आतला आवाज

Submitted by राहुल नरवणे. on 3 July, 2013 - 09:19

स्वतः शी जेव्हा होते युद्ध,
तेव्हा चवताळलेला प्रतीयोद्धा
करतो जो आवाज …

आतून अडकलेल्या ‘मी’ ला,
बाहेर काढण्यासाठीची साद . .

पांढऱ्या शुभ्र दिसण्याऱ्या निर्जीव
राखेतील आग . . .

मुक्या आणि घुसमटलेल्या प्रवृत्तीच्या
मन: पटलावरची हालचाल . .

प्रचंड गर्दीत, लोकलच्या प्रचंड खडखडात,
असह्य वातावरणात सुचलेलं गाणं,
अन ओठांची आपसूक हालचाल .

भरमसाठ रंगांनी ओरबडलेल्या,
माखलेल्या कॅनवास वरचा
आवडत्या रंगाचा एकच स्ट्रोक …

न आवडत्या जगात जगलेले
काहि आवडीचे क्षण,
आवडत्या क्षणासाठी जगलेलं
ना आवडतं आयुष्य. . .

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून आभार. Happy
चित्रकलेचा वर्ग या सर्व लिखाणाचं उगमस्थान आहे. G.D. Art च्या शेवटच्या वर्षात असताना एखादा विषय दिला जायचा, आणि त्यावर चित्र काढणे असा उपक्रम असे. सांगायला बरंच काही असायचं, मग आधी ते शब्दांतून व्यक़्त व्हायचं आणि मग चित्रातून.
. . . हे सारं चित्राच्या गतीत मांडून मोकळा होतोय.

राहुल,

फारच छान, चित्रावरुन आठवले, मी सुद्धा चित्रकलेचा विद्यार्थी होतोच, ५ वेगळे विषय होते नुसत्या चित्रकलेचेच, आमचे सर एक गोष्ट नेहेमी सारखे सांगायचे कि " खरा चित्रकार तोच असतो, ज्याचे चित्र बनवतांना बिघडले तर ते फेकुन न देता, त्यातुनच आणखीन जास्त सुंदर चित्र तो निर्माण करतो". Happy

व्वा !! अप्रतिम. परब्रम्ह जी,
निर्मितीचा आनंदच वेगळा आहे. ती सर्वांनाच सुखाहून जाते.
चला या निम्माताने तुम्हाला शाळेची, सरांची आठवण झाली. यापेक्षा सुंदर काय ? Happy

प्रणालि,
आभारी आहे. Happy

सगळे शब्द रंग रूप रेषा घेऊन मनाच्या कॅनव्हासवर उतरले... कोर्‍या कॅनव्हासवर रंगाचा एकच फटकारा मारावा तसे गतीमान... व्याकूळपणा जर चित्रीत करायचा असेल तर हा असाच!!

अख्खी कविताच प्रचंड आवडून गेली... तरीही
स्वतः शी जेव्हा होते युद्ध,
तेव्हा चवताळलेला प्रतीयोद्धा
करतो जो आवाज …

आतून अडकलेल्या ‘मी’ ला,
बाहेर काढण्यासाठीची साद . .

आणि

भरमसाठ रंगांनी ओरबडलेल्या,
माखलेल्या कॅनवास वरचा
आवडत्या रंगाचा एकच स्ट्रोक …

न आवडत्या जगात जगलेले
काहि आवडीचे क्षण,
आवडत्या क्षणासाठी जगलेलं
ना आवडतं आयुष्य. . . हे खूप म्हणजे खूपच आवडलंय...

पुलेशु... तुमची चित्रे शब्दांत उतरूद्यात... मजा येईल...

dreamgirl,
धन्यवाद !!
फार सुंदर वर्णन केलं आहे. "व्याकूळपणा जर चित्रीत करायचा असेल तर हा असाच!!"
खरं तर हे सारं काय आहे, हे लिहिताना समजत नाही.
मी प्रयत्न करिन माझी चित्र शब्दांत मांडायाचा.