चेक Maize
गृपः मका + पनीर + चीझ
लागणारे साहित्यः
१) बेस:
१ कप पोलेन्टा (मक्याचा रवा),
पनीरचा स्लॅब
ऑलिव्ह ऑइल / स्प्रे
मिठ
२) स्प्रेड:
१/२ कप क्रिम चीज (किंवा अवाकाडो + क्रिम चीझ )
अवाकाडो घातल्यास लिंबाचा रस
कोथिंबीर पेस्ट
मिठ
३) साल्सा:
लालबुंद टोमॅटो - गर काढुन बारीक तुकडे करुन
हिरवी ढोबळी मिरची - बारीक तुकडे करुन
मक्याचे दाणे
उकडलेल्या किडनी बीन्स
कोथिंबीर - भरपूर
हिरवी मिरचीचे तुकडे
*सिझनींग
४) टॉपिंग्स:
कॉर्न चिप्स,
उरलेले आवाकाडो / क्रिमचीझ स्प्रेड
*सिझनींग
*सिझनींग - ओरेगानो+लाल तिखट+भाजक्या जीर्याची पावडर+धणे पवडर ( किंवा वाळलेल्या कोथिंबीरीची पूड)
१) बेस:
- १ कप पोलेन्टा ४ कप गरम पाण्यात घालावा त्यात थोडे मिठ आणि ऑलिव्ह ऑइल घालुन शिजवावा. ट्रे मधे सेट करायला ठेवावा.
- पनीरच्या ब्लॉक (मधील शक्य तितके पाणी काढुन टाकावे^) चे आयताकृती तुकडे (साधारण ४ इंच लांब) करुन घ्यावेत.
- पोलेन्टा सेट झाला की त्याचेही पनीरच्याच साईझचे तुकडे करुन घ्यावेत.
- ग्रिल/ पॅन/ओव्हन गरम करुन पोलेन्टावर ऑइल स्प्रे मारुन हलके फ्राय करुन घ्यावे. जास्त खरपुस नको.
२) स्प्रेड:
- स्प्रेड साठी घेतलेले सर्व पदार्थ नीट मिक्स करुन घ्यावेत.
३) असेंबली:
- बटर पेपर वर एक तुकडा पोलेन्टाच त्याला थोडं स्प्रेड लवुन त्याच्या सईडला आणि वर पनीरचा तुकडा, त्याशेजारी परत पोलेन्टाचा तुकडा असे रचुन घ्यावे आणि थोडावेळ फ्रिज मधे सेट करायला ठेवावे.
४) साल्सा:
- टॉमेटो सोडुन सर्व जिन्नस एकत्र करावे. टॉमेटो अगदी आयत्यावेळेस घालावे अन्यथा साल्साला पाणी सुटेल.
५) सर्व्ह करताना:
- सेट झालेल्या बेस चे १ इंच रुंद काप काढावेत - आता चेकरबोर्ड पॅटर्न दिसेल.
- सॅल्सा डीशवर पसरून त्यावर हा चेकर्ड बेस ठेवावा.
- वरतुन आवाकाडो क्रिम घालावे आणि कॉर्न चिप्स चे तुकडे पेरावे *सिझनिंग भुरभुरावे..
दिसायला लांबलचक वाटली तरी पाकृ अगदी सोपी आहे.
- मेक्सिकन बरीटो/ टाको यांच्या लायनीतला हा प्रकार ट्राय केला आहे. टॉर्टियाज्/टाकोज ऐवजी चेकर्ड बेस. हे आधी करुन ठेवता येतिल. फ्रिज मधे २-४ दिवस सहज रहातिल.
- सपर्धेत कांदा / लसूण वापरायचा की नाही अशी शंका आल्याने साल्सा मधे कांदा वापरला नाहिये पण एरवी लाल कांदा बारीक चिरुन घालता येइल.
- एक पोलेन्टा शिजवायचे प्रमाण सोडले तर बाकी सर्व कमी-आधिक करता येइल.
- *सिझनींग ऐवजी \विकतचे सिझनींग वापरता येइल.


