स्मोकिंग अर्थात धुम्रपानाविषयी बोलायचंय !!!

Submitted by पियू on 15 September, 2013 - 12:51

प्रिय माबोकरांनो..

खुप दिवस या विषयावर लिहायचे मनात होते.

आजकाल आपल्याकडे स्मोकिंगचे प्रमाण वाढत चालले आहे.
माझ्या आसपास कित्येक कॉलेजगोईंग आणि त्यापेक्षा मोठी मुलेमुली स्मोक अर्थात धुम्रपान करतांना दिसतात.
त्याचा फार त्रास होतो.. शारीरीक आणि मानसिक सुद्धा..

मानसिक त्रास असा की आपण कुठे चाललो आहोत.. रोज किमान एकदा तरी ह्या ना त्या मार्गाने "धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills !!!" हा संदेश कानांवर आदळतोच. आणि तरी धुम्रपान करणे हा एक स्टेटस सिंबॉल बनु लागलेला आहे. पुढे मुले मोठी झाल्यावर त्यांना ह्या विळख्यात अडकण्यापासुन कसे रोखु शकु तेच कळत नाही.

मानसिक त्रास एकवेळ थोडा दुर्लक्षित करता येतो. इतर व्यसनांच्या बाबतीत ते सहजपणे करता येते. इतर कोणाला दारू ढोसतांना पाहीले तर "जाऊदे.. तो आणि त्याचे लिव्हर" असं म्हणुन सोडुन देता येतं.

पण ह्याचा शारीरीक त्रास हल्ली वरचेवर होऊ लागला आहे. त्या वासाने घुसमटल्यासारखे होते.. श्वास कोंडल्यासारखा होतो.. ह्या अनुशंगाने मला सगळ्यांशी थोडेसे बोलायचे आहे.

माबोवरील डॉक्टर्स किंवा या क्षेत्रातले तज्ञः

१. खरंच स्मोकिंग इतके हानीकारक आहे का? मी कोणालाही धुम्रपानाच्या दुष्परिणांमांविषयी समजवायला गेले तर "धुम्रपानाने मेलेला एक तरी माणुस दाखव" असे म्हणतात. ह्याचे कारण आजेसासरे (जे आता हयात नाहीत) तेही स्मोक करायचे पण त्यांना काही झाले नाही. माझे ४ही सासरे गेली अनेक वर्षे स्मोक करतात पण अजुनही सगळे ठणठणीत आहेत.

२. जर खरंच धुम्रपानामुळे काही रोग/विकार होत असेल तर याचा धोका त्यांना किती असतो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना हे रोग/विकार होण्याचा धोका किती असतो? घरात लहान मुल असेल तर त्याला किती धोका असतो?

३. कुठेतरी वाचले आहे की स्मोक करणार्‍याने घराबाहेर जाऊन स्मोक केले तरी त्यानंतर २ तास त्याच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला तेवढाच धोका असतो.

४. ज्याप्रमाणे दारुचे व्यसन हे व्यसन करणार्‍याच्या अपरोक्ष सोडवण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत तशी धुम्रपानासाठी आहेत का?

५. स्मोकिंग करणार्‍याच्या सतत संपर्कात राहणार्‍या व्यक्तीने कोणती औषधे इ. घेऊन ती दुष्परीणांमापासुन दूर राहू शकते का?

स्मोकिंग करणार्‍याच्या सतत संपर्कात राहणारे माबोवरील सदस्य:

१. तुमच्या निकटच्या व्यक्तीने स्मोकिंग केलेले तुम्हाला कितपत आवडते? आवडत नसेल तर तुम्ही काय करता?

२. अश्या व्यक्तीच्या सतत संपर्कात राहिल्याने आपल्याला व घरातील लहानग्यांना काही होईल अशी भिती तुम्हाला वाटते का? तुम्ही अश्या वेळी काय करता?

स्मोकिंग करणारे माबोवरील सदस्यः

माझ्या प्रश्नांचा कृपया राग मानु नका.. "आमचे पैसे..आमचे फुफ्फुस..आमची मर्जी..आमचे घर..आम्ही काहीही करु..तुम्ही कोण सांगणारे" हा तुमचा युक्तीवाद मी अनेकवेळा ऐकला आहे. पण..

