आयसिसी T20 विश्वचषक

Submitted by केदार on 5 June, 2009 - 11:46

आजपासून विश्वचषक सुरु होणार. Happy कोण जिंकेल?

मला वाटतं भारत परत जिंकणार, कारण आपल्या सर्वच खेळाडूंना आयपियल मुळे व्यवस्थित सराव मिळाला आहे. तसेच बरेच भारतिय खेळाडू (रैना, धोनी, आर पी, गंभीर, रोहित, झहिर) फॉर्मात आहेत.

पॅकेज
http://www.liverel.com/Beta $25

http://www.willow.tv/EventMgmt/Default.asp $७९

http://www.action8cricket.com/watch_live_cricket_score.htm

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबे, आने दो आने दो! डरते है क्या?

सुनो गौरसे दुनियावालो, बुरी नजर ... इ. इ. माहित आहे ना!!
Happy Light 1

अरे भाऊ पाकिस्तान आलेलच बरय, ते ही ऐन वेळी गलथानपणा करण्यात पटाईत आहेत, एखादी अंडरडॉग टीम आली की "नथींग टू लुज" ह्या अ‍ॅटिट्युड मुळे फायनल जिंकायलाही बसले, कसं?

अफ्रिका जिंकले. Happy जबरदस्त झाली मॅच. पण न्युझिलंडला काय झाले? अचानक सगळा टेम्पो घालवला त्यांनी.
आयपीयल सारखाच इथेही 'स्पिन' मोठा रोल प्ले करतेय. व्हॅन डि मर्व्ह रॉक्स. Happy हा माणूस मला बेंगलोरमुळे आवडला लागला आहे.

अबे, आने दो आने दो! डरते है क्या? >>> अरे आनदेव ना, डरने का क्यूं? ठोक ठोक के मारेंगे. Proud

यावेळेस वर्ल्ड कप पेक्षा नियम एका ठिकाणी वेगळा आहे - जर दोन संघांचे पॉइंट एकच झाले तर सुपर ८ मधल्या नेट रन रेट वर त्यातील कोणता पुढे जाणार ते ठरणार आणि नेट रन रेट सारखा असेल तर विकेट्स वरून आणि त्यानंतर मग त्या दोन संघातील मॅच मधे कोण जिंकला हे बघणार. यातील पहिले दोन नंबर सारखे येणे अवघड असल्याने दोन संघातील आधीच्या मॅच च्या निकालाचा फारसा परिणाम होणार नाही.

म्हणजे एका दृष्टीने सुपर ८ मधे आलेल्या संघांची आधीची कामगिरी पुसली जाउन नव्याने सुरूवात धरली जाईल.

५० ओव्हर्सच्या वर्ल्ड कप मधे (१९९९ आणि २००३ मधे. २००७ चे लक्षात नाही) आधी दोन्ही संघांमधली मॅच झाली असेल तर त्यात कोण जिंकले हे बघायचे. मग त्या दृष्टीने (उदा:) इंग्लंड ला पाक पेक्षा जास्त चान्सेस झाले असते.

भारताला सेमी मधे जाण्याचा मार्ग खडतर आहे... श्रीलंका, किवीज, आफ्रिका फुल्ल फॉर्म मधे आहेत..

गृप ए मधून भारत, सी मधून श्री लंका, व डी मधून साउथ अफ्रिका आले. बी मधून कोण? नि आठ टीममधे कोण कोण येणार?

Happy Light 1

झक्की,
सुपर एट झाले की नक्की केव्हाच.
आपल्या ग्रुपमध्ये इंग्लंड, साउथ आफ्रिका आणि वेस्ट ईंडिज आहेत तर दुसर्‍या ग्रुपमध्ये पाकिस्तान, श्रिलंका, न्युझीलंड आणि नेदरलँड आहेत.
शुक्रवारी भारत आणि वेस्ट ईंडीज मॅच आहे.

liverel.com चे package कोणी वापरत आहे का? streaming कसे आहे? आणी matches cha playback option आहे का?

मी वापरत आहे. streaming एकदम मस्त. नो बफरींग, नो सफरींग Happy प्लेबॅक ऑप्शन नाही.

आज लवकर न संपवायला काय झालं होत म्हणे? टेस्ट मॅचची प्रॅक्टीस हवी होती का? १३ फारतर १४ व्या ओव्हरला मॅच संपवायला हवी होती व युसूफ पठाणला प्रॅक्टीस साठी १ डाउन पाठवायला हवे होते.

आपण हरवू ईंग्लंडला आनि विंडीजला. नंतर एक मटका लागला की फायनल. बहूतेक SA किंवा लंके विरूद्ध. आफ्रिके बरोबर असली तर बरे.

आताच मलिंगाचे आयरलंड विरुद्ध २ बोल्ड पाहिले. तो श्रीलंकेत "लिंगोरचा" चँम्पीयन असावा.

रोहीत भाउ गेले घरी.. होपफुली बाकिचे काढतील पाहिजे असलेल्या धावा. Sad

हरलो.. अर्थात धोनीच्या अतर्क्य कॅप्टन्सीमुळेच Uhoh
बरं झालो हरलो ते आपली जिंकण्याची लायकीच नव्हती.. टीम बर्‍यापैकी यंग असूनही टेंपरामेंट कमी पडलच..
१. धोनीने आपली बॅट म्यान केलेय, अँकर रोल मधे राहायला बघतोय आणि व्ही मध्येच जमिनीलगत खेळतोय तो.. का?
२. रैनाला तिसर्‍या नंबरवरुन फॉर्मात असताना हाकलून काय साधले पहिल्या दोन मॅचेस मध्ये, त्याला असा मागे पुढे ढकलल्याने त्याच्या फॉर्मची वाट लागलीच ना?
३. जडेजा सारख्या अननुभवी खेळाडूस पुढे पाठवून भज्जी, युवी, पठाण यांना बसवून ठेवून साधले काय धोनीने?
४. इशांत शर्माला ४ ओव्हर्स आणि रुद्रप्रताप सिंग, जहीर ला (तुलनेने कमी झोडूनही) पूर्ण बॉलिंग का दिली गेली नाही?
भज्जीने वाईड वर दिलेल्या १० बाईज चांगल्याच महागात पडल्या पण एकंदरच सगळ्याच मॅचेस मध्ये कुठेही भारतीय चमू विजेता वाटलाच नाही, आधिच्या मॅचेस मधुन शिकले तर काहीच नाहीत. अशी टीम नशीबाच्या जोरावर जिंकण्यापेक्षा हरले तेच बरे, निदान क्रिकेट तरी जिंकेल!

उपास...

फुल्ल टू पटेश...

आपण कधीच विजेत्यासारखं खेळलो नाही... (एक पाकिस्तान चा सामना सोडला तर...)

ग्रेट बॅट्समन संघाचे अँकर असतात म्हणून धोनी तसं खेळायला लागलाय... पण वेळप्रसंगी ते बॅट चे तडाखे ही देतात... जे हा पूर्णपणे विसरलाय...
ईशांतला पूर्ण कोटा देणे...
रुद्रा ला बाहेर बसवणे...
बॅटिंग ऑर्डर मधे वाटेल तसा फेरफार करणे...
यातून एकच दिसून येतं की टीम प्लॅनिंग चा आभाव होता...

मॅच नंतर धोनी म्हणाला की जर मी अन् युवराज राहिलो असतो तर ९-१० चा रेट सहज अचीव्ह केला असता...
मला हसायला आलं... जी काही हाणामारी केली ती युसुफ नी, याला धड १ चौकार मारता आला नाही... आणि हा तरी स्वतःचाच माज दाखवतोय...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

हा जाणून बुझून स्वीकारलेला परभव वाटला मला तर!!

धोनीला १२ च रन रेट हवा आहे हे माहिती होते आणि ५ फलंदाज बाकी होते असे असूनही हा उचलून फटके मारू शकत नव्हता.....?? १-१ रन काढून जिंकू शकणार नाही हे ह्यला ठाउक नव्हते!!
अगदी दिसत होते की धोनीची जिंकायची इच्छा नाहिए!

-------------------------------------------------------------
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको

पूर्वी विनिंग शॉट षटकारच असावा यासाठी प्रयत्नशील असलेला धोनी, त्या प्रयत्नात विकेट घालवणारा धोनी...
आणि आता डू ऑर डाय सिचुएशन असताना चौकारही मारू न शकणारा धोनी तोच आहे यावर विश्वास ठेवणं अवघड आहे...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

>>> २. रैनाला तिसर्‍या नंबरवरुन फॉर्मात असताना हाकलून काय साधले पहिल्या दोन मॅचेस मध्ये, त्याला असा मागे पुढे ढकलल्याने त्याच्या फॉर्मची वाट लागलीच ना?

फलंदाजाला कोणत्याही क्रमांकावर खेळता यायला हवे. फलंदाजीचा क्रमांक बदलला म्हणून रैनाचा फॉर्म हरविला हे "नाचता येईना . . ." या म्हणीसारखे फुसके कारण आहे. रैनाला सुपर ८ च्या दोन्ही सामन्यात ३र्‍या क्रमांकावर पाठविले होते पण तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला व रोहित शर्माला शॉर्टपिच चेंडू खेळताच येत नव्हते. आय पी एल म्हणजे आंतरराष्ट्रिय सामने नव्हेत हे त्याला, जडेजाला आणि रोहित शर्माला आता समजले असेल.

भारत स्पर्धेतून बाहेर पडला याला धोनीच सर्वात जास्त जबाबदार आहे. कालच्या सामन्यात इरफान सारख्या अष्टपैलूला बाहेर ठेवणे, फॉर्मात नसलेल्या इशांत शर्माला आत घेऊन त्याला पूर्ण ४ षटके देणे, रूद्र प्रताप सिंगला फक्त ३ च षटके देणे व त्याला विंडिजविरूद्धच्या सामन्यात न खेळविणे, विंडिजविरूद्ध स्वत: वर येऊन संथ फलंदाजी करणे, खराब यष्टीरक्षण करणे, कालच्या सामन्यात २ खेळाडू बाद झाल्यावर युवराजला न पाठविता जडेजासारख्या संथ फलंदाजाला वर पाठविणे इ. गोष्टींना तोच जबाबदार आहे.

त्याला रोहित शर्मा व रैनाने दोन्ही सामन्यात किरकोळीत बाद होऊन चांगला हातभार लावला. भजी आणि इशांत यांनी खराब गोलंदाजी केली. गंभीर फारसे काही करू शकला नाही. जडेजाने अत्यंत संथ फलंदाजी केली.

फक्त युबराज व युसुफ पठाणने चांगली कामगिरी केली. एकंदरीत उपांत्य फेरीत जाण्याची या संघाची पात्रता नव्हती हे दिसून आले.

भारत स्पर्धेतून बाहेर पडला याला धोनीच सर्वात जास्त जबाबदार आहे>> धोनीने जबाबदारी घेऊन भारतेय जनतेची माफी मागितली आहे.
--------------
नंदिनी
--------------

धोनीने जबाबदारी घेऊन भारतेय जनतेची माफी मागितली आहे. >> त्याने काय होणार? तो ही राजकारण करतोय का?

दरवेळी नेतृत्वाने तो हारणारी मॅच जिंकून देतो, ह्यावेळी सगळे फॉर्मात असताना त्यांचा निट वापर करता नाही आला. त्याने फक्त त्याला फेवरेट असलेले प्लेअर्स खेळवले असेच वाटतेय.
रविंद्र जडेशा पेक्षा दिनेश कार्तीक कधीही चांगला होता. इशांत तर निव्वळ टीपी करतोय न्युझीलंड सिरीज पासून. तो आयपिएलला पण चाचपडतच खेळत होता. रुद्रप्रतापला न घेतल्याचे खूप नडले.

सेहवाग्-धोणी, युवी-धोणी असे वाद आपल्या टीम मध्ये चालू आहेत. आपल्या टीमचे पाकीस्थानच्या टीम सारखे होऊ नये म्हणजे झाले.

क्रिकेटच्या खेळात केंव्हा काय होईल हे सांगता येत नाही असे म्हणतातच. एखादा दिवस अगदीच वाईट जातो. नेमका तोच दिवस महत्वाचा असतो.
पण मग, पूर्वी ऑस्ट्रेलियाने अनेक वर्षे क्रिकेटमधे आपले वर्चस्व कसे कायम ठेवले होते? त्याचा अभ्यास करायला पाहिजे.

नि एकट्या धोनी ला का नावे ठेवतात? तो कोण भरपूर पैसे देऊ कोच नेमला आहे, त्याचे हे काम नाही का की कप्तानाला योग्य तो सल्ला देणे, त्याचा काय प्लॅन आहे? तो batting order, bowling याबद्दल कोणत्या प्रसंगी कसे निर्णय घेणार आहे, कसे घ्यावेत, हे कोच करण्याचे त्याचे काम नाही का?

Happy Light 1

मनावर घेउ नका मित्रांनो. क्रिकेट मधे अस चालायचच. शिवाय २०-२० म्हणजे अजून तरी लॉटरीच आहे. सट्टेबाजांचा गेम आहे हा. अगदीच अतिरेक करायचा झाला तर एक बॉलच्या मॅच मधे तेंडू सुद्धा १००% वेळा जिंकेल, अगदी शाळकरी मुलाविरूध्द , असे म्हणणे धाडसाचे ठरेल. सगळेजण चाचपडत आहेत योग्य स्ट्रॅटेजी साठी जी कायम यश देईल. एखादा फटका मॅच फिरवू शकतो. जर-तर ला खूपच वाव.
पण तरी धोनीच्या बेसिक चुका झाल्या हे मान्य करायला हवे. जसे की जडेजाला चौथा पाठवणे, आर्.पी.ला कमी वापरणे, वगैरे.
आता साउथ आफ्रिकेला जास्त सन्धी येवढेच म्हणता येइल.

एक बॉलच्या मॅच मधे तेंडू सुद्धा १००% वेळा जिंकेल, अगदी शाळकरी मुलाविरूध्द >>> सहमत. या २०-२० चे काही वाटतच नाही. कोणीही कधीही जिंकू शकेल असे वाटते.

पण एकूण इंग्लिश समर च्या पूर्वार्धात खेळणे भारताला नीट जमत नाही हे पुन्हा दिसले (गावस्कर ने हे बर्‍याच वर्षांपूर्वी लिहीले होते).

Pages