भारी दिसतेय !!! यम् यम्
भारी दिसतेय !!! यम् यम्
वा!!!!! भन्नाट..
वा!!!!! भन्नाट..
बापरे... कसली कल्पकता. आणि
बापरे... कसली कल्पकता. आणि माझ्यासारखं नुस्तं यंव नं त्यंव नाही.. प्रत्यक्षात पदार्थं
तय्यार. ग्रेट.
लाजो.. कधी येऊ?
एकदम किलर फोटो.
एकदम किलर फोटो.
जबरी फोटो. लाजो खरेच तुझ्या
जबरी फोटो. लाजो खरेच तुझ्या क्रिएटिविटिचे भारी कौतुक वाटते.
वॉव..........अप्रतीम!
वॉव..........अप्रतीम!
एक प्रश्न लाजो- पोलेन्टा आणि
एक प्रश्न लाजो- पोलेन्टा आणि पनीर घ्यायचं प्रयोजन कळलं नाही. म्हणजे पोलेन्टाला कशी चव असते? आणि चीज ऐवजी पनीर घेतलं आहेस का?
खास लाजो स्टाईल !!! फोटोही
खास लाजो स्टाईल !!!
)
फोटोही मस्त. बघूनच पोट भरलं. (करण्याचा खटाटोप कोण करणार
डोळ्याचं पारण फिटलं! अप्रतिम!
डोळ्याचं पारण फिटलं! अप्रतिम!
डोळ्याचं पारण फिटलं! अप्रतिम!
डोळ्याचं पारण फिटलं! अप्रतिम! +१
लाजो, तू लाजवाब आहेस !!! खूप
लाजो,
तू लाजवाब आहेस !!! खूप छान कल्पकता..रुबिक क्युब अगदी मस्त जमले आहेंत.पोलेन्टो ही मस्त..फोटो लोभस आहेंत.
इंतजार का फल मिठा होता है
इंतजार का फल मिठा होता है
__________/\__________________
हे घ्या!
काश तुला मुलगा असता, काश तो माझ्या वयाचा असता... मी लगेच त्याला मागणी घातली असती
एकदम हटके! मस्त रेसिपी.
एकदम हटके! मस्त रेसिपी.
दिसतंय सुंदर, पण भयंकर
दिसतंय सुंदर, पण भयंकर खटपटीचं प्रकरण असेल असं वाटतं आहे.
शाब्बास... मस्तच दिसतय
शाब्बास... मस्तच दिसतय

यावेळी आलीस की खाणार तुझ्या हात्चे
लाजो लाजो लाजो कित्ती ग सुंदर
लाजो लाजो लाजो कित्ती ग सुंदर बनवलयस. खुप छान. तुझ्या कलेला मनापासुन सलाम.
खूप मस्त. फोटोत चेकर बोर्ड
खूप मस्त. फोटोत चेकर बोर्ड पॅटर्न बरोबर आलेला नाही.
मस्त!
मस्त!
फारच सुंदर!
फारच सुंदर!
रिया, सगळीकडे गळ टाकून बसू
रिया, सगळीकडे गळ टाकून बसू नकोस.
खुप सुंदर. पॉलेंटा अजून
खुप सुंदर. पॉलेंटा अजून वापरला नव्ह्ता, आता ट्राय करायला हवा.
मामी असू देत कुठला तरी मासा
मामी

असू देत कुठला तरी मासा गळाला लागेलच कधी ना कधी
दाद, हेच शब्द . लाजो कधी येऊ
दाद, हेच शब्द .
लाजो कधी येऊ ?
म-हा-न !
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मंडळी
- मी कच्चेच पनीर वापरले आहे. पण हवे तर पोलेन्टासारखे थोडे ग्रिल करुन वापरता येइल;
- पोलेन्टा गरम पाण्यात घालुन गॅसवर शिजवायचा आणि मग ट्रे मधे घालुन सेट करायचा;
- पनीर घालण्याचे असे काही खास प्रयोजन वगैरे नाही... पोलेन्टा बरोबर चांगले लागते आणि नुसते चीझ जरा जास्तच चीझी होइल म्हणुन नाही घातले.... हा प्रकार थोडा सॅलड सारखा आहे.
- यात फार खटाटोप नाही. सर्व गोष्टी आधी करुन ठेवता येतिल. आयत्यावेळेस सगळे असेंबल तेव्हढे करायचे. (पूरणाच्या पोळ्या आणि उकडीच्या मोदकांपेक्षा खुपच कमी खटाटोप आहे
)
परत एकदा आभार्स
Very nice...very colorful...
Very nice...very colorful...
मस्त दिसतीये!! आवडली.
मस्त दिसतीये!! आवडली. कम्प्लीट मिल आहे, सोपी आहे. पोलेन्ता ग्रील केल्याने खमंग लागेल. करून बघणार!!
मस्त....मस्त
मस्त....मस्त
फोटोस छान आहेत. पण इतके
फोटोस छान आहेत.
पण इतके क्रीयेटीवीटीच्या मागे पळल्याने काय्च्या काय किचकट व खटाटोपीची पाकृ आहे. हा प्रामाणिक फीड्बॅक आहे.
(इतरांना आवडला नाही तर ते त्यांच्या व्रुतीप्रमाणे विचार करतात असे समजावे वा त्यां. बु. दो. स. )
एकदम हटके! खास लाजोस्टाईल.
एकदम हटके! खास लाजोस्टाईल. नावही भारीये. >>>++१११
लाजो,
लाजो,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.
Pages