स्वयंपाकघरात प्लास्टीकचा वापर

Submitted by निंबुडा on 27 December, 2012 - 01:45

स्वयंपाकघरात अन्न टिकविण्यासाठी/साठविण्यासाठी प्लास्टीक चा पिशव्या, डबे, बाटल्या इ. स्वरुपात वापर केला जातो. पण बर्‍याच लोकांकडून अज्ञानामुळे/ अनवधानाने योग्य प्लास्टीकचा वापर केला जात नाही. अन्नासाठी कायम फूड ग्रेड प्लास्टीकचा वापर केला जायला पाहिजे. कुठलीही प्लास्टीकची वस्तु विकत घेताना त्याच्या तळाशी फूड ग्रेड ची खूण (प्लास्टीकचा ग्लास / काटा व चमचा ह्या स्वरुपात एक खूण असते) बघून घ्यावी. तसेच एका त्रिकोणात १ ते ७ पर्यंत आकडे लिहिलेले असतात. १ हा आकडा असेल तर फक्त एकदा वापरून फेकून द्यावे लागणारे प्लास्टीक असते.

प्लास्टीक बद्दल समज, गैरसमज, फायदे, गैरफायदे, प्लास्टीक च्या वस्तुंची सफाई, पर्यावरणावर प्लास्टीकचा परीणाम व उपाय ह्या सर्वांबद्दल इथे ह्या धाग्यावर चर्चा करू या!

हे फूड ग्रेड चे सिंबल्स
1157614769.jpgassets_plastic_containers_971306865.jpg

हे प्लास्टीक रीसायकल गाईड
PlasticRecyclingGuide.gif

वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक्स ग्रेड्सची तुलना:

code.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

युसूयुसां वरूनः

योडी | 27 December, 2012 - 10:58
पाण्याच्या बाटल्यांमध्ये ४-५ दिवस जरी पाणी भरुन ठेवलं तरी तळाला हिरवट दिसतं. पाण्याला वास यायला लागतो. ४-५ दिवसांनी बाटल्या घासुन साफ कराव्या लागतात तरीही तो हिरवट थर संपुर्ण जात नाही. काय करता येईल??

नीधप | 27 December, 2012 - 11:09
पण योडे ४-५ दिवस का पाणी भरून ठेवतेस?

योडी | 27 December, 2012 - 11:26
४-५ दिवस का पाणी भरून ठेवतेस?
>>
फ्रीजमध्ये पाणी ठेवलं तर रहातंच की ४-५ दिवस. दोघांना कितीसं लागणार..

नीधप | 27 December, 2012 - 11:35
ते झालंच पण मग थर जमतोय याचा अर्थ काहीतरी आहे पाण्यात.
जमलं तर रोजचं जेवढं लागतं तेवढंच भरायचं बघ.

योडी | 27 December, 2012 - 11:37
हो, पण बाटल्या साफ कशा करायच्या हा मुख्य प्रश्न आहे. तळाशी नीट साफ करता येत नाहीत ब्रशनेही.

दक्षिणा | 27 December, 2012 - 11:40
योडे एकतर पाणी नीट तपासून घे.. आणि कंटेनर्स नीट साफ करता येतील असेच वापर.

मंजूडी | 27 December, 2012 - 11:40
बाटली कशी धुतेस योडे?

योडी | 27 December, 2012 - 11:44
बाटली कशी धुतेस योडे?
>>
गरम पाणी आणि डिटर्जन्ट पावडर घालुन ठेवते थोडा वेळ आणी नंतर बाटल्या साफ करायच्या ब्रशने घासते पण त्याने नीट घासल्या जात नाही.

कंटेनर्स नीट साफ करता येतील असेच वापर.
>>
म्हणजे कसे नेमके?? हात घालुन घासता येतील अशा बाटल्या??

नीधप | 27 December, 2012 - 11:46
गरम पाणी + साबण असे भरून ठेवणे १-२ तास आणि मग अर्धे पाणी टाकून बंद बाटली जोरजोरात हलवणे जेणेकरून त्या पाण्याच्या फोर्सने तो थर निघून जाईल.
ट्राय करून बघ.
कदाचित जमेल कदाचित नाही.

