स्मोकिंग अर्थात धुम्रपानाविषयी बोलायचंय !!!

Submitted by पियू on 15 September, 2013 - 12:51

प्रिय माबोकरांनो..

खुप दिवस या विषयावर लिहायचे मनात होते.

आजकाल आपल्याकडे स्मोकिंगचे प्रमाण वाढत चालले आहे.
माझ्या आसपास कित्येक कॉलेजगोईंग आणि त्यापेक्षा मोठी मुलेमुली स्मोक अर्थात धुम्रपान करतांना दिसतात.
त्याचा फार त्रास होतो.. शारीरीक आणि मानसिक सुद्धा..

मानसिक त्रास असा की आपण कुठे चाललो आहोत.. रोज किमान एकदा तरी ह्या ना त्या मार्गाने "धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills !!!" हा संदेश कानांवर आदळतोच. आणि तरी धुम्रपान करणे हा एक स्टेटस सिंबॉल बनु लागलेला आहे. पुढे मुले मोठी झाल्यावर त्यांना ह्या विळख्यात अडकण्यापासुन कसे रोखु शकु तेच कळत नाही.

मानसिक त्रास एकवेळ थोडा दुर्लक्षित करता येतो. इतर व्यसनांच्या बाबतीत ते सहजपणे करता येते. इतर कोणाला दारू ढोसतांना पाहीले तर "जाऊदे.. तो आणि त्याचे लिव्हर" असं म्हणुन सोडुन देता येतं.

पण ह्याचा शारीरीक त्रास हल्ली वरचेवर होऊ लागला आहे. त्या वासाने घुसमटल्यासारखे होते.. श्वास कोंडल्यासारखा होतो.. ह्या अनुशंगाने मला सगळ्यांशी थोडेसे बोलायचे आहे.

माबोवरील डॉक्टर्स किंवा या क्षेत्रातले तज्ञः

१. खरंच स्मोकिंग इतके हानीकारक आहे का? मी कोणालाही धुम्रपानाच्या दुष्परिणांमांविषयी समजवायला गेले तर "धुम्रपानाने मेलेला एक तरी माणुस दाखव" असे म्हणतात. ह्याचे कारण आजेसासरे (जे आता हयात नाहीत) तेही स्मोक करायचे पण त्यांना काही झाले नाही. माझे ४ही सासरे गेली अनेक वर्षे स्मोक करतात पण अजुनही सगळे ठणठणीत आहेत.

२. जर खरंच धुम्रपानामुळे काही रोग/विकार होत असेल तर याचा धोका त्यांना किती असतो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना हे रोग/विकार होण्याचा धोका किती असतो? घरात लहान मुल असेल तर त्याला किती धोका असतो?

३. कुठेतरी वाचले आहे की स्मोक करणार्‍याने घराबाहेर जाऊन स्मोक केले तरी त्यानंतर २ तास त्याच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला तेवढाच धोका असतो.

४. ज्याप्रमाणे दारुचे व्यसन हे व्यसन करणार्‍याच्या अपरोक्ष सोडवण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत तशी धुम्रपानासाठी आहेत का?

५. स्मोकिंग करणार्‍याच्या सतत संपर्कात राहणार्‍या व्यक्तीने कोणती औषधे इ. घेऊन ती दुष्परीणांमापासुन दूर राहू शकते का?

स्मोकिंग करणार्‍याच्या सतत संपर्कात राहणारे माबोवरील सदस्य:

१. तुमच्या निकटच्या व्यक्तीने स्मोकिंग केलेले तुम्हाला कितपत आवडते? आवडत नसेल तर तुम्ही काय करता?

२. अश्या व्यक्तीच्या सतत संपर्कात राहिल्याने आपल्याला व घरातील लहानग्यांना काही होईल अशी भिती तुम्हाला वाटते का? तुम्ही अश्या वेळी काय करता?

स्मोकिंग करणारे माबोवरील सदस्यः

माझ्या प्रश्नांचा कृपया राग मानु नका.. "आमचे पैसे..आमचे फुफ्फुस..आमची मर्जी..आमचे घर..आम्ही काहीही करु..तुम्ही कोण सांगणारे" हा तुमचा युक्तीवाद मी अनेकवेळा ऐकला आहे. पण..

