इ मेजवानी - भाग ३

Submitted by दिनेश. on 22 June, 2013 - 08:07

बरेच दिवस झाले ना, जेवायला आला नाहीत ते. या पानं मांडलीत.

हा आहे चीज + बेसिल + गार्लिक टोस्ट आणि चहा

चीज पराठा

छोले आणि राय पराठा

आफ्रिकन खासियत, फ्राईड कसावा

मूली पराठा ( सुलेखाच्या पद्धतीने), घडीसाठी केनयन खिमा चपाती बघा. )

स्पॅनिश राईस

मकई पालक

पीच नेक्टर + पेअर + बेरीज योगर्ट + गावा जेली + क्रीम

सेकंड हेल्पिंग

स्ट्रॉबेरी विथ क्रीम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्लर्प!!
एकदम तोंपासु दिनेशदा!
सगळेच पदार्थ मस्त! Happy

एक शंका... एवढे सुंदर सजवलेले पदार्थ, कॅमेरा काढुन फोटो काढेस्तोवर तुम्हाला धीर धरवतो का?

नि:शब्द.
कौतुक, तारीफ, वाहवा करायला शब्दच नाहीत.....

आधीच्या दोन भागांची लिंक द्याना ईथे. पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते.

सेकंड हेल्पिंग............आईग!

स्लर्प स्लर्प.............. एक्दम तोंपासू............ प्रत्येक डिश आणि फोटो केवळ सह्ही!!

दिनेशदा,
अ प्र ति म मेजवानी !
अक्षरशः स्क्रीन मध्ये हात घालून पदार्थ बाहेर काढून खावा असं वाटतंय .
नुसते पदार्थ करण्याचेच नाही तर प्रेझेंटशन स्किल ही सुंदर आहे तुमचं.

धन्यवाद दिनेशदा, खरच स्क्रीनमधे हात घालून खाता आले असते तर किती बहार आली असती.

हे फोटू टाकायचे होते पण कुठे ते समजत न्व्हते..
तर इथेच दिनेश दा च्या ई मेजवानीत चिटकवून दिलेत.... मेरा भी ओरिएंटल अ‍ॅडिशन.. Wink

आज का डिमसम लंच..
शुमाई

प्रॉन डिमसम

चियाओ च

एग भरलेली ब्रेड

हे मेन्यु कार्ड... आपली ई ऑर्डर नोंदवू शकता इथे.. Proud

दिनेशदा... जळवा आम्हाला...... ते काही नाही मी तुम्हाला आता दत्तकच घेणार आहे..... कधी येताय मुंबईत...

वर्षु ताई पण ऐकत नाय....

दिनेशदा आणि वर्षु,
तुम्हा दोघांची ई-मेजवानी "नेत्रसुखद आहेच त्याशिवाय अप्रतिम फोटोग्राफी व मांडणी सुध्धा सुबक आहे.
तारीफेकाबिल
.."अस्सा "नेहले पे देहेला' पहायला खूप्पच छान वाटला.

Pages