भगवद्गीतेचे भाषांतर हवे आहे

Submitted by अतरंगी on 6 August, 2013 - 07:27

मागच्या महिन्यात मी भगवत गीता वाचायला घेतली. आमच्या घरात स्वामी प्रभुपाद यांचे "गीता आहे तशी" हे भाषांतर आहे. मला दहावी पर्यंत पूर्ण संस्कृत होतं पण तरी आता दहावी पास होउन बरीच वर्षे झाल्याने आणि मध्यंतरी संस्कृतशी काहिच संबंध नसल्याने कोणत्यातरी भाषांतरावरच अवलंबून रहावे लागणार होते...

पण हे भाषांतर वाचता वाचता मला असे वाटायला लागले कि त्यात काहि त्रुटी आहेत.... ( कदाचित मा.बु.दो)

म्हणून मला बर्‍याच श्लोकांचा अर्थ हवा आहे. तसेच गीतेचे कोणते भाषांतर वाचावे हे पण कळत नाही. बाजारात जास्त करुन स्वामी प्रभुपाद यांचे पुस्तक उपलब्ध आहे. गीताई पाहण्यात नाही आले, गीतारहस्य अ.ब. चौकात मिळते पण ते ईंग्रजी मधे आहे.

कोणास जर चांगले भाषांतर माहित असल्यास कृपया सुचवा.....

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.manogat.com/node/367

ह्या दुव्यावर मी स्वतः गीताई टंकित केलेली आहे.
ही प्रत अनेकदा मुळावरून तपासली गेल्याने शुद्धतेची खात्री देता येईल.

त्यातूनही काही चूक आढळल्यास मला
narendra.v.gole@gmail.com
ह्या पत्त्यावर अवश्य कळवावे.

http://www.freebhajans.com/category/yatharth-geeta

ईथे पण यथार्थ गीता उपलब्ध आहे. पण मला ईथुन पण डाउनलोड करता येत नाही. बाकी कोणाला जमत असेल तर पहा कृपया. मला A plugin needed to display this content असा मेसेज येतोय.

अहो भाग्यम!!!
योगायोगाने मलाही गितेचे 'मराठीत' भाषांतर हवे होते! काय भाग्य आहे पहा!
सहस्र धन्यवाद!!

या ठीकाणी मीळेल मराठी भाषांतर
अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असे झाले आहे माझे. आता ईतके सगळे वाचे पर्यंत एक दोन महिने आरामात जातील तो पर्यंत बाकि सर्व बंद...... माबो वर दर अर्ध्या तासाने येणं पण........... Happy

इस्कॉन प्रकाशित प्रभुपाद स्वामी लिखित श्रीमद्भगवत गीतेमध्ये विवेचन फारच कंटाळवाणे आहे असे मलाही वाटते.
पण मुळात विवेचन वाचलेच पाहिजे असे कुठे आहे?
श्रीमद्भगवत गीता वाचायची आहे. मग श्रीमद्भगवत गीताच वाचावी.
आपले आयुष्य - आपली गीता - आपले विवेचन आपणच करावे!
'प्रत्येकाची गीता निराळी'.

गीता वाचनातून दर वेळी नवा विचार आणि मार्ग मिळतो.
फक्त गीता आणि त्याचे शब्दश: भाषांतर हे पण वाचता येईल. आणि हाच या प्रभुपाद स्वामी लिखित गीतेचा माझा आवडता भाग आहे. विवेचन काहीही असो, तरी शब्दशः भाषांतर देणारी मला वाटते हीच एक सुंदर आवृत्ती आहे. तेव्हढेच वाचावे!

मला वाटते अँड्रॉइड फोनवरही गीता मिळेल.
नारायण कॉम यांची गीता सोपी आणि आणि वाचायला प्रवाही आहे. ही इतर अनेक भाषांसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. वापरायला सोपी आहे. फक्त संस्कृत व खाली त्याचे भाषांतर इतकेच!

(पण क्वचित अचानक येणारे अशुद्ध लेखन खटकते. - खूप नाहीये. पण एका ठिकाणी पैदा ऐवजी पौदा वगैरे झाले आहे.)

माझा फोन अँड्रॉइड नसल्याने त्याला पास.....

गीता वाचनातून दर वेळी नवा विचार आणि मार्ग मिळतो.>>>>
हे मात्र नक्की. जितक्या जास्त वेळा वाचावे तितके जास्त समजते/ उमजते. मी स्वामी प्रभुपाद यांचे भाषांतर दोन वेळा वाचले. दुसर्‍या वेळेस आधी च्या वाचनात जो भाग डोक्यावरुन गेला तो थोडा फार कळाला. आता काल तिसर्‍यावेळेस वाचायला घेतली आहे. बघुया काय काय समजते अजुन.

भगवत गिता चे मराठी पुस्तक मिळ्ते .

भगवत गिता चे मराठी पुस्तक मिळ्ते .<<< होय गोरखपुर प्रेस्चे मराठीतले गीतेचे पुस्तक मिळते मी तेच वाचल्याचे स्मरते आहे

स्वामी प्रभुपाद यांचे "गीता आहे तशी" .

इस्कोन वाल्यांनी समजायला अवघड आणि बोअर करून ठेवलीये हि गीता . "गीता प्रेस " ची भागवाद गीता वाचू शकता . पण detail मध्ये अर्थ न देता थोडक्यात दिला आहे. समजायला सोपी आहे

Pages