चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आ देखे जरा..... बिलकुल रिस्क मत लेना Happy

ह्या चित्रपटात पहाण्या सारख काही म्हणजे काहीच शेवट पर्यंत दिसत नाही. एका माणसाला सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळते आणी मग काय तो रोजच त्या कोंबडी कडुन सोन्याची अंडी मीळवण्याच्या नादात लागतो आणी लालची होतो. एक दिवस अचानक (म्हणजे ह्या माणासा ने कोंबडी कडुन भरपुर अंडी आणी अंड्या पासुन भरपुर कोंबड्या मीळवुन घेतल्यावर) मुळ कोंबडी अंडी देण बंद करते आणी ईतर अंड्यांपासुन ही कोंबड्या बाहेर येण बंद होत :)... आता ह्या माणासाला त्याने कोंबडी चा फक्त स्वःता साठी वापर केला म्हणुन अस झाल ही बोचणी लागते पण तो पश्चाताप करण्या आधिच त्याच्या कोंबडी मागे व्हिलन लागतात... मग कोंबडी साठी धावपळ मारामारी... ह्या सगळ्यात अखेर कोंबडीच मरुन जाते !!!!.....(कोंबडीच सगळ्यांना इंगा दाखवते)...

कोंबडीची भूमिका कोणी केली आहे?

http://runpee.com

चित्रपट बघताना कोणत्या मिनटाला तुम्ही स्वच्छतागृहा ला भेट देवु शकता ह्या गोष्टीचा डेटाबेस. Happy
आणि जेव्हा तुम्ही गेले होता त्या वेळेस काय झाले हे देखील ईथे वाचता येईल...

Angles and Demons बघीतला. मस्त आहे. मला आवडला. मी दा विंची कोड पुस्तक वाचले होते सिनेमा नव्हता बघीतला त्यामुळे त्या सिनेमाच्या तुलनेत हा कसाय हे माहित नाही. पण स्वतंत्र सिनेमा म्हणुन Angles and Demons एकदम चांगला वाटला. टॉम हँक्सचे काम नेहमीसारखच छान.

दिल्ली ६ संपूर्ण बघितल्यावर (डोकं) सही सलामत राहिलेय म्हणुन ही पोस्ट. आई गं !!!! का ? का ? का ? का असे अत्याचार करावेत लोकांवर. ते सुद्धा रंग दे बसंती नंतर ?

रॉबिन जी

कोंबडी ची भुमीका 'कॅमेरॅने' केली आहे ... कॅमेरा भविष्यातल्या तारखेवर सेट केला असेल तरच चालतो व ज्या व्यक्ती चा, जागेचा, प्राण्याचा ई. ई. कशाचा ही फोटू घेतला असेल त्याच 'त्या' तारखेला काय होणार हे फोटू डेव्हलप केल्यावर दिसत Happy

टू ब्रदर्स
नावाचा इंग्रजी सिनेमा काल बघितला. दोन जूळे भाऊ. एका पडक्या देवळात आईबाबांबरोबर सुखाने रहात असतात. एक भाउ भित्रा तर दुसरा धीट. मग काहि दुष्ट लोक येतात. बाबांना मारले जाते. आई आणि दोन भावांची ताटातूट. दोन भाऊ दोन ठिकाणी वाढतात. एक सर्कशीत जातो तर दुसरा एका घरात.
परिस्थिती त्याना परत एकमेकांसमोर आणते. पण ते समोरासमोर येतात ते प्रतिस्पर्धी म्हणून. लढता लढता त्याना एकमेकांची ओळख पटते, बालपण आठवते. त्याना आनंद होतो. मग ते परत आईकडे येतात. आणि मग सुखाने राहु लागतात. अगदी मनमोहन देसाईचा सिनेमा वाटतो कि नाही ?
पण गंमत अशी कि दोन भावांच्या भुमिकेत दोन तगडे वाघ आहेत. वाघांनी केलेला अभिनय अप्रतिम आहे, बाकि घटना पटल्या नाही तरी अभिनय मात्र पटतो. अधिक माहिती इथे आहे. यु ट्युबवर झलकहि मिळेल.

http://movies.yahoo.com/movie/1808439310/info

वा वा ड्युमा आणि टू ब्रदर्स हे अत्यंत आवडते आणि १००० वेळा बघितलेले चित्रपट. ह्याच लाइनमधे पण वास्तविकतेच्या अधिक जवळ जाणारे बॉर्न फ्री आणि लिविंग फ्री. अजून एक अत्यंत आवडता म्हणजे बेंजि सिरिज मधला बेंजि- द हंटेड. अजून एक मायलो अँड ओटिस.

