स्वयंपाकघरात अन्न टिकविण्यासाठी/साठविण्यासाठी प्लास्टीक चा पिशव्या, डबे, बाटल्या इ. स्वरुपात वापर केला जातो. पण बर्याच लोकांकडून अज्ञानामुळे/ अनवधानाने योग्य प्लास्टीकचा वापर केला जात नाही. अन्नासाठी कायम फूड ग्रेड प्लास्टीकचा वापर केला जायला पाहिजे. कुठलीही प्लास्टीकची वस्तु विकत घेताना त्याच्या तळाशी फूड ग्रेड ची खूण (प्लास्टीकचा ग्लास / काटा व चमचा ह्या स्वरुपात एक खूण असते) बघून घ्यावी. तसेच एका त्रिकोणात १ ते ७ पर्यंत आकडे लिहिलेले असतात. १ हा आकडा असेल तर फक्त एकदा वापरून फेकून द्यावे लागणारे प्लास्टीक असते.
प्लास्टीक बद्दल समज, गैरसमज, फायदे, गैरफायदे, प्लास्टीक च्या वस्तुंची सफाई, पर्यावरणावर प्लास्टीकचा परीणाम व उपाय ह्या सर्वांबद्दल इथे ह्या धाग्यावर चर्चा करू या!
हे फूड ग्रेड चे सिंबल्स
हे प्लास्टीक रीसायकल गाईड
वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक्स ग्रेड्सची तुलना:
इब्लिस यादीमधे सिंथेटिक
इब्लिस
यादीमधे सिंथेटिक किंवा सिंथेटिक धागा मिक्स कापडचोपड राह्यलं हो.
योग्य प्रश्न
अन्न आणि प्यायचं पाणी हे शक्यतो प्लास्टीकमधे नसावे, असलेच तर चांगल्या ग्रेडचे प्लास्टिक असावे.
बाहेर जाताना कापडी पिशवी बरोबर ठेवावी जेणेकरून प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा कमी प्रमाणात निर्माण होईल.
हे एवढे वगळता प्लॅस्टिक प्लॅस्टिक म्हणत भूत लागल्यासारखे सगळे प्लॅस्टिक काढून टाकायची गरज नाही.
fridge madhey bhaji
fridge madhey bhaji thevnyasathi plastic bag la kaahi paryay ahe ka
<<
अहो, तो फ्रीज आतून सगळाच प्लास्टिकचा बनलेला आहे हो!
इब्लिस
इब्लिस

नी, ऑलरेडी लिहिले आहे मी ते
नी, ऑलरेडी लिहिले आहे मी ते कपड्यांचं.
>>
कपाळाला लावलेली टिकली काढा ती. प्लास्टिकच्या टिकलीला प्लास्टिक डिंक लावलेला आहे तो.. अन हो. अंगावरचे कपडे. सिंथेटिक कापड = प्लास्टिक च.<<
अहो, तो फ्रीज आतून सगळाच
अहो, तो फ्रीज आतून सगळाच प्लास्टिकचा बनलेला आहे हो! >>
पण त्यात थेट कुठे आपण ठेवतो काही?
प्लॅ.पि ऐवजी नायलॉनच्या जाळीच्या पिशव्या, हवाबंद प्लॅस्टिकचे डबे इ पर्याय दिसले. पण ते सर्वच प्लॅस्टिक/ सिन्थेटिक. कापडी पिशव्यातच ठेवता येईल.
भाजी/ फळं यांसाठी मात्र अगदी नक्कीच कापडी पिशवी वापरता येते. कृपया आपापल्या पर्स/ बॅगांमध्ये एक कापडी पिशवी ठेवत चलाच.
Iblis hahaha sahi ahe Kapdi
Iblis hahaha sahi ahe
Kapdi pishvi direct fridge madhey ...baap re
हो, मलाही धागा पूर्ण वाचून
हो, मलाही धागा पूर्ण वाचून आपण पॅरॅनॉईड होतोय का वाटायला लागलंय..
कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी वापर गैरच, पण म्हणून आपण ते पूर्णपणे हद्दपार करू शकतो का?
खालील गोष्टी झाल्या/केल्याच पाहिजेत
१. प्लॅस्टिकच्या पातळ पिशव्या शक्य तेवढ्या कमी वापरायच्या. इतर जाड पिशव्या शक्य तेवढे दिवस वापरत रहायच्या (चांगल्या कॅरी बॅग्ज). खरेदीसाठी स्वतःच्या कापडी पिशव्या शक्यतोवर जवळ ठेवायच्या
२. बिस्लेरी आणि तत्सम बाटल्या लगेच फेकून द्यायच्या.
३. मावेत गरम करताना काचेची/सिरॅमिकची भांडी वापरणं
इ.
पण स्वयंपाकघरातून साठवणीचे डबे वगैरे हद्दपार कितपत व्यवहार्य आहे? मुळात आता चांगल्या दर्जाचे पत्र्याचे डबे मिळतात का? स्टीलचे डबे सगळ्यांना प्रत्येक वेळी परवडणारे आहेत का? काचेच्या बरण्या आता खाद्यपदार्थांबरोबर येत नाहीत (उदा: बोर्नव्हिटा), म्हणजे वेगळ्या आणायच्या. त्या बाईला घासायला द्यायच्या म्हणजे धड हाताळल्या जातील त्याची गॅरंटी नाही, इ आणी असे अनेक मुद्दे काढता येतील
आंघोळीच्या बादल्या आणि साबण ठेवायची सोपकेस>> निंबे, सॉरी पण फस्सकन हसू आलं.. त्या गोष्टी प्लॅस्टिकच्या असल्या तर काय हानी होते?
मुळात प्लॅस्टिकचा वापर ते सोयीचं आहे म्हणूनच वाढला ना? ते इतकं विषारी असतं तर इतकं सर्वव्यापी झालं असतं का? अनावश्यक गैरवापर टाळा, पण पॅरॅनॉइया नको
इब्लिस पण स्वयंपाकघरातून
इब्लिस
पण स्वयंपाकघरातून साठवणीचे डबे वगैरे हद्दपार कितपत व्यवहार्य आहे? मुळात आता चांगल्या दर्जाचे पत्र्याचे डबे मिळतात का? स्टीलचे डबे सगळ्यांना प्रत्येक वेळी परवडणारे आहेत का? काचेच्या बरण्या आता खाद्यपदार्थांबरोबर येत नाहीत (उदा: बोर्नव्हिटा), म्हणजे वेगळ्या आणायच्या. त्या बाईला घासायला द्यायच्या म्हणजे धड हाताळल्या जातील त्याची गॅरंटी नाही, इ आणी असे अनेक मुद्दे काढता येतील>>> वरदा, शिवाय आमच्यासारखे लोक जे कधीही संसार ट्रकमधे घालून इकडेतिकडे जातात, त्यांचं सगळे काचेचे वगैरे डबे असले तर झालंच काम.
मी कधीही बाहेर जाताना एक कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडते. किराणा वगैरे पण ताडपत्रीच्या पिशवीतून. (आमच्याक्डे तीस छाप बीडीच्या भरभक्कम ब्यागा हायती) पूर्वी बिग बझारमधे वगैरे प्लास्टिकच्या पिशव्यांना पैसे पडत नव्हते. तेव्हा माझ्याकडच्या पिशव्या बघून मला एका सेल्सगर्लने ऐटीत "आम्ही देतो पिशव्या फुकट, घरून आणायची गरज नाही" हे ऐकवलेले. तेव्हा यातच किराणा घालून दे. प्लास्टिक नको हे मला सांगावं लागलं होतं. ती माझ्याकडे "अलिबागसे आयेली है" नजरेने बघत होती.
