घरामधे पैशांची गुंतवणूक करणे

Submitted by शर्मिला फडके on 20 August, 2013 - 05:53

गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्याचे 'हॉट डेस्टीनेशन' कोणते आहे?
वांगणी, नेरळ, कर्जत हे पर्याय रिसेल व्हॅल्यू, व्यवहारांची सुरक्षितता या दृष्टीकोनातून कसे आहेत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या दुबई सिंगापुर मधे फ्लॅट मुंबई ( अगदी ठाण्या पेक्षा) पेक्षाही स्वस्तात मिळतात. त्यांच्या कडुन फ्लॅट घेतल्यावर लिव्हिंग पर्मिट मिळतं..... बघा हा ही पर्याय आहे.....(स्मायली)

<<<<सध्या दुबई सिंगापुर मधे फ्लॅट मुंबई ( अगदी ठाण्या पेक्षा) पेक्षाही स्वस्तात मिळतात. त्यांच्या कडुन फ्लॅट घेतल्यावर लिव्हिंग पर्मिट मिळतं..... बघा हा ही पर्याय आहे..>>>>>सिंगापूरच्या बाबतीत ही गोष्ट खरी नाही अहे. दुबई बद्दल कल्पना नाही

<<सध्या दुबई सिंगापुर मधे फ्लॅट मुंबई ( अगदी ठाण्या पेक्षा) पेक्षाही स्वस्तात मिळतात. त्यांच्या कडुन फ्लॅट घेतल्यावर लिव्हिंग पर्मिट मिळतं>> वावा छानच माहिती .
मी स्वत मात्र घरातच गुंतवणूक केली आहे आणि मला त्याचा भरपूर फायदाही झाला आहे. घर घेतलं की ते भाड्याने द्यायचं आणि भाड्यातच "इ एम आय" वळता करून घ्यायचा अशीच पहिल्यापासून पोलिसी ठेवली आहे . मेंटेनन्स च्या बर्याच बर्या पट भाडे मिळते. काय वाईट आहे. भाडेकरू दर दोन वर्षांनी बदलायचे. कुठलाही भाडेकरू दोन वर्षापेक्षा जास्त वाढवायचा नाही. एवढ एक पथ्य पाळायच.आमच्या आई वडिलांनी फक्त स्वतःपुरत घर घेतलं. मुल मुलांचं बघतील काय ते असा विचार केला. आम्हालाही घ्यायला जमल. पण आत्ता याच्या पुढे मुलांना त्यांच्या पगारामध्ये घर घेण जमणार आहे का ? याचा आपणही विचार करायला पाहिजे अस मला वाटत .घरांच्या किमती अफाट वाढल्या आहेत पण त्या मानानी पगार( मासिक उत्पन्न ) वाढले का ? आणि मग मुलांची लग्न झाल्यावर १ बेडरूमच्या घरामध्ये धुसफुसत राहण्यापेक्षा जस जस जमल तस तशी घरामध्येच गुंतवणूक केली :).

अतिशयच उपयुक्त धागा!
गुंतवणुकीला हा काळ योग्य नाही. ह्या रेट मधे बरीच करेक्शन्स येतिल >>> हे तर खरेच मोकिमी..
पण ही जी काही घर/फ्लॅट संदर्भात चर्चा सुरू आहे, ती प्लॉट/ जमीन घेण्याच्या बाबतीत कितपत लागू पडतेय?
एकदा बांधलेय म्हटल्यावर घर/फ्लॅट ला बर्‍याच मर्यादा येतात. पण प्लॉट/ जमीन यांत गुंतवणूक केली सध्या मंदीचा फायदा घेऊन तर अजून किमान दहा वर्षानी फायदा होईलच की....

@मोहन की मीरा
सिंगापुर मध्ये फ्लॅट पडून आहेत.. तुम्ही कोणत्या जमान्यातील गोष्ट करताय? सिंगापूर मध्ये २ बिएचके चं भाडं किती मिळतं माहित आहे का? जर फ्लॅट खरंच पडुन असतील तर मला जरा एकाद्या फ्लॅट ची माहिती देता.. बघतो स्वस्तात देतो का भाड्याने?

पण प्लॉट/ जमीन यांत गुंतवणूक केली सध्या मंदीचा फायदा घेऊन तर अजून किमान दहा वर्षानी फायदा होईलच की....>> याबद्दल अजून थोडी माहिती मिळेल का? सध्या दोन तीन महिन्यांत कोकणामधे एखाद्या ठिकाणी जमीन घ्यायचा विचार चालू आहे. अर्थात तिथेदेखील रेट्स काहीही सांगतात, पण गुंतवणूक म्हणून आणि रीटायर झाल्यावर रहायचे अशा विचारांनी जमीन घेण्याचा विचार चालू आहे.

मी ३ महिन्यांपुर्वीच एक प्लॉट घेतला कोकणात.. तुम्ही कुठे बघताय? शहराकडे की थोडं बाहेर, की गावात (थोडी झाडं/लागवड केलेली) ?

