घरामधे पैशांची गुंतवणूक करणे

Submitted by शर्मिला फडके on 20 August, 2013 - 05:53

गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्याचे 'हॉट डेस्टीनेशन' कोणते आहे?
वांगणी, नेरळ, कर्जत हे पर्याय रिसेल व्हॅल्यू, व्यवहारांची सुरक्षितता या दृष्टीकोनातून कसे आहेत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदीनी - कोकणात जमिन वगैरे घेउन घर बांधुन रहाण्याचा विचार करण्या पूर्वी कोकणात १० -१५ दिवस जाउन रहा. पर्यटक म्हणुन नव्हे.

लांबुन फार छान वाटते, खरी परिस्थिती अवघड आहे.
<< अवघड आहे म्हणजे नक्की कशी? लांबून छान वाटते म्हणजे कशी? सविस्तर लिहाल तर जरा माहिती मिळेल. माफ करा, पण मला कोकणात रहायचा खरंच जास्त अनुभव नाही, आम्ही फक्त २५ वर्षापासून रत्नागिरीमधे राहत आहोत. नवर्‍याला तर कोकणचा अजिबात अनुभव नाही. खेड-खोपी-दापोली-दाभोळ्-चिपळूण-रत्नागिरी-कणकवली एवढ्याच कोकणातल्या गावांमधे राहिलाय तो.

डीडी, एजंटचे डीटेल्स संपर्कामधून पाठवून ठेवशील का प्लीज!

@नंदीनी - कोकणात जमिन वगैरे घेउन घर बांधुन रहाण्याचा विचार करण्या पूर्वी कोकणात १० -१५ दिवस जाउन रहा. पर्यटक म्हणुन नव्हे. >>> Lol

अहो, कोकणकन्या आहे नंदिनी. Lol

मोकीमी.. फार सुंदर पोस्ट. आवश्यक ती माहिती मिळाली. धन्यवाद.

बाकी पोस्ट्सही खूप उपयुक्त आहेत. एजंट गाठणे म्हणजे जीव नकोसा करुन घेणे, इतकी घरं, प्लॉट्स दाखवायला, सुचवायला लागतात की जीव नको होतो. Proud . पण चांगला, भरवशाचा एजंट मिळणं खरंच गरजेचं आहे आपल्याला हवी तशी जागा मिळण्याकरता.

कोकणातला जागेचा पर्याय मला मुंबईपासून जाण्या येण्याच्या अंतरावर सोयीचा या अटीत बसेल का कळत नाही. बहुधा नाहीच. तरीही चांगला प्रस्ताव असेल तर हरकत नाही. ओवी मलाही मेल कराल का प्लीज?

आम्ही फक्त २५ वर्षापासून रत्नागिरीमधे राहत आहोत. नवर्‍याला तर कोकणचा अजिबात अनुभव नाही. खेड-खोपी-दापोली-दाभोळ्-चिपळूण-रत्नागिरी-कणकवली एवढ्याच कोकणातल्या गावांमधे राहिलाय तो. >>>>>>

हे जर असे आहे तर तुम्हाला रत्नांगीरी, दापोली, दाभोळ, गुहागर, गणपतीपुळे इथे विकण्यासाठी असलेल्या जमिनी माहीती नाहीत? सगळीकडे एजंटांचा सुळसुळाट झालाय.

साठे - ८८०५२४५२७७ : गणपतीपुळे च्या आसपास
बिवलकर - ०२३५८२८३१५८ : दापोलीच्या आसपास

jaga1.jpgjaga3.jpgआम्हाला आमची मंडणगडची ७ एकर जागा विकायची आहे, एकरी भाव २.५ लाख , मंडणगड पासून ३कि मी . आणि मंडणगड चा डोंगराळ भाग असूनही जागा सपाट आहे.

प्रसाद, काही एजंट माहिती आहेत. जागा दोन तीन ठिकाणी बघत आहोत. अजून कुठे स्वस्तात मिळाली तरी बघत आहोत. नंबर दिल्याबद्दल धन्यवाद.

खुद्द गुहागरला माझ्या आजोळच घर आहे १९४१ मध्ये बांधलेलं . तिथे मामे बहिणींना जाण्यात काडीचा इंटरेस्ट नाहीये. आणि आम्ही पडलो मुलीच्या मुली. त्यामुळे आमचा त्यात वाटा नाहीये . म्हणतात ना दात आहेत तिथे Happy

डिडि...