१. रोज इतक्यावेळा "धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills !!!" ऐकुन तुम्हाला स्वतःला कधी स्मोकिंग सोडावेसे वाटते का?

२. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना (विशेषतः जोडिदाराला) तुमचे स्मोकिंग आवडते का?

३. तुम्ही स्मोक करत असतांना तुमच्या आसपास स्मोकिंग अज्जिबात न आवडणारी व्यक्ती असेल तर तुम्ही काय करता? तिच्या विनंतीचा मान राखता का?

४. आपल्या ह्या विशिष्ट व्यसनाने आपल्यासोबत इतरांचेही नुकसान होते आहे ह्यामुळे कधीही अपराधी वाटते का?

५. घरात कोणी लहान असले तर त्याच्यासाठी तुम्ही काय विशेष काळजी घेता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरातही सासरे स्मोक करतात.. दीरही लपत छपत स्मोक करु लागला आहे.. >>>>>>>>

सासरे स्मोक करतात तर दिराला कोणाची भीती? लपुन छपुन कशाला?

आजकाल आपल्याकडे स्मोकिंगचे प्रमाण वाढत चालले आहे.>>>>> हे विधान पटणारे नाही. मी माझ्या नोकरीच्या २१ वर्षाच्या अनुभवानी सांगतो की स्मोकिंचे प्रमाण कमी होते आहे. माझ्या बरोबरच्या बर्‍याच लोकांनी सोडले. जे नविन trainee जॉईन होतात त्यांच्या मधे पण स्मोकिंचे प्रमाण खुप कमी झाले आहे.


कुठेतरी वाचले आहे की स्मोक करणार्‍याने घराबाहेर जाऊन स्मोक केले तरी त्यानंतर २ तास त्याच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला तेवढाच धोका असतो.>>>>>> ह्यात काडीचेही तथ्य नाही.

ई-सिगारेट हा स्मोकिंग च्या व्यसना वरचा चांगला उपाय आहे. ह्यानी शरीराला फक्त निकोर्टीन मिळते. पण धुर नसल्या मुळे कार्बन, टार अश्या गोष्टी फुफूसात जात नाहीत. पण ही सिगारेट खर्‍या सिगारेट सारखी धुर ( ग्लिसरीन आणि पाण्याच्या वाफा ) सोडते, त्यामुळे ओढणार्‍याला पण आवडते.

आपल्याकडे काही वर्षांपूर्वी २ ऑक्टोबरला सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास मनाई करणारा कायदा झाला होता ना, त्याची काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही Sad

थिएटरमधे पिक्चरच्या आधी जी अ‍ॅड दाखवतात ती पण किती भयानक वाटते, तरीसुद्धा ह्या लोकांना काहीच फरक कसा पडत नाही देव जाणे.
ऑफिसमधे अनुभव येतात, लोक बाहेर जाऊन स्मोक करून आले तरीही वास येत राहतो आणि नको होते. आता तिथे काय सांगणार? घेऊ नका असे नाही तर सांगू शकत!

आपल्याकडे काही वर्षांपूर्वी २ ऑक्टोबरला सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास मनाई करणारा कायदा झाला होता ना, त्याची काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही >>>>> तो कायदा म्हणजे विनोद करून टाकलेला कायदेपंडीतांनी झाला त्याच दिवशी Uhoh
बाकी स्मोकर कुणाला ऐकत नाहीत हे खरं, घरात एक स्वतंत्र स्मोकिंग रूमची व्यवस्था करून घ्या जमलं तर

सासरे स्मोक करतात तर दिराला कोणाची भीती? लपुन छपुन कशाला?

>> सासुबाई माझा मुलगा वाया गेला म्हणुन रडतील ह्याची.

त्यांना स्मोकिंग अज्जिबात आवडत नाही. पण इथे एकत्र कुटंब पद्धती आहे.
घरातल्या बायकांना आणि त्यांच्या मताला काडीचीही किंमत नसल्याने त्या सासरेबुवा आणि त्यांच्या भावांच्या स्मोकिंगविषयी काहीही करु शकत नाहीत.