१. रोज इतक्यावेळा "धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills !!!" ऐकुन तुम्हाला स्वतःला कधी स्मोकिंग सोडावेसे वाटते का?

२. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना (विशेषतः जोडिदाराला) तुमचे स्मोकिंग आवडते का?

३. तुम्ही स्मोक करत असतांना तुमच्या आसपास स्मोकिंग अज्जिबात न आवडणारी व्यक्ती असेल तर तुम्ही काय करता? तिच्या विनंतीचा मान राखता का?

४. आपल्या ह्या विशिष्ट व्यसनाने आपल्यासोबत इतरांचेही नुकसान होते आहे ह्यामुळे कधीही अपराधी वाटते का?

५. घरात कोणी लहान असले तर त्याच्यासाठी तुम्ही काय विशेष काळजी घेता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन.. तुम्ही असा प्रतिसाद देण्यामागचे कारण कळले नाही.
तुम्ही धुम्रपान करता असे लेखात कुठेच लिहिलेले नाहीये मी..
पण तुमच्या आसपास माहीतीत कोणी ना कोणी स्मोकर असु शकेल ना..

तुम्ही ह्या लेखावर तुमची मते, तुम्हाला या विषयात असलेली माहिती, इतर कोणाचे अनुभव इ. नक्कीच शेअर करु शकता.

हाय कम्बख्त तुने पी ही नही.... एकदा ओढून बघ न तू त्यांच्यासमोर. मग दरमहा सिगरेटीसाठी पैसे मागशील नवर्याला. मग दोन्ही पार्टी एकमताने ठरेल सिगरेट बरी की वाईट. सध्या म्हणजे "आंधळ्या हाती दिधले मोती" अशी तुझही गत. Wink Happy
अमेरिकेत आकडेवारी जरा सहज उपलब्ध होते म्हणून तिथला संदर्भ देतीये -तिथे एकूण ४६.६ मिलियन लोक स्मोक करतात. त्यापैकी ८.६ मिलियन (अंदाजे १८%) लोकांना गंभीर आजार होतात आणि त्यापैकी ४४०००० लोकांचे प्राण जातात. म्हणजे एकूण स्मोक करणार्यांपैकी फक्त १%. त्यामुळे गंभीर आजार होईल, प्राण जाईल ही भीती घालणे/त्याबद्दल विचार करणे सोडून दे. ह्यापेक्षा जास्त चान्स रस्ता क्रोस करताना मरायचा असतो. म्हणून काय लोक घरी बसतील का? (हे ऐकल होतस का आधी?? Wink आमची मर्जी हा जुना युक्तिवाद आहे, हा जरा माझ्या दृष्टीने नवीन होता Happy )
(हलके घे, वैतागू नकोस. सर्वात महत्त्वाच तुझी तब्बेत आणि तुझा व्यवसाय (वर्कशोप घेतेस ना अजून?), बाकी सगळ चालू राहतंय तू नसलीस तरी).

माझ्या दोन्ही घरात कोणीच स्मोक करत नाही. वडील पुर्वी तंबाखु खायचे Sad पण त्यांनी १० वर्षापूर्वी तंबाखू खाणे सोडले. त्यापूर्वी आम्ही त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त करण्याचा खुप प्रयत्न केला होता. आम्ही लहान असताना खुप विनवायचो, त्यांना कॅन्सर झाला तर या भितीने घाबरायला व्हायचं. पण व्यर्थ! १० वर्षांपूर्वी इथे आले होते त्या आधी १-२ महिने त्यांना सहज म्हटले, आता तंबाखु सोडा. तर त्यांनी खरच सोडली! म्हणजे व्यसन सोडण्यासाठी त्या व्यक्तिच्या मनाचा निर्धार महत्वाचा! अलिकडे त्यांना ब्लॅडर कॅन्सर झाला होता. त्या आजारचा आणि पूर्वी ते तंबाखु खायचे याचा काही संबंध आहे किंवा कसे हे मात्र समजले नाही! इथले डॉक्टरच सांगु शकतील.
पण माझ्यासमोर कोणी स्मोक करत असेल तर मी निश्चितच त्या व्यक्तिला 'तुमच्या तब्येतीचे काय ते तुम्ही बघा. पण मला पॅसिव्ह स्मोकिंग आवडत नाही. माझ्यासमोर स्मोक करु नका!' असे सांगायला कचरणार नाही! आकडेवारी काहीही सांगु दे. पॅसिव्ह स्मोकिंगने मरणार्‍यांची संख्या अगदी नगण्य किंवा ०%असली तरी तेव्हढा वेळ होणारा त्रास मी का सहन करावा???
वर सिमंतीनीने म्हटलय की क्रॉसिंग करताना मरण्याची शक्यता जास्त आहे. पण क्रॉसिंग करताना एखादा मेला तर त्याच्या घरच्यांना त्याच्या कॅन्सरसारख्या दुखण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही! स्मोकिंगमुळे कॅन्सर झाल्यास ती व्यक्तिच पूर्णपणे जबाबदार आहे. त्या व्यक्तिच्या व्यसनापायी इतरांची वाताहात का?
एकदा त्यांना टाटा मेमोरियलला जाऊन स्मोकिंगमुळे कॅन्सर झालेल्या रुग्णांच्या वॉर्डात चक्कर मारायला सांग.

