ज्युनियर के जी अभ्यासक्रम.

Submitted by साती on 1 October, 2013 - 07:04

नर्सरीच्या अभ्यासक्रमाबद्दल सांगोपांग चर्चा इथे वाचली.
ज्युनियर आणि सिनीयर के जी च्या अभ्यासक्रमाबद्दल इथे चर्चा करूया.
आमच्या मुलाच्या शाळेत कन्नड, हिंदी मूळाक्षरे, इंग्रजी कॅपिटल , स्मॉल , करसिव रायटिंग , दोन ते पाच पाढे , एक ते शंभर आकडे एवढे सगळे लिहीणे ज्युनियर केजीत अपेक्षित आहे.
हे फारच जास्तं आहे असे आमचे मत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनिधीला ज्युनिअर केजीला पहिले सहा महिने फक्त आडव्या उभ्या रेघा (तेच standing line, sleeping line etc) आहे. तमिळ मुळाक्षरांची ओळख आहे. गाणी पंचवीस तीस आहेत. हिंदी तिसरीनंतर चालू होईल. (तेव्हा हिंदी अथवा संस्कृत असा ऑप्शन असेल). आकड्यांचे अजून काही माहित नाही.

साती, पाढे वगैरे केजीला जरा जास्तच होत नाहीत का? अक्षरे पण खूप लिहिणे अपेक्षित आहे. ज्युनिअर केजीला नक्की किती वयाची मुले आहेत शाळेमध्ये?

ज्जे बात!
धन्स हा धागा सुरु केल्याबद्दल.
माझ्या मुलाला, सि. केजि. मधे cbsc १ते ५० अक्षरात, निबंध- cow, environmental studies- que. ans. for eg. where is air?= air is everywhere
मी आणि माझी मैत्रीण काय हसलो आहोत वेड्यासारख्या......
this, that, words
माझ्या मते, नव्हे तर खरेच, ५ वर्षांच्या मानाने हा खुप जास्त आहे अभ्यास. and the most imp. thing is it is mugging up and not the real understanding.
they do not know what is vovel etc.

नंदिनी पुण्यात वय वर्षे साडेतीन पूर्ण असलेली मुले लोअर केजीला पात्र ठरतात( सर्वच शाळांमध्ये) माझ्या मुलीला आधी इंग्लिश अल्फाबेटस, १ ते १० आकडे, नंतर त्यांचे स्पेलिंग्ज वगैरे होते. अप्पर केजीला १ ते ५० आधी नंतर १ ते १०० आकडे व कर्सिव्ह रायटिंग होते. अभ्यास जास्त आहे.:अरेरे:

दोन ते पाच पाढे , एक ते शंभर आकडे एवढे सगळे लिहीणे ज्युनियर केजीत अपेक्षित आहे. >>> शिक्षण मंडळाने जागोजागी कारकुनांचा कारखाना उघडलेला आहे.

सुनिधीच्या शाळेत तीन ते चार वयोगटाची मुले आहेत ज्यू. केजीला. नर्सरी नसल्यामुळे अक्षर ओळखीपासून सुरुवात आहे सध्या त्यांची. जास्त भर गाणी आणि तोंडी इंफोवरच आहे.

तिला काही आलं नाही तरी मिस म्हणते ठीक आहे. नेक्स्ट वीकमध्ये जमते का ते बघू!! अद्याप सुनिधी चार धड उभ्या आडव्या रेघा काढत नाही. आणि मी पण जास्त नादात जात नाही. ती आणि टीचर काही का घोळ घालेनात.

देवा रे!
बिच्चारी मुलं. Sad

मुग्धानंद, सिबिएससी चा पहिली दुसरीचा अभ्यासक्रम सोपा वाटतोय मला.

करसिव रायटिंग , दोन ते पाच पाढे >>>> हे जास्त आहे...

१ ते १०० लिहायला होतं बहुद्धा पण शेवटच्या सहा महिन्यात तिथवर पोचले ते.

माझ्या मुलाला पहिलीत कर्सिव्ह सुरु झालय.
पाढे अजुन नाहियेत.

साती, अतिच होतय. येशा आता दुसरीला आहे आणि त्यांना टेबल्स सुरु केलेत आता ०,१,२ चे.