मी सिंगापुर मधल्या रेंट मार्केट विषयी बोलतच नाहिये. मी सेल च्या रेट ची तुलना केली. मुंबईत सध्या प्रभादेवि, शिवजी पार्क, बांद्रा, लोअर परेल अशा ठिकाणी गुंतवणुक करणे हे सिंगापुर पेक्षा महाग आहे. सिंगापुर मधे ४० ते ४८ हजार रुपये प्रति स्क्वे.फू. रेट आहे. मुंबईत ह्या किमतीत लोअर परेल च्या रीडेव्हल्पमेंट बिल्डिंग मधे घरे मिळतात. सध्याच एक डिल पाहिला की परळ ला ६० वर्ष जुन्या इमारती मधे जिथे लिफ्ट नाही तिकडे ५०० स्क्वे. फु चा फ्लॅट १.८० करोड ला गेला. प्रभादेविला साधारण १५०० स्क्वे. फू साठी ७ ते ८ कोटी मोजावे लागतात. ते ही जुन्या इमारतींमध्ये. माझ्या बॉस ला जुहुला १० कोटी पर्यंत ३ बेडरुम चा फ्लॅट गेली दोन वर्ष शोधुनही मिळत नाहिये...

ठाण्याला घोड्बंदर रोड ला काही काँप्लेक्स मधे बेस रेट १५०००+ १५० फ्लोर राइज आहे. म्हणजे २७ व्या मजल्या वरचा फ्लॅट १९००० प्रति स्क्वे.फूच्या वर गेला. + सेर्व्हीस टॅक्स, स्टँप ड्युटी, रजिस्ट्रेशन, टिडि.एस.

सध्या च्या मार्केट मधे घर लोन वर घेवुन ते भाड्याने चढवुन त्या भाड्यात इ.एम.आय. भागवायचे दिवस गेले
( उदा. ४००० प्रति स्क्वे. फू. ने बदलापूर मधे समजा ६०० स्क्वे.फु चा फ्लॅट घेतला तर तो २४ लाखाला पडेल. तिकडे ६०० स्क्वे. फु. साठी जास्तित जास्त १२ हजार भाडे मिळेल. हा फ्लॅट घेताना जर लोन २० लाखाचं असेल, तर निदान १८००० इ.एम.आय तर नक्कीच असेल. म्हण्जे भाडे १२ हजार आणि हप्ता १८०००!!!हा शॉर्ट फॉल रहाणारच) हे गणित २००५- ते २००८ च्या मार्केट पर्यंत जुळत होते... तेही काही काही एरियां मधेच ( २००८ ला ठाण्याला पाच पाखाडित १ बेडरुम चा भाड्याचा रेट १० ते ११ हजार होता). माझ्या शेजारच्या फ्लॅट ला २३००० भाडे येते आणि त्यांचा लोन चा हप्ता ३२००० आहे. हा फ्लॅट त्यांनी २००८ मधे ४००० प्रति चौ.फु. प्रमाणे घेतला. त्या वर ४० लाखाचं लोन आहे.

त्या मुळे सध्या.... अळीमिळी गुप चिळी....

मुंबईचा २ बेड रुमचा फ्लॅट काढुन मुंबईबाहेर राहाता येईल (रीटायरमेंट नंतर २५ एक वर्षांनी Happy ) असा बंगला घ्यायचा विचार आहे. साधारण १ करोड पर्यत. कुठे गुंतवणे फायदेशीर आहे?

मोहन की मीरा …. <<<सध्या दुबई सिंगापुर मधे फ्लॅट मुंबई ( अगदी ठाण्या पेक्षा) पेक्षाही स्वस्तात मिळतात>>>> <<<<ठाण्याला घोड्बंदर रोड ला काही काँप्लेक्स मधे बेस रेट १५०००+ १५० फ्लोर राइज आहे.>>>
सिंगापुरमध्ये ज्या डेवलपमेंट मुख्य शहराच्या बाहेर आहेत तिथला रेट सुद्धा ७० ,० ० ० रु. प्रति स्क्वे.फुट आहे. आणि सिंगापूरमधील जर परळ दादर हा एरिया (मुख्य शहरातील ) घेतला तर तेथील रेट हा ४ ,० ० ,० ० ० च्या पुढे अहे.

गौरीम..