पॅसिव्ह स्मोकिंगने मरणार्‍यांची संख्या अगदी नगण्य किंवा ०%असली तरी तेव्हढा वेळ होणारा त्रास मी का सहन करावा???>>> +१

सिमन्तिनी, तुमचा प्रतिसाद कुचाळकी टाईप वाटला, अजिबात आवडला नाही.

पियू परीने काय अपेक्षित आहे हे खूप स्पष्ट केलंय. खूप चांगला विचार आहे. सहज करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. सिगारेट न पिणा-यासमोर सिगारेट पिताना किमान परवानगी घ्यावी हे देखील सुशिक्षितांकडून घडत नाही. त्यातून अधिकाराची गुर्मी असेल तर समोरच्याला सांगायचीही चोरी असते. ज्याच्याकडे काम आहे तोच स्मोकर असेल तर त्याला दुखवा कशाला या विचाराने लोक सहन करत असावेत. मी पूर्वी तुमचं होऊ द्या, मी बाहेर थांबतो असं हसून सांगायचो. काही वेळा समोरच्याच्या लक्षात येऊन तो सॉरी म्हणायचा. बरेचदा काही फरक पडायच नाही. आता इतकं आवर्जून सांगायचं लक्षात राहत नाही. या बाफने पुन्हा लक्षात आलं. धन्यवाद.

सिमन्तिनी, तुमचा प्रतिसाद कुचाळकी टाईप वाटला, अजिबात आवडला नाही. >> आवडला नाही हे ठीक आहे. हेतू कुचाळकीचा नव्हता. डेव्हिल'स अद्वोकेत प्रकारचा होता. सामान्यपणे कुणालाही सांगितलेले आवडत नाही की स्मोकिंग चांगले नसते. वाद प्रतिवाद युक्तिवाद घडतात- स्मोकिंगला जेनेटिक आधार आहे, स्मोकिंग मुळे क्रीयेटीव्हिटि वाढते इ इ अनेक. "पॅसिव्ह स्मोकिंगने मरणार्‍यांची संख्या अगदी नगण्य किंवा ०%असली तरी तेव्हढा वेळ होणारा त्रास मी का सहन करावा???" हे स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तीला सांगून बघा. फार थोडे लोक ऐकून घेतील. "तुझी सहनशक्तीच कमी त्याला आम्ही काय करणार" असली उत्तरे येतात, विषेतह घरातील व्यक्तीकडून. बाहेर, व्यवसायात इ क्वचित लोक ऐकतात, क्वचित "तुम उधर जाव" असले काहीही उत्तर येते. आकडेवारी सांगते:कि फक्त १०% लोक स्मोकिंग सोडण्याचा विचार करतात. दर ३ वर्षातून एकदा प्रत्येक स्मोकर सोडून देईन हा विचार करतो. सर्व प्रकारच्या उपायानंतर (मानसोपचार, औषधी इ इ ) फक्त २५% लोक स्मोकिंग कायमस्वरूपी सोडू शकतात. मी नकारात्मक विचार नाही सांगत आहे उलट "ही तर सुरुवात आहे" हे पियूपरीला सुचवत आहे. कुठल्याही स्मोकर/व्यसनी व्यक्तीला काहीही सुचवण्याआधी आपण स्वतः सकाळचा चहा/दुपारची कोफी असली आपली फुटकळ व्यसने एक महिना सोडून बघावी. त्यातील काठीण्य लक्षात आले तर पुढचा मार्ग कसा असेल हे जाणवत.