नंदिनी म्हणतेय त्याप्रमाणे फक्त स्टँडिंग लाईन, स्लीपींग लाईन, स्लांटिंग लाईन बस्स इतकच. चित्र रंगवणे. शेप्स, नंबर्स हे सगळे सिनियर केजीत. आता फक्त जाणे, डबा खाणे आणि गाणी म्हणणे.

आमच्या कडे पहिलीला १ ते ३ पाढे आणि सोबतीला कवितांचे धडे सुरु आहेत. बर त्या कविता लईत म्हणायच म्हट्लं तरी पंचाईत.

सावली + १०० !

मी हेच लिहायला आले होते. आम्ही मुलाची नर्सरी अमेरिकेत आणि ज्युनियर-सिनियर युकेत केली. आता भारतात पहिलीत ICSE मध्ये घातले आहे. जास्त अभ्यास असावा असे माझे कधीच मत नव्हते पण गेल्यावर्षीपेक्षा अभ्यासक्रमात घसरणच आहे हे मात्र थोडे खटकतेय. हे फक्त आमचेच मत नाही तर भारतात ज्युनियर-सिनियर करणार्‍यांचेही ठाम मत आहे. असे असेल तर ज्युनियर-सिनियरला इतका भार का घालावा ?

खरं तर गेल्यावर्षी कर्सिव्हही लिहित होता. ह्यावर्षी मात्र शाळेत प्रिंटमध्येच लिहायला सांगितले. भारतात ज्यु.-सिनियर केलेल्यांचाही हाच अनुभव.

हा आभ्यासक्रम नक्किच जास्त आहे.. करसिव रायटिंग , पाढे आत्ताच ? Sad
माझा मुलगा U.K.G cbse ला आहे त्याला ह्यावर्षी करसिव रायटिंग ची सुरुवात आहे..
L.K.G ला हिंदी अ से अ: , इंग्रजी कॅपिटल , स्मॉल , १ ते ५० अंक , समाजशास्त्र इतक होत.. पण तेही मला जास्त वाटत होत .. Sad

माझ्या मुलाला, ज्यु. केजि. मधे cbsc १ते १०० अंक, हिंदी मूळाक्षरे, इंग्रजी कॅपिटल , स्मॉल अक्षरे .- प्र. महीना- पोएम्स कमीत कमी २ (१०-१२ ओळी) , इंग्रजी गोष्ट १-२, हिंदी १ , हिंदी कविता (४-४ ओळी) २, एका वाक्यात उत्तरे(तोंडी), १०. Conversation (my school, my self, cleaniness, diwali, ganesh chaturthi etc..) 2.

इतका अभ्यास खुप वाटतो.

अगदी अगदी.
त्यात कन्नड आणि हिंदी दोन्ही स्क्रिप्ट लिहायला जाम किचकट.
हिंदीत बाराक्षरी आणि कानडीत चौदाक्षरी ही कन्सेप्टही पोरांना कळणे कठीण.
परवा पॅरेंट टीचर मिटींगला बाईंना हे सांगितलं तर सरळ तुम्ही घरी जास्त अभ्यास करून घ्या म्हणे.
बाई खूप गोड आहेत आणि मुलाला आवडतातही त्यामुळे काही जास्तं बोलू शकत नाही.
पण बाईंनी कुठेतरी ट्यूशनला घाला असंही आडून सुचवलं.
तरी आमचा मुलगा वर्गात तिसरा आहे.
एवढ्या लहान मुलांना गुण देणे , नंबर लावणे हे चुकीचं आहे.
त्या ऐवजी नुसत्या श्रेण्या द्या सांगितलं तर श्रेण्याही दिलेल्या आहेतच की हे उत्तर.

मात्रं बाई जास्तं जबरदस्ती करत नाहित लिहायची ही चांगली बाब आहे.
मुलगा शाळेवर एकंदर खूश आहे.
पण हे भाषांचे कन्फ्यूजन आणि पाढे पाठ करायला लावणं मला अति वाटतंय.

If you are staying anywhere in/near Bangalore please try and visit Vibgyor kids. They have grading system and assessments for kids over 50 parameters. There are 4 grades : skills acquired, gaining mastery, learning and development, trying to attempt. Even the grades doesn't have negative notion to them. H/w is given only on weekends 1-2 pages of alphabet book + number book. They used to have field trip every month(It used to be going to Hypercity super market, going to ice-cream parlour to learn colours :), even mcdonalds (Don't know what they taught there coz my son definitely knows that it's a junk food), HAL museum, banerghatta national park (this was family field trip) . Every month they used to have a theme for monthly syllabus.