अजुन एक कारण म्हणजे इथे (सासरी) आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसमोर स्मोक करत नाहीत. आणि याचीच दुसरी बाजु म्हणजे मोठे करतील ते सगळे बरोबर आणि लहानांनी ते सहन केले पाहीजे.

हे विधान पटणारे नाही. मी माझ्या नोकरीच्या २१ वर्षाच्या अनुभवानी सांगतो की स्मोकिंचे प्रमाण कमी होते आहे.

>> असं खरंच होत असेल तर सोने पे सुहागा.. पण दुर्दैवाने माझ्या आजुबाजुला परीस्थिती वेगळी आहे.

ह्यात काडीचेही तथ्य नाही.

>> हे मला एका डॉक्टरने सांगितले आहे.

ई-सिगारेट हा स्मोकिंग च्या व्यसना वरचा चांगला उपाय आहे.

>> कुठे मिळेल ही?

झकासराव तुम्ही दिलेली लींक (जुन्या हितगुजची) वाचून हताश आणि हेल्पलेस वाटते आहे Sad

घरात एक स्वतंत्र स्मोकिंग रूमची व्यवस्था करून घ्या जमलं तर

>> ते तिथे जाऊन ओढणार नाहीत. उलट तुम्हीच एक रूम करून घ्या म्हणतील. त्याप्रमाणे आमच्या बेडरूममध्ये कोणीही येत नसल्याने तो "नो स्मोकिंग झोन" झाला आहे. पण आपण २४ तास तर बेडरूममध्ये बसून राहू शकत नाही.

ई-सिगारेट हा स्मोकिंग च्या व्यसना वरचा चांगला उपाय आहे.

>> कुठे मिळेल ही? >>>>>>>>>>

गूगल वर "e-cigarette in india" असा सर्च करा. सध्या ऑन लाईन च मिळते. पण नेहमीच्या सिगरेट पेक्षा स्वस्त पडते.

सासुबाई माझा मुलगा वाया गेला म्हणुन रडतील ह्याची.

त्यांना स्मोकिंग अज्जिबात आवडत नाही. पण इथे एकत्र कुटंब पद्धती आहे.
घरातल्या बायकांना आणि त्यांच्या मताला काडीचीही किंमत नसल्याने त्या सासरेबुवा आणि त्यांच्या भावांच्या स्मोकिंगविषयी काहीही करु शकत नाहीत.

>>
अस्स आहे होय. मग बिनधास्त तुम्ही आणि तुम्हाला साथ देणारे कुटुंबिय सासर्‍यांच्या समोरच एकत्र स्मोक करा. (जमल्यास हुक्का पार्टीच करा.)
कोणी काही आक्षेप घेतला तर सरळ बोलायचे "तुम्ही करता ते चालते? आपण एकत्र जेवतो, टीव्ही बघतो, तर एकत्र सिगरेट फुंकली तर काय झाले?"
"आम्ही वयाने लहान. मोठ्यांचे अनुकरण नाही करणार तर कोणाचे करणार?"

बघा हा प्रयोग करुन. Happy

राहुल१२३ प्रयोग म्हणुन ठिक आहे हो..
पण ज्याच्या नुसत्या वासानेदेखील मळमळते ते व्यसन गंमत/ अनुकरण/ प्रयोग यातील काहीही कारणाने करणे मलातरी अशक्य आहे.

खरंच स्मोकिंग इतके हानीकारक आहे का>>> आहे गं.
मी माझ्या वडिलांना गमावलेय यापायी. Sad
ते प्रचंड स्मोकिंग करायचे. मी आणि आईने खूप सांगून पाहिले. काही होत नाही मला म्हणत बसायचे. शेवटी मी आमच्या फॅमिली डॉ. ना समजावून सांगायला सांगितले. पण व्यर्थ!
त्यांचे पाय खूप दुखायचे नंतरनंतर. कारण डॉ. नी सांगितले की नसा आवळल्या जात असल्यामुळे हे होतेय. लवकर सिगरेट कमी करा. डॉ. सांगायचे अगदी पूर्ण बंद लगेच होणं शक्य नाही पण १० वरून ५ वर मग ४,३,२ असे करत बंद करा. पण बाबांनी ऐकले नाही.
त्यांच्या दाताचा रंग बदललेला होता. खोकला यायचा बर्‍याचदा.
शेवटी हार्टफेलने गेले ते ५ महिन्यापूर्वी.

