स्वयंपाकघरात प्लास्टीकचा वापर

Submitted by निंबुडा on 27 December, 2012 - 01:45

स्वयंपाकघरात अन्न टिकविण्यासाठी/साठविण्यासाठी प्लास्टीक चा पिशव्या, डबे, बाटल्या इ. स्वरुपात वापर केला जातो. पण बर्‍याच लोकांकडून अज्ञानामुळे/ अनवधानाने योग्य प्लास्टीकचा वापर केला जात नाही. अन्नासाठी कायम फूड ग्रेड प्लास्टीकचा वापर केला जायला पाहिजे. कुठलीही प्लास्टीकची वस्तु विकत घेताना त्याच्या तळाशी फूड ग्रेड ची खूण (प्लास्टीकचा ग्लास / काटा व चमचा ह्या स्वरुपात एक खूण असते) बघून घ्यावी. तसेच एका त्रिकोणात १ ते ७ पर्यंत आकडे लिहिलेले असतात. १ हा आकडा असेल तर फक्त एकदा वापरून फेकून द्यावे लागणारे प्लास्टीक असते.

प्लास्टीक बद्दल समज, गैरसमज, फायदे, गैरफायदे, प्लास्टीक च्या वस्तुंची सफाई, पर्यावरणावर प्लास्टीकचा परीणाम व उपाय ह्या सर्वांबद्दल इथे ह्या धाग्यावर चर्चा करू या!

हे फूड ग्रेड चे सिंबल्स
1157614769.jpgassets_plastic_containers_971306865.jpg

हे प्लास्टीक रीसायकल गाईड
PlasticRecyclingGuide.gif

वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक्स ग्रेड्सची तुलना:

code.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली, फार आंबट असणारे पदार्थ ( ज्यात टोमॅटो / व्हीनीगर / लिंबू / चिंच ) आहेत ते फॉईलमधे नको. पण चपाती साठी चांगले आहे.
बागेश्री, साधारणपणे डब्याचा पारदर्शकपणा गेला, मूळ रंग खराब दिसायला लागला, ओरखडे दिसायला लागले कि तो बदलायचा.

निंबुडा, ते तक्ते हेडरमधे टाकणार का ?

मी एका फ्लेक्सीबल पॅकेजिंग उत्पादन करणार्‍या कंपनीशी संबंधित होतो. आपल्याला जाणवणार नाही इतक्या कमी वजनाचे पॅकेज असले तरी त्या कंपनीत रोज किमान ८/१० टन उत्पादन होत असे. आता कल्पना करा कि एवढा कचरा आपण रोज निर्माण करतोय.

टपरवेअरची खरच खूप क्रेझ आहे हल्ली, पण माझा अनुभव ते डबे भाजी वगरे कॅरी केली तर तेलकट रहातात कितीही गरम, नरम पाण्याने धुतले तरी>> माझा पण असाच अनुभव होत, पण मग मी टप्परवेअर साठी लिक्वीड सोप वापरुन पाहिला, खरच फरक पडला.

सध्या खुप मुलांकडे प्लासीकचे पाऊच सारखी वॉटरबॅग पहिलीये. पाणी संपले कि चपटी करुन ठेवता येते. >>
मी पहिल्यांदाच ऐकतेय हा प्रकार. पण दक्षी म्हणतेय ते बरोबर. कुठल्या प्लास्टीकच्या अस्तील देव जाणे. त्यामुळे त्या वाटेला न जाणे बरे!

धान्य वगैरे प्लॅस्टीक बॅग्स मधे पॅक होऊन येते ते तसेच ठेवले तर चालते का? साधारण महिनाभरात संपतेच ना ते?
>>>
मी धान्य कायम कुठल्या ना कुठल्या डब्यात काढून ठेवते. अगदीच डबा अवेलेबल नसेल तरच ते धान्य तसेच्या तसे प्लास्टीकच्या पिशवीत राहू देते.

निंबुडा, धागा आवडला.
सगळे एकदम उत्तम चर्चा करत आहेत.
बरीचशी माहिती माझ्यासाठीही नविन आहे.
हा धागा वाचत रहायला हवा.