आहो मी हेच म्हणते आहे... की मुंबई सारख्या बकाल शहरात १५-२० कोटी घालण्या पेक्षा सिंगापुर मधे घातले तर नीदान फायदा तरी होइल.... मुंबईत दक्षिण मुंबई मधे आहेत की असे भयानक रेट.... पण ह्या शहराची लायकी आहे का तेवढा रेट देण्याची!!!! त्या पेक्षा दुबई/सिंगापुर मधे घेतलेला बरा.

हॉलिवुड च्या अप्रतिम कॉलनीत फिरत असताना गाईड ने जवळ्च्या इमारती मधला रेट सांगितला. साधारण ४ ते ५ लाख डॉलर ला २ बेडरुम अपार्ट्मेंट येतं..... म्हणजेच आजच्या रेट ने ३ ते ४ कोटी. हा तर सायन चा रेट झाला. तिकडची क्वालिटी/लिव्हिंग स्टँडर्ड... ह्याची आणि मुंबईची तुलना तरी होइल का....

जाउदे...

मोकिमी,
तु म्हणतेयस त्याप्रमाणे दुबईत सध्या मुंबई-ठाण्यापेक्षा फ्लॅटस स्वस्त आहेत हे खरंय. पण तो विकत घेताना वीज-पाणी ह्या सोयी तिथल्या मुनिसीपल कॉर्पोरेशन ने पुरवल्यात का ते बघणं अतिशय गरजेचं आहे.
मित्राने शारजाहला चांगला ४ BHK फ्लॅट घेतला पण शारजाह कॉर्पोरेशन ने वीज-पाणी कनेक्शन दिलं नाही. बिल्डरने सांगितलं की अ‍ॅग्रीमेंट फक्त जागेचं, बाकी सोयी पुरवणं/ न पुरवणं हे त्या म्युनिसीपालिटीने ठरवायचं. झक्कत विकावा लागला.

.>>मुंबई सारख्या बकाल शहरात १५-२० कोटी घालण्या पेक्षा सिंगापुर मधे घातले तर नीदान फायदा तरी होइल.... मुंबईत दक्षिण मुंबई मधे आहेत की असे भयानक रेट.... पण ह्या शहराची लायकी आहे का तेवढा रेट देण्याची!!!! त्या पेक्षा दुबई/सिंगापुर मधे घेतलेला बरा >>>>>>>>
>> मलाही अगदी मनापासुन असेच वाटते मोकिमी.

अशुतोष...

ठाण्यात आज अनेक इमारती अशा आहेत जिथे कॉर्पोरेशन्चं ओ.सी. नाही त्यामुळे पाणी नाही. जवळ जवळ ७०% नवी बांधकामांची हीच स्थिती आहे. मलनि:सारणाची लाइनही थोडे पैसे देवुन जोडुन घावी लागते. आणि बर्‍याचदा न सांगताही जोडतात. पण अनेक इमारती टँकर वर अवलंबुन आहेत. नावं घेत नाही पण मोठे सगळे काँप्लेक्स आज ह्या स्थितीत आहेत. तरीही आपण घरं घेतच रहातो.... जी परिस्थीती ठाण्याची तिच कल्याण, डोंबिवली, बदलापूर , विरार, कांदिवली बोरिवली.... ला कमी अधिक फरकाने आहे.

आपल्याकडे लाईट पुरवणारी वेगळी कंपनी आहे म्हणुन लाईट मिळत आहेत. नाहितर जर ते उद्या ओ.सी. शी लिंक केलं तर तेही बंद होइल... आर्थात मग लोक जनरेटर वर काम चालवतिल.... तसं देखिल कल्याण डोंबिवलीत लोड शेडिंगची सवय आहेच....

अति लोकसंख्या असल्या मुळे आपल्या इथे मुळात ऑकॉमोडेशन चा अति प्रचंड प्रॉब्लेम आहे....त्या मुळे ग्राहक अशा तडजोडी नाइलाजाने स्विकारतो.....

मुंबई मधे आहेत की असे भयानक रेट.... पण ह्या शहराची लायकी आहे का तेवढा रेट देण्याची! >> पुण्याचीही हीच परिस्थिती आहे, पुणे भोसले नगर पेक्षा अमेरीकेत बे एरीया सन होजे/सान्टा क्लारा मधे तेवढयाच एरीयाची घरे स्वस्त आहेत

Pages