'आजोबा'ची पहिली झलक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 June, 2013 - 11:29

एका कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या एका विहिरीत पडला. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी त्याला पकडलं, आणि एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली. त्याचं नाव ठेवलं 'आजोबा'.

माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं.

पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा निघाला मुंबईच्या दिशेनं. त्याच्या घराकडे.
२९ दिवस. १२० किलोमीटर.
आजोबाचा भन्नाट ट्रेक.

आजोबाला त्याचं घर सापडलं का?

ऑक्टोबर, २०१३मध्ये प्रदर्शित होणार्‍या 'आजोबा'ची ही पहिली झलक -

'शाळा'च्या तडाखेबंद यशानंतर तरुण दिग्दर्शक सुजय डहाके घेऊन येत आहे त्याची पुढची कलाकृती - 'आजोबा'.

निर्माते - लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे
दिग्दर्शन - सुजय डहाके
कथा, संवाद, संकलन - सुजय डहाके
पटकथा - गौरी बापट
छायांकन - दिएगो रोमेरो सुआरेझ लिआनोस
संगीत - गंधार संगोराम

कलाकार - उर्मिला मातोंडकर, हृषीकेश जोशी, दिलीप प्रभावळकर, श्रीकांत यादव, अनिता दाते, ओम भूतकर, नेहा महाजन, शशांक शेंडे, सुहास शिरसाट, गणेश मयेकर आणि यशपाल शर्मा

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम

ajoba.jpg


***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही विषय आहे. २-३ दिवसांपासून ह्याचं ट्रेलर फिरतय फेसबुकवर, आता बघते. शिर्षकातला 'ओ' ऐवजी दिलेला पंजा आवडला Happy

अरे वा! बघायलाच पाहिजे.

अवांतर : हा सिनेमा येईपर्यंत, बिबट्याविषयी मजेदार,खर्‍या घडलेल्या गोष्टी माहित करुन घ्यायच्या असतील तर वाचा : नेगल-भाग १ व २ लेखक- विलास मनोहर(हेमलकसा)

सिनेमा बघायला आवडेल.

'आजोबा' बद्द्ल एक लेख वाचला होता लोकसत्तामधे खूप महिन्यांपूर्वि त्याची आठ्वण झाली.

झलक बघितली. जबरदस्त एकदम.

मराठी चित्रपट नेटफ्लिक्सवर यायला हवेत. म्हणजे आम्ही राजरोस बघु शकतो.

मस्त ट्रेलर!!
अतिशय वेगळा विषय चित्रपटासाठी निवडल्याबद्दल दिग्दर्शक सुजय डहाके यांचं अभिनंदन!!!

जबरदस्त वाटतोय सिनेमा .
मराठी सिनेमा हळु हळु अजुन एकदा प्रगल्भ होत चाललाय.एक आगळा वेगळा विषय मांडल्याबद्दल सगळ्या ' आजोबा' टीमचं खुप खुप अभिनंदन.

ट्रेलर मस्त आहे; चित्रपट बघण्याचा नक्की प्रयत्न करणार.

ऊर्मिलाचे मराठी उच्चार अगदी स्पष्ट आणि शुध्द आहेत >>> डिजे, ती एक मराठी चॅनलवर परीक्षक म्हणून यायची तेव्हा तिचे बोलणं ऐकायला हवं होतंस. मराठी कविता, मराठी गाणी यांचे चपखल दाखले देत एकही हिंदी शब्द न वापरता सहज बोलायची. तेव्हा मलापण आश्चर्य वाटलेलं.

उर्मिला मातोंडकरचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं आहे असं एका मुलाखतीत वाचल्याचं आठवतंय. खखो उर्मिलाच जाणे.

प्राणी सृष्टीचा सिनेमा प्रायोजित केल्या बद्दल धन्यवाद. तो पाठलाग करून कुत्र्याला मारतो काय? देख्ना पडेंगा.

Pages