मी यंदाच्या भारतवारीत नवर्‍यासाठी सेलोचा स्टिलचा डबा (एकावर एक ४ डबे) घेतला प्रत्येक डब्यावर स्टिलच्याच झाकण्या आहेत पुर्वीचा कडीचा जेवणाचा डबा असतो तसा. पण त्याला बाहेरुन एक पाऊच आहे आणि मग तो पाऊच आणि डबे लंच बॅग मध्ये ठेवायचे.
ह्या डब्यात इकडच्या थंडीतही अन्न व्यवस्थित गरम राहतय आणि सांडतही नाहिये (अगदी आमटी वैगरे देत नाही) पण रस भाजी वैगरे नाहि सांडत.
पुढच्या भारतवारीत अजुन १-२ आणण्याच्या विचारात आहे. लेकीसाठी पण छोट्यामध्ये तसा मिळतो का बघायचा आहे.

मी मिल्टनचे टिफिन वापरते. आत स्टीलचे छोटे तीन डबे , प्रत्येकावर स्टीलचे झाकण.
पोळ्या ठेवायलाही मिल्ट्नचा डबा, आतून स्टील असते.

मी सरळ काचेचं डबे वापरते. बरण्या सुद्धा. प्लॅस्टीक नाहीच ठेवत.
आता आताशी मायक्रोवेव पण कमी केलेय. मावे तर न्हवताच ना पुर्वी.. जगलो ना शेवटी असे स्वतःला सांगून कमी केलाय वापर.
कमीत कमी एका वेळचं अन्न(सर्व) मावेचा वापर करतच नाही. ऑफीसमध्ये थंड गिळवत नाही म्हणून वापरते .. पण एकदाच.
स्टीलचा चार पदरी डबा आणला पण त्यात जेवन काही इतके गरम नाही राहत.. मरणथंडीत ते थंड जेवण जात नाही.
पण काहितरी करून कमी करायचेय ते सुद्धा.

नवर्याला हापिसात जाताना लंच काचेच्या डब्यांमध्ये देते व जाड, साधारण शॉकप्रूफ असल्यासारखी लंचबॅग डबे ठेवायला वापरते. त्याला दोन स्नॅक्सही द्यावी लागतात ती अगदी छोट्या प्लास्टीकच्या डब्या किंवा शिल्लक असल्यास काचेच्या डब्यांमध्ये देते. त्याने कामाच्या ठिकाणी कोरेलची प्लेट व बाऊल ठेवलाय त्यात अन्न गरम करून घेतो व जेवतो. रोज ही दोन भांडी साबणानी धुवावी मात्र लागतात पण तो ते सगळं करतो, घरी खरकटं काही आणत नाही. डबेही पाण्यानं विसळून घरी येतात. Wink

हो माधवी सिग्नोरावेअर हा ही एक ब्रँड आहे सध्या बाजारात. आणि तो चांगल्या प्रतीचा आहे असं म्हणणं आहे ज्यांनी वापरलाय त्यांचं. शिवाय किंमतही बहुतेक टप्परवेअरच्या निम्म्यात जाते. एकदा वापरून पहायला हरकत नाही. तुबा मध्ये तुलसी नावाचं दुकान आहे, तिथे मिळतो हा ब्रँड.

चांगला धागा.
आभार निंबुडा आणि इतर प्रतिसादक. Happy

हापिसात मी पाणी प्यायला जुनीच माझाची बॉटल वापरतोय. ती बंद करावी.
घरी जाउन प्लॅस्टिक चेक करेन आता.

हापिसात मी पाणी प्यायला जुनीच माझाची बॉटल वापरतोय. ती बंद करावी.
>>>
ताबडतोब बंद करा.