aashu29 +१

"स्मोकिंग कसे सोडवू?" असा सर्वसाधारण प्रश्न विचारलेला नाही. एकच प्रश्न त्याशी निगडित आहे आणि तोसुद्दा "औषधे आहेत का?" अशा स्वरूपाचा. वरील सर्वच प्रश्नांची विविध उत्तरे ऐकायला मलाही आवडेल. Happy

आधी एक बीबी होउन गेलाय.
त्यावरच्या अनुभवातुन सांगतो फरक पडत नाही स्मोकरना.
त्याना त्यांची तलफ भागणे महत्वाचे.
बाकी गेल तेल लावत.. Happy

सासुबाई दमेकरी आहेत.. त्यांच्यासाठी तर हा धूर म्हणजे विष आहे>>> घरातच उदाहरण आहे तुमच्या.
बाकी सर्व गोष्टी ह्या फक्त बोलण्याच्या असतात. ज्याला पोकळ युक्तिवाद म्हणता येइल फारतर.

स्मोकिंग करणार्‍याच्या सतत संपर्कात राहणारे माबोवरील सदस्य:

१. तुमच्या निकटच्या व्यक्तीने स्मोकिंग केलेले तुम्हाला कितपत आवडते? आवडत नसेल तर तुम्ही काय करता?
२. अश्या व्यक्तीच्या सतत संपर्कात राहिल्याने आपल्याला व घरातील लहानग्यांना काही होईल अशी भिती तुम्हाला वाटते का? तुम्ही अश्या वेळी काय करता?
दोन्हीसाठी एकच उत्तर - तिथून निघून जाते. जाणे शक्य नसेल तर सरळ नाकावर ओढणी घेऊन बसते. अगदी समोरच्या माणसाल समजेल असे. Angry त्याला राग आला / ओशाळे वाटले तरी चालेल.
सुदैवाने निकटच्या व्यक्तींमध्ये कोणीही स्मोकिंग करत नाही. Happy

धागा चांगला आहे,

मी मागच्या १० वर्षापासून स्मोकींग करायचो , आणि आता सोडले आहे (एप्रिल १३ नंतर )

सहसा हि सवय /व्यसन सूटने अवघड जाते , मी स्मोकींग सोडण्याचे प्रमूख कारण असे घडले,

लहानपणासून असणा-या सर्दीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर नाकातील पडदा डाव्या बाजूला सरकल्याचे निदान झाले यावर उपाय म्हणून नाकाचे ऑपरेशन ( मेडीकल भाषेत ज्याला सेप्टोप्लास्टी म्हणतात ) करावे लागले . सहाजिकच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी १ ते १.५ महिना स्मोकिंग करु शकणार नव्हतो. याच काळात मनाशी पक्क ठरवून ही सवय सोडण्यात यश आल.

याच काळात स्मोकिंगमुळे होणारे नुकसान /आजार याबाबत बरच वाचन केल यातल्या काही ठळक गोष्टी सांगाव्याशा वाटतील
१) स्मोकिंगचा परिणाम स्लो पॉईझनसारखा आहे तो लगेच दिसणार नाही पण जेव्हा दिसू लागेल तेव्हा उशीर झाला असेल
.
२) स्मोकिंगचा परिणाम करणा-या व्यक्तीपेक्षा आसपासच्या लोकांवर जास्त होतो