They don't have exams till 4th std. No exams, no marks, no numbers. In first std. they taught table of 2,5,10 and that too skip counting, say no to remembering.

Following were assessment parameters for Jr. Kg. to get a idea about syllabus:

Physical Development

GROSS MOTOR SKILLS
Jumps into a hoop
Rolls a ball to a target
Catches a ball thrown to him / her
Can kick a ball in a specified direction
Walks sideways
Walks backward
Walks forward on toes
Balances a beanbag on the head
Moves rhythmically to music
Hops on one leg
Walks on a balance beam unaided

FINE MOTOR SKILLS
Sorts pulses/ legumes
Cuts with scissors
Plays with puzzles
Copies shapes
Traces around shapes
Uses tongs/fingers to sort objects
Threads macaroni
Draws a recognisable picture of a person

COGNITIVE DEVELOPMENT

UNDERSTANDING CONCEPTS
Displays an understanding of the themes and answers related questions
Recognises and names colours

CREATIVE THINKING
Contributes ideas during play
Displays creativity and imagination
Seeks new experiences
Creates new things from available material

PERCEPTUAL SKILLS
Identifies missing parts, similarities and differences in pictures/objects
Finds two matching pictures from a group of pictures
Sequences pictures to tell a story
Completes puzzles
Copies patterns
Describes the uses of objects
Identifies left and right hand

LANGUAGE DEVELOPMENT
TALKING / ARTICULATION
Retells stories
Tells a story from a picture book
Relates recent experiences
Talks about self and family
Recites short rhymes / poems with appropriate expressions and gestures
Communicates ideas effectively in a logical sequence
Uses positional words
Describes an object/picture in short sentences
Understands and relates events in a sequence
Asks questions to obtain information
Asks questions appropriate to a situation

LISTENING SKILLS

Follows simple directions
Listens attentively to concept related information
Carries out a series of four related instructions in proper order

FORMAL WORKS
READING SKILLS

Recognises and names uppercase letters
Recognises and names lowercase letters
Associates all the letters to its appropriate phonic sound
Associates all letters to related vocabulary
Displays an interest in books
Turns pages in a book
Identifies and reads three letter words
Reads sight words/ phrases from the reader
Connects letters in the correct alphabetical order

MATHEMATICAL SKILLS

Recognises and names numerals
Rote counts
Associates numbers to their value
Understands the concept of ordinal numbers
Knows the days of the week
Knows the months of the year
Classifies objects according to their use
Categorizes objects
Seriates objects
Grades objects according to size
Recognises shapes
Correctly answers questions on mathematical concepts
Has a basic understanding of the concept of time
Rearranges numerals in the mentioned order
Understands spatial relationships

WRITING SKILLS
Writes upper case letters
Writes single digit numerals
Copies shapes and lines
Draws a self-portrait
Traces along a dotted line
Colours within the outline
Prints first name

SOCIAL DEVELOPMENT

ROLE PLAYING
Participates with others in dramatic play
Understands when told “Let's pretend.”
Plays roles observed in life experiences
Distinguishes between fantasy and reality
FLEXIBILITY
Accepts changes in plans and schedules
Participates cooperatively in small and large group activities
UNDERSTANDING FEELINGS
Identifies and expresses own feelings and thoughts
Understands how others feel and think
Comforts friends when they are upset

SOCIAL SKILLS

Plays cooperatively in a group
Shares materials with other children
Waits for a turn to use a desired toy
Accepts authority and acts within established rules
Shows awareness and respect for the needs of others
Resolves conflicts in an appropriate manner
Makes decisions / choices

PERSONAL DEVELOPMENT
DEVELOPMENT OF SELF RELIANCE AND ORGANIZATIONAL SKILLS
Completes assigned tasks
Manages routine tasks independently
Concentrates on the task at hand
Comprehends verbal instructions
Displays a sense of responsibility towards possessions
Displays self-confidence
Uses the washroom independently

COMPUTER
COMPUTER EXPERIENCE

Manipulates the mouse
Shows keen interest
Follows instructions and performs tasks

Sorry the response is too big, if it's not helpful I will remove it.

