Submitted by उद्दाम हसेन on 30 July, 2013 - 14:29
तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला पण. चल अन्जू, सोबत बघू..
मला पण. चल अन्जू, सोबत बघू..
माझी आवडती मूव्ही..पूर्ण
माझी आवडती मूव्ही..पूर्ण पिक्चर पाठ झालाय आता तरी सुद्धा दरवेळेस पाहताना टेन्शन येतच.>>>>>>> +++११ हो त्या स्कूल बस सीन मधे बोगद्यात तो ट्रक येऊन उभा राहतो आणि जरावेळाने लाईट लागतात. खतरनाक वाटंतं ते! आणि त्या ट्रकचं फायरींग..
दो गज जमीन के नीचे>>> काहीच
दो गज जमीन के नीचे>>> काहीच हॉरर नाही त्यात. वाईल्डलाईफ मुव्ही आहे. स्टोरी अशी आहे... दोन झेब्रे आणि दोन हत्तींची मारामारी होते. त्यात झेब्र्यांनी हत्तींना चोपून काढले आणि पुन्हा जंगलात दिसलात तर तंगडी मोडू असे सांगितले. घाबरलेले हत्ती जमिनीत एक बिळ खोदून त्यात राहू लागले. त्यावरच पिक्चर आहे.
आशु चालेल मोरोबा
आशु चालेल
मोरोबा
मोरोबा =))
मोरोबा

हेरेडेटरी, मी पाहिलेला सर्वात
हेरेडेटरी, मी पाहिलेला सर्वात भीतिदायक चित्रपट. दोन दिवस डोकं जड वाटतं. मला ताण असह्य झाल्याने मी पाऊन बघून सोडून दिला व शेवट Wikipedia वर वाचला.
येस बरोबर अस्मिता, हेरिडेटरी
येस बरोबर अस्मिता, हेरिडेटरी भीतीदायक आहे..
फॉल हा सर्वावयल थ्रिलर बर्
फॉल हा सर्वावयल थ्रिलर बर्यापैकी घाबरवणारा वाटला होता. अस्वस्थ जास्त करतो.
प्रत्येक वेळी थांबवून ब्रेक घेऊन मग पहावा लागला.
भूत.. रामगोपाल वर्मा.
भूत.. रामगोपाल वर्मा. थिएटरला पाहिलेला. कॉलेजच्या मित्रांसोबत. रात्रीचा शो. आणि पिक्चर संपल्यावर घरी न जाता कॉलेजला झोपायला गेलेलो. त्यामुळे त्या रात्री काही वाटले नव्हते. पण दुसर्या दिवशीपासून पुढचे महिनाभर मी एकटा झोपलो नव्हतो. आईच्या बाजूला झोपायचो. कारण घरात भूत असू शकते हे हादरवणारे होते. आणि तेव्हा मी आस्तिक होतो. त्यामुळे देव आहे तर भूत सुद्धा असू शकते असा विचार करायचो.
बाई दवे, नुकताच आलेला शैतान हास्यास्पद आणि बालिश आहे त्या पिक्चर समोर.. तुलना करायचे कारण हे की घरात घडणारी स्टोरी आणि अजय देवगण हे कॉमन फॅक्टर..
मी हेरिडीटरी आणि गेट आऊट
मी हेरिडीटरी आणि गेट आऊट दोन्ही पाहिले बॅक टू बॅक.
गेट आऊटच्या कन्सेप्टमुळे तो जास्त डिस्टर्बिंग वाटला.
हेरिडीटरीची वातावरण निर्मिती आणि काही काही सीन्स जबरदस्त आहेत. पण कधीकधी फार संथ वाटतो.
मी हेरिडीटरी आणि गेट आऊट
मी हेरिडीटरी आणि गेट आऊट दोन्ही पाहिले बॅक टू बॅक. >>>> Which OTT platform?
Startup Show
Startup Show
ए त्या अमेरिकाज गॉट
त्या America's Got Talentमध्ये त्या जम्मू कश्मीरच्या मुलीने कसला क्रिपी डान्स केला ते बघितलं का. लूक, मेकपही फारच क्रिपी होता.
^^^ बापरे! तेरा वर्षाची मुलगी
^^^ बापरे! तेरा वर्षाची मुलगी? नि:शब्द....!
