सर्वात भीतीदायक चित्रपट

Submitted by उद्दाम हसेन on 30 July, 2013 - 14:29

तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुनळी मी नंतर लिहायला सुरवात केली इथल्या लोकांचं लिहिलेलं पाहुन ,आधी मी युट्युबच लिहायचे .पण हे तुनळी भारी वाटतं आता .
पण हिम्मतवाला पाहिलाय म्हणजे नक्कीच माझ्यापेक्षाही महान आहात मी अजुन पाहीला नाही. हमशकल पाहिला होता टीव्हीवर त्यापासुन भीतीच वाटते हा चित्रपट पाहायची.त्यापेक्षा रामुचे भयपट बरे.

महेशकुमार,चित्रपटाच्या HDलिंक साठी धन्यवाद.

"तुझं तू जेव ठेवलाय ते वाढुन घे !!! मला उगाच उठवू नकोस, वाट्टेल तेव्हा येतो आणि मी जागी राहू" अस्ले अत्यन्त तुसडेपणाचे संवाद किंवा
"तुझ्या पॉलिसीचे डीटेल्स !! माझ्या पॉलिसीचे डीटेल्स!! माझ्या अकाऊंटला इतके तितके पैसे आहेत " वगैरे निरवा निरवीची भाषा आईने सुरू केली की मी समजतो की ती हॉरर मुव्ही पाहीली गेलेय

बागबान

परवा woman in black पाहिला.. चांगला वाटला.. तशी भुताबिताला/अंधाराला फारशी घाबरत नाही मी.. पण २ ३ वेळा मस्त दचकायला झालं.. आणि धडधडलं.. मजा आली..

वुमन इन ब्लॅक
मलापन आवडला पहिला..खरच दचकायला होत दोन तीन ठिकाणी.. बाकी रॅडक्लीफ एका एवढ्या मोठ्या लेकराचा बाप वाटत नै ते सोडा...

केस ३९
ओके आहे.. तो सुद्दा दचकवतो कुठ कुठ.. खुप काही भितीदायक नै वाटला..

बाकी भितीदायक हे परिमाणात मोजायच असेल तर चित्रपट एकट्याने रात्रीच्या वेळी पाहिलेला उत्तम..
तेव्हाच कळत कि कुठल्या चित्रपटाने हितभर केली ते Wink

१४०८ पाहिला पण अजिबात घाबरायला झाल नाहि..... पण, राँग टर्न बघून जाम टरकले. (एकच भाग पाहिलाय अजून… बाकीच्या भागांची लिंक मिळत नाहीये )

१४०८ पाहिला पण अजिबात घाबरायला झाल नाहि..... >> +१
राँग टर्न बघुन मला भिती कमी न किळस जास्त वाटते ..

डुप्लिकेट भुतांच्या गोष्टी मला आवडत नसल्याने काही अपवाद वगळता फक्त सायको थ्रिलर- हॉरर यात मोडणारे सिनेमे मी सुचवेल
Shutter Island (2010)
Insomnia (2002)
Vertigo (1958)
Misery (1990)
Eyes Wide Shut (1999)
The Game (1997)
Secret Window (२००४)
Let the Right One In (2008)
Jacob's Ladder (1990 )
Identity (2003)
Session 9 (२००१)
Don't Look Now (1973)

एक पुस्तक आहे लेफ्ट साईड ऑफ गॉड, एका अघोरपंथीच चरीत्र. त्यात त्याने 'द शायनिंग' च कौतुक केलय की हे अस असत.
मी विमानात पहायचा प्रयत्न केला. तो नुसता भितीदायक नाही तर मनात अत्यन्त निराशा निर्माण करणारा आहे.
Submitted by गुगु on 3 August, 2013 - 01:19
>>>गुगु, तिन्ही पुस्तक वाचलीत का ? किती गोष्टी खऱ्या वाटल्या ? विमलानंदांचं खरं नाव माहितेय का ?

>>>गुगु, तिन्ही पुस्तक वाचलीत का ? किती गोष्टी खऱ्या वाटल्या ? विमलानंदांचं खरं नाव माहितेय का?
जिद्दू
पहिलच वाचलं बाकीची दोन आहेत माझ्याकडे पण नाही वाचली. त्यांच खर नाव माहीत नाही

सर्वच वाचा . मुंबईतील एक ख्रिश्चन गृहस्थांनी ती पुस्तक वाचून बराच शोध घेतला यातील लोकांचा तेव्हा त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं त्यात. विमलानंदांचं कुटुंब पूर्वी मुंबईतील सर्वांत श्रीमंत लोकांपैकी एक होतं. त्यांचे आईवडील नंतर बहुतेक संपत्ती दान करून वानप्रस्थाश्रमात गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आई साऊथला कोणत्यातरी आश्रमात होती. या माणसामुळे माझी त्या आयुर्वेदिक डॉक्टर आणि ती पारशी बाई यांची भेट झालीय आणि विमलानंदाचा फोटो पण पाहायला मिळाला. बहुतेक गोष्टी खऱ्या असल्या तरी रॉबर्ट स्वबोडाने भरपूर फेकाफेकी केलीय जी ओळखता आली पाहिजे.
असो धाग्यातून विषयांतर नको. तुम्हाला विमलानंदांचं नाव पाठवलंय . मेल चेक करा .

Pages