आमच्याकडे हल्ली प्लास्टिकच्या
आमच्याकडे हल्ली प्लास्टिकच्या पिशव्यांवर ब्लँकेट बॅन घातलाय सरकारने. कोणत्याही प्रकारच्या प्लास्तीकच्या पिशव्या चालणार नाहीत.
भाजी, फळं, सामान आणायला कापडी पिशव्या. बर्याचदा दुकानातून कपड्यासदृश दिसणार्या मटेरियलच्या पिशव्या मिळतात. (हे काय मटेरियल आहे मला अजून कळालं नाहीये) त्या पिशव्यांमध्ये किंवा कपड्याच्या पिशव्यांमध्ये भाज्या ठेवल्या तर खराब होत नाहीत असा अनुभव आहे. अगदी पालेभाज्या /चिरलेल्या भाज्यासुद्धा २-३ दिवस चांगल्या रहातात.
प्लास्टिकच्या पिशव्यांवरच्या बंदीनंतर चिकन /मटण विकणार्या दुकानदारांना काय वापरायचं हा प्रश्न पडला होता. बाकीच्या दुकानांप्रमाणे कागद किंवा कापड वापरता येत नाही. आता अल्युमिनियम फॉइलसारखं आतून आवरण असलेल्या कागदाच्या पिशव्यांचा वापर करायला लागलेत हे दुकानदार.
मला डस्टबीन लायनर्सना मात्र पर्याय सापडत नाहीये अजूनही.
. तेव्हा यातच किराणा घालून
. तेव्हा यातच किराणा घालून दे. प्लास्टिक नको हे मला सांगावं लागलं होतं. ती माझ्याकडे "अलिबागसे आयेली है" नजरेने बघत होती.>>>
नंदिनि अलिबागचा वापर करु नका.आमिरच्या तलाशचा किस्सा माहित आहे ना! उगाच त्या भागातिल लोकांच्या भावना दुखावतात.
ज्या मॉल्समध्ये किराणा/ भाजी/
ज्या मॉल्समध्ये किराणा/ भाजी/ फळं मिळतात तिथे आता प्लॅस्टीकच्या पिशवीसाठी पैसे घेतात. आकारानुसार १/२/३ रुपये. पण ही किंमत इतकी नगण्य आहे, की पुढच्या वेळी लक्षातही रहात नाही पिशव्या न्यायचं
Kapdi pishvi direct fridge madhey ...baap re>> का? काय प्रॉब्लेम होतो/ होईल याने?
हा हा हा ! इब्लिस! तुम्ही
हा हा हा ! इब्लिस!
तुम्ही विनोद जबरीच केलात, पण पाणी व अन्न ह्यांच्या साठवणी/वाहतुकी साठी प्लास्टीक नको. असा मुद्दा आहे. ह्यात टिव्ही, इंजेक्शन इ. बाबी कुठून आल्या?
आंघोळीचा साबण वा आंघोळीचे पाणी - इथे ओलसर गोष्टी आल्या म्हणून शंका विचारली. त्यात फस्स्कन हसण्यासारखेही काय आहे, समजेचना!
असो. पॅरानॉईड वगैरे, होऊ नका बुवा आणि बायांनो!
प्लास्टीकचे पूर्णपणे विघटन होत नसल्याने जितके जास्त जनरेट होईल तितकी पर्यावरणाची हानी आहे, म्हणून रोजच्या जीवनात जिथे सहजासहजी शक्य आहे तिथे काय पर्यायी वस्तु वापरता येतील अश्या अर्थाने ती पोस्ट होती. 'सुतावरून स्वर्ग' हा प्रकार इथे नवा नाही. त्यामुळे मला आश्चर्य वाटले नाही. 
पावसाळ्यात मुंबईत
पावसाळ्यात मुंबईत प्लास्टिकशिवाय कसे जगणार आहोत लोकहो?