वयाच्या ३०+ नंतर भूत नसते हे
वयाच्या ३०+ नंतर भूत नसते हे ठाम मनात झाले. त्यामुळे सायको थ्रिलर जास्त घाबरवणारे वाटायला लागले. कारण सायको खर्या आयुष्यात असतात
बापरे त्या मुलीने कायच्या काय
बापरे त्या मुलीने कायच्या काय डान्स केला.
भारी आहे पोरगी.
भारी आहे पोरगी.
असाच एक सिमीलर बघितला होता
असाच एक सिमीलर बघितला होता एका डान्स शो मधे. बर्यापैकी कॉपी वाटतोय.
https://www.youtube.com/watch?v=z8OuA_x_GAw
हो, मला ही आणि ती एकच वाटली
हो, मला ही आणि ती एकच वाटली इतक्या दोन्ही नाचाच्या थीम सारख्या आहेत.पण ही अमेरिका शो मधली लहान , काश्मिरी आहे आणि भारतीय शो वाली थोडी मोठी आणि बंगाली.कॉपी असेल किंवा दोघींना आयडिया एकाच क्लास मध्ये एकाच गुरु ने दिली असेल.(आमच्या एरियात अचानक एका गणपतीत सगळ्या सोसायटीच्या सगळ्या वेगवेगळ्या मुली टॉप लेचीपोडी वर नाचायला लागतात.तेव्हा कळतं एरियातल्या 'अमुक डाँझा' नावाच्या क्लास मध्ये हा पूर्ण महिना हा आयटम घासतायत.)
र आ, 'दरवाजा' खरंच भीतीदायक
र आ, 'दरवाजा' खरंच भीतीदायक वाटला? त्यापेक्षा तर वीराना मधली जास्मिन डेंजर वाटते
हॉरर्सची भीती वाटणं केव्हाच बंद झालंय पण तरीही काहीकाही सीन्स अधूनमधून झटका देतात. उदा: कॉन्ज्युरिंग १ मधला तो सीन ज्यात त्या मुलींची आई तळघरात अडकते, दिवा जातो आणि ती काडेपेटीतल्या काड्या पेटवत दाराला पाठ टेकवून बसलेली असते. आणि मागून दोन हात येऊन टाळ्या वाजवतात.
मला सगळ्यात जास्त आजही 'रात' च भीतीदायक वाटतो. कमाल आहे तो सिनेमा.
र आ, 'दरवाजा' खरंच भीतीदायक
र आ, 'दरवाजा' खरंच भीतीदायक वाटला? >> दरवाजाच्या आधी हॉरर मूव्ही काय असते याबद्दल फक्त ऐकून होतो. हा पण अठरा पूर्ण झाल्यावर री रन ला आलेला तेव्हां पाहिला.
त्यापेक्षा तर वीराना मधली जास्मिन डेंजर वाटते >>> इतकं सुंदर भूत असेल तर कुणीही म्हणले "ये मला पछाड"
ओमेन मधे दचकवणार्या सीन्स पेक्षा तणाव जास्त ठेवलेला आहे. सशक्त कथा आहे. शैतान जन्माला आलेला आहे याची उकल, तपास यामुळे इतका जुना होऊनही हा चित्रपट कदाचित क्रमांक एकला ठेवावा लागेल. एव्हिल डेड मला नेहमी किळसवाणा जास्त वाटला. खूप ओंगळ दृश्ये असलेल्या हॉरर मूव्हीजचा जन्मदाता असावा हा.
जहाजावर एक साधा सरळ हॉरर मूव्ही पाहिला होता. आठवला कि इथे देईन. जंगल हेच त्यात पात्र आहे. जंगलात होणारे भास , संपूर्ण जंगल आपल्याकडे पाहतंय असं वाटत राहणं, तिथून आल्यावर वागणुकीत होणारे बदल या पार्श्वभूमीवर एकदाही भूत न दाखवता असह्य ताण निर्माण केला आहे. शेवटपर्यंत अज्ञात शक्ती कि मानसिक तणाव हे गूढ कायम राहतं. भयाला गूढाची जोड दिली कि उत्तम भयपट बनतो. कुणी पाहिला असेल तर नाव सांगा प्लीज.
ओमेन बद्दल +१
ओमेन बद्दल +१
इतकं सुंदर भूत >>> सुंदर? आता तर मला तुम्हीच डेंजर वाटायला लागलात आचार्य
जंगल वाला पिक्चर इंग्लिश आहे का? Forest नावाचा पिक्चर का? पण तो काही इतका भयंकर नव्हता वाटला. आठवलं तर नाव सांगा नक्की.