साती,

गणिताच्या बाबतीत आपण भारतीय वंशाचे लोक जरा जास्त सक्षम आहोत असे मला अनुभवावरून वाटतेय.
त्यामूळे जर योग्य तर्‍हेने आणि त्यांच्या कलाने जर मुलांची ही क्षमता विकसित केली, तर पुढे फायदा होतो.
माझ्या क्षेत्रात केवळ दोन संख्यांकडे बघून, त्यातले संबंध आम्हाला कळावे लागतात. ( उदा. सेल्स आणि त्यावरचा टॅक्स या दोन संख्या बघून टॅक्सचा रेट किती आहे त्याचा पटकन अंदाज यावा लागतो. ) त्या वेळी
आपली ही नैसर्गिक क्षमता उपयोगी पडते.

माझ्या बाबतीत मला थेट दुसरीत घातल्याने पाढे पाठ करायची वेळच आली नाही. मला आजही पाढे येत नाहीत. पण ते पाठ केले असते तर चांगले झाले असते असे वाटते.

हाँगकाँग मधे मात्र आपल्यापेक्षा फार वेगळ्या तर्‍हेने शिकवले जाते ( यू ट्यूबवर क्लीप्स आहेत ) फळ्यावर ( पडद्यावर ) भराभर काही आकडे प्रोजेक्ट करून, ती संपल्याबरोबर मुलांचे उत्तर तयार असते. त्यांच्याकडे
गणिताचे, हातानी चालवायचे उपकरणही असते.

माझ्या परदेशी ( मुद्दाम देशांची नावे घेत नाही, पण यात सो कॉल्ड विकसित देशही आहेत. ) सहकार्‍यांकडे ही
क्षमता अभावानेच आढळते. दहाने गुणताना संखेपुढे केवळ एक शून्य दिले किंवा डेसिमल पाँईट उजवीकडे सरकवला, एवढी बेसिक युक्ती पण त्यांना शिकवलेली नसते.

तरी एक मुद्दा मात्र आवर्जून मांडावासा वाटतो, तो म्हणजे मुलांचा नैसर्गिक कल बघूनच शिक्षण द्यावे. एखाद्याला चित्रकलेत गति असेल तर नियमित अभ्यासाचे ओझे न लादता, केवळ चित्रकलेची साधना करणे,
त्याला शक्य व्हावे. प्रत्येक मूलाचा स्वतंत्रपणे विचार व्हावा, छापाचे गणपती बनू नयेत.

अग बाबो.. केव्हढा हा अभ्यास क्रम..

मुलीनी अभ्यास केला तर केला नाही केला तर नाही केला अशीच अपेक्षा ठेवणार आहे.. फार काही फरक पडत नाही.. प्रचंड अभ्यास करुन किंवा पाठांतर करुन.. त्यापेक्षा काय चालू आहे ते समजून घेतले तर जास्त उपयोग होतो. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे..

>>यार असते. त्यांच्याकडे
गणिताचे, हातानी चालवायचे उपकरणही असते.>> अ‍ॅबाकस का?

उदयन, पण तुमच्या मुलांचे काय?
Wink

राजसी, तुम्ही दिलेला अभ्यासक्रम खरेच सुंदर आहे.
मी एच के रिजनमध्ये रहाते म्हणजे बेंगलोरपासून सुमारे ६०० किमी फक्तं!

अहो त्यांना ऑप्शनच नाही आहे... Happy

आणि आशा आहे की काहीवर्षात डोके वापरणारे राजकारणी सत्तेवर येतील.. ज्यामुळे काही चांगले बदल होतील

गणिताच्या बाबतीत आपण भारतीय वंशाचे लोक जरा जास्त सक्षम आहोत >>>> Uhoh दिनेश दा मला भेटाच मग Happy

दिनेश हे गणिताचं ठिक आहे पण वेगवेगळ्या भाषा लिहायला शिकवणं अती होतंय.
बोलायला शिकवणे चांगले.
आमच्या मुलाने स्वतःच स्वतःची भाषा हिंदी ठरवून टाकलीय.

बाकी भाषा समजत/ बोलता येत असल्या तरी ढिम्म बोलत नाही.

बोलायला शिकवणे चांगले.
>>> मला शाळावाल्यांचा हा फंडा समाजात नाही की भाषा लिहून कशी शिकवतात? मुलांना हिंदी बोलताच येत नसेल तर मुळाक्षरे गिरवून काय फायदा. पहिले सहा महिने तरी आधी बोलायला शिकवा की. अक्षर ओळख घ्या.