वरदा +१००
आमच्याकडे मॉल्समध्ये /मोठ्या
आमच्याकडे मॉल्समध्ये /मोठ्या दुकानांमध्ये वैगरे तर प्लास्टिकच्या पिशव्या बंद झाल्या. आपल्याकडे पिशवी नसेल तर अशा ठिकाणी कापडी पिशव्या विकत घ्याव्या लागतात. १०-१५ रु एका पिशवीसाठी या प्रमाणे.
पूर्वी २-३ वेळा ग्रोसरी करताना विकत घेतल्या होत्या पिशव्या. आता आठवणीने नेते पिशव्या घरूनच. तसंही सामान जास्त असेल तर कार्टन्समध्ये पॅक करुन देतात आमच्याकडे. ते सोप्पं पडतं. १-२ खोक्यांमध्ये सगळं महिन्याचं सामान मावतं.
अल्पना, बर्याचदा दुकानातून
अल्पना,
बर्याचदा दुकानातून कपड्यासदृश दिसणार्या मटेरियलच्या पिशव्या मिळतात. >> मंगलोरमधे प्रत्येक देवळातून या मटेरीयलच्या पिशवीतूनच प्रसाद मिळायचा. चेन्नईमधे नल्लीज, पोथीजसार्ख्या दुकानातून याच पिशव्या देतात. मी अशा सर्व पिशव्या जोडून ठेवून मग आईला देते. तिला कुणाला ना कुणाला काही घालून द्यायचं असतं तेव्हा बर्या पडतात असल्या पिशव्या. प्लास्टिकपेक्षा हा पर्याय सोयीस्कर वाटतो मला.
मला डस्टबीन लायनर्सना मात्र पर्याय सापडत नाहीये अजूनही.>>> दिल्ली अथवा मुंबईत शक्य होणार नाही हे ठाऊक आहे. तरी इथे लिहितेय. मी ओला आणि सुका कचरा वेगळा करते. दोन्हीसाठी डस्टबिन्स वेग्ळीच ठेवली आहेत. सुका कचर्यामधे प्लास्टिक पिशव्या असल्यास घडी करून रद्दीमधे देते. (दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवून मग), या डस्टबिन्सला लायनर्सची गरज नसते. ओला कचरा (खरकटे, भाजीचे देठ, शिळंपाकं, चहाची पत्ती) वगैरे सर्व एकत्र करून ठेवते. तेच डस्टबिन बाहेर नेऊन ठेवलं की आमच्याकडे गायी, कुत्रे, कावळे हे सर्व संपवतात. मग स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने की काम झालं. घरातला काढलेला कचरा (मुख्यत्वे धूळ नेऊन माडातच घालते.)
पार्ल्यात बरेच भाजीवाले
पार्ल्यात बरेच भाजीवाले ब्राउन पेपरच्या किंवा वर्तमानपत्राच्या पिशव्या देतात. आपण जर खूप दिवसाची(४ पेक्षा जास्त दिवस) भाजी आणून ठेवणार नसलो तर त्या पिशव्यांमधेच ठेवल्या भाज्या तरी हरकत नाही.
दिल्ली अथवा मुंबईत शक्य होणार
दिल्ली अथवा मुंबईत शक्य होणार नाही हे ठाऊक आहे. तरी इथे लिहितेय. मी ओला आणि सुका कचरा वेगळा करते. दोन्हीसाठी डस्टबिन्स वेग्ळीच ठेवली आहेत. सुका कचर्यामधे प्लास्टिक पिशव्या असल्यास घडी करून रद्दीमधे देते. (दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवून मग), या डस्टबिन्सला लायनर्सची गरज नसते. ओला कचरा (खरकटे, भाजीचे देठ, शिळंपाकं, चहाची पत्ती) वगैरे सर्व एकत्र करून ठेवते. तेच डस्टबिन बाहेर नेऊन ठेवलं की आमच्याकडे गायी, कुत्रे, कावळे हे सर्व संपवतात. मग स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने की काम झालं. घरातला काढलेला कचरा (मुख्यत्वे धूळ नेऊन माडातच घालते.)>>>> हे खरंच बेस्ट आहे.