काल ऑफिस मधल्या एका मैत्रिणीचे प्रबोधन केले. तिने आज पाण्यासाठी नवीन बाटली आणली आणि मला आल्या आल्या दाखवलीय! Happy

मि एक लॉक & सिल अशा नावाचा डबा आणला आहे हा डुबलिकेट ब्रँडचा आहे का?
>>>
माझ्या मते हो! डब्याच्या तळाशी फूड ग्रेड चे चिन्ह आहे का ते चेक करा. ते साईनही कॉपी मारत असतील तर माहीत नाही. गूगलून बघा काही सापडते का.

२००५ च्या अतिवृष्टीनंतर मिठी नदी व इतर ठिकाणी आलेल्या पूरानंतर प्लास्टीक पिशव्यांमुळे झालेल्या प्रदूषणावर फार चर्चा झाली होती. नंतर सरकार ने ठराविक मायक्रॉन जाडीच्याच पिशव्या वापरणे बंधनकारक असल्याचा कायदा केला (किंवा फतवा काढला). थोड्या काळापुरती त्याची अंमलबजावणी झाली. आता तर पुन्हा सगळीकडे प्लास्टीकचा सुळसुळाट झाला आहे. Sad

वाण्याकडूनच्या प्रत्येक सामानाबरोबर निदान एक प्ला. ची पिशवी घरात येते. सध्या तरी त्याचा वापर ओला कचरा टाकण्यासाठी करत आहे. भाजी व तत्सम गोष्टी खरेदी करण्यासाठी बाहेर पडताना आवर्जून भाजीची पिशवी घेऊन बाहेर पडते. जिथे शक्य असेल तिथे दुकानदाराला किंवा भाजीवाल्यांना त्यांच्याकडची प्ला. ची पिशवी नको असे सांगते.

बरेच लोक घरचे निर्माल्य प्ला. च्या पिशव्यांमध्ये कोंबून मुंब्र्याच्या खाडीत टाकतात, ते पाहून जीव कळवळतो. Sad ट्रेनच्या खिडकीतून पाहिल्यास त्या खाडीच्या आसपासच्या झाडाझुडपांमध्ये कित्येक रंगीबेरेंगी पिशव्या अडकलेल्या दिसतात. नाहीतरी निर्माल्य हे अश्या घाण जागीच कुजणार आहे, मग घरच्या केराच्या बादलीत कुजले तर काय फरक पडतो. आपल्याकडच्या निर्माल्याला चिकटून असलेल्या पवित्रतेच्या कल्पनेला हरताळ फासण्याची जाम इच्छा होते. ट्रेन मधले शिकले - सवरलेले लोक मुंब्रा येताच खिडकीतून किंवा दरवाजातून मोठमोठ्या पिशव्या ट्रेन मधून भिरकावतात तेव्हा अचंबा वाटतो. मी माझ्या घरात जमा झालेले निर्माल्य सरळ केरात टाकायला सुरुवात केली आहे. माझे बाबा घरात गॅलरीत येणार्‍या उन्हात ती फुले, व पालापाचोळा सुकवून नंतर क्रश करून बिल्डिंगखालच्या झाडांच्या मुळाशी घालून येतात. (पूर्वी ते ही घरामागेच असलेल्या कल्याणच्या खाडीत निर्माल्य टाकून येत असत. मी खूप लहान असताना वर्तमानपत्रात ह्या संदर्भात आलेला एक लेख वाचला होता तेव्हा निसर्गासाठी हे कसे अनिष्ट आहे ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. बाबांना ते पटले. मग लेखातच सजेस्ट केल्याप्रमाणे निर्माल्य वाळवून ते झाडांना टाकू लागले.) साबा-साबुंवर प्रबोधनाचा उपयोग नाही. Sad पण माझ्या घरात मी निर्माल्याचे थोतांड बंद केले आहे. ट्रेन मध्ये कधी कधी असे करणार्‍या बायकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. पण अजूनही कुणाकडून पॉझिटिव्ह रीस्पॉन्स नाही. Sad पर्यावरण आणि त्याची जपणूक ह्याच्याशी जणू कुणालाच काहीच देणे घेणे नाही.

