स्वयंपाकघरात प्लास्टीकचा वापर

Submitted by निंबुडा on 27 December, 2012 - 01:45

स्वयंपाकघरात अन्न टिकविण्यासाठी/साठविण्यासाठी प्लास्टीक चा पिशव्या, डबे, बाटल्या इ. स्वरुपात वापर केला जातो. पण बर्‍याच लोकांकडून अज्ञानामुळे/ अनवधानाने योग्य प्लास्टीकचा वापर केला जात नाही. अन्नासाठी कायम फूड ग्रेड प्लास्टीकचा वापर केला जायला पाहिजे. कुठलीही प्लास्टीकची वस्तु विकत घेताना त्याच्या तळाशी फूड ग्रेड ची खूण (प्लास्टीकचा ग्लास / काटा व चमचा ह्या स्वरुपात एक खूण असते) बघून घ्यावी. तसेच एका त्रिकोणात १ ते ७ पर्यंत आकडे लिहिलेले असतात. १ हा आकडा असेल तर फक्त एकदा वापरून फेकून द्यावे लागणारे प्लास्टीक असते.

प्लास्टीक बद्दल समज, गैरसमज, फायदे, गैरफायदे, प्लास्टीक च्या वस्तुंची सफाई, पर्यावरणावर प्लास्टीकचा परीणाम व उपाय ह्या सर्वांबद्दल इथे ह्या धाग्यावर चर्चा करू या!

हे फूड ग्रेड चे सिंबल्स
1157614769.jpgassets_plastic_containers_971306865.jpg

हे प्लास्टीक रीसायकल गाईड
PlasticRecyclingGuide.gif

वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक्स ग्रेड्सची तुलना:

code.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Kitchen madhe sathavani sathi konati container vaparavi

Plz share ur container pics so we get some idea

बाप रे.. ते फूड ग्रेड ची खूण आणि त्रिकोणातील आकडे याबद्दल माहितीच न्हवते... चांगली माहिती कळाली... सगळं अनब्रॅण्डेड प्लास्टिक फेकून दिलं मी आत्ता... आता फक्त टप्परवेअर आहे...

Pages