सर्वात भीतीदायक चित्रपट

Submitted by उद्दाम हसेन on 30 July, 2013 - 14:29

तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉण्टेड आणि राजला भीती ( भट्ट कँपचे) वाटली होती Happy
द ओमेन, सिनेमा हॉल मधे पाहीला होता शेवटच्या रनला. सीडी आणून घरी पाहिला तर अजिबातच भीती वाटत नाही.

Visiting Hours नामक एका चित्रपटाने झोप उडवली होती एके काळी ....

Psycho

रामुचा भुत, थेटर मध्ये टरकाउन गेलेला.

एक्सोर्सिस्ट घरीच रात्री एकटा असताना ११ वाजता पहायला सुरु केलेला.
संपल्यावर शु शु ला जायची पण भिती.. Lol

ओमेन.....माझी खुप टरकलेली...मी ७ वीत असताना बघितलेला १९९७ मधे.....ग्रेगरी पेक वॉज ऑसम.......लहानपणापासुन तो माझा हार्ट्थ्रोब आहे...

एक्सोर्सिस्ट घरीच रात्री एकटा असताना ११ वाजता पहायला सुरु केलेला.
संपल्यावर शु शु ला जायची पण भिती.. >>>>>>>..... मला पण.....मी मम्मी ला बाहेर उभं ठेउन तिच्याशी बोलत रहायची मग.......

डेमन्स्...शाळेत असताना बघितला होता. तो बघितल्यावर खुर्चीवर बसल्यावर पण असे वाटायचे की खालून कुणीतरी पाय पकडेल. मी तर एका खोलीतून दुसर्या खोलीत जायला पण घाबरायचे. थीएटर मधे जायची पण भीती वाटायची. कारण पुर्ण सिनेमा थीएटर मधला आहे.

मी मम्मी ला बाहेर उभं ठेउन तिच्याशी बोलत रहायची मग....>>> Lol

पण मी घरात एकटाच होतो.
बाय्को माहेरी..

आमचं घर ज्या कॉलनीत होतं तिथे दोनच बिल्डीन्ग आणि फक्त १६ फ्लॅट एका बिल्डिन्गमध्ये.
माझं घर चौथ्या मजल्यावर.
बाजुच्या फ्लॅट रिकामाच.
आणि कॉलनीत भरपुर झाडं.
आजुबाजुला बिलकुल गोन्गाट नाही मुख्य रस्त्यापासुन आत कॉलनी असल्यामुळे.

पक्कं वातावरण Happy

आमचं घर ज्या कॉलनीत होतं तिथे दोनच बिल्डीन्ग आणि फक्त १६ फ्लॅट एका बिल्डिन्गमध्ये.
माझं घर चौथ्या मजल्यावर.
बाजुच्या फ्लॅट रिकामाच.
आणि कॉलनीत भरपुर झाडं.

पक्कं वातावरण>>>>>>>>.. मग तर भारी......... मी एकटी कधी असलीच तर सर्व लाईट्स चालु ठेउनच झोपते....हॉल्,किचन्,बेडरूम, संडास्,बाथरुम्,मधला पॅसेज, बाहेरची लाईट,टि.व्ही पण.....

खिडकी बरोबर तिचे पडदे पण बंद करायचे नाहीतर बाहेरच्या अंधारातुन कोणीतरी तुमच्या कडे पाहात असल्याचा भास होउ शकतो....

लहानपणी खुनी पंजा पाहिला होता. कित्येक रात्री घाबरुन काढल्या आहेत. तो पंजा कुठुनही येईल आणि मला धरेल ह्यामुळे झोप लागायची नाही. अगदी ब-याचदा घाबरुन अंगाला घाम देखील सुटायचा. कुठल्याही चित्रपटात भुताचे पांढरे डोळे पाहीले की खुप भीती वाटायची.

शाळेत सताना - पुराना मंदीर, मंगळ्सुत्र, चक्क करीष्माचा पापी गुडीया पण Happy
कॉलेजात असताना - रामुचा भुत. थेटरात जाम टरकलेली. साउन्ड इफेक्ट भारी होता. द रिंग, एक्सोर्सिस्ट

कौन ... शेवट एकदम शॉकिंग वाटला होता. परत पहायची हिंमत नाही.

अलिकडचा १९२० बघून पण घाबरायला झालं होतं. तो कुठल्यातरी हॉलिवूडपटावरून चोरला होता असं ऐकलं होतं.

एक एपिसोड सोनी टीव्हीच्या 'आहट' चा हिवाळ्यात बाहेर जबरी थंडी असताना, चांगलाच घाम फुटला होता... पण नंतरचे कोणतेही एपिसोड फासरे काही विषेश वाटले नाही.

झकासराव :- मागे बघा, ती आली Happy

Pages