दक्षिणा | 27 December, 2012 - 11:46
योडे मला एक सांग हे पाणी तु फ्रिजात ठेवतेस की बाहेर? बाहेर साठवायचं असेल तर छोटं पिंप आण की ते नीट साफ करता येईल शिवाय त्यात तुरटी फिरवलीस तर पाणी ही थोडं अजून पिण्यायोग्य मिळेल.

दक्षिणा | 27 December, 2012 - 11:46
हॉनेस्टली प्लॅस्टिकमध्ये पाणी साठवणे नकोच.

नीधप | 27 December, 2012 - 11:47
ऊप्स.. म्हणजे हा उपाय आधीच निष्प्रभ.

नीधप | 27 December, 2012 - 11:47
हॉनेस्टली प्लॅस्टिकमध्ये पाणी साठवणे नकोच <<
+१०००००००००००००००००००

योडी | 27 December, 2012 - 11:52
दक्षे, छोटं पिंप फ्रिजमध्ये ठेवु का??

फ्रिजमध्ये बाटल्या ठेवायला स्टीलच्या आणु?? पण मग असं वाटतं की ह्या बाटल्यांमध्ये खराब झाल्या तर दिसतं तरी. स्टीलच्या बाटल्यांमध्ये ते ही दिसणार नाही.

मंजूडी | 27 December, 2012 - 11:53
मोठ्या तोंडाच्या बाटल्या बर्‍या पडतात. सध्या टपरवेअरचं नवं डिझाईन आहे ते चांगलं आहे, माझा अख्खा हात बाटलीच्या तळापर्यंत जातो. आणि बाटली धुतल्यावर साबण पूर्ण निघून जाऊ दे, धुतल्यानंतर पूर्ण कोरडी होऊ दे बाटली, मगच पाणी भर. सहा बाटल्या असतील तर तीन आज आणि तीन उद्या अश्या धुवायच्या.

योडी | 27 December, 2012 - 11:55
मंजु, बघते आता असं करुन.

दक्षिणा | 27 December, 2012 - 11:55
योडी येडी..
स्टिलचे जग मिळतात फ्रिजात बसणारे ते आण.

>>पण मग असं वाटतं की ह्या बाटल्यांमध्ये खराब झाल्या तर दिसतं तरी. स्टीलच्या बाटल्यांमध्ये ते ही दिसणार नाही. >> खराब दिसेपर्यंत साफ करायची वाट पहातेस? २ दिवसातून आपणहून साफ करायचं.

मंजूडी | 27 December, 2012 - 11:57
मला मध्यंतरी एक फॉरवर्ड मेल आली होती त्यात ठराविक परिमाणाची (म्हणजे प्लास्टीक पिशवीसाठी जसं मायक्रॉन हे परीमाण वापरतात तसं बाटल्यांचंही असतं) प्लास्टिकची बाटली ठराविक दिवसच वापरावी, दीर्घ कालावधीसाठी वापरू नये असं लिहिलं होतं.
म्हणजे बाटली चांगली असली तरी काही दिवसांनी ती रिसायकलला द्यावी.

योडी | 27 December, 2012 - 11:56
स्टिलचे जग मिळतात फ्रिजात बसणारे ते आण
>>
आता मलाही असंच वाटतंय की मोठ्या तोंडाचा जग/बाटली घ्यावी जेणेकरुन साफ करता येईल नीट.

दक्षिणा | 27 December, 2012 - 12:01
मंजूडी बरोबर आहे तुझं. प्लॅस्टिकच्या बाटलीच्या तळाशी त्रिकोणात एक आकडा लिहिलेला असतो. तो जितका कमी तितकी ती बाटली निकामी.
बिसलरीच्या वगैरे बाटल्या नीट पाहिल्या तर त्रिकोणात १ आकडा असतो, त्या एकदाच वापरून क्रश करायच्या असतात.
पण जास्ती आकडेवालं प्लॅस्टीक जास्ती चांगल्या प्रतीचं अशा बाटल्या महाग असतात. माझी ऑफिसच्या पाण्याची बाटली मी २०० ला घेतली, त्यात ७ आकडा आहे. पण मी ६-८ महिन्यांनी तशीही बाटली बदलतेच.