३) त्याचे परिणाम पुढील गोष्टीवर जास्त अवलंबून आहेत
अ) कोणत्या प्रकारचे स्मोकिंग म्हणजे बीडी, सिगरेट, सिगार , हुक्का वगैरे ( बीडीचे परिणाम त्यातल्या
त्यात लवकर दिसतात )
ब) शरिराचा फिटनेस आणि रोजच्या जीवनातले शारिरिक कष्ट ( माझ्या कामावरचे बरेचसे लेबर बीडी
ओढतात त्यांचा दिनक्रम वर्षानुवर्षे चालू आहे , त्यांच्या जीवनशैलीत असणारे कष्ट त्यांचे शरिर
बळकट बनवत असतात त्यामुळे साधारण व्यक्तीपेक्षा यांच्यावर स्मोकिंग इफेक्ट कदाचित उशीरा
दिसेल )
क) साधारणता स्मोकिंगपेक्षा गुटख्याचे परिणाम जास्त वाईट आणि तंबाखूपेक्षा मिसरी ( तंबाखू भाजून
पूड केलेला काळा पदार्थ ) वाईट

इ .

स्मो़किंग किंवा दारु सोडण्यासाठी कोणत्याही औषधाचा वापर करु नका ते जास्त घातक आहे , केवळ योग्य मार्गदर्शन करुन ही सवय कमी करत करत सोडण्यासाठी प्रयत्न करा.

पियूपरी मनातलं लिहीलंयस...
मला त्या वासाची प्रचंड अ‍ॅलर्जी आहे. मामेसासर्‍यांनी एकदा "समोर सिगारेट ओढली तर चालेल का" असं विचारल्यावर मी चक्क नाही म्हणाले. "मला त्रास होतो. तुम्ही बाहेर जाऊन ओढा किंवा तुमचं होईपर्यंत मी बाहेर जाते." अर्थात त्यांनी जेन्युइनपणे विचारलं हा त्यांचा मोठेपणा.

कॉलेजमध्ये असताना ग्रूपमधील ३-४ जणांना सवय होती स्मोकींगची. त्यांना धमकीवजा रिक्वेस्ट केलेली. मुली सोबत असताना ही थेरं नकोत. आपापसात काहीही करा. बिचार्‍यांनी निमूटपणे ऐकलेलं.

रस्त्यात इतकेजण स्मोकींग करतात की त्या धुरापासून किती वाचवत फिरायचं स्वतःला? जमेल तेवढं लांब उभं राहायचं बस्स.

आणखी एक दुसरी घाणेरडी सवय असते या स्मोकर्सना की जळती सिगारेट (थोटूक) तशीच टाकून पुढे जातात. विझवून टाकायचेही कष्ट घेत नाहीत. ती कुठे जाऊन आग वगैरे लागली तर यांच्या बा चं काय जाणारेय. एवढा दुसर्‍याचा विचार केला असता तर कशाला हवं होतं. सुरूवातीला अशी रस्त्यात सिगारेट टाकून जाणार्‍या माणसाला अडवून विनंती करत असे. काही ऐकत, काही कळलंच नाही तो मी नव्हेच या थाटात पुढे जात, काही तर चक्क तेरे बाप का क्या गया अशी चपराकही देत. आता तोही उत्साह मावळला. असो.

दादरला एका टॅक्सीवाल्याला विनंती केली होती आम्हाला सोडेपर्यंत प्लीज स्मोक करू नकोस तर माझी टॅक्सी आहे मी काहीही करेन तुला जमत नाहीये तर उतरो अभी के अभी नीचे असं मग्रूरीने सुनावलं होतं. मामा लोकं पण यावेळी नेमके गायब असतात. उतरलो झक मारत काय करणार? धुराचा त्रास मला होत होता ना मग मीच अ‍ॅडजस्ट करायला हवं होतं.

स्मोकिंग आणि कॅन्सर याचा घनिष्ठ संबंध आहे. यूकेतले लंग कॅन्सरनं मेलेल्यांपैकी ८६% स्मोकर होते. सर्व प्रकारच्या कॅन्सरनं मेलेल्यांपैकी सुमारे २५% लोक स्मोकर होते.

तुम्ही लोकांना याची माहिती देण्यापलिकडे फारसं काही करू शकत नाही. मागे मी अशी एक खरी गोष्ट ऐकली होती.. एका मुलाने आईला सांगितलं की मला सिगरेट प्यायची आहे. आई म्हणाली.. ठीक आहे आपण घेऊन येऊ. पण त्याआधी एका ठिकाणी जाऊ.. ती त्याला हॉस्पिटलातल्या कॅन्सर वॉर्ड मधे घेऊन गेली. तिथलं वातावरण आणि रुग्णांचे हाल पाहून तो मुलगा स्वतःच म्हणाला.. आपण घरी जाऊ.

