चेक-Maize -- तिखट - लाजो

Submitted by लाजो on 17 September, 2013 - 10:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चेक Maize

गृपः मका + पनीर + चीझ

लागणारे साहित्यः

१) बेस:
१ कप पोलेन्टा (मक्याचा रवा),
पनीरचा स्लॅब
ऑलिव्ह ऑइल / स्प्रे
मिठ

२) स्प्रेड:
१/२ कप क्रिम चीज (किंवा अवाकाडो + क्रिम चीझ )
अवाकाडो घातल्यास लिंबाचा रस
कोथिंबीर पेस्ट
मिठ

३) साल्सा:
लालबुंद टोमॅटो - गर काढुन बारीक तुकडे करुन
हिरवी ढोबळी मिरची - बारीक तुकडे करुन
मक्याचे दाणे
उकडलेल्या किडनी बीन्स
कोथिंबीर - भरपूर
हिरवी मिरचीचे तुकडे
*सिझनींग

४) टॉपिंग्स:
कॉर्न चिप्स,
उरलेले आवाकाडो / क्रिमचीझ स्प्रेड
*सिझनींग

*सिझनींग - ओरेगानो+लाल तिखट+भाजक्या जीर्‍याची पावडर+धणे पवडर ( किंवा वाळलेल्या कोथिंबीरीची पूड)

क्रमवार पाककृती: 

१) बेस:
- १ कप पोलेन्टा ४ कप गरम पाण्यात घालावा त्यात थोडे मिठ आणि ऑलिव्ह ऑइल घालुन शिजवावा. ट्रे मधे सेट करायला ठेवावा.
- पनीरच्या ब्लॉक (मधील शक्य तितके पाणी काढुन टाकावे^) चे आयताकृती तुकडे (साधारण ४ इंच लांब) करुन घ्यावेत.
- पोलेन्टा सेट झाला की त्याचेही पनीरच्याच साईझचे तुकडे करुन घ्यावेत.
- ग्रिल/ पॅन/ओव्हन गरम करुन पोलेन्टावर ऑइल स्प्रे मारुन हलके फ्राय करुन घ्यावे. जास्त खरपुस नको.

२) स्प्रेड:
- स्प्रेड साठी घेतलेले सर्व पदार्थ नीट मिक्स करुन घ्यावेत.

३) असेंबली:
- बटर पेपर वर एक तुकडा पोलेन्टाच त्याला थोडं स्प्रेड लवुन त्याच्या सईडला आणि वर पनीरचा तुकडा, त्याशेजारी परत पोलेन्टाचा तुकडा असे रचुन घ्यावे आणि थोडावेळ फ्रिज मधे सेट करायला ठेवावे.

४) साल्सा:
- टॉमेटो सोडुन सर्व जिन्नस एकत्र करावे. टॉमेटो अगदी आयत्यावेळेस घालावे अन्यथा साल्साला पाणी सुटेल.

५) सर्व्ह करताना:

- सेट झालेल्या बेस चे १ इंच रुंद काप काढावेत - आता चेकरबोर्ड पॅटर्न दिसेल.

- सॅल्सा डीशवर पसरून त्यावर हा चेकर्ड बेस ठेवावा.

- वरतुन आवाकाडो क्रिम घालावे आणि कॉर्न चिप्स चे तुकडे पेरावे *सिझनिंग भुरभुरावे..

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे २-३ जण
अधिक टिपा: 

दिसायला लांबलचक वाटली तरी पाकृ अगदी सोपी आहे.

- मेक्सिकन बरीटो/ टाको यांच्या लायनीतला हा प्रकार ट्राय केला आहे. टॉर्टियाज्/टाकोज ऐवजी चेकर्ड बेस. हे आधी करुन ठेवता येतिल. फ्रिज मधे २-४ दिवस सहज रहातिल.
- सपर्धेत कांदा / लसूण वापरायचा की नाही अशी शंका आल्याने साल्सा मधे कांदा वापरला नाहिये पण एरवी लाल कांदा बारीक चिरुन घालता येइल.
- एक पोलेन्टा शिजवायचे प्रमाण सोडले तर बाकी सर्व कमी-आधिक करता येइल.
- *सिझनींग ऐवजी \विकतचे सिझनींग वापरता येइल.

माहितीचा स्रोत: 
मेक्सिकन पदार्थ आणि प्रयोग
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कच्चंच दिसतंय पनीर सिंड्रेला. जर चांगलं - फ्रेश पनीर असेल तर कच्चं छान लागतं. नुसतं वरून मीठ घालून खायला पण आवडतं आमच्या घरी. Happy

फ्रेश पनीर असेल तर कच्चं छान लागतं. >>> अल्पना + १

>>>> मुंबईत पंजाब्-सिंध पनीरवाला असे क्युब्ज कापून त्यावर एक मसाला भुरभुरवून खायला देतो. कसलं चविष्ट प्रकरण लागतं ते. किंबहुना, तळलेलं पनीर मला तरी अजिबात आवडत नाही. अगदी पालक पनीर मध्येही ताजं ताजं पनीर फक्त क्युब्ज कापून टाकायचं. फारच मस्त लागतं.

मी पण तळून नाही घेत कधीच पनीर.
मुंबईत पंजाब्-सिंध पनीरवाला असे क्युब्ज कापून त्यावर एक मसाला भुरभुरवून खायला देतो >>> आम्ही पनीरच्या क्युबवर साबा स्पेशल लुण (बरेच पदार्थ घालून तयार केलेलं मीठ) आणि किंचीतसा लिंबाचा रस घालून खातो.

पालक पनीर आणि तत्सम भाज्यांमध्ये मी पण कच्च पनीर घालते. ग्रेवीची चव लागते त्या पनीरला. इथे तसंच आहे म्हणून शंका विचारली.

जस्ट वॉव... काय भन्नाट दिसतेय.. पाककृती वाचायच्या भानगडीत पडत नाही.. पण चित्रे कि फोटो असे आहेत की एखाद्या पंचतारांकित फूडमॉलच्या मेनूकार्डवर सारखे..

छान!

स्वतः करायला किचकट आहे पण असं सजवून दिलेलं ऐतं खायला जबरी !!
मार्गारिटा किंवा अगदी वाइन बरोबर छान वाटेल स्टार्टर म्हणून !

वॉव! मस्त!
ते पोलेन्टा शिजवायचं नीट कळलं नाही मला. ४ कप गरम पाण्यात १ कप पोलेन्टा घलून गॅसवर शिजवायचं का? शिजलेला कसा कळतो? आणि मग ट्रे मध्ये ओतून सेट करायला ठेवायचं का?

Pages