Submitted by मुग्धमानसी on 7 October, 2013 - 02:23
प्रेम तर करायचं असं ठरलंय...
पण अंतर राखायचं असं ठरलंय!
पुढच्यावेळी एकमेकांना दुखावताना...
नंतर हसून ’असूदे’ म्हणायचं असं ठरलंय!
कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय!
तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता मिटता...
स्वतःसाठी गंध जपायचं असं ठरलंय!
तुझ्याविना मी असणे काही सोसत नाही...
भांडणसुद्धा सोबत न्यायचं असं ठरलंय!
कधी शेवटी तुला-मला हे कळेल तेंव्हा...
रडं उरातील वाहू द्यायचं असं ठरलंय!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मस्तच!!!
मस्तच!!!
व्वा , क्या बात आहे. मस्तच …
व्वा , क्या बात आहे. मस्तच …
तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता
तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता मिटता...
स्वतःसाठी गंध जपायचं असं ठरलंय!
>>
वाह!
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय!
वा.
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय!
तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता मिटता...
स्वतःसाठी गंध जपायचं असं ठरलंय!
>>>> छान अगदी मनातल
तुझ्याविना मी असणे काही सोसत
तुझ्याविना मी असणे काही सोसत नाही...
भांडणसुद्धा सोबत न्यायचं असं ठरलंय!
खुप सुंदर रचना....
व्वा..!
व्वा..!
छानंच
छानंच
धन्यवाद!
धन्यवाद!
मस्तच ...
मस्तच ...
फारच छान.
फारच छान.
कुशीत अलगद् भल्या पहाटे
कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!
खूप आवडली!
मस्तच ...
मस्तच ...
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
शाब्बास ग
शाब्बास ग
खूप आवडली
खूप आवडली
कुशीत अलगद् भल्या पहाटे
कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय! >> सुंदर
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय! >>> छान ओळी.
प्रेम तर करायचं असं ठरलंय...
पण अंतर राखायचं असं ठरलंय! >>> यातली पहिली ओळ पटली नाही. कारण प्रेम ठरवून करता येत नाही.
बरोबर उकाका, पण मला वाटतं की
बरोबर उकाका, पण मला वाटतं की त्या ओळीचा अर्थ की "प्रेम बसलं आहे, तर ते निभवायचं" असा असावा.
खूप सुन्दर. एकेका शब्दाशी मी
खूप सुन्दर. एकेका शब्दाशी मी relate करू शकतेय. काठाकाठावरून चालायचं . जमलं तर थोडे पाय बुडवून पहायचे. उडी घ्यायचीच नाही. वाहून तर मुळीच जायचं नाही.
फार छान.
फार छान.
धन्यवाद!
धन्यवाद!