असं प्रौढ व्यक्तीबाबत करू शकाल याची शक्यता नाही. पण ओळखीच्या डॉक्टरांना घरी बोलावून त्यांच्याकडून सांगणे. आणि त्याचे दुष्परिणाम सांगणे.. घराबाहेर ओढण्याबद्दल आग्रह धरणे.. अशा काही गोष्टी करता येतील. या कामी नवरा आणि सासू यांना आधी पटवता येईल. त्याचा उपयोग होईल किंवा नाही हे सांगता येत नाही.

असो... गुडलक!

घरातील चेन धुम्रपान करणार्या माणसावर कोणत्याही कारण अथवा तर्काचा काहीही परीणाम होत नाही. फार फार तर घरात सीगरेट ओढण्यास कठोर मनाई करु शकता. सहन करणे या पलीकडे दुसरा उपाय नसतो. उपचार घेत नाहीत. गरज वाटत नाही असे सान्गतात. मग काय करणार? जोवर ते आहेत तोवर त्यान्चे व्यसन, अशी खूणगाठ मनाशी बान्धली आहे आता.

सर्व प्रतिसादकांचे खुप खुप आभार.. मला ह्या विषयावर कुणाशीतरी बोलायची खरंच गरज होती. तुमच्याशी बोलल्यावर बरं वाटतंय.

हाय कम्बख्त तुने पी ही नही.... एकदा ओढून बघ न तू त्यांच्यासमोर. मग दरमहा सिगरेटीसाठी पैसे मागशील नवर्याला. मग दोन्ही पार्टी एकमताने ठरेल सिगरेट बरी की वाईट. सध्या म्हणजे "आंधळ्या हाती दिधले मोती" अशी तुझही गत.

>> सॉरी टू से.. पण तुमच्यासारख्या आयडीकडुन अश्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. तुमचे इतर ठिकाणचे लेखन वाचुन तुमच्याविषयी आदर वाटला होता. तो असा घालवु नका प्लीज.

सगळ चालू राहतंय तू नसलीस तरी..

>> म्हणुन मी इतर कोणाच्यातरी क्षणिक "मजे"साठी मरून जाऊ असं सुचवायचं आहे का? आपल्याशिवाय जगाचं काहीही अडत नाही हे कधीच मान्य केलेले आहे. म्हणुन हातात असलेलं आयुष्य निरोगीपणे घालवण्याचा मला अधिकार नाही का?

कुठल्याही स्मोकर/व्यसनी व्यक्तीला काहीही सुचवण्याआधी आपण स्वतः सकाळचा चहा/दुपारची कोफी असली आपली फुटकळ व्यसने एक महिना सोडून बघावी.

>> मी चहा/कॉफी किंवा असली कोणतीही व्यसने केली तर त्याचा त्रास मला एकटीला होईल.
अजुन एक.. मी त्यांनी ही व्यसने सोडावीत असे लिहिण्याआधी त्यांनी किमान ज्या व्यक्तीला त्रास होतो तिचा विचार करुन धुम्रपान करावे एवढीच माफक अपेक्षा ठेवली आहे.

पॅसिव्ह स्मोकिंगने मरणार्‍यांची संख्या अगदी नगण्य किंवा ०%असली तरी तेव्हढा वेळ होणारा त्रास मी का सहन करावा??? त्या व्यक्तिच्या व्यसनापायी इतरांची वाताहात का?

>> हेच खरे दुखणे आहे. थँक्स वत्सला Sad

आधी एक बीबी होउन गेलाय.

>> झकासराव लींक मिळेल का प्लीज?

अरुंधती, ड्रीमगर्ल, मुद्दाम हसेन आणि किरण कुमार प्रतिसादाबद्दल आभार..

प्रणाली, तुम्हाला धुम्रपानाविषयीच काही विचारायचे असेल तर इथेच विचारा. मला चालेल. हवे असल्यास हेडरमध्ये अपडेट करेल.

चिमण माहितीबद्दल आभारी आहे.