पियूपरी तू नसलीस तरी ह्या वाक्याचा इतका अनर्थ नको करूस. दुष्ट व्यक्ती सुद्धा मरावी अस कधी मी म्हणणार नाही. तू घरात नसलीस तरी एवढच म्हणायचं होत. म्हणून तुला वर्कशोप बद्दल विचारल होत. सामान्यपणे व्यवसायासाठी माणूस ८-१० तास बाहेर जातो. मग जे काही २-४ तास एकत्र जेवणे, टीव्ही ह्याचे असतात त्यात तुला सहज नियम घालता येतील. अख्खा दिवस मी येतीये का काही तुम्हाला सांगायला एवढे २-४ तास ओढू नका हे सहज बोलता येत. पण हि फक्त पहिली पायरी झाली. त्यांनी व्यसन सोडव ही त्यांच्यासहित सर्वांची इच्छा असणार, असावी.
सोडणाऱ्यासाठी व्यसन हे व्यसन असतंय. व्यसन सोडताना शरीरावर काय परिणाम होतात हे एक दिवस, एक आठवडा, एक महिना लक्षात आले तरी कुणाला व्यसन सोडायला कसे उद्युक्त करावे? व्यसन सोडताना आपली भूमिका काय असावी इ इ हे आपसूक लक्षात येतय. म्हणून आधी केले मग सांगितले ह्या न्यायाने आपले स्वतःचे एक व्यसन (मग ते काहीही असेल - एखादा टीव्ही शो, चहा, कोफी, गोड खाणे) कमी करता आले पाहिजे. फक्त तुझ्यासमोर व्यसन करू नये एवढीच इच्छा असेल तर ते खूपच सोप आहे, कारण तिथे ७५-१००% कंट्रोल तुझ्या हातात आहे.

अंजली Sad

तुला वर्कशोप बद्दल विचारल होतं.

>> ते सारखं नसतं गं.. बॅच असली की असतं.. तेही रोज फक्त १ तास..

असो..

माझ्या अचानक हायपर व्हायचं कारण म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंगचे लक्षात आलेले दुष्परीणाम आणि गणपतीत सगळे एकत्र जमलेले असतांना सगळ्यांनी गणपतीसमोर एकत्र बसुन केलेले स्मोकिंग आणि एका सासरेबुवांनी तोंडावर सोडलेला धूर.. Sad

माझ्या अचानक हायपर व्हायचं कारण म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंगचे लक्षात आलेले दुष्परीणाम आणि गणपतीत सगळे एकत्र जमलेले असतांना सगळ्यांनी गणपतीसमोर एकत्र बसुन केलेले स्मोकिंग आणि एका सासरेबुवांनी तोंडावर सोडलेला धूर.. >> ह्म्म्म गणपतीसमोर करतात?!! असो.. हा अचानक हायपरचा विषय नाही तर सतत पाठपुरावा करायचा विषय आहे. एकदा बोलून काहीच सुटणार नाही पण म्हणून हा विषय सोडून द्यावा इतका साधा नाहीये. आकडेवारी, डॉक्टर इ इ सांगून काही सुटत नाही. न चिडता, न रडता सातत्याने हे घरात नको हे घरात नको हे सांगावे लागेल.

पियु परी
तुझ्या कुटुंबात तुझ्यासारखा विचार करणारे अजूनही लोक असतील ना, तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काही विचार केला तर मार्ग निघू शकतात.

तुझ्या कुटुंबात तुझ्यासारखा विचार करणारे अजूनही लोक असतील ना

>> हो आहेत ना.. पण त्यांनी पण हात टेकलेत..
सगळे त्यांना घाबरतात.. रादर कंडिशनींगच तसं झालंय..

माझे वडील स्मोक करत असते तर ज्या अधिकारवाणीने मी त्यांना सांगु शकले असते त्या अधिकाराने माझा नवरा किंवा नणंद अजिबातच सांगू शकत नाहीत. त्यामूळे ते इग्नोर करतात.

