पणत्या

Submitted by तृप्ती आवटी on 31 October, 2013 - 19:50

तुम्हाला आणि तुमच्या आप्तस्वकीयांना दिवाळी निमित्त फराळी शुभेच्छा!!!

गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं(*)-

photo(1).JPGpaNatyaa.jpg

माझ्या सारखे कुणी लेमन आणि ले-मन्या असतील तर त्यांना थोडासा दिलासा, आधार, धीर, हुरूप देण्यासाठी काही सूचना:
१. अजिबात घाबरायचं नाही.
२. धीर सुटू द्यायचा नाही.
३. म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.

* पहिल्या प्रकाशचित्रात आहेत त्यापैकी एक मोठी आणि इतर पाच मी केल्यात. बाकी पणत्यांना एक मैत्रिण, तिचा नवरा, माझा नवरा यांचे हात लागलेत. दुसर्‍या चित्रातल्या स-ग-ळ्या मी रंगवल्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूचना, Lol

पणत्या सुंदर रंगवल्यात.

(वरच्या फोटोत, नेमक्या कुठल्या पणत्या कोणी रंगवल्यात याचा उल्लेख शिताफीनं टाळला गेला आहे. :P)

कुठल्या पणत्या कोणी रंगवल्यात याचा उल्लेख शिताफीनं टाळला >>> ते इतरांच्या भावना दुखावतील म्हणून Proud

सायो, इथे मिळाल्या इंडियन स्टोअरमध्ये. मला खरं तर प्लेन हव्या होत्या पण नाही मिळाल्या.

मस्त !!!!

हस्तकला विभागात स्वागत.

सगळ्याच पणत्या सुंदर रंगवल्यात.

सूचना पण भारीच एकदम. Happy

माझा एक झब्बू.

pantya_1.jpgpantya.jpg

सिन्ड्रेला ......झकास आहे ...<<<<माझ्या सारखे कुणी ले-मॅन आणि ले-मन्या असतील तर त्यांना थोडासा दिलासा, आधार, धीर, हुरूप देण्यासाठी काही सूचना:>>>>.. फारच आवडेश आणी भावेश ...:) Happy

"गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं" >>> फार गोंडस, सुंदर बाळं आहेत Happy

आणि अशा चुका वारंवार घडाव्यात ही सदिच्छा.

>>गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं(*)->>>>

बाळं फार गोजिरवाणी आहेत बरं का सिंडी!! Happy पुन्हा चान्स घ्या.....एक से भले दो(सौ), दो से भले........ Wink

सिंडे, मी एक पणती भीत भीत रंगवून बघीतली Proud चक्क जमली Happy मला ग्लास पेंटींग चे रंग मिळाले नाहीत म्हणून मी फॅब्रीक कलर्स आणले आणि सिडी क्राफ्ट पण केलं त्यातही फॅब्रीक आणि ग्लीटर कलर्स वापरले. फोटो सध्या मोबाईल मधे आहेत. वेळ मिळाला की इथे टाकेन

म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.
Biggrin
तरी बाळं गोड आहेत हं सिंडी! आणि असंच पाऊल नेहेमीच वाकडं पडू दे! :स्मितः

ख त र ना क.....

तू लेमनी व्गैरे नसावीस्...खर्^या लेमन्यांच्या पणत्या इतक्या सुंदर होणं शक्य नाही (मला विचार)

रच्याकने, ते कुठले रंग वगैरे वापरलेस त्या प्रश्नाचं उत्तर वेळ मिळाला की वरती मूळ पोस्टमध्ये चिकटव. खर्^या लेमन्यांना उपयोगी पडेल.

सीडी क्राफ्ट म्हणजे सीडीच्या मागच्या चमकत्या बाजूला कलाकुसर करतात. त्यावर पणत्या ठेवल्या की खूप सुरेख दिसतं. हा एक नमुना आम्हाला गिफ्ट मिळालेला. यात खूप हेवी वर्क केलं आहे. त्यानंतरचे आहेत ते आम्ही घरी केलेले. आमचे एकदम बेसिक आहेत. पण असं विरळ काम असेल तरच पणतीचा प्रकाश छान परावर्तित होतो.

cdcraft2.jpgcdcraft.JPG

Pages