धुम्रपान सोडण्याची इच्छा आणि प्रयत्न स्वतः धुम्रपान करणार्‍याशिवाय अजून कुणीही दुसरा काहिही करू शकत नाही. तुम्ही जेव्हडे अधिक सांगाल तेव्हडे अधिक प्रत्युत्तर मिळेल.

घरात सिगरेट न ओढणे, लहान मुलांसमोर न ओढणे वगैरे नियम तुम्ही जर घालून देउ शकत असाल आणी तुमचे म्हणणे ऐकले जात असेल तर उत्तम. तसे करा. जर तुमचे म्हणणे ऐकत नसतील तर गणित मांडा (ट्रेड ऑफ) आणि त्याप्रमाने निर्णय घ्या.

एका मुलाने आईला सांगितलं की मला सिगरेट प्यायची आहे. आई म्हणाली.. ठीक आहे आपण घेऊन येऊ. पण त्याआधी एका ठिकाणी जाऊ.. ती त्याला हॉस्पिटलातल्या कॅन्सर वॉर्ड मधे घेऊन गेली. तिथलं वातावरण आणि रुग्णांचे हाल पाहून तो मुलगा स्वतःच म्हणाला.. आपण घरी जाऊ.>>>>>> हा किस्सा मी बहुदा पूर्वी लिहीला असावा. माझ्या एका मैत्रीणीने हा प्रयोग केला आहे.

घरात सिगरेट न ओढणे, लहान मुलांसमोर न ओढणे वगैरे नियम तुम्ही जर घालून देउ शकत असाल आणी तुमचे म्हणणे ऐकले जात असेल तर उत्तम.

>> अगेन.. माझा नवरा, त्याचे ४ भाऊ आणि ३ नणंदा लहान (अगदी तान्हे बाळ) असल्यापासुन चारही सासरे प्लस आजेसासरे घरातच स्मोक करत असल्याने स्मोकिंगचा लहान मुलांवर परीणाम होतो हे त्यांना पटेल असे वाटत नाही.

घरात किंवा नातेवाईकांत स्मोकिंग कोणी करत नाही पण रस्त्याने जात असताना कोणी बाजूने स्मोकिंग करत असेल तर खूप त्रास होतो, कोणी गुटखा खात असेल तरी वास सहन होत नाही.

मी लहान असताना बाबांना तंबाखूचे व्यसन होते, मी नेहेमी बाबा तंबाखू सोडा सांगायची, एकदा बाबांना चक्कर आली त्या दिवसापासून त्यांनी व्यसन सोडले, मला खूप आनंद झाला.

स्मोकिंग करणारी लोकं दुसऱ्याचा विचार का करत नाहीत कारण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास खूप होतो, कधीकधी जीवही गुदमरतो, आणि बऱ्याच जणांना हा वास सहन होत नाही.

हे त्यांना पटेल असे वाटत नाही>>> पटवुन घ्यायच नाही असं ठरवलेलं असेल तर पोकळ युक्तीवाद चालु होतात.
ते म्हणतील हॅ त्याना कुठे काय झालय.
जे झालय ते बाहेरुन दिसणार नाहीच.
एकदा फुफ्फुसं चेक करुन घ्या त्यांची.
मग कळेल आतुन बिल्डिन्ग किती ढासळली आहे ते..

लिन्क शोधतो.
जुन्या माबोत होती बहुतेक.

घरात सिगरेट न ओढणे, लहान मुलांसमोर न ओढणे वगैरे नियम तुम्ही जर घालून देउ शकत असाल आणी तुमचे म्हणणे ऐकले जात असेल तर उत्तम.

>> अगेन.. माझा नवरा, त्याचे ४ भाऊ आणि ३ नणंदा लहान (अगदी तान्हे बाळ) असल्यापासुन चारही सासरे प्लस आजेसासरे घरातच स्मोक करत असल्याने स्मोकिंगचा लहान मुलांवर परीणाम होतो हे त्यांना पटेल असे वाटत नाही.

>>>>>>

तुम्ही माझे पुढचे वाक्य वाचले नाहीत का?
जर तुमचे म्हणणे ऐकत नसतील तर गणित मांडा (ट्रेड ऑफ) आणि त्याप्रमाने निर्णय घ्या.