माझ्या जावेला त्रास व्हायचा पण तिला सवय झालीये आता.. आणि तिने सुरुवातीला "मला (म्हणजे तिला) स्मोकिंगचा त्रास होतो" हे सांगण्याचे केलेले प्रयत्न आजही तिच्यामागे कुचेष्टेचा विषय म्हणुन चघळले जातात.

मलाही नवर्‍याने या विषयावर साबुंशी कधीही न बोलण्याची तंबी दिलीये. Sad

माबोवरील डॉक्टर्स किंवा या क्षेत्रातले तज्ञः

१. खरंच स्मोकिंग इतके हानीकारक आहे का?

होय. यापेक्षाही जास्त हानीकारक आहे.

२. जर खरंच धुम्रपानामुळे काही रोग/विकार होत असेल तर याचा धोका त्यांना किती असतो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना हे रोग/विकार होण्याचा धोका किती असतो? घरात लहान मुल असेल तर त्याला किती धोका असतो?

भरपूर. अनेक प्रकारच्या आकडेवारी उपलब्ध आहेत.

३. कुठेतरी वाचले आहे की स्मोक करणार्‍याने घराबाहेर जाऊन स्मोक केले तरी त्यानंतर २ तास त्याच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला तेवढाच धोका असतो.

माझ्या अभ्यासात तरी असे लिहिलेलेल वाचनात आले नाही. कधी कधी पेशंटला घाबरवण्यासाठी आम्ही डॉ. लोक अशा गोष्टी सांगतो. म्हणजे, मला दिस्तंय की बाबांना बाळाचा लळा लागलाय. मग त्यांची बिडी सुटली तर बरंचेय न? म्हणून काही डॉक्टर्स अशी गोष्ट सांगू शकतात.. तोंडाचा घाण वास बराच वेळ येतो हे मात्र बरोबर.

४. ज्याप्रमाणे दारुचे व्यसन हे व्यसन करणार्‍याच्या अपरोक्ष सोडवण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत तशी धुम्रपानासाठी आहेत का?

वर एक इ सिगारेट लिहिली आहे. निकोटिन पॅचेस, निकोटिन च्युइंग गम बाजारात (मेडिकल स्टोर्स मधे) उपलब्ध आहेत. दारू सोडविण्यासाठी जी औषधे आहेत, उदा. डायसल्फिराम, ती अत्यंत डेंजरस आहेत. व फक्त एक्स्पर्ट सुपरविजनखाली देण्यात यावीत.
"अपरोक्ष" सोडविणार्‍या वैदूंच्या जाहिरातींपासून प्लीजच दूर रहा. ते काय देताहेत याची काहीच ग्यारंटी नाही. जीव लाखमोलाचा नव्हे, अनमोल आहे. त्याच्याशी खेळू नका.

५. स्मोकिंग करणार्‍याच्या सतत संपर्कात राहणार्‍या व्यक्तीने कोणती औषधे इ. घेऊन ती दुष्परीणांमापासुन दूर राहू शकते का?

नाही. अशी औषधे नाहीत.

- (एक्स स्मोकर,च्युअर,इ.इ.टोबॅको यूजर) डॉ. इब्लिस

फु.स.
उद्या एक मास्क विकत आणा.
चौकात ट्र्याफिक पोलिस घालतात नं? तसा. तो असा मुस्क्या बांधल्यागत बांधून घरात फिरत जा. हे असं का? असे विचारले गेले, तर सांगा, की मला आजकाल दम लागतो. डॉक्टरांनी घरातली धुरकट परिस्थिती ऐकून हा सल्ला दिला आहे.
ज्येष्ठांच्या धुराला आवरता येत नसेल, तर तुमचे नाकतोंड बंद करा, असा सल्ला व मास्क त्यांनी "विकत" दिला असे सांगा.
माझे नांव सांगा.
पुढचे मी त्यांना सांगतो Happy

पूर्ण चर्चा वाचली नाही. इब्लिस यांची उपाय योजना वाचली, स्त्युत्य आहे.