५ पेक्षा खालील आकड्यांबद्दल लिहिलंय इथे, पण मग ६ आणि ७ असं लिहिलं असेल तर त्याचं काय? ते plastic चांगल असतं का नाही?
आणि हे फक्त आपल्या स्वयंपाकघराच्या डब्यानबद्दलचं का? आपली cosmetics जी plastic च्या डब्यां मध्ये असतात त्यालाही हे लागू होत का?
उदा. चेहेर्याची क्रीम्स, hair जेल्स वगैर? त्या डब्यां वर, tubes वर हि हे सगळं चेक करायला हवं का?

निंबुडा, छान धागा.
आजच घरातील सगळ्या प्लॅ बाटल्यांचे तळ चेक करते. लहान मूल घरात आहे, काचेची वस्तू फुटून अपघात होईल, म्हणून सध्या घरात प्लॅस्टिकचा सुळसुळाट आहे.

माझ्या माहेरी पुण्यात सगळे कडधान्य कायम फ्रीजबाहेर आणि जुने पोस्टमनचे (पत्र्याचे) डबे असायचे त्यात किंवा बोर्नव्हिटाच्या काचेच्या बरण्यांच्यात असायचे. ते वर्षभराचे घेतलेले असायचे.
कधीही प्रॉब्लेम झाला नाही कारण पुण्यातल्या कोरड्या हवेला चालतं.
मुंबईमधे मी एकावेळेला पाव किलो पेक्षा जास्त कडधान्य आणत नाही. फ्रिजमधे ठेवत नाही. बाहेरच असते. बोरीक पावडर लावून ठेवते.
च्यवनप्राशचे उरलेले डबे किंवा तत्सम डब्यांमधे ठेवते.
कोरड्या गोष्टींसाठी प्लास्टिक चालायला हवे बहुतेक.

हे माहितच नव्हत ... माझ्या कडे सर्व कड्धान्य Plastic बरण्यांमधेय आहे ..शिवाय जिरे हळद मसाले साबुदाणा सर्व काही .. लग्नाच्या वेळेस वाटले की साफ करायला easy म्हणुन घेतले होते .. आता लव्करात लवकर बदलायास हवे ..traditional स्टील डबे च चांगले ...घासायला त्रास म्हणुन Plastic बरण्यांची PoPularitY होती..
स्टील मधेय सुधा काही वेगवेगळे tyPe नाहित न ?

गौरी, काचेमधे प्लॅस्टिकप्रमाणे ग्रेड नसतात.
खरेतर खाद्यपदार्थ साठवायला काच बेश्ट.

लॉक सील च्या डब्यान्च्या झाकणात आत एक. रबर (रबरी पट्टी) असते., काही महिन्यानी ती खराब होते, काळी पडते, किवा तुटतेच.,

ह्या चर्चे निमित्ताने मला अजून काही शंका आहेत त्या इथे विचाराव्याश्या वाटतात.

हल्ली एकंदरीतच रोजच्या आयुष्यात प्लास्टीकचा वापर आपण जिथे तिथे करत असतोच. उदा. बाथरूम मध्ये बादल्या, मग, सोप केसेस इ. हा धागा जरी स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे ह्या ग्रूप मध्ये असला तरीही बाकी ठिकाणीही वापर केल्या जाणार्‍या प्लास्टीकच्या आयटम्स बद्दल चर्चा करूया. प्लास्टीकचा वापर हळू हळू कमी करायचा असेल, तर काय काय आयटम्स चा विचार करता येईल?

बाजारातून शांपू, तेले इ. प्लास्टीकच्याच बाटलीत मिळतात. त्यामुळे ज्या गोष्टी हातात नाहीत, ते सोडून देऊ. पण बाकी कुठे कुठे प्लास्टीकला फाटा देता येऊ शकेल? मला काही आयटम्स सुचले

१) प्लास्टीकच्या कॅरीबॅग्स ऐवजी कागदी/ खादी/ कापडी कॅरीबॅग्स वापरणे
२) आंघोळीचे साबण ठेवण्यासाठी स्टीलचे सोपकेसेस मिळतात. किंवा चीनी मातीचे ही पाहिलेत, पण कामवाल्या बाई च्या हातून सुरक्षित राहतीलच याची गॅरंटे नाही.
३) प्लास्टीकच्या बादल्यांना स्टीलच्या बादल्या हा पर्याय सूचतोय. पण बादली सरकवताना किंवा खाली ठेवताना आवाज फार होतो, आणि तळ गंजला की जमिनीवर चरे, डाग ही समस्या आहे. दुसरा काही पर्याय?