आमच्या भागात तर कचराकुंडीपण एक-दिड किलोमीटर दुर आहे. अॅक्चुअली मनपाचे सफाईकामगार कचर्याची गाडी घेवून येतात + गल्लीतले रस्ते पण झाडतात. पण यांच्या वेळा अनिश्चित असतात.
एनीवेज कचर्याची चर्चा या बाफवर नको करायला.
पार्ल्यात बरेच भाजीवाले ब्राउन पेपरच्या किंवा वर्तमानपत्राच्या पिशव्या देतात. आपण जर खूप दिवसाची(४ पेक्षा जास्त दिवस) भाजी आणून ठेवणार नसलो तर त्या पिशव्यांमधेच ठेवल्या भाज्या तरी हरकत नाही.>>>पॅरॉनॉइड व्हायला अजून मुद्दा देवू? वर्तमानपत्रांवर छ्पाईसाठी वापरली जाणारी शाई आरोग्यास हानीकारक असते. मग अशा पिशव्यांमध्ये भाज्या?
भाज्या धुवून वापरतात आमच्यात
भाज्या धुवून वापरतात आमच्यात

इब्लिस +१ पण मला प्लास्टिक
इब्लिस +१
पण मला प्लास्टिक फर्निचर अजिब्बात आवडत नाही. त्यापेक्षा लाकडी, बांबु किंवा अगदी भारतीय बैठक सुद्धा कितीतरी एलिगंट वाटते.
सोपकेस वगैरे मेटल, सिरॅमिकच्या छान दिसतात. कचर्याचे डबे मेटलचे चांगले दिसतात. त्याला लायनर म्हणून वर्तमानपत्रं. विचित्र वाटलं तरी मला चालतात. शेवटी ते कचर्याचेच डबे आहेत. धुवावे लागणारच. प्लॅस्टिक लावून ते अगदी स्पॉटफ्री ठेवण्यात विशेष पॉइंट वाटत नाही.
बेसिकली प्लास्टिकच्या वस्तु दिसायला बिल्कुल आवडत नाही, त्यामुळे आमच्या घरातून आपोआपच शक्य तिथे हद्दपार झाल्यात.
फ्रीज बॉटल्स साठी प्लास्टिकला काही पर्याय नाही सापडला. काच वापरणं फिजिबल नाही. स्टीलमध्ये आतलं काही दिसत नाही.
निंबूडा, तुम्ही योग्य
निंबूडा,
तुम्ही योग्य स्पिरिटने माझा प्रतिसाद घेतलात त्याबद्दल धन्यवाद.
स्टोन एज झालं, ब्राँझ एज झालं, आयर्न एजही झालं. आजचं प्लास्टिक एज आहे. प्लॅस्टिक सर्वत्र आहे. थोड्या प्रमाणात टॉक्सिक असेलही, पण मग टॉक्सिक नाही असे काय आहे? सूर्याचे ऊन जसे शरीरात व्हिटॅमिन डी तयार करून देते, तसेच त्वचेचा कॅन्सर अन मोतिबिंदू सारखे आजार होण्यासाठीदेखिल कारणीभूत ठरते. पण आपण ऊन टाळत नाही, अन टाळूही शकत नाही. अती होऊ नये याची काळजी घेतली की झालं.
फूडग्रेड प्लॅस्टिक इ. चर्चा सुरू होती तोपर्यंत मीही बोललो नाही काही. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचं पुढे लिहितोच. पण अगदी बादली सोपकेस त्रासदायक होऊ शकते, हे वाचून, आपण डायरेक्ट ज्या प्लॅस्टिकच्या कॉण्टॅक्टमधे येतो, त्याबद्दलच मी त्या यादीत लिहिले आहे. माऊस अन कीबोर्ड, तसेच सिंथेटिक कपडे जास्त काळ शरीराला स्पर्श करून असतात, ते नाहीत का धोकादायक?