एक प्रयोग करुन बघता का? ( कदाचीत केला गेला असेलही किंवा वर कुणी तसे लिहीले असेल पण घाईत वाचले नाही)

घरातील लहान मुलांच्या हातात कागदाची ( सिगरेटसारखी किंवा त्याच्या पाकिटाची) सुरनळी करुन, ती देऊन त्यांना ( मुलांना ) त्या आजोबा आणी काकापुढे ओढायची अ‍ॅक्शन करुन दाखवायला सांगा. माझा सल्ला भयानक विचीत्र वाटु शकेल, परंतु लहान मुलांपुढे आपण काय आदर्श ठेवतो आहे याची जाणिव ( थोडक्यात मुस्काटात बसेल अशी) झाली तर कदाचीत काही दिवे पेटतील.

माझ्या मैत्रिणीच्या जावेने हे प्रयोग केले नवर्‍यापुढे, तो वरमला. थोडी फार लाज शाबुत असल्याने त्याने त्याच दिवशी सिगरेट ओढणे सोडुन दिले. अर्थात, मुलाची शपथ वगैरे पण तिने घातली होती. काही महाभाग यालाही बधत नाही ते सोडा.

इब्लिस तुमचा आणि रश्मी यांचा सल्ला अतीशय आवडला.

इब्लिस खरंच मनापासुन आभार.

सासुबाईंना आज पुन्हा दम्याचा अ‍ॅटॅक आलाय. Sad पण "त्यां"च्या वागण्यात नो फरक..त्यामुळे माझा मास्क काय काम करेल सांगता येत नाही पण मी नक्की ट्राय करेन हा उपाय.

रश्मी.. अजुन घरात कोणी लहान नाही. हि परीस्थिती कायम असेपर्यंत मला इतर कोणाचाही जीव धोक्यात घालायचा नाहीये. Sad पण सल्ल्यासाठी आभार !!!

जरा मूळ मुद्दा सोडून पण तरी धुम्रपानाविषयी:

मी University of Texas at Austin इथे PhD करत्येय. इथल्या बऱ्याच research labs ना Cancer Research Institute of Texas (CPRIT) कडून funding मिळते. ह्या CPRIT ने गेल्या वर्षी जाहीर केले की जर तुमचा campus "Tobacco-free" नसेल तर funding बंद! ही मात्रा बरोब्बर लागू पडली! गेल्या April पासून आमचा campus Tobacco free झाला आहे! पैशाच्या जोरावर चांगले बदलही घडवून आणता येतात हे जाणवलं!

सुदैवाने घरात कोणी स्मोक करत नाही. मध्यंतरी भावाला सवय लागली होती पण त्या वाईट मित्रांची संगत सुटली आणि सवयही!

घरात कोणी लहान असले तर त्याच्यासाठी तुम्ही काय विशेष काळजी घेता?
मी पूर्वी दररोज ८-१० सिगरेटी फुंकत होतो. पण माझा मुलगा जन्माला आला नि त्याला अस्थमा आहे असे कळल्यावर घरी सिगारेट पिणे सोडले. पण बाहेर पिणे चालूच होते. पण एक दिवस माझा घसा भयंकर दुखू लागला म्हणून प्यायलो नाही, घसा बरा झाल्यावर चार दिवस थँक्सगिव्हिंग ची सुट्टी म्हणून पिणे बंद. नंतर एक दोन दिवस ऑफीसच्या मशिनमधे माझा ब्रँड मिळाला नाही म्हणून बंद. नि नंतर आपोआप पिऊ नये असे वाटू लागले. मग सहा महिन्यानी एकदा एक पाकीट आणून फुंकले पण त्याला आता ३० वर्षे झाली.

थोडक्यात कोल्ड टर्की सोडा वगैरे मला जमले नाही, हळू हळू करूनच सोडणे जमले. तसेच माझे मलाच वाटले म्हणून सुटली, इतरांनी सांगितले म्हणून नव्हे.

गंमत अशी की मी डॉक्टरला विचारले की मी आता तीस वर्षे सिगारेट पीत नाही म्हणजे माझी फुप्पुसे आता ठीक झाली असतील ना? तो म्हणाला तसे नसते, एकदा जे दुष्परिणाम झाले ते तसेच रहातात!