माझे तर स्मोकिंग न करणार्‍या मित्रापुढे सिगारेट पेटवायचे सुध्दा डेरींग होत नाही . घरात सिगारेट पिणे तर लांबची गोष्ट .

बाकी घरात सिगरेट पिण्याचे बन्द करावयाचे असल्यास , सिगारेट पिणार्‍याचे पाकीट गुपचुप गायब करावे हा एक सोप्पा उपाय आहे . हे वै. म.

माझ्या एका मित्राचे वडील घरात सिगारेट प्यायचे ....त्यांनी ते कमी करावे म्हणुन आम्ही त्यांच्या पाकीटातील सिगारेट गायब करुन बाहेर जावुन प्यायचो !!

डॉ. बालाजी तांबेंच्याच भाषणात ऐकले होते की त्याबद्दल वाचले आठवत नाही.:अरेरे: पण सिगरेटमुळे जे निकोटीन श्वसनाद्वारे आत ओढले जाते त्याचा काळा निळा दाट थर फुफ्फुसांच्या आतल्या भिंतीवर बसतो.

त्याच्यामुळेच कॅन्सर, टिबी आणी दमा वगैरे रोगांची शक्यता वाढीस लागते. अशी व्यक्ती हळु हळु रोगट होत जाते.

किती दुष्परीणाम सांगणार याचे?

कधीकधी जीवही गुदमरतो, आणि बऱ्याच जणांना हा वास सहन होत नाही.

>> ह्म्म.. Sad

एकदा फुफ्फुसं चेक करुन घ्या त्यांची.
मग कळेल आतुन बिल्डिन्ग किती ढासळली आहे ते..

>> लींकसाठी आभार झकासराव.. एकदा रुटीन चेकअपच्या नावाखाली करायला लावते चेक.

तुम्ही माझे पुढचे वाक्य वाचले नाहीत का?

>> वाचले. तुम्ही विपु पाहिली का?

माझे तर स्मोकिंग न करणार्‍या मित्रापुढे सिगारेट पेटवायचे सुध्दा डेरींग होत नाही . घरात सिगारेट पिणे तर लांबची गोष्ट .

>> तुम्ही स्त्री असल्याने असे होते का? सहसा पुरुष स्मोकर्स कुणाचाही इतका विचार करतांना पाहिले नाहीत अजुन.

माझ्या एका मित्राचे वडील घरात सिगारेट प्यायचे ....त्यांनी ते कमी करावे म्हणुन आम्ही त्यांच्या पाकीटातील सिगारेट गायब करुन बाहेर जावुन प्यायचो !!

>> त्यांनी कमी करावे म्हणुन तुम्ही पिणे हा कोणता उपाय आहे?

माझे तर स्मोकिंग न करणार्‍या मित्रापुढे सिगारेट पेटवायचे सुध्दा डेरींग होत नाही . घरात सिगारेट पिणे तर लांबची गोष्ट .

>> तुम्ही स्त्री असल्याने असे होते का? सहसा पुरुष स्मोकर्स कुणाचाही इतका विचार करतांना पाहिले नाहीत अजुन.

>>>>
lol
गिरिजे,
अगं ही भिंत अन गे डोके. आपट!

अन हो, स्त्री असल्याने विड्या फुंकत जाउ नकोस गं बाई. Proud Lol

टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधे भयानक पोस्टर्स आहेत. स्मोकर्स ना अवश्य दाखवावीत ती.
अगदी कौतुकाने सांगावेसे वाटते कि अंगोलात सिगारेट ओढणार्‍यांचे प्रमाण खुपच कमी आहे. आमच्या कंपनीत तर केवळ एकच जण आहे तसा.

ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि आता गल्फमधेही ते प्रमाण भयावह आहे.

माझ्या वडीलांना मी घरी सिगारेट ओढायला बंदी केली होती आणि त्यांनी ती मानलीदेखील होती. मला
या वासाचीच भयानक अ‍ॅलर्जी आहे. माझे डोके दुखायला लागते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करु नये, असा नियम असल्यास, मी त्या ठिकाणी आवर्जून विरोध करतो. खुपदा नाराजी ओढवून घेतो मी. पण माझे काम होते.

Pages