पाण्याची/सोड्याची बाटली परत न वापरणेबद्दल.
का? म्हणजे का नाही वापरायची?
त्या बाटलीवर बेस्ट बिफोर ३-६ मन्थ्स असं लिहिलेलं असतं. जर मी पहिल्या महिन्यात बाटली उघडून पाणी प्यालो, अन नंतर परत त्यात पाणी भरले, तर नक्की काय होते? अन याच्या तुलनेत तीच बाटली साडेपाच महिन्यांनी उघडून त्यातलं सील्ड पाणी प्यालो तर नक्कि काय होते, हे कुणी सांगेल का मला?
कोणते पाणी जास्त धोकादायक 'असू शकते'?? अन का?
पाण्याची/सोड्याची बाटली परत न
पाण्याची/सोड्याची बाटली परत न वापरणेबद्दल.
का? म्हणजे का नाही वापरायची?
त्या बाटलीवर बेस्ट बिफोर ३-६ मन्थ्स असं लिहिलेलं असतं. जर मी पहिल्या महिन्यात बाटली उघडून पाणी प्यालो, अन नंतर परत त्यात पाणी भरले, तर नक्की काय होते? अन याच्या तुलनेत तीच बाटली साडेपाच महिन्यांनी उघडून त्यातलं सील्ड पाणी प्यालो तर नक्कि काय होते, हे कुणी सांगेल का मला?
कोणते पाणी जास्त धोकादायक 'असू शकते'?? अन का?
>>>
मला जे वाटतंय ते लिहितेय! ज्यांना शास्त्रीय माहिती असेल त्यांनी प्रकाश टाकावा प्लीज
त्या बाटलीवर बेस्ट बिफोर ३-६ मन्थ्स असं लिहिलेलं असतं. - म्हणजे बाटली मॅनिफॅक्चर केल्यापासून पुढील ३-६ मन्थ्स पर्यंत त्यातले पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे. (provided kept at specific temperature i guess) त्यामुळे बाटली त्या मुदती पर्यंत कधीही उघडता येईल.
जर मी पहिल्या महिन्यात बाटली उघडून पाणी प्यालो, अन नंतर परत त्यात पाणी भरले, तर नक्की काय होते?>>
प्लास्टीक ची ही बाटली वन टाईम युझेबल (use once and throw types) असल्याचे बाटलीवर लिहिलेले असते. किंवा त्रिकोणात १ आकडा देऊन सुचित केलेले असते. थोडक्यात एकदा त्यातले पाणी प्यायले की फेकून द्यायला हवे. आता ह्यामागचे कारण मागे कुणीतरी प्रतिसादांत लिहिलेय त्याप्रमाणे प्लास्टीक मधून ठराविक टेंपरेचर ला मेंटेन न केल्यास काही फ्युम्स जनरेट होतात, ज्यामुळे आतील अन्न व पाणी टॉक्सिक घटकांनी अफेक्टेड होऊ शकतात, असे असावे असे वाटते.
तीच बाटली साडेपाच महिन्यांनी उघडून त्यातलं सील्ड पाणी प्यालो तर नक्कि काय होते, हे कुणी सांगेल का मला?
>>>
हे मी पोस्टच्या पहिल्या भागात सांगितले. की सील उघडण्यासाठी ती ३-६ मन्थ्स ची मुदत असावी. त्यामुळे साडेपाच महिन्यांनी सील उघडलेले नसल्यास व ती बाटली मेंशन केलेल्या टेंपरेचरला मेंटेन केलेली अस्ल्यास बहुदा त्यातले पाणी प्यायला हरकत नसावी. धोका नसावा.
