ठरलंय!

Submitted by मुग्धमानसी on 7 October, 2013 - 02:23

प्रेम तर करायचं असं ठरलंय...
पण अंतर राखायचं असं ठरलंय!

पुढच्यावेळी एकमेकांना दुखावताना...
नंतर हसून ’असूदे’ म्हणायचं असं ठरलंय!

कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!

तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय!

तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता मिटता...
स्वतःसाठी गंध जपायचं असं ठरलंय!

तुझ्याविना मी असणे काही सोसत नाही...
भांडणसुद्धा सोबत न्यायचं असं ठरलंय!

कधी शेवटी तुला-मला हे कळेल तेंव्हा...
रडं उरातील वाहू द्यायचं असं ठरलंय!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय!

तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता मिटता...
स्वतःसाठी गंध जपायचं असं ठरलंय!

>>>> छान अगदी मनातल

कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!

खूप आवडली!

कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!

तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय! >> सुंदर

तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय! >>> छान ओळी.

प्रेम तर करायचं असं ठरलंय...
पण अंतर राखायचं असं ठरलंय! >>> यातली पहिली ओळ पटली नाही. कारण प्रेम ठरवून करता येत नाही.

खूप सुन्दर. एकेका शब्दाशी मी relate करू शकतेय. काठाकाठावरून चालायचं . जमलं तर थोडे पाय बुडवून पहायचे. उडी घ्यायचीच नाही. वाहून तर मुळीच जायचं नाही. Happy