कानडीमध्ये ते छोटा ए मोठा ए मध्ये फार कन्फ्युजन आहे. भरीस भर च छ शिकवताना मोठा च छोटा च असे करत शिकवतात (धारवाडमध्ये तरी असं पाहिलंय) त्यात मग पोरं अजून गोंधळ घालतात.

नंदिनी, ते ए मोठा ए आणि ऐ, तसेच ओ मोठा ओ आणि औ यात मलाच कधीकधी कन्फ्यूजन होते तर मुलाला काय कपाळ शिकवणार!
त्यात इथे बोलतात तसं लिहित नाहीत.
हा प्रॉब्लेम मला रत्नागिरीत मराठी शिकताना आला नाही कारण घरात आईबाबांशी ज्या प्रमाण मराठीत बोलत होते ती भाषा आणि शाळेत शिकताना वापरायची शिक्षकांची आणि पुस्तकातली भाषा एकच होती.
इथे आम्ही बोलतो ती कन्नड वेगळीच आणि पुस्तकातली वेगळीच. शिक्षकांनाही पुस्तकी कानडी नीट येत नाही.
एकंदत आमच्या मुलाचे हाल होणार आहेत.

भाषा शिकायचे पण एक तंत्र आहे. अक्षरओळख नंतर झाली तरी चालेल पण स्वतः त्या भाषेत विचार करून,
आपली वाक्ये तयार करता आली पाहिजेत.
घरी नाही पण मुलाला आवडणारी एखादी घराबाहेरची व्यक्ती जर वेगळ्या भाषेत बोलत असेल, तर लहान मुले ती भाषा लवकर शिकतात. त्यांच्या मित्रमैत्रिणींशी वेगळ्या भाषेत संवाद साधायला त्यांना अजिबात जड जात नाही. पण तेच जर अभ्यास म्हणून शिकावे लागले तर जड जाते.

बापरे! इतका अभ्यास??
उदयन .. पहिली पोस्ट +१

माझ्या आठवणीनुसार , मी बालवाडीत जायचे ते खेळायला ,नाचायला नि नावापुरता अभ्यास कराय्चा .. मग तेव्हा सरकारतर्फे (बहुतेक) सुकडी (लापशी रवा सारंख) मिळायचं.. ड्ब्बा भरुन खायची नि घरी परत Happy

मित्राचा भाचा पण ईंग्लिश मिडीमय CBSE KG ला आहे.. आताच ट्युशन ला जातो Uhoh Sad
त्याच्या घरी सगळं मराठी .. त्यामुळे चित्र ओळखायला सांगितल की राजे मराठीत सुरु होतात मग आठवण करुन द्यावी लागते ईंग्लिशची

>>दिनेश. | 1 October, 2013 - 10:18
नाव लक्षात नाही, पण मणी असतात आणि ते हातानी सरकवून गणिते करतात.>> तेच अ‍ॅबाकस. जॅपनीज, चायनीज वयस्कर माणसांना वापरताना पाहिलंय गणिताकरता.

हो, आमच्याकडे पण डोरेमॉनमुळे हिंदी भाषा आवडती बनलीय.
पण तरी चार वर्षाच्या मुलाला ऋ लिहिता आला पाहिजे ही अपेक्षा चुकीची वाटते.
ते पण दोन-दोन लिप्यांत.

मी इथे सगळं याकरिता विचारतेय की आमच्या लहानपणी अभ्यास पहिलीलाच सुरू झाला, तो ही पाटीवर मावेल इतकच असे.
आत्ता नेमका अभ्यास सगळीकडे किती अभिप्रेत आहे ते बघावे.
म्हणजे त्यानुसार मुलावर किती ओझे टाकायचे ते ठरवता येईल.

शाळेतल्या वेगाने लिहायला शिकवायचे नाही हे मात्रं आम्ही पक्कं करून टाकलंय.

साती,
मला वाटतं मुलाची स्वतःची आवड बघून त्याला संधी द्यावी.
मायबोलीकर सईच्या मुलाला शाळेत न घालता घरीच शिकवतात. तो मला इतर मुलांइतकाच चुणचुणीत वाटतो. तिला तिचे अनुभव इथे लिहायला सांगू या.

हो सायो, तेच.

दक्षिण अमेरीकेत पण गाठी असलेल्या दोर्‍यांचे एक साधन वापरतात. ( किंवा मायन लोक वापरत असत.
अवकाशातील ग्रहतार्‍यांशी संबंधित गणिते, त्यावर करत असत. )

Pages