ह्या चर्चेवरून एक अजून प्रश्न
ह्या चर्चेवरून एक अजून प्रश्न आठवला. औषधांच्या सिरप्स च्या बाटल्यांवर किंवा मलमांच्या ट्युब्स असतात त्यावर
keep away from sunlight
maintain at .... temperature
अश्या प्रकारच्या सूचना वाचल्या आहेत.
माझे बाबा रेल्वे हॉस्पिटल मध्ये पॅथॉलॉजी विभागात काम करतात. त्यांच्या येथे सर्व औषधे ठराविक टेंपरेचर च्या मोठमोठाल्या फ्रीज मध्ये स्टोअर केलेली असतात. त्यामुळे घरातही त्यांना सिरप्स च्या बाटल्या व औषधी ट्युब्स वगैरे फ्रीज मध्येच ठेवायची सवय लागली आहे. त्यामुळे लहानपासून माझ्याही मनावर हेच पक्के बिंबले आहे, की औषधे, कानांचे/डोळ्यांचे ड्रॉप्स इ. कायम फ्रिज मध्ये. सासरी आल्यानंतर सर्व औषधे कायम खिडकीत, कपाटात, फडताळात (थोडक्यात फ्रिज मध्ये नाही) हे पाहून मला कसेतरीच वाटायचे. आणि मी औषधे फ्रिज मध्ये कोंबली की सासरच्यांना कसे तरी वाटायचे.
मग औषधांच्या बाटल्यांवर पाहिले तेव्हा वरील २ सूचना वाचल्या. मग माझे बाबा करतात ते योग्य असे वाटले. पण शास्त्रीय आधार काय आहे, ह्या सूचनांचा? मला वाटते २५ डीग्री सेल्सियस असा उल्लेख असतो. हिवाळ्यात प्रॉब्लेम नाही. पण मुंबईसारख्या ठिकाणी उन्हाळ्यात जेव्हा कधी कधी तापमान ३० ते ३५ च्या आसपास असते, तेव्हा खरंच फ्रिज मध्ये औषधे ठेवणे गरजेचे आहे का?
(बाकी फ्रिज मधून नुकत्याच बाहेर काढलेल्या आय ड्रॉप्स चा गारपणा डोळ्यांना फार फार छान वाटतो!
)
(हा प्रश्न कदाचित ह्या धाग्यावर अप्रस्तुत आहे, पण औषधाच्या बाटल्याही हल्ली प्लास्टीकच्या असल्याने चालू शकावा.)
ओके. प्लॅस्टिकच्या बाटलीतील
ओके.
प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी 'विषारी' का होऊ शकते? तर याचे कारण म्हणजे पॉलिमर ब्रेकडाऊन. प्लॅस्टीक(सर्वच प्रकारची) पॉलिमर्स असतात, त्यांचे आपोआप विघटन होत असते, व त्यातून 'काहीवेळा' जी मोनोमर्स तयार होतात ती टॉक्सिक असतात.
ही मोनोमर्स प्लॅस्टिकमधून बाहेर पडतात. माझ्या आठवणी प्रमाणे याला लीचींग असे नाव आहे. या मोनोमर्स विरघळण्यामुळे पाणी तुलनात्मक रित्या विषारी होईल.
साडेपाच महिने त्याच बाटलीत तेच पाणी भरून ठेवलेले असल्यावर जितके मोनोमर्स त्यात येतील, त्यापेक्षा रोज धुवून तिच्यात मी नवे पाणी भरून तीच बाटली टोटल साडेपाच महिने वापरून फेकली तर नक्कीच थोडे कमी येतील. (बाटली कॉन्स्टन्ट रेटला मोनोमर रिलिज करते आहे, असे गृहित धरून रोज वापरायची बाटली काहि काळ तरी रिकामी राहील असे हिशोबात धरले आहे)
या बाटलीला पाणी/सोडा/थम्सप भरून ६ महिने सेफ राहिल असे बाटलीवर कोकाकोला, पेप्सी इ. कंपन्यांनी छापण्यापुर्वी, तितके कालावधीत बाटलीतून होणारे लीचींग सेफ प्रमाणात राहील याची काळजी घेऊन योग्य दर्जाचे प्लॅस्टिक वापरलेले असावे, व त्यावर एफ.डी.ए. ने लक्ष ठेवावे अशी अपेक्षा आहे.