१. खरंच स्मोकिंग इतके हानीकारक आहे का? होय. यापेक्षाही जास्त हानीकारक आहे.
........भरपूर. अनेक प्रकारच्या आकडेवारी उपलब्ध आहेत.

मग वर सिमन्तिनी यांनी जी आकडेवारी दिली आहे ती खोटी आहे का?

स्वतः मला हे आकडेवारी वगैर वर काही विश्वास नाही. एक दोन वर्षे संख्याशास्त्र शिकल्यावर आकडेवारीतले बरेच विनोद कळतात.

खरे काय ते डॉक्टरच जाणे. मला जे जे डॉक्टर माहित आहेत त्यापैकी सर्वांनी सिगारेट पिऊ नका असेच सांगितले. शिवाय आकडेवारी काही असो, डोक्टरच्या मते सिगारेट प्यायल्यामुळे घशाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. तसे झालेले लोक पाहिल्यावर मुळीच सिगारेट नको वाटते.

अमेरिकेत बर्‍याच ठिकाणी सिगारेट पिण्याला बंदी आहे. नि दर वेळी पोलीसची वाट न पहाता आजूबाजूचे लोक सिगारेट पिणार्‍याला सिगारेट विझवायला लावतात. आता इथे - माझे पैसे, माझे फुफ्फुस वगैरे, वाद होतात. पण एकदा कायदा केल्यावर ह्या वादांना कोणी भीक घालत नाही. प्रश्न कायदापालनाचा आहे.

बाकी भारतात काय, कायदा, नियम, राजकारण, धंदा वगैरे सगळी नुसती गंमतच!! लै धम्माल राव. कायकू टेन्शन लेनेका? वाट्टेल ते करा, बरोबर माणसाला पैसे द्या की झाले..
फक्त बॉलीवूड नि क्रिकेट!!

मग वर सिमन्तिनी यांनी जी आकडेवारी दिली आहे ती खोटी आहे का? >> संदर्भ हवे असतील तर मागा, आनंदाने देईन पण उगीच इब्लीससर आणि माझ्यात का 'असंतुष्टी का बीज' लावताय Happy त्यांच्याकडे दुसर्या देशातील किंवा अक्ख्या जगातील किंवा जुनी किंवा प्रोजेक्तेद अशी आकडेवारी असेल.
माझे रेफरन्स इथले आहेत -
http://www.cdc.gov/tobacco/data_statistics/fact_sheets/adult_data/cig_sm...

अजून एक दोन पेपर होते सवडीने टाकते.

संदर्भ हवे असतील तर मागा, आनंदाने देईन पण उगीच इब्लीससर आणि माझ्यात का 'असंतुष्टी का बीज' लावताय

असे काही नाही हो.

माझ्यासाठी, तब्येतीच्या बाबतीत आकडेवारीला अर्थ नाही. शंभर कोटी लोकांना पोलेनची अ‍ॅलर्जी होत नसेल पण मला होते! दहा कोटी लोक पुण्यात तोंडाला मास्क न लावता फिरतात, त्यांचा घसा दुखत नाही. माझा मात्र पुण्यात आल्यावर एका तासात घसा खलास!

पण तोंडाला मास्क लावूनसुद्धा पुण्यात निदान आठवडाभर रहाण्याची इच्छा आहे - घरचे लोक जाऊ देत नाहीत.

