ले-मन्या असतील तर त्यांना थोडासा दिलासा, आधार, धीर, हुरूप देण्यासाठी काही सूचना:
१. अजिबात घाबरायचं नाही.
२. धीर सुटू द्यायचा नाही.
३. म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.

* पहिल्या प्रकाशचित्रात आहेत त्यापैकी एक मोठी आणि इतर पाच मी केल्यात. बाकी पणत्यांना एक मैत्रिण, तिचा नवरा, माझा नवरा यांचे हात लागलेत. दुसर्‍या चित्रातल्या स-ग-ळ्या मी रंगवल्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला!!! सह्हीच झाल्यात की. सिंडीबाय तुम्हीपण कलाकारांच्या कळपात गेल्या म्हणायच्या!

>>>>
१. अजिबात घाबरायचं नाही.
२. धीर सुटू द्यायचा नाही.
३. म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.

>>>>> Proud

वॉव..सिंडरेला.. सह्हीच झाल्यात पणत्या.. इतक्या सुर्रेख पणतींमधे तेल ,वात लावाविशी वाटेल का???? ऊप्स!!

सूचना, लई म्हंजे लईच्च आवडल्या Lol

सुरेखच Happy

मी लेमनी कॅटेगरी वालीच आहे. दहा वेळा करुन बघायचा झटका येऊन आवरतं घेतलय कारण स्वतःच्या रंग कौशल्यावर फारच गाढा विश्वास आहे Proud

तरी एकदा तरी हे प्रक्रण हाताळायचा मोह होतोय. रंग कोणते वापरलेस? आणि वर काही वॉर्निश टाईपचं लावावं लागतं का?

असच ह्यावेळी सिडी क्राफ्ट रांगोळी करायचा प्ल्यान होता (नुसताच डोक्यात) सिडी घरात आहेतच. ग्लास पेंटींग कलर चालतील असं वाचलय नेटवर एका ठिकाणी. बघू त्यालाही मुहूर्त कधी लागतोय. तू त्याचेही प्रयोग केले आहेस का? असशील तर त्याबाबतीतही ह्या लेमनीला टिप दे

मस्त !

छानच.

>> म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.
Lol

मस्त झाल्यात पणत्या. Happy

धन्यवाद सगळ्यांना Happy

वर्षु, सई- अशा पणत्यांमध्ये तेल आणि वात मी तरी घालत नाही. टी लाइट्स लावायचे.

कविता, अनया- लाल आणि कॉपर रंग ग्लास पेंट आहे. बाकीचे अ‍ॅक्रिलिक आउटडोअर पेंट्स आहेत. वरून काही कोटिंग केलेले नाही. दुसर्‍या प्रचिमधल्या गडद निळ्या आणि हिरव्या रंगासाठी ऑइल पेंट बेस्ड पेन्स वापरले आहेत. या पेनांना निब आहे आणि शाईपेन सारखे चालतात. त्यामुळे काम खूप सोपं होतं. पण एक तर हे पेन्स लगेच बंद पडले. दुसरे महत्वाचे म्हणजे त्यात xylene असतं असं त्यावर लिहिलं आहे. त्यामुळे वापरायचे की नाही तुम्ही ठरवा. ब्रश ईशानच्या बॉक्समध्ये सापडले ते घेतले.

कविता, सिडी क्राफ्ट रांगोळी गेल्या वर्षी केली होती. त्यासाठीच तो लाल ग्लास पेंट आणला होता Happy रांगोळीत रंगकाम कमी आणि रेडीमेड खडे वगैरे वापरले तर पटकन होते आणि जास्त चांगली दिसते.

सिंडे, शेवटी आहेत त्या डिझायनर पणत्या प्लेन कुठे मिळाल्या? इथे मिळणार्‍या सगळ्या रंगवलेल्याच बघितल्या आहेत.

Pages