त्या सुंदर भूताच्या मागे
त्या सुंदर भूताच्या मागे अंडरवर्ल्ड लागलं होतं.
त्यांच्या भीतीने ती गायब झाली.
जंगल वाला पिक्चर इंग्लिश आहे का? त्याच्या नावात वूडस होतं इतकंच लक्षात आहे. तो इंग्लीश मधे डब्ड आहे बहुतेक. मूळचा युरोपीय आहे.
सुंदर भूत> काही लोकांच्या
सुंदर भूत> काही लोकांच्या डेफिनेशन मधे लख्खं गोरी चामडी = सौंदर्याची परीसीमा वगैरे. मंदाकिनी ही काहींना अ ति सुंदर वगैरे वाटायची. तिच्या चेहर्यावर थोड्या तरी भावना दिसायच्या पण ही विराना वाली जास्मिन तर किती मख्खं बापरे. भूतासारखीच पांढरी फटफटीत & मख्खं भाव.
रीसेंटली, भितीदायक वाटणारा विकी कोउशल चा १ जहाजा वरचा सिनेमा आवडला होता. त्या आधी अलिजफर चा खामिशीयां त्यात इमाने इतबारे फक्त & फक्त त्यानेच अभिनय केलाय
लख्खं गोरी चामडी = सौंदर्याची
लख्खं गोरी चामडी = सौंदर्याची परीसीमा >> दिवे घ्या ओ.
चणे फुटाणे विकायला आलेली एखादी महिला नाकी डोळी नीटस असली कि अपेक्षा नसताना नाडोनी असल्याने सुंदर म्हटलं जातं तसंच ओ. तीच जर मार्केटिंग एक्झेक्युटिव्ह किंवा मॉडेल असेल तर फूटपट्टी पण बदलेल ना ?
दाऊद ला आवडली होती. अंडरवर्ल्डची आवडच न्यारी !
तेच तर अपनी अपनी पसंद. दाऊद
तेच तर अपनी अपनी पसंद. दाऊद ला माशुका दिसली, rmd ला भूत
Rosemarys Baby
Rosemarys Baby
The cabin in the woods
Scream
मला सगळ्यात जास्त आजही 'रात'
मला सगळ्यात जास्त आजही 'रात' च भीतीदायक वाटतो. कमाल आहे तो सिनेमा. >> +१ रेवती चे फेशियल एक्स्प्रेशन्स जबरदस्त आहेत.
इतका जुना होऊनही हा चित्रपट कदाचित क्रमांक एकला ठेवावा लागेल. >> +१. तुम्ही ग्रेगरी पेकच्या सिनेमाबद्दल बोलत असावेत असे धरून अनुमोदन देतो आहे. शेवटच्या सीनमधे डेमियन चा शॉट हा माझ्यापुरता सर्वात भितीदायक शॉट असावा.
जंगल वाला पिक्चर >> ब्लेअरविच प्रोजेक्ट म्हणत आहात का ?
एव्हिल डेड मला नेहमी किळसवाणा जास्त वाटला. खूप ओंगळ दृश्ये असलेल्या हॉरर मूव्हीजचा जन्मदाता असावा हा. >> ह्या कारणामूळेच कल्ट क्लासिक मानला जातो हा. सॅम रैमीने व्हिडियो नॅस्टी मूव्हमेंटला टंग ईन चीक रीस्पॉन्स म्हणून सुरूवात केली होती हे अजूनही खरे वाटत नाही एव्हढे डीटेल्स त्यात भरले आहेत.
ब्लेअरविच प्रोजेक्ट म्हणत
ब्लेअरविच प्रोजेक्ट म्हणत आहात का ? >>> तो बहुतेक व्हिस्पर इन द वूडस असावा. शिप वर भरमसाठ पाहिल्याने नावं नीट लक्षात राहिली नाहीत.
ग्रेगरी पेकचाच.
एव्हिल् डेड बद्दल ही माहिती नव्हती. आभार.
कल्ट क्लासिक >>> +१
कल्ट क्लासिक >>> +१
व्हिस्पर इन द वूडस >>> या नावाची एक शॉर्ट फिल्म सापडली. मूव्ही पण आहे का?
सर्वात भीतीदायक म्हणून नाही पण 'इव्हेन्ट होरायझन' हा माझा एक आवडता पिक्चर आहे. अजून एक कल्ट क्लासिक.
Pages