अरे देवा टिफीन, बाटल्या, डबे आणि आता अंघोळीच्या बादल्या पण.....
निंबुडा काय किडे सोडतेयेस डोक्यात Light 1
अज्ञानात सुख म्हणतात ते उगीच नाही

प्लॅस्टिक किती ही मावे प्रूफ असले तरी ते काही वेळाच मावे मधे वापरावे ( जास्तित जास्त १० ). प्रत्येक वेळेला प्लॅस्टिक थोडे disintegrate होत असते.
बर्‍याच वेळेला मावे मधे गरम करायचे असेल तर काच बेष्ट.

Mi bathroom bucket baddal vicharnarach hote.fridge madhey bhaji thevnyasathi plastic bag la kaahi paryay ahe ka

निंबुडा,
अगं मी पण काही दिवसांपूर्वी हे विचारल होत इथे. आपण जे cosmetics वापरतो प्लास्टिक tubes, बाटल्यामधले त्याचं काय? aloevera gel वगैरे.

किती भयंकर आहे हे प्लॅस्टिक!

चला प्लॅस्टिक निर्मूलनाला लागू या.

सगळ्यात आधी ते टीफटी मॉनिटर्स, कीबोर्ड्स अन माऊस अन लॅपटॉप आहेत ना प्लास्टिकचे? ते फेकून द्या पाहू?
सिंथेटिक चपला, पर्सेस.. ईऽक! त्याही प्लास्टिकच्याच असतात. उद्यापासून फक्त प्युअर लेदर.
चष्म्याच्या काचा, फ्रेम्स, घड्याळांचे पट्टे, शर्टांची बटणे, टॉपच्या/प्यांटींच्या झिप्स.. चला पटपट यादी करायला घेऊ.
तो टीव्ही आहे नवा आणलेला एलीडी. (कुठे फेकणार आहात ते सांगून ठेवा. मी येतो उचलून न्यायला.)

अन हो, नेक्स्ट टाईम दवाखान्यात जाल तेव्हा आठवणीने डॉक्टरांना सांगा. ती प्लास्टिकची डिस्पोजेबल सिरिंज मला नको. चांगली उकळलेली काचेची सिरिंज घ्या. अन स्टीलची सुई. आमच्या जिवाशी खेळता आहात तुम्ही प्लॅस्टिक वापरून. औषधांच्या गोळ्यादेखिल प्लॅस्टिक प्याक मधे? शिवशिव!

आईबाबंच्या डोळ्यात मोतीबिंदू आल्यावर ऑपरेशन करताना देखिल सांगा, आम्हाला कोणतीच प्लास्टिकची लेन्स नको. काचेची बनवा आमच्यासाठी स्पेशल. हार्ट व्हॉल्व्ह कशाचे बनवूयात?

गाड्यांचे सीट्स, अनेक पार्ट्स, खुर्च्या, सग्ळंच आपण धातूचं किंवा लाकडाचं बनवू या.

पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, ते अ‍ॅक्वागार्ड देवा रे! आलं प्लॅस्टिक माझ्या संपर्कात. आता क्यान्सर होणार नक्कीच मला Sad

कपाळाला लावलेली टिकली काढा ती. प्लास्टिकच्या टिकलीला प्लास्टिक डिंक लावलेला आहे तो.. अन हो. अंगावरचे कपडे. सिंथेटिक कापड = प्लास्टिक च.

***

मी एक शंका विचारू का?

तुम्ही लोक एकंदरितच प्लास्टिकबद्दल इतके पॅरानॉईड का होत आहात?

Pages