'आजोबा'ची पहिली झलक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 June, 2013 - 11:29

एका कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या एका विहिरीत पडला. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी त्याला पकडलं, आणि एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली. त्याचं नाव ठेवलं 'आजोबा'.

माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं.

पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा निघाला मुंबईच्या दिशेनं. त्याच्या घराकडे.
२९ दिवस. १२० किलोमीटर.
आजोबाचा भन्नाट ट्रेक.

आजोबाला त्याचं घर सापडलं का?

ऑक्टोबर, २०१३मध्ये प्रदर्शित होणार्‍या 'आजोबा'ची ही पहिली झलक -

'शाळा'च्या तडाखेबंद यशानंतर तरुण दिग्दर्शक सुजय डहाके घेऊन येत आहे त्याची पुढची कलाकृती - 'आजोबा'.

निर्माते - लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे
दिग्दर्शन - सुजय डहाके
कथा, संवाद, संकलन - सुजय डहाके
पटकथा - गौरी बापट
छायांकन - दिएगो रोमेरो सुआरेझ लिआनोस
संगीत - गंधार संगोराम

कलाकार - उर्मिला मातोंडकर, हृषीकेश जोशी, दिलीप प्रभावळकर, श्रीकांत यादव, अनिता दाते, ओम भूतकर, नेहा महाजन, शशांक शेंडे, सुहास शिरसाट, गणेश मयेकर आणि यशपाल शर्मा

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम

ajoba.jpg


***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक वेगळा विषय आणि विशेष म्हणजे वेगळा प्रयत्न... मराठी सिनेमातसुद्धा आता नवनविन प्रयोग व्हायला लागलेत हे खरच स्वागतार्ह आहे...

Pages