'आजोबा'ची पहिली झलक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 June, 2013 - 11:29

एका कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या एका विहिरीत पडला. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी त्याला पकडलं, आणि एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली. त्याचं नाव ठेवलं 'आजोबा'.

माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं.

पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा निघाला मुंबईच्या दिशेनं. त्याच्या घराकडे.
२९ दिवस. १२० किलोमीटर.
आजोबाचा भन्नाट ट्रेक.

आजोबाला त्याचं घर सापडलं का?

ऑक्टोबर, २०१३मध्ये प्रदर्शित होणार्‍या 'आजोबा'ची ही पहिली झलक -

'शाळा'च्या तडाखेबंद यशानंतर तरुण दिग्दर्शक सुजय डहाके घेऊन येत आहे त्याची पुढची कलाकृती - 'आजोबा'.

निर्माते - लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे
दिग्दर्शन - सुजय डहाके
कथा, संवाद, संकलन - सुजय डहाके
पटकथा - गौरी बापट
छायांकन - दिएगो रोमेरो सुआरेझ लिआनोस
संगीत - गंधार संगोराम

कलाकार - उर्मिला मातोंडकर, हृषीकेश जोशी, दिलीप प्रभावळकर, श्रीकांत यादव, अनिता दाते, ओम भूतकर, नेहा महाजन, शशांक शेंडे, सुहास शिरसाट, गणेश मयेकर आणि यशपाल शर्मा

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम

ajoba.jpg


***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. एकदम इन्टरेस्टिंग ट्रेलर. उर्मिलाची मराठी चित्रपटात योग्य फिल्मने एन्ट्री होतेय. (पहिलाच मराठी सिनेमा असेल ना हा तिचा?)

चांगला वाटतोय..

उर्मिला (लंडनला माहेर आणि पॅरिसला सासर असल्यागत न बोलता) चांगले मराठी बोलतेय हे ऐकुन आनंद झाला. अवांतर... तिचे शालेय शिक्षण राजा शिवाजी विद्यालय (दादर) मधे झालेय.

वॉव. अल्टीमेट वाटतोय सिनेमा. बघायचाच आहे.
इतका वेगळा आणि महत्वाचा विषय घेतल्याबद्दल अभिनंदन.

सिनेमाचे छायांकन ( व्हिडियोग्राफी) इतकी सुंदर वाटतेय की इथे येऊन पुन्हा व्हिडीयोग्राफरचे नाव पाहिले. "दिएगो रोमेरो सुआरेझ लिआनोस" यांच्याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल. गुगलवर मिळाली नाही.

पहिलाच मराठी सिनेमा असेल ना हा तिचा?)><< बालकलाकार म्हणून तिने झाकोळ वगैरे चित्रपट केले आहेत. पण नायिका म्हणून बहुतेक हाच.

उर्मिला खूप छान दिसतेय या सिनेमामधे. वय अजिबात जाणवत नाही तिच्या चेहर्‍यावर.

मस्तच. बघावासा वाटतोय चित्रपट.
मध्ये एका मराठी कार्यक्रमात ऊर्मिलाचं सुरेख मराठी ऐकून आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसला होता.

सावली:
"diego romero suarez llanos" असा सर्च केला तर थोड्याफार हिट्स् येतायत गूगलवर. त्याचं नाव 'यानोस' (llanos) आहे, त्यामुळे लिआनोस (lianos) लिहिलं तर सापडत नसेल. Happy

ट्रेलर फारच आवडला.

<< ट्रेलर भन्नाट आहे. सिनेमाही असणारच >> सहमत.
<< ऊर्मिलाचं सुरेख मराठी ऐकून आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसला होता.>> तिला वाचनाची प्रचंड आवड असल्याचं निश्चितपणे माहित आहे ; त्याचाच हा परिणाम असावा.

aabbcc.JPG

़ तिला वाचनाची प्रचंड आवड असल्याचं निश्चितपणे माहित आहे ; त्याचाच हा परिणाम असावा.>>>>+++१॑१११११११

सही, मराठी चित्रपटात वेगळा ईंटरेस्टींग विषय घेतलाय.
झलक मस्तच, आधी फेबु वर पाहिली आहे.
मायबोली प्रायोजक आहे हे ऐकुन छान वाटलं.

हा शेवटी बोरीवली चा का मॅप दाखवताहेत ? नॅशनल पार्क असत कारण तर तेही सेंटर ला नाहिये मॅपच्या ....

गोराई दिसतय ... मी राहतो तो एरिया ....

कमाल आहे ... कधी बघायला मिळणार ???

अरे व्वा, मराठी चित्रपट एका नव्या विषयावर, छानच! उर्मिला मस्त दिसतेय! मुलांना दाखवण्या सारखा
दिसतोय.

Pages