आम्ही डायनिंग टेबल खरेदी करायला गेलो तेव्हा त्या दुकानात मोठ्या पडद्यावर मायलो अँड ओटिस लावला होता. मी टेबले बघायची सोडुन चित्रपटच बघत बसले Wink

काय " सालीनं केला घोटाळा " हा मराठी सिनेमा पाहयचा प्रयत्न केला.... पहिल्या १० मिनीटातच डोक्याला मुन्ग्या आल्या ( भारत जाधव आणि कं )... शरद उपध्येंना वाया घालावले आहे...तुम्हाला कोणाला जर बाघावासा वाटला तर " आता नको पुन्हा कघीतरी ...." हे मनात १० वेळा तरी म्हणा....

डिस्नी-पिक्सारचा नवीन "अप" मस्त आहे. जमल्यास ३-डी मध्ये पहा.

मॅट डिमन चा 'द रेनमेकर' बघितला.. मस्त आहे.. एका नवोदित वकीलाची एका मोठ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनी विरूद्धची केस अशी कथा आहे. शेवट तर फारच मस्त.

जॉन ग्रिशॅम चं पुस्तक वाच...
धमाल आहे...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

काल फास्ट अ‍ॅन्ड फ्युरियस (नवा) पाहिला... पिक्चर एक्दम खिळवुन ठेवतो...त्यातले काही स्टंट्स एकदम झकास घेतलेत...खासकरुन पहिला पेट्रोल चा टँकर लुटतानाचा आणि कॅनल मधले रेसिंग..
पण त्यापेक्षा या आधिचा फास्ट अ‍ॅन्ड फ्युरियस - टोक्यो ड्रिफ्ट मला जास्त आवडला होता..त्यातले ड्रिफ्ट रेसिंग निव्वळ भन्नाट होते..

रेनमेकर हे पुस्तक सिनेमापेक्षा छान आहे.

रेनमेकर वरून कायद्याच बोला घेतलाय म्हणे... इथेच कधि तरी वाचल्यासारखे वाटले...

जामोप्या, तो माय कझिन विनीवरून घेतलाय. रेनमेकर चा रीमेक आला नाही आपल्याकडे बहुधा (अजून Happy )

मराठी शिनेमे कोणी बघत नाही का?
'त्या रात्री पाउस होता' पाहिला.
गजेंद्र अहिरेंचा अजुन एक चांगला चित्रपट. सोनली कुलकर्णी, अम्रुता सुभाष, सयाजी शिंदेंचे काम अप्रतिम.
दिग्दर्शन ही मस्त. फक्त काही ठिकाणी कथेची वळणे तर्कसंगत वाटत नाहीत.

'निशाणी डावा अंगठा' ही मस्त एकदम!
सगळ्यांचीच कामं छान. नी कथासुत्र पण सुंदर. कादंबरी मी वाचली नाही आहे पण सिनेमा बघुन वाचावीशी वाटते.
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

निशाणी डावा अंगठा आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सलग बघितले Happy

निशाणी मधे सगळ्यांचीच कामं छान झालीयेत , पण जरा 'आध्यात्मिक' Wink बोलणे जास्तच आहे.

'त्या रात्री' ची थीम काय आहे ?

-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

Angels and Demons पाहिलात का कुणी? मला डॅन ब्राऊन ची कादंबरी आवडली होती... पण Da Vinci Code सारखी निराशा नको म्हणून Angels and Demons अजून पाहिला नाहिये.

========================
बस एवढंच!!

पण Da Vinci Code सारखी निराशा नको
आयला मला तर तोही चित्रपट आवडला होता.अर्थात मी कादंबरी वाचली नव्हती.
~~~~~~~~~~~~~~~~~~
हिमगिरी लांघ चला आया मै,
लघुकंकर अवरोध बन गया |
जलनिधी तैर चला आया मै,
उथला तट प्रतिरोध बन गया |

कालच रात्री टीव्हीवर [ एन्डीटीव्ही लुमिएर ]'द बेअर" हा सिनेमा पाहिला. एक अजस्र अस्वल व दोन शिकारी बाप-लेक यांच्यातील जीवघेण्या पाठशिवणीचा खेळ. अन त्यांतच अस्वलाच्या एका पिलाची प्रचंड लाघवी लुडबुड ! मनुष्यप्राण्याच अस्तित्व विसंगत वाटाव असा डोंगराळ, जंगलमय, निसर्गरम्य प्रदेश. हींसेला चाट देऊन, शेवटीं शिकार्यांच्या माणूसकीला अस्वलाकडून जाग येणं !!
कसं करून घेतात हे अस्वलांकडून इतकं सफाईदार काम. नॅशनल जिओ.च्या चित्रफीतिवर बेमालून
कथानक पेरल्यासरख वाटलं.

एक डाव धोबीपछाड डीवीडी वर पाहीला काल .

मस्त टीपी आहे हा सिनेमा Happy मुक्ता बर्वेचा तर फॅनच झालोय मी Happy
खूप आवडला . सतिश राजवाडे आहे दिग्दर्शक . मुक्ता ला मंजुळा (अग्निहोत्र) च्या कामासाठी इथेच
सलेक्ट केला असेल त्याने Proud तोच टोन आहे सिनेमात तिचा अन काम एक्दम भन्नाट केलय तिने ...

-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

>> एक डाव धोबीपछाड ... मुक्ता बर्वेचा तर फॅनच झालोय मी
हो... सिनेमा फुल टाइम पास आहे! मुक्ता बर्वे च कामपण मस्त आहे... कशी (वेड्यासारखी) हसते ना ती मधे मधे, नंतर आम्हि किती प्रयत्न केला पण नाही जमत.

काल टिव्ही वर 'सैल' हा चित्रपट पाहिला... रीमा लागू व मोहन जोशि... जरा सैल वाटला, पण बरा वाटला....

गुड मॉर्निंग वियेतनाम पाहिला. रॉबिन विल्यम्स मस्त, मस्त. अनेक विनोदांचे संस्प लागत नव्हते. Happy
स्लायडिंग डोअर्स पाहिला- ग्वेनेथ पालट्रो. नेहमीच्या दळणापेक्षा वेगळा. दोन ट्रॅक्सवर पॅरालल गोष्टी पुढे सरकवण्याची मज्जा सही होती.

मुक्ता बर्वे आणि अतुल कुलकर्णी चा चकवा चित्रपट पण चांगला आहे..
त्यात पण भारी काम केलेय मुक्ता ने.

०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/

"दा विंची कोड" वाचत असतांना माझ्या डोळ्यासमोर रॉबर्ट लँगडन म्हंटल्यावर टॉम हँक्सच होता. अजुन सिनेमा पाहिला नाही त्यामुळे त्याबद्दल काही लिहु शकत नाही. रेनमेकर सध्या वाचतेय. ईथे "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" लागलाय. खूप वर्षांनी थिएटरमधे शिट्या, "शिवाजी महाराज की जय" वगैरेसकट सिनेमा पाहिला. धमाल आली.
_______________________________
"शापादपि शरादपि"

चिन्या१९८५
पण Da Vinci Code सारखी निराशा नको
आयला मला तर तोही चित्रपट आवडला होता.अर्थात मी कादंबरी वाचली नव्हती.
------------------------------------------------------------------
मी कादंबरी वाचली होती, म्हणून कदाचित मला चित्रपट इतका आवडला नाही. कादंबरी जास्त खिळवून ठेवणारी आहे.

काल Angels and Demons पाहिला. कादंबरी इतकाच आवडला. छानच बनलाय. ज्यान्नी कादंबरी वाचलिये, त्यांना पण निराशा होणार नाही.

========================
बस एवढंच!!

कादम्बरीच्या वरचढ सिनेमा हाप्रकार फार कमी वेळेला आढळतो. या दोन्ही माध्यमांचा स्कोपच वेगळा आहे . लॉरेन्स ऑफ अरेबिया हा एकदम आठवलेला अपवाद् . गॉन विथ विन्ड पुस्तक मी वाचलेले नाही. पिक्चर तर क्लासिकच आहे. हिन्दीतही तीसरी कसम , दस्तक्,देवदास, जमले नाहेच. शामची आइ चित्रपट उत्तमच होता पण मूळ पुस्तकाची उंची नाही. मूळ वस्तू पॉवर्फुल असल्याने जमले. पण चित्रपट माध्यम म्हणून मर्यादितच.

पुस्तक वाचताना प्रत्येक वाचकाचे immagination वेगवेगळे असते, सिनेमा हा या सगळ्या immaginations चा ल.सा.वि. असतो.

Pages