कोकणात गुंतवणूक म्हणून आणि रीटायर झाल्यावर रहायचे अशा विचारांनी जमीन घेण्याचा विचार चालू आहे. >>> अगदी अगदी! तुझी हरकत नसेल तर एक जागा सुचवू?
खरंच, घरापेक्षा सध्या गुंतवणूक म्हणून प्लॉट बरा असे वाटतेय..... जाणकार अजून सांगू शकतील.
त्याचे कायेय, की सध्या बेसिक घर/घरे झाली आहेत, पिल्लू लहान असल्याने अजून मोठ्ठे खर्च सुरु झाले नाहियेत, वयस्क पिढी सुदैवाने आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाहिये, रिटायर व्हायला किमान २५ वर्षे आहेत आणि नेहमीची म्युच्यअल फंड इ इ गुंतवणूक वगळून थोडे पैसे जमलेत अशी काही मित्रमंडळी आहेत.
जमिनीत गुंतवणूक करायला उत्सुक आहेत, पण नेमके आत्ताच मंदीच्या फेर्‍यात अडकतोय की काय असे झालेय.......

हे सगळ तुम्ही मुंबईच्या बाबतीतच फक्त बोलताय ना ? कारण मी आत्ताच पुण्यात (पिंपळे सौदागर) ५००० रू ने फ्लॅट घेतला आहे . अगदी रावेतलाही ४००० सुरू आहे आणी मोशीलाही ३-३५०० .
अर्थात मी तो स्वतःला राहण्यासाठी घेतला आहे , सध्या मी १४००० भाडे देतोय . माझ चुकलय का , जाणकारानी प्लीज सांगा .

@केदार जाधव |
रहाण्यासाठी असेल तर उत्तम ..काहीही चूक नाही ! १४००० भाडे देण्यापेक्षा हे चांगला

मला दाभोळ दापोली या पट्ट्यामधे हवा आहे >>>> मी म्हणतेय ते गुहागरजवळ आहे... असो.
जाणकार कुठे गेले सगळे??

मी रत्नागिरीपासुन १० किमी वर, पावस रस्त्याला, कोळंबेच्या इथे (फिनोलेक्स च्या अलिकडे) घेतला.. एन.ए. प्लॉट.. तिथे २ लाख गुंठा दर चालु होता. शहरात यायला १० मि. पुष्कळ. हाय-वे ने

डीडी, कोळंब्यामधे हातिसकरांच्या प्रॊपर्टीच्या आसपास कुठेतरी का? त्यांची बाग वगैरे आहे ना तिथे? २ लाख गुंठा म्हणजे बराच चांगला मिळालाय.

ओके नंदिनी.... गुहागर ते चिपळूण रस्त्यावर चिखली का काय गाव आहे तिथे... आता घरी जाऊन सगळी नीट माहिती मेल करीन आज-उद्या.
आम्हाला नक्की अंदाज येत नाहिये कोकणात माणसांचा आणि जागेचा वगैरे. पण वरचा प्रोजेक्ट छान वाटला.

सध्या सगळीकडे मंदिचच वातावरण आहे. नव्या योजना उअपक्रम बासनात आहेत. सध्या लोकांकडे व्हाइट वर्किंग कॅपिटल नाही. आहे ती सगळी कॅश. एका लिमिट पलीकडे ती कॅश बाजारात सोडता येत नाही. मग डेस्परेट सिच्यशन होते आणि मग मार्केट पडतं...( अनेक क्लायेंटचा अनुभव) हा जो काळा पैसा ह्या उद्यगात आहे तो आता निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर निघेल. त्या करीता मार्केट मधे बरच करेक्शन होइल.>>>>>>>>>>>>>>>>>> थोड जास्त सविस्तर लिहता का ??? प्लीज Happy

@नंदीनी - कोकणात जमिन वगैरे घेउन घर बांधुन रहाण्याचा विचार करण्या पूर्वी कोकणात १० -१५ दिवस जाउन रहा. पर्यटक म्हणुन नव्हे.

लांबुन फार छान वाटते, खरी परिस्थिती अवघड आहे.

मार्च मध्ये, घरी २ दिवसाचा मुक्काम असताना, एक एजंट घेतला आणि दिवसभर त्याने दाखवलेले प्लॉट्स बघत फिरलो. जर आपल्याला घ्यायचा असेल तर हा पर्याय मस्त.. त्यांच्याकडे खुप ऑप्षन्स असतात. फक्त एक प्लॉट लक्षात आहे.. मुंबई-गोवा हाय-वेवर हातखंबा तिठ्यापासुन १.५ किमी. रोडच्या थोडा आत हा प्लॉट होता. आणि हाय-वे रुंदिकरणानंतर रोड टच होणार आहे. ५ गुंठे ४ लाख प्रति गुंठा. ८-१० कलमं होती, ४ वर्षाची. हा फोटो-

Pages