माझ्या एका कलीगने "सेल्वा माइंड कंट्रोल" हे पुस्तक वापरून स्वतःची सिगारेट सोडली. त्यात बरीच चांगली टेक्नीक्स आहेत.
मीही कुतुहल म्हणून ते पुस्तक वाचले...त्यात अल्फा स्टेट ऑफ माइंड मधे स्वयंसूचना द्यायच्या अशा पद्धतीचे टेक्नीक आहे. म्हणजे असे की, सुरुवातीला डोळ्यासमोर एक स्क्रीन आणायची..त्यात स्वतःच्या दिनक्रम तटस्थ्पणे बघायचा....सकाळ झाली, उठवत नाहीये, सिगरेट हवीये.....ती ओढल्याशिवाय उठवणार नाही....मग सिगरेट ओढली.....इथे ती खरीखरी ओढल्याप्रमाणे फिल करायचे. मग खोकला येतोय्.....दम लागतोय्...आजारी आजारी वाटतय्, हे सगळे अनुभवायचे. व नंतर पहिली स्क्रीन मिनिमाइज करून उजवीकडे न्यायची व नवीन स्क्रीन डो़ळ्यापुढे आणायची..त्यात सिगरेट न ओढणारा मी अनुभवायचा...पहाट झाली...फ्रेश वाटते आहे. आता मस्त्पैकी तयार होऊन ऑफीस्....काम करायला मजा येतीये...दम लागत नाहीये, बायको खूश आहे... वगैरे वगैरे .महीनाभरानंतर हळूहळू स्वतःवर कंट्रोल यायला लागतो. फक्त रोजचा दिवस जपायचा. मित्राला सिगरेट अजूनही आवडतेच, पण आता स्व्तःला त्यापासून लांब ठेवायला जमायला लागले आहे त्याला. अशी इतरही अनेक पुस्तके किंवा टेक्नीक्स असतील परंतु मित्राच्या अनुभवामुळे मिळालेली माहीती माबो मित्रमैत्रिणींबरोबर शेअर केली आहे. (डिस्क्लेमर)मी डॉ नाही किंवा मानसशास्त्रज्ञही नाही. किंवा हा अनुभवही माझा नाही.
अवांतर्...मित्र आता सेल्वाच्या एवढा आहारी गेलाय की साय्-भात सोडायसाठीही त्याला सेल्वा टेक्नीक वापरावे लागते.

इब्लिस आणि रश्मी +१. प्रयोग करुन बघा.
तसच, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधे भयानक पोस्टर्स आहेत. स्मोकर्स ना अवश्य दाखवावीत ती.>>>> दिनेश म्हणतात तसं १०-१२ पोस्टर्स आणुन घरात लावुन बघा.

नको असलेला शेवटचा उपाय :- (काही दिवसांसाठी) घर सोडा. Sad अर्थात हे अतीच होईल, पण काय सांगावं कशानं ते बदलतील.

घरात लहान मूल असेल , ( तुमच्या घरात आहे बहुतेक असे मला वाटतेय ), तेव्हा त्याचे कारण सांगून घरातले स्मोकिन्ग बन्द करा.
अगदी वाट्टेल ते झाले तरी, घरात स्मोकीन्ग चालणारच नाही असे निक्षून सांगा. स्मोकिन्ग करणारे जितके हट्टी असतात त्यांच्या दुप्पट हट्टी बना. आर या पार , या गोष्टीचा एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाका.

मी क्वचित सिगरेट ओढलेली आहे/ ओढते (महिन्या-दोन महिन्यातून एखादा झुरका. एखादाच झुरका.. आख्खी सिगरेट जमत नाही.). त्यातली गंमत माहितीये. आणि ती गंमत अंगाशी येऊ शकते हे माहित असल्याने इतक्या वर्षात फ्रिक्वेन्सी वाढणं शक्य नाहीये. पण सर्व दुष्परिणाम माहित असूनही रेग्युलर स्मोकरला सिगरेट सोडाविशी न वाटणे ते 'हो हो कधीतरी सोडेन मी' असे नुसते फुकाचे बोल याच्यामागची मानसिकता समजू शकते.
त्यामुळे जोवर माणूस स्वतःहून ठरवत नाही सिगरेट सोडायचे तोवर कुणी काहीही करू शकत नाही हे अंतिम सत्य आहे.
मला वाटतं सिमन्तिनीची पहिली उपरोधिक पोस्ट याच बेसिसवर असावी.

>>>ई-सिगारेट हा स्मोकिंग च्या व्यसना वरचा चांगला उपाय आहे. ह्यानी शरीराला फक्त निकोर्टीन मिळते. पण धुर नसल्या मुळे कार्बन, टार अश्या गोष्टी फुफूसात जात नाहीत. पण ही सिगारेट खर्‍या सिगारेट सारखी धुर ( ग्लिसरीन आणि पाण्याच्या वाफा ) सोडते, त्यामुळे ओढणार्‍याला पण आवडते. >>>>
+१००
खरच बाकी काहीच उपाय चालत नाहियेत तर हा उपाय कराच ...

Pages