एकदा वापरून बाटली फेका, क्रश करून फेका, या मागे त्या बाटलीत कुणी नळाचे पाणी भरून तुम्हाला तेच परत विकून फसवणूक करू नये हा हेतू असतो. त्याच प्रमाणे फेकताना योग्य प्रकारे रिसायकल करा असेही अध्यहृत असते. क्रश करून खिडकीबाहेर फेकणे नव्हे.
आयएसाय मार्क नसलेल्या अनेक पाणी कंपन्या कोणत्या दर्जाचे प्लास्टीक बाटल्यांत पाणी भरून विकतात, अन त्यापेक्षाही ते पाणी खरेच मिनरल वॉटर असते काय हा खरा मोठा प्रश्न आहे.
पिण्याच्या पाण्याचेच म्हणाल तर टाकी पासून, पाइपलाईनी पासून अॅक्वागार्ड्/आर ओ फिल्टरपर्यंत सगळेच प्लॅस्टिकचे आहे. अगदी ती मेंब्रेन्स देखिल.
औषधांच्या सिरप्स च्या
औषधांच्या सिरप्स च्या बाटल्यांवर किंवा मलमांच्या ट्युब्स असतात त्यावर
keep away from sunlight
maintain at .... temperature
अश्या प्रकारच्या सूचना वाचल्या आहेत.
कारण नाहीतर औषधाचे विघटन व्हायची शक्यता असते. त्यामुळे ते निकामी ठरु शकते.
Drugs are stable over a specific range of temperature. Some of them undergo degradation on exposure to sunlight.
उदा. लसी (vaccines like polio) ह्यांची cold chain maintain नाही झाली, तर उपयोग नाही.
अमेरीकेत वा भारतात पाणी
अमेरीकेत वा भारतात पाणी पिण्याकरता स्टेन्लेस स्टीलची बॉटल वापरता का?
मला मुलीसाठी व माझ्यासाठी पण हवी आहे. प्लॅस्टीकची बॉटल वापरणे बंद करायचे आहे.
तुम्ही कुठली वापरता?
prr >> मी ईथे २-३ काचेच्या
prr >> मी ईथे २-३ काचेच्या बॉटल आणल्या आहेत.
त्याला वरुन कव्हर पण आहे (सिलीकॉन) च त्यामुळे फुटण्याची पण भिती नाही
Contigo ब्रँडच्या स्टील
Contigo ब्रँडच्या स्टील बॉटल्स येतात. कॉस्टको मधे बरेचदा तीन बाटल्यांचा सेट असतो विकायला. एखाद दुसरीच हवी असेल तर वॉलमार्ट मधे पण पाहिली आहे.
BPA free plastic ची बाटली
BPA free plastic ची बाटली चालेल की. नाही का? आधीचे वाचले नाही.
अनु ... कुठल्या ब्रँडच्या
अनु ... कुठल्या ब्रँडच्या आहेत ?
प्रॅडी ... Klean Kanteen , Contigo ब्रँडच्या पण बघतेय मी. वॉलमार्ट मध्ये मी नक्की बघेन.
सुनिधी प्लॅस्टीक शक्य तितके बंद करायचेय. मी पण BPA free च प्लॅस्टीक वापरतेय.
http://www.containerstore.com
http://www.containerstore.com/shop/kitchen/lunchtimeEssentials/beverageC...
ह्या आणल्या आहेत. म्हणजे ह्यात मोठ्या पण आहेत.
अजुन बरेच प्रकार आहेत ह्या दुकानात.
Pages