जरा`डोकं' चालवा...

Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2013 - 11:17

मायबोलीकरांसाठी सहर्ष सादर करीत आहोत`मायबोली टी शर्टस' आणि ??????.
ओळखा पाहु काय ते... Happy

tshirt1.jpg११ व्या वविच्या निमित्ताने टीशर्टस बरोबरच मायबोलीकरांसाठी अजुन एक खास आकर्षण लवकरच.... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिवळा, ब्ल्यूग्रीन (रंगूनी रंगात... च्या अक्षरांचा रंग), पांढरा काँबिनेशन?
दुसरं आकर्षण म्हणजे वविच्या सुचनांच्या बाफवर सुचवलं गेल्याप्रमाणे बॅग असावी.

'डोकं' >>>>>inverted comma (अवतरण चिन्ह ?) मध्ये लिहिलंय ना म्हणुन. Wink

हेल्मेट...... कहर !!! Rofl Rofl Rofl Rofl

वविदिवशी समस्त माबोकर हेल्मेट घालून बसमधे बसलेत - असं दृष्य इम्याजिनलं मी Lol 'नवरा माझा नवसाचा' सिनेमासारखं. त्यात ते एक जोडपं सदा हेल्मेट घालून प्रवास करत असतं.

>>> 'डोकं' चालवा लिहीलंय म्हणजे टोपी असणार.. <<<< नी क्याप पण देऊ शकतील, या "सन्योजक" नामक जमातीचे काही सान्गता येत नाही Proud

डोकं हायलाईट केल्यामुळे टोपी वाटतय . पण इतका सोपा क्लू नसावा .
७ ? मार्क म्हणजे ७ अ़क्षरी का ? मराठी का इंग्लिश ? Happy

सगळेच ... Biggrin इंद्रा, मीही टीबॅग लिहायला आले होते.

"रंगूनी रंगात वविच्या, रंग माझा ओळखा" ..... संयोजक रंगपेटी देतायत की काय? टीशर्ट पेंटिंगची स्पर्धा ठेवली असणार. कारण वरच्या चित्रातला टीशर्ट पांढराच दाखवलाय. Happy

११ वा ववि.. म्हणजे १ वर १ फ्री ची स्किम आहे अस सुचवत आहे टि_स.

टिशर्ट वर 'T'वाल नक्कीच काही तरी फ्री देणार असं दिसतयं. आता नीट डोकं चालवा...

इंद्रा + १

एक आताच्या मापाचा टीशर्ट घेतला की एक वाढत्या अंगाचा टीशर्ट फ्री!!! म्हणूनच चित्रात एक छोटा पांढरा टीशर्ट आणि एक मोठा पिवळा टीशर्ट दाखवलेत. Proud

- टिक्कर,
- टिमकी (ही वस्तू आहे असं मी आजवर मानत आलेले आहे),
- टी-स्पून,
- टिचकी (ही वस्तू नाहीये, पण तरी 'टि'मुळे क्वालिफाय झाली आहे),
- टीचभर काहीतरी
- टिणगिण्या

मामी Lol

'खांदा चालवा' > Lol

चप्पल, टीबॅग, एक वाढत्या मापाचा>> Rofl

सियान रंगाचा टीशर्ट आणि मायबोलीसॅक (बरोब्बर सहा अक्षरं होत आहेत) असणार.

Pages