मंजूडी | 27 December, 2012 - 12:06
प्लॅस्टिकच्या बाटलीच्या तळाशी त्रिकोणात एक आकडा लिहिलेला असतो.>> येस्स... करेक्ट!! अशीच माहिती त्यात लिहिली होती. आता इच्छुकांनी त्याप्रमाणे सर्च करून बाकी माहिती मिळवा.

अल्पना | 27 December, 2012 - 12:07
फ्रीजमध्ये ठेवायला काचेच्या बाटल्या पण छान वाटतात, पण त्यातही साफ करायचा प्रॉब्लेम येईल ना.

निंबुडा | 27 December, 2012 - 12:07
मला मध्यंतरी एक फॉरवर्ड मेल आली होती त्यात ठराविक परिमाणाची (म्हणजे प्लास्टीक पिशवीसाठी जसं मायक्रॉन हे परीमाण वापरतात तसं बाटल्यांचंही असतं) प्लास्टिकची बाटली ठराविक दिवसच वापरावी, दीर्घ कालावधीसाठी वापरू नये असं लिहिलं होतं.
म्हणजे बाटली चांगली असली तरी काही दिवसांनी ती रिसायकलला द्यावी.
>>> +१
कुठल्याही प्लास्टिक च्या वस्तुंवर फूड ग्रेडेड प्लास्टीक ची खूण असेल तरच ते कंटेनर्स पाणी किंवा कोणतेही अन्न पदार्थ साठविण्यासाठी वापरावेत.

खरे म्हणजे अन्न साठविण्यासाठी केला जाणारा प्लास्टीक चा वापर ह्या विषयावर एक सेपरेट धागा काढायला हवा. मी बर्‍याचदा पाहिले आहे की बिसलेरी च्या बाटल्या ज्या एकदा वापरून फेकून द्यायच्या असतात त्यात बरेच लोक पाणी साठविणे, फ्रीज मध्ये त्या बाटल्यांत पाणी भरून ठेवणे इत्यादी प्रकार करतात. त्या बाटल्यांवर लिहिलेल्या instructions काळजीपूर्वक वाचल्या तर लक्षात येईल की त्यांवर लिहिलेले असते की वापरून झाल्यावर फेकून देणे. हे कळल्यापासून मी तसल्या बाटल्यांचा मोह ठेवतच नाही. वापरून झालेल्या तसल्या बाटल्या सरळ क्रंच करून केराच्या डब्यात जायला हव्यात. चायना प्लास्टीक तर सगळ्यात बेक्कार!

बादवे, सेपरेट धागा काढतेय. तिथे चर्चा करूया!

प्लॅस्टिकच्या कंटेनरच्या तळाशी त्रिकोणात त्या प्लॅस्टिकचे परिमाण दाखवणारा आकडा असतो.
#१ - पाणी आणि सोडा साठवण्यासाठी. हे एकदा वापरून क्रश्/नष्ट करणे.
#२ - दूध. वापरण्यास योग्य.
#४ - वापरण्यास योग्य.
#५ - दही, योगर्ट, बटर. वापरास योग्य
# ७ - अनब्रेकेबल असते म्हणे. आरोग्यास हानिकारक. (आत्ताच विकिपेडियावर वाचलं. इथे http://www.ehow.com/how_5004337_identify-good-bad-plastic-bottles.html आणि मग इथे
http://en.wikipedia.org/wiki/Bisphenol_A

माझी बाटली बदलली पाहिजे. त्यात तळाशी ७ आकडा लिहिलाय.

लहान मुलांना गिफ्ट म्हणून चायना प्लास्टीक पासून बनवलेल्या डिशेस, खेळणी इ अमाप येतात. मी त्यांना एक तर केराचा डबा दाखवते किंवा घरातल्या मेडला हवे असेल तर घेऊन जाऊ देते. खरे म्हणजे त्यांनी ही असले लो क्वालिटी प्लास्टीक वापरू नये अशी मनापासून इच्छा असते. पण त्यांना असल्या गोष्टींचा फार मोह असतो. जिथे घरातल्यांना सुद्धा समजावणे कठिण आहे तिथे घराबाहेरच्यांचे काय प्रबोधन करणार?

मी माझ्यापुरते असले प्लास्टीक वापरायचे बंद केले आहे. फ्रीज मध्ये पाणी साठविण्यासाठी टप्परवेअर च्या मोठ्या बाटल्या आणल्या आहेत. त्या दर आठवड्याला धुवायला टाकते म्हणजे टाकतेच! सफेद रंगाचा एक बाटली धुण्याचा गोल ब्रश मिळतो. त्याने बाटली धुते.

राजससाठी स्कूल ची वॉटरबॅग, टिफिन इ. गोष्टी कटाक्षाने फूड ग्रेड प्लास्टीकच्याच आणते.

सध्या पर्लपेट च्या प्लास्टीकच्या बरण्यांना जॅम च्या काचेच्या बरण्यांनी रीप्लेस करण्याची मोहिम चालू आहे.

ऑफिस मध्ये न्यायचे टिफिन लॉक अँड लॉक किंवा टप्परवेअर.

ऑफिस मध्येही बर्‍याच जणांना डेस्क वर बिसलेरीच्या जुन्या बाटल्या परत परत पाणी भरून वापरताना पाहिले आहे. Sad जमेल तसे प्रबोधन करीत राहते.

मी स्वतः घर ते ऑफिस ह्या प्रवासात सेलो चा एक लहान अर्धा लीटरचा थर्मास आहे तो पाणी कॅरी करण्यासाठी वापरते. गरम पाणी गरम आणि गार पाणी मस्त गार राहते त्यात. प्लास्टीक वै. को गोली मारो. Happy

मी पण टिफिनसाठी सध्याच टप्परवेअर वर शिफ्ट झाले, त्या आधी लॉक अ‍ॅन्ड लॉकच वापरायची. टप्परवेअर इज रियली बेस्ट.

टप्परवेअर इज रियली बेस्ट.
>>
टप्पर वेअर चे पूर्वीचे डबे (एकदम सुरुवातीला आलेले ते) रंगीत नसत. फक्त झाकणे रंगीत असत. ते डबे फार लवकर खराब होत असत. स्पेशली ज्यात भाजी भरून नेत असू ते डबे. साबणाच्या गरम / कढत पाण्यात टाकून घासूनही स्वच्छ निघत नसत. लागोपाठ २ वेळा असे झाल्यावर कंटाळून लॉक अँड लॉक चे डबे वापरायला सुरुवात केली. ते बेस्ट वाटले घासून स्वच्छ निघतात अगदी.
सध्या परत गिफ्ट म्हणून आलेले टप्पर वेअर चे डबे (टिफिन बॉक्सेस) ही वापरात आहेत. आता नवीन स्टाईलचे रंगीत डबे व रंगीत झाकणे आहेत. बघू या!

तेलाचा लॉक अँड लॉकचा कावळा मात्र बंडल आहे. एक तर तेल भरण्यासाठी त्याचे लॉक सारखे काढ-घाल करून ते कालांतराने तुटतात. आणि तेल साईडने जाम गळते. आता परत टप्पर वेअर चा तेलाचा कावळा घेतला आहे. पण त्याच्या तोटीचे झाकण नीट न बसणे हा कायमचा अनुभव आहे.

आताच एका मैत्रिणीने हायपर सिटीतून आणलेला मस्त तेलाचा कावळा दाखवला. ज्याचा बेस काचेचा आहे व तोटीच्या बाजुने प्लास्टीकच्या वाटीसारखा भाग आहे. आपण तोटीतून तेल काढून घेतले की बाजूने गळणारे तेल ह्या वाटीत व तळाशी असलेल्या एका लहान भोकातून परत आता बाटलीत जाते.

स्वैपाकघरात डाळींच्या साठवणूकीसाठी पर्लपेटच्या बरण्या आहेत पण आता त्या बदलून टप्परवेअरचे कंटेनर्स किंवा स्टीलचे छोटे कंटेनर्स आणायचेत. बिस्किट -नमकिन-खाऊचे २-४ टप्परवेअरचे डब्बे सोडले तर सगळ्या काचेच्या बरण्या आहेत.

फ्रीझमध्ये ठेवायला फूड ग्रेड प्लास्टीकच्या बाटल्या आहेत. त्या दरवर्षी बदलते. (तसंही वर्षातले सहाच महिने फ्रिजचं पाणी प्यायलं जातं).

आमचे दोघांचे डब्बे स्टीलचे आहेत आणि पाण्याची बाटली थर्मास टाइपची. पोराची पाण्याची बाटली थर्मास प्रकारातली होती इतके दिवस. आता तिचं झाकण हरवल्यावर फूड ग्रेड प्लास्टीकची बाटली आणलिये. पण तीसुद्धा २-३ महिन्यात आपोआपच बदलली जाणार ( २-३ महिन्यात झाकण हरवळ्याची १००% खात्री आहे. Proud )

मनीष + १. लॉक अँड लॉकसुद्धा प्लास्टीकच आहे.

पण त्यांना असल्या गोष्टींचा फार मोह असतो.>> प्लास्टिकच्या बदली लसूण मिळते म्हणून त्यांना प्लास्टीकचा मोह असतो. तुटकी फुटकी वस्तूदेखील त्यांना चालते, फक्त प्लास्टीक हवे.

निंबु, बरं झालं असा धागा काढलास. प्लास्टिक वापराबाबत इतके गैरसमज आणि एवढा चुकीचा वापर होतो कि माबोवर वाचुन थोड्या लोकांनी जरी प्लास्टिक वापरणं सोडलं तरी जिंकलीस.

लॉक & लॉक पण शेवटी प्लास्टिकच. मी एवढी वर्षे लॉक एन लॉकची फॅन होते कारण हे अ‍ॅब्सोल्युटली लिकप्रुफ आहेत आणि ऑफिसमधे डायरेक्ट मावेमधे अन्न गरम करायला वापरता येतात. पण काही महिन्यांनी ते (कितीही धुतले तरीही) पिवळे पडतात. याचा अर्थ गरम केल्यामुळे त्या प्लास्टिकवर नक्कीच काही परिणाम होतो. मग ते कितपत सेफ? मी तर मिल्टनच्या स्टीलच्या डब्यांकडे स्वीच ओवर करणार आहे. याबरोबर डबे कॅरी करायला एक स्मार्ट पाउच पण मिळतो.

दुसरा प्लास्टिकचा चुकीचा वापर होतो मावेमधे. हे तर फारच धोकादायक. लोक अन्न गरम करण्यासाठी किंवा कुकिंगसाठीही कोणतंही प्लास्टिक वापरतात. अगदी मावे कंपनीने दिलेले भांडेसुद्धा कितपत योग्य असते कोणास ठावुक? जरी योग्य असेल तरी ते किती महिने/वर्षं वापरायचे याचं काहीतरी लिमिट हवंच. जर ३०हजारांचा मावे घेतला तर २-३ हजारांची बोरोसील्/पायरेक्सची भांडी घेणं यामधे काटकसर कशाला? मेलामाइनची भांडी नुसतं गरम जेवायला सुद्धा चालणार नाहीत, ही भांडी मावेमधे अन्न शिजवायला / गरम करायला वापरणं नक्कीच घातक असणार. चायना प्लास्टिकची खेळणी बाळाला देणं हा दुसरा वेडेपणा. बाळ ती खेळणी तोंडात घालतं, च्यु करतं त्यामुळे टाळलेलीच चांगली. बाळाच्या रुम डेकॉरसाठी किंवा सरळ कचर्‍याच्या बादलीत एवढ्या दोनच ठिकाणी ती योग्य आहेत.

टपरवेअरमध्ये काय मटेरियल वापरलेले असते? तेपण प्लॅस्टिकच असतं ना?
>>
मनीष, प्लास्टीक मध्ये बरेच प्रकार असतात.

दक्षीने लिहिलेय त्याप्रमाणे प्रत्येक प्लास्टीक चे वर्गीकरण तळाशी दिलेले असते. १ नं चे प्लस्टीक रीसायकल केलेले आणि म्हणूनच एकदा वापरून फेकून देण्याजोगे असते. प्लास्टीकची उत्पादने बनविणार्‍या प्रत्येक कंपनीला तळाशी तो नंबर आणि फूड ग्रेड आहे की नाही ते नमूद करणे आवश्यक असते.

हॉटेल्स मधून अन्नाचे पार्सल घेताना, दह्याचा प्लास्टीकचा डबा घेताना तळाशी एकदा बघून घेणे.

मी टिफिनसाठी आधी टप्परवेअर वापरत होते, पण टप्परवेअरचं झाकण (भाजीच्या डब्याचं) कितीही वेळा, कशाही प्रकारे घासलं धुतलं तरी त्याचा ओशटपणा, तेलकटपणा गेल्याचं समाधान मला तरी मिळत नाही, त्यामुळे भाजीसाठी स्टीलचाच डबा वापरते. Happy

प्लास्टिकच्या बदली लसूण मिळते म्हणून त्यांना प्लास्टीकचा मोह असतो. तुटकी फुटकी वस्तूदेखील त्यांना चालते, फक्त प्लास्टीक हवे.
>>>
हो गं पूर्वी आमच्या इथे असे मिळत असे. आता आमच्या एरीयात असे मिळणे बंद झाले आहे. मेड जिथे राहते तिथे मिळतही असेल. पण माझ्या मेडला तिला स्वतःला वापरायला हवे असते,.

साबा-साबुंनाही खूप वेळा सांगितले आहे की पिण्याचे पाणी साठविण्यासाठी थम्स अप, कोक इ. च्या तसेच बिसलेरीच्या बाटल्या वापरणे हानीकारक आहे. पण ऐकण्याचे नाव नाही. माझ्यापुरता मी माझ्या घरात बदल केला आहे. लग्नानंतर तर जुने प्लास्टीकचे कित्येक सामान फेकून दिले मी! जिथे जीवाला/आरोग्याला हानी पोचण्याची शक्यता आहे तिथे असला पुचाट मोह हवाय कुणाला!

वाढदिवसाला, बक्षिसामधे मिळालेल्या पाण्याच्या बाटल्या एकदाही न वापरता सरळ फेकुन देणे शहाणपणा आहे. फ्रीजमधे किंवा टेबलवर ठेवायला ल्युमिनारचे सुंदरसे ग्लासचे जार्स मिळतात. याचं तोंड मोठं असल्यामुळे आत हात घालुन धुता येतात. पाण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटल्स महिनोन महिने वापरणं अगदी चुक.

आपण जेवढं प्लास्टिक कमी वापरु आणि पर्यायी मेटल / ग्लासच्या वस्तु वापरु तेवढा प्लास्टिक डिस्पोजलचा प्रश्न कमी होइल.

बरं, टप्परवेअरचे जे कंटेनर्स असतात, ते किती वर्षांनी बदलावेत? (डाळी, पीठं, बिस्किट इ. कोरड्या वस्तू ठेवण्यासाठी वापरतात ते )

हाच प्रश्न लॉक अँड लॉकसाठीसुद्धा. घरात २-३ लॉक अँड लॉकचे डब्बे आहेत जे कधीतरी उरलं-सुरलं कोरडं सामान ठेवायला वापरले जातात. ते किती दिवस वापरावेत?

मिल्टनच्या स्टीलच्या डब्यांकडे स्वीच ओवर करणार आहे. याबरोबर डबे कॅरी करायला एक स्मार्ट पाउच पण मिळतो.
>>
माझ्याकडेही मिल्टनचे स्टील्चे डबे - ज्यांची झाकणे प्लास्टीकची आहेत- आहेत. पण फक्त पोळ्या/सुके पदार्थ कॅरी करायला उपयोगी आहेत. रसभाजी असेल तर गळते त्यातून. Sad स्टीलच्या डब्यांचीही तीच गत!

त्यामुळे पोळीसाठी मी चपटा स्टीलचा डबा किंवा मिल्टनचा डबा आणि भाजी साठी टप्पर वेअर किंवा लॉक अँड लॉक!

(मी, मोदक आणि राजस ह्या तिघांच्याही टिफिन्स चे २-३ सेट्स माझ्याकडे एका वेळी वापरात आहेत. घरी रात्री १० ला पोचल्यावर रोजचे तिघांचे मिनिमम ५ [मॅक्झिमम कितीही. कारण कधी लोणचे, कधी तूप्-गूळ, गुळांबा, सलाड असे काहीतरी एक्स्ट्रा असतेच डब्याला!] डबे घासणे मला फार कंटाळवाणे व जिकिरीचे वाटते!)

टपरवेअरची खरच खूप क्रेझ आहे हल्ली, पण माझा अनुभव ते डबे भाजी वगरे कॅरी केली तर तेलकट रहातात कितीही गरम, नरम पाण्याने धुतले तरी, मी भाजी साठी लिक्प्रुफ डबा नेते, झाकण प्लॅस्टिकच आणि डबा स्टील चा किंवा पूर्ण स्टील चा. लेकीला ही जाम क्रेझ आहे टपर वेअर च्या गोष्टींची, पण ओले पदार्थ प्लॅस्टिक मधे देत नाही, ते मिल्टन किंवा स्टीलच्या डब्यात जे तिच्या मते फार गावंढळ दिसत Uhoh कारण हल्ली म्हणे शाळेत फारस कोणी स्टील चे वगरे डबे आणत नाहीत. Uhoh
लोकांना खरच क्रेझ असते प्लॅस्टिक्च्या गोष्टींची,मी फ्रीज मधे सरळ स्टील्चे , तांब्याचे तांबे ठेवते, नाहीतर जार गावठी दिसल तरी Proud . तांब्याचे तांबे आवर्जून वापरते. प्लॅस्टिक बरण्या वगरे फक्त कोरड्या वस्तूंसाठी, अर्थात ते ही योग्य की नाही माहित नाही. पण बाकी फक्त स्टील, तांबच वापरते स्वयंपाकघरात.

स्टीलच्या डब्याच अजून एक फायदा म्हणजे २/३ सेट मधे ठेवता येतात, म्हणजे घासायला टाकू शकतो Proud
मी आणि नवरा फक्त टपरवेअरच्या बॅग्स वापरतो आतले डबे फक्त कोरड्या गोष्टींना

use and throw वाले जे प्लास्टीक असते त्यातून कॅन्सर जेनिक फ्यूम्स उत्सर्जित केले जातात, त्यामुळे अश्या कंटेनर्स मध्ये साठविलेले अन्न हानीकारक व खाण्यास अयोग्य असते, असेही कुठेतरी वाचले होते मागे. कुणाला काही माहिती आहे का?

स्वच्छ साफ करण्यासाठी तरी स्टीलचेच डबे हवेत. स्टायलिश नसतील तरीही.

निंबु, लॉक & लॉक पटकन साफ होत नाही म्हणुन तुला कंटाळा येत असेल. Happy

अल्पना, कोरड्या पदार्थांसाठी जास्त दिवस वापरले तरी चालावं बहुतेक. पण टपरवेअरपेक्षा 'येरा'च्या ग्लास बॉटल्स वापरणं जास्त सोयीस्कर आहे. मी किती तरी वर्ष येराच वापरते. प्लास्टिक थोड्या धुण्यानंतर ट्रान्सपरंट रहात नाही. धुरकट होतं. चरे येतात. येरा बॉटल्स धुतल्या कि परत नविन चकाचक होतात. शिवाय आत भरलेली गोष्ट लगेच दिसते त्यामुळे स्वयंपाक करताना किंवा ग्रोसरी आणायच्या वेळेस सोयीस्कर पडतं. यामधे पण ४-५ साइझ मिळतात. टपरवेअर आणि येराची कॉस्ट कम्पॅरिझन मात्र मला माहित नाही. शिवाय किचनमधे किती माणसं असतात आणि ती किती व्यवस्थित आहेत यावर बॉटल्सचं आयुष्य अवलंबुन असतं. Happy

अरे मुलींनो ते लीकप्रुफ मधे स्टीलचा डाबा आणी झाकण फक्त प्लॅस्टिक च असा डबा मिळतो तो वापरून बघा

निंबु, लॉक & लॉक पटकन साफ होत नाही म्हणुन तुला कंटाळा येत असेल. >>>
साफ करणे तितके कठिण वाटत नाही मला. जुने वापरात नसलेले ब्रश वापरून झाकणांच्या कडा, डब्यांचा खाचा इ साफ करता येते. डब्यांची एकूण संख्या बघता वेळेचा आणि तितक्या पेशन्स चा प्रश्न आहे. Proud

प्लॅस्टीकच्या बाटल्या फ्रीझरमधे कधीही ठेवू नयेत. त्यात बर्फ तयार झाला तर ते तब्येतीला वाईट असते.

भारतात तेलाच्या बाटलीचे खास करुन झाकणाचे वेगळे डिझाईन कधी बघितले नाही. अंगोलात मिळणार्‍या किंवा फ्रान्स / इताली / पोर्तुगाल मधून आलेल्या तेलाच्या बाटल्यांचे आणि त्यांच्या झाकणाचे डिझाईन खास असते. त्यातून तेलाची नियंत्रित धारच पडते. अगदी ३ लिटरची बाटली असली तरी त्यातून तेल ओतताना डबॉक डबॉक होऊन तेल डुचमळत नाही.

आमच्याकडे फ्रीजच पाणी कोणीच पीत नाही, त्यामुळे रोज पाणी बाहेरच १ पितळी कळशी आणि १ तांब्याच्या तपेल्यामधे भरते. माझ्या नवर्‍याला ते गावठीपणाच वाटत पण आता काही म्हणत नाही.

लीकप्रुफ मधे स्टीलचा डाबा आणी झाकण फक्त प्लॅस्टिक च असा डबा मिळतो तो वापरून बघा
>>
लीकप्रूफ हे ब्रँड चे नाव आहे का>? असला मिल्टनच्या डब्याचा अनुभव लिहिलाय ना मी वर. भाजी-आमटीचे तेल वै. गळते त्यातून. Sad

मी मागंपण एकदा लिहिलं होतं. टपरवेअरचे/प्लॅस्टिकचे डबे वापरण्यापेक्षा काचेचे लॉक & लॉक टाइप डबे मिळतात. उसगावात पायरेक्सचा घेतला होता. इथं पुण्यातपण मी घेतलाय. कंपनीचं नाव आठवत नाही. शिवाय काचेचा असूनपण अनब्रेकेबल आहे (दुकानदारानं डबा वरून टाकून दाखवला होता). फक्त थोडा जड असतो पण आरोग्यापेक्षा नक्कीच जड नाही Happy

येराच्या बॉटल्स आहेत मसाले-तिखट-लोणची प्रकारांना. रोजच्या डाळ-तांदुळाला जरा भिती वाटते येराच्या बाटल्या वापरायची. पण त्या बाटल्या दिसतात मात्र खास.

आमच्याकडे पण मिल्टनचेच डब्बे आहेत. नवर्‍याचा मोठा एकावर एक तिन डब्ब्यांवाला आहे आणि माझा प्लास्टीकच्या झाकणावले स्टीलचे डब्बे असलेला.

क्रॉफर्ड मार्केटला/ इतरही बर्‍याच स्टेशन्स च्या नजीक रस्त्यांवर प्लास्टीकच्या वस्तु विकणारे अमाप बसलेले असतात. त्यांच्याकडून तसल्या वस्तु घेणार्‍यांची कीव येते मला. टप्पर वेअर किंवा तत्सम बड्या ब्रँडच्या मालाची नक्कल करून डुप्लिकेट बाटल्या व इतर उत्पादने बनवली असतात. तीच हे लोक रस्त्यांवर कमी भावाने विकत असतात Sad

लीकप्रूफ हे ब्रँड चे नाव आहे का>? नाही, तो लिक्प्रुफ म्हणजे सांडत नाही म्हणून म्हणतेय, डबा स्टीलचा किंवा मनिष ने लिहिलाय तसा काचेचा असतो - पण अन्ब्रेकेबल नाही

Pages