Slumdog कि Millionaire ??

Submitted by मी मी on 20 May, 2013 - 12:59

Slumdog Millionaire बघून बाहेर पडतांना एक अनामिक उदासी दाटली होती मनात … भोवताल ची सर्व गर्दी सिनेमाच्या कौतुक सोहळ्यात मग्न असतांना माझ मन मात्र अजिबातच खुश नव्हतं …. कलाकारांचा अभिनय सोडता या सिनेमात पाहिलेली कुठली तरी बाब किंवा मग सगळंच काही आपल्याला खटकतंय अस सारखं जाणवत होतं ……
त्यानंतर सिनेमाचं जागतिक स्तरावर झालेलं कौतुक, आंतराष्ट्रीय पातळीचे अवार्डस, फिल्मच्या कलाकारांचे कौतुक, भारतीय संगीताची जगात वाढती ओढ आणि सन्मान या सर्वात देश डुंबून गेला …
खरा मुद्दा मात्र राहिला बाजूलाच ……

भारतीय कलाकार किंवा भारतीय संगीत एखाद्या पाश्चिमात्य सिनेमात वापरल गेलं आहे फक्त एवढीच एक बाब आपल्यासाठी समाधानाची किंवा आनंदाची गोष्ट कशी राहू शकते ?
म्हणजे सिनेमात भारतीय कलाकाराला भिक मागतांना का दाखवले नसेल पण तो भिकारी भारतीय आहे एवढ्यावर आपण आनंद मानून चक्क सेलिब्रेशन्स करतो ….
आपल्या आनंदाच्या कल्पना किंवा विचारांची उंची किती तोकडी किती निम्नस्तरीय असावी …
नाही ??

काय होते Slumdog Millionaire मध्ये :-

भारतातले ८०% पब्लिक हि स्लम मध्ये राहणारी आहे….
इतकी हपापलेली कि एखाद्या हिरो ला पाहायला घाणीच्या डबक्यात न्हाऊन निघायला तयार (यावर आपण पोटधरून हसलो ….हसलो म्हणजे मान्य केल्यासारखेच … हि बाब अलाहिदा)
स्लम मध्ये राहणारी सगळी मुलं एकतर चोर आणि वाईट प्रवृत्तीची निघतात नाहीतर त्यांना उडवून नेउन त्यांच्या बरोबर क्रूर कर्म करून त्यांना पाकीटमार किंवा भिकारी बनवले जातात ….
त्यातल्या त्यात यातला एखादा चुकून माखून हुशार निघू शकतो यावर बाहेरच्यांना तर सोडा भारतीय पोलिसांना सुद्धा विश्वास बसू शकत नाही ...
आणि इतकी अशक्य कोटीतली बुद्धी त्याने मिळवलीच कुठून
हे जाणून घ्यायला ते अश्या रेअर बुद्धिशाली मुलाला उचलून स्टेशन ला आणतात …….
त्याचा चोपून चुपून रिमांड घेतात ….

राहिलेली २०% जनता हि थोडी श्रीमंत झालेली
पण कशी तर क्रिकेट सारख्या गेम वर सट्टा लावून, किंवा मग मुली सप्लाय करून ….
यांची लाइफ़ स्टायील जी दाखवली आहे ते बघून खरे मानून आपण देखील हळहळलोच ……
त्यात चूक हि काय आहे म्हणा…. जे दाखवलं गेलं तेच भारतीय जीवनाचं सत्य आहे हे आपलेच लोक वेळोवेळी प्रुफ करत असतातच……
IPL सारख्या श्रीमंत खेळात भरगोस पैसा मिळूनही आणि
कितीतरी पटीने बाहेरचे खेळाडू खेळत असतांनाही …
पैशांसाठी आणि मुलींसाठी सट्टा लावून स्वतःचा इमान विकणारे खेळाडू शेवटी भारतीयच तर निघाले … त्यात एकही विदेशी कसा फसला नाही बरे ??….

सत्य परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे …
स्लम मध्ये मजबुरीची जिंदगी जगणारे, सटोरीये, मुलींचे व्यापारी किंवा तत्सम अनेक दयनीय किंवा लाजिरवाणे जिने जगनारयानपेक्षा ….
साधारण चांगल्या प्रतीचे जीवन जगणारे, मेहेनतीने श्रीमंत झालेले, वैचारिक, बुद्धिशाली आणि कोणाच्याही मध्यात न राहणारे मध्यम वर्गीयांची संख्या अनेक पटीने जास्त आहे
पण संख्या जास्त असूनही आपल्या अस्तित्वाची जाणीव याच महत्व नसल्याने
आणि मौन पाळल्यानेच Slumdog Millionaire सारखे सिनेमे
विदेशी निर्माते करू घालतात आणि
आपल्या इज्जतीचा भाजीपाला करून स्वतः इज्जत आणि पैसा कमावतात……

आणि आपले लोक काय करतात …??

आपले(?) लोक दिल्ली सारखे रेप केसेस, विदेशी महिलेंवर होणारे बलात्कार, IPL सट्टा, घोटाळे, भ्रष्टाचार, दंगे यातून त्यांची आपल्या बद्दल झालेली समज किंवा विचारांवर सत्यतेची पक्की मोहोर लावतात …।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१,००,००,००,०००
अगदी बरोब्बर..... तो स्लम डॉग मिलियोनेअर पाहून जेवढ विषण्ण वाटलं त्याहीपेक्शा लाख पटीने जास्त वाईट
आपल्यकडल्या प्रसारमाध्यमांनी त्याला डोक्यावर घेतल्यामुळे वाटलं.

मयी, याज्ञसेनी - आपल्याशी १०००% सहमत. आज प्रथमच कोणीतरी ह्या विषयावर अगदी माझ्यासारखच मत बाळगून आहे हे बघून आनंद झाला.

हा चित्रपट बघितल्यावर माझीही तुम्ही लिहिलय तीच प्रतिक्रिया होती. "हीच रिअ‍ॅलिटी आहे" असं म्हणून त्याचे गोडवे गाणार्‍यांना मी सांगत होतो कि, हा रिअ‍ॅलिटी चा एक खूप छोटा भाग आहे आणि बाकी बरीच "चांगली रीअ‍ॅलिटी" आहे जी दाखवलीच नाहिये. आपल्या देशाचं असं चित्रण बघताना अक्षरश: यातना झाल्या. परदेशातल्या दिग्दर्शक निर्मात्यांनी उठून यावं आणि आपल्याकडच्या फक्त दारिद्र्याचं चित्रण करावं?

अजून त्रास झाला जेव्हा ऑफिसमधल्या मंडळींनी "हे असच असतं का तुमच्या देशात?" हे विचारायला सुरुवात केली. हॉलीवूडच्या सिनेमात अमेरिका कशी नेहमी जगाला वाचवते, त्यांचा प्रेसिडेंट कसा सगळ्या विश्वाचा तारण्हार असतो हेच दाखवलं जातं. तिथेही भिकारी आहेत, गरीबी आहे, भयानक परिस्थीतीत लोक रहातात. पण त्याचं असं चित्रण केलं आहे? उलट"परस्युट ऑफ हॅपिनेस" सारखे चित्रपट प्रचंड आशावाद दाखवतात. पण स्लमडॉग सारखे चित्रपट बघून हेच लोक आपल्या देशावर "थर्ड वल्ड कंट्री" चा शिक्का मारून मोकळे होतात. हो, घडत असतील असे प्रकार आपल्या देशात पण ते अपवाद असतील आणि ते घडतात म्हणून त्याचा असा उदो उदो? वाईट ह्याचं वाटलं आपलेच देशवासीय त्यावर बेहद्द खुष होते.
रेप केसेस, स्मगलिंग, सट्टा, दंगे इतरही देशात होतात. अगदी भ्रष्टाचारातही आपल्यासुद्धा पुढे असणारे देश आहेत. पण तिथलं "बॉलीवूड" आपल्या एवढं प्रसिद्ध नाही आणि आपल्याएवढा तिथे चित्रपटांना बाजार नाही म्हणून त्यांचा उल्लेखही प्रसिद्ध चित्रपटात अपवादानीच दिसतो (ब्लड डायमंड, बेबल ही काही उदाहरण पटकन सुचली)
स्लमडॉगवर तुम्ही लेखात लिहिली आहे तशी प्रतिक्रीया दिल्यावर लोक माझ्याकडे विचित्र नजरेनी बघायचे आणि वर म्हणायचे "इट्स जस्ट अ मूव्ही !!" काय बोलणार पुढे?

मयी, याज्ञसेनी आणि चौकट राजा,

अगदी माझ्याच मनातलं बोललात तुम्ही सारे! नको त्या गोष्टींचं उदात्तीकरण करून पैसा कमावणं काही लोकांना लज्जास्पद वाटत नाही. अशांना कितीही पौष्टिक आणि रुचकर जेवण दिलं तरी ते लोक अन्नातला केवळ मलांशच धुंडाळत राहतील. आणि त्यांना तो मिळेलही. आपण एव्हढंच म्हणू शकतो की : जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात!

आ.न.,
-गा.पै.

इट्स जस्ट अ मुव्ही हेच खरं आहे. मुळात तो सिनेमा भारतीय लेखक विकास स्वरूप ह्यांनी लिहिलेल्या Q and A ह्या पुस्तकावर आधारित आहे. स्वरुप स्वतः भारतीय डिप्ललोमॅट आहेत. म्हणजे भारतीय माणसानी लिहिलेल्या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे त्यामुळे मग नक्की इज्जतीचा भाजीपाला कोणी केला? कैत्तरी आपलं! भलत्या गोष्टीत देशप्रेम घुसडायचं. एक तर मुळात ते पुस्तक आणि सिनेमा दोन्ही फिक्शन आहेत त्यामुळे खरं हा विषयच नाही यायला पाहिजे.
उगाच आता त्या सिनेमाला लोकप्रियता मिळाली पण त्यात भारतात असलेल्या गरिबी हायलाईट करणारी गोष्ट आहे म्हंटल्यावर आपण बोंब मारायची की त्या मुळे भारताची इमेज खराब होते!

पुढे परदेशात जर कोणी ह्यालाच रियॅलिटी समजत असतील तरे ते ही बिन्डोक आणि इग्नोरंट आहेत पण आणि ही बिन्डोक लोकं आपल्याला असले प्रश्न विचारतात म्हणून आपण लगेच परदेशी फिल्म निर्माते, डायरेक्टर लोकांच्या नावानी शंख करायचा हे कितपत शहाणपणाचे आहे?
मला तर आत्ता आत्ता पर्यंत लोकं "तुमच्या इथे रस्त्यावर हत्ती फिरतात का?" असा प्रश्न विचारयचे. (A&E चॅनल वर नुकताच इंडियाना जोन्स अ‍ॅन्ड द टेंपल ऑफ डूम लागून गेला असावा त्याच दरम्यान अशी मला दाट शंका असायची)
मी म्हणायचो हत्ती नाही पण गायी फिरतात अजून माझ्या गावात, मागच्या भारतवारीत गेलो तेव्हाच शेणात पाय भरला होता माझा. जे आहे ते मान्य करण्यात कसला आलाय कमीपणा?

आणि हो, भारतात बॉलिवूड मध्ये तरी भारताची बलस्थानं हायलाईट होतील, रियॅलिटी कळेल असले किती सिनेमे निघतात दर वर्षी? ७० टक्के (किंवा जास्त) सिनेमांचा वस्तुस्थितीशी आजिबात ताळमेळ नसतो. हेच सिनेमे एखाद्यानी भारताबद्दल काहीच माहिती नसताना जर परदेशात बसून पाहिले तर ती व्यक्ती जे निष्कर्ष काढेल त्याचा कितपत संबंध असेल भारताच्या वस्तुस्थितीशी? परदेशी लोकांचे सोडा, भारतात बसून भारतातल्या टिव्ही सिरियल बघून, सिनेमे बघून एखाद्या भारतीयाला तरी नीट निष्कर्ष काढता येइल का? एकता कपूरच्या सिरियली अन शूटाऊट अ‍ॅट वडाळा बघून कसली डोंबलाची रियॅलिटी कळतेय?

बुवा +१

>>
काय होते Slumdog Millionaire मध्ये :-
भारतातले ८०% पब्लिक हि स्लम मध्ये राहणारी आहे….
राहिलेली २०% जनता हि थोडी श्रीमंत झालेली
पण कशी तर क्रिकेट सारख्या गेम वर सट्टा लावून, किंवा मग मुली सप्लाय करून ….
<<

असं स्टॅटिस्टिक्स कुठे आहे सिनेमात?

एका महानगरातल्या एका झोपडपट्टीत वाढलेल्या एका मुलाची काल्पनिक गोष्ट आहे ती. त्यात काय प्रातिनिधिक शोधताय!

वैद्यबुवा,

>> मागच्या भारतवारीत गेलो तेव्हाच शेणात पाय भरला होता माझा. जे आहे ते मान्य करण्यात कसला
>> आलाय कमीपणा?

अहो, काय सांगायचं आता! जे आहे ते मान्य आहे आम्हाला! आणि हे मान्य करण्यात आम्हाला कसलाही कमीपणा वाटत नाही. मात्र ते दाखवून पैसे मिळवावेत का, असा प्रश्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

मात्र ते दाखवून पैसे मिळवावेत का, असा प्रश्न आहे. >>>> हा एक मुद्दा मला आजिबात कळत नाही. आमच्या इथली गरिबी दाखवून तुम्ही पैसा मिळवता म्हणजे नेमकं काय? पैसा त्यांनