आयसिसी T20 विश्वचषक

Submitted by केदार on 5 June, 2009 - 11:46

आजपासून विश्वचषक सुरु होणार. Happy कोण जिंकेल?

मला वाटतं भारत परत जिंकणार, कारण आपल्या सर्वच खेळाडूंना आयपियल मुळे व्यवस्थित सराव मिळाला आहे. तसेच बरेच भारतिय खेळाडू (रैना, धोनी, आर पी, गंभीर, रोहित, झहिर) फॉर्मात आहेत.

पॅकेज
http://www.liverel.com/Beta $25

http://www.willow.tv/EventMgmt/Default.asp $७९

http://www.action8cricket.com/watch_live_cricket_score.htm

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साउथ अफ्रिका जिंकेल असे वाटते आहे .... टीम चांगली आहे त्यांची .... नाहीतर मग भारतच परत जिंकणार Happy

पण ह्या वेळचे गट काही बरोबर पाडलेले नाहीत बुवा ... भारतासाठी छान आहे पण Aus, WI किंवा SL पैकी १ टीम पहील्या राउंड मधे गायब होणार Sad

टेस्ट मॅचेस साठी भारताला पूर्वीपासून जुलै-ऑगस्ट मधले इंग्लंड चे दौरे जास्त चांगले ठरले आहेत -काहीतरी थंडी, स्विंग वगैरे चा परिणाम असेल. पण आता २० ओव्हर्स मधे त्याचा फारसा परिणाम होईल असे वाटत नाही. भारताला चांगला चान्स आहे.

डच जिंकले. Happy वॉव व्हॉट अ मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत गेली. क्लास.

वा.. पहिला सनसनाटी निकाल. इंग्लंडचा संघ पहिल्याच फेरीत गारद होउ शकतो. दुसरा सामना पाकबरोबर आहे.

हम्म्म्म्म ... अजून २ दिवसात राणीचा देश वल्डकप मधून बाहेर फेकला जाणार बहूतेक ...

आयला,काल कमालच केली की हॉलंडने... मी १२ ओव्हर्समध्ये इंग्लंडचा स्कोअर १०५/१ असताना पाहिला शेवटचं.. म्हटलं आरामात जिंकतील हे.. नंतर टेनीस मॅचच्या नादात इथे पाहिलेच नाही आणि ती मॅच झाल्यावर झोपलो..आणि आज नेटवर पाहिले तर हॉलंड जिंकल्याची बातमी .. सुरुवातच धक्कदायक झालीये स्पर्धेची.. सही Happy

कोणच नाय इथे? विंडीज ने मारला ऑसिजना.. ख्रिस गेल जबरी म्हणजे जबरीच खेळला...
आपला गेम मधे खूप्पच स्लो झाला.. युविने ४१(१८) हाणले म्हणून लाज राखली म्हणायची.. गंभीरच अर्धशतक म्हणजे अंगदी डक्याव डक्याव..

भारत १८०, ईरफान एकदम दे मार, ३ बॉल ११ रन.

आपल्या टीम मधे बीरू ला पण जागा नाही. (आणि खर म्हणजे सचिनला ही) .लय भारी. प्रोब्लेम ऑफ प्लेन्टी. बाकीच्यांन धड्की भरली असेल.

कोणी स्कोअर सान्गेल काय ?

ऑस्ट्रेलियाचा पराभव, १६ षटकात, पाँटिग शून्य फर्स्ट बॉल, सायमंडस परत, वाह, तसच पाहीजे.

बांगलादेश १२७/७ सही काढली मॅच आपण.. ओझा चार विकेट्स.. त्यांना ५३ हव्यात १४ चेंडूत..

छान. जिंकलो शेवटी. पण नॉट अ व्हेरी कन्व्हीनसिंग परफॉरमन्स.

जय युवी, जय ओझाजी. Happy
अरे वाट लागली होती. युवी खेळला नसता तर हारली पण असती ही मॅच. ८ ते १४ ओव्हर काय गेम चालू होता हे मज पामराला कळले नाही. बिलो पार. धोणीला यायची गरज न्हवती. रैनाला पाठवायचे होते.
इशांत, झहिर,भज्जीला आरामात ठोकत होते ते लोक. विचार करावा लागणार आपल्याला. Happy

जय ख्रिस गेल, जय फ्लेचर. काय खेळले दोघे. एकदम जबरी. ख्रिस गेल मागच्या वेळेलाही पहील्या मॅच मध्ये जबरी खेळला होता.

आज एकदम डबल बिल. ऑस्ट्रेलिया अन बांग्लादेश पराभूत. स्कॉटलंड पण जबरी खेळले.

मस्त झाल्या मॅचेस! हा फ्लेचर फारसा माहीत नाही.

प्लेचर मस्त आहे. त्याचा स्टान्स थोडा वेगळा आहे, तो ऑफचा बॉल ऑनला घेउन जायला त्याला खूप उपयोगी पडतो. त्यासाठी आता रिप्ले पाहायला बसायची इच्छा आहे.

बाकी पाँटींगतात्याला परेशान बघुन आनंद झाला. ली ला गेल ने एका ओव्हर मध्ये २७ एवढा धुतला. सचिन पाठोपाठ आता त्याला ख्रिस बद्दल कॉम्लेक्स येईल. Happy

ऑस्ट्रेलिया बाहेर. धमाल. कुमार, खरा कॅप्टन्स नॉक.

ब्रेटली ने मस्त वाट लावली शेवटी.. पाँटीग तात्याचा चेहरा बघण्यालायक.. हाण तिच्या मारी!!!

पॉटींग, सर्व्स हीम राइट!!!!
इंडीज, साऊथ अफ्रिका फॉर्मात दिसतायत, आपली बॅटींग थोडी ढिल्ली वाटली बांगला देश बरोबर पण थोडा आणखीन स्पीड पकडला तर या वेळेस ही चान्स आहे.
बाकी मंडळी, टी २० ला या वेळेस स्पीनर लोकांनी जम बसवायला सुरवात केली आहे. मला तर वाटलं टी २० स्पीनर्स ना लुप्तच करणार. त्या दिवशी ओझानी विकेट नसत्या घेतल्या तर मॅच हातातुन गेली असती.
ब्रेटली च्या निर्मा धुलाई वरुन मला कुठल्याश्या मॅच मध्ये वेंकटेश प्रसाद नी मकग्राथ ला मारलेला सिक्स आठवला Lol

आता रिप्ले पाहात होतो श्रिलंका वि ऑस्ट्रेलिया, अरे तो मलिंगा कसली फेकी बॉलींग टाकतो यार. त्याला बॉलींग करु देतायत म्हणजे कमाल आहे, काही नवीन रुल आहे का ?

आयला सुपर ८ भारताला जड जाणार असे दिसतय ... सगळ्या खतरनाक टीम येणार आपल्या ग्रुप मघे ..

भारत - विंडीज - स आफ्रीका - ईंग्लंड .... सेमी फायनल चा रस्ता फारच कठीण Sad

अगदी अगदी नयनीश मला सुद्धा तेच वाटलं पण म्हटलं ह्या स्टेजला बॉलिंग टाकतोय म्हणजे सगळ्यांनी पारखला असावा एव्हाना मलिंगाला.. त्या फेकीच्या मानाने त्याचा वेग कमीच वाटतो पण..
२०-२० मध्ये कुठल्याही टीमचा काही भरवसा देता येत नाही, ते ज्या दिवशी जसा खेळ करतील त्यावर अवलंबून.. आपल्याकडे सुदैवाने धोनीला बॉलिंगसाठी खूप ओप्शन्स आहेत आणि बॅटींगला डेप्थही आहे, हवेत बॅटी फिरवणारेच आहेत सगळे.. पण धोनीच्या कॅप्टनशीपचा ख्ररा कस आहे इतके ऑप्शन्स असल्यानेच.. फिल्डींग, क्लोज इन फील्डर्सचे अचूक थ्रोज, सेफ हँड्स फॉर कॅचेस विशेष आवश्यक आहेच.. पहिल्या मॅच मधे आपण १० ते १६ ओव्हर्सदरम्यान बॅटी म्यान केल्या ती मोठी चूक होती.. धोनीला ते आता जाणवलं असेलच.. युसुफ पठाण सारखा गदाधर आत बसून राहिला..
बरं शेहवाग ला बाहेर ठेवलय की खरच फीट नाहीये तो?
आता उत्तरोत्तर मजा येणार प्रत्येक मॅचला ह्यात शंका नाही, टेंपो मस्त जमलाय एकूणच.. उद्या पाकिस्तान बाहेर जातेय का बघायचे.. त्यांना खूप मार्जिनने जिंकावेच लागेल.. त्यादिवशी मॅचनंतर बोलताना युनुस तितका सीर्यस वाटला नाही शिवाय हरतानाही कमीत कमी फरकाने हरायला हवे म्हणजे पुढच्या मॅचचे दडपण कमी होईल असा सूज्ञ खेळही दिसला नाही पाकिस्तानचा बॅटींग करते वेळी..

सहमत. २-३ दिवसातच एकदम जोरदार इंटरेस्ट आला या स्पर्धेत (आयपीएल मधे आलाच नाही कधी).

पाकिस्तानला पुढच्या फेरीत जाण्याकरिता आजचा सामना किमान २४ धावानी किंवा ३ षटके राखून जिंकण्याची गरज आहे.

अरे मला वाटलं होतं ६० रन्स नी. हे (वरचे) शक्य दिसते.

सेहवाग पुढच्या सर्व सामन्यासाठी खाद्याच्या दुखापतीमुळे अनफिट. लवकरच भारतात परत येणार!!!
--------------
नंदिनी
--------------

२०-२० मध्ये कुठल्याही टीमचा काही भरवसा देता येत नाही, ते ज्या दिवशी जसा खेळ करतील त्यावर अवलंबून.. >>>>>>> बात मे दम है उपास Happy २० ओवर्स इतक्या पटापट संपतात, ५० ओवर्स सारखं आधी विकेट पडल्यामुळे हळू खेळुन नंतर शेवटच्या १० ओवर्स मध्ये फटकेबाजी करुन रिस्पेक्टेबल स्कोअर उभा करणे वगैरेला वावच नाही. काल श्रिलंकेच्या जेहान आणी संगाक्कारा चे शेवटच्या ३-४ ओवर्स मध्ये फटके कोणाच्या हातात न जाता वरच्या वर सीमे बाहेर गेले म्हणुन ठीक आहे नाही तर तिलकरत्ने नी केलेली जोरदार खेळी वाया गेली असती. एकंदरीत मॅच च्या कुठल्याच फेज मध्ये ढिल्लं राहुन चालत नाही. गंभीर आणी शर्मा नी अ‍ॅक्सलंरेटर वरचा पाय काढता कामा नये. बांगला देश होती म्हणुन १८० वर भागलं, साऊथ आफ्रिका, इंडीज बरोबर वाट लागली असती. बॉलींग च्या वेळेस सुद्धा त्या झहीर ची बॉलींग म्हणजे मला भितीच वाटते, टाकली तर टाकेल नीट नाही तर वाईड, नो आणी उरलेल्या वेळात ६ Happy

पाक १७५...

डच लोकांनी १५०+ करावेत हीच इच्छा...
काल ऑसी गेले... आज पाकडे जायला पाहिजेत...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

गेल्या वेळेला वूल्मर गेले. या वेळी तशी वेळ यायला नको पाकच्या कोच वर.
कादीरने तर आधिच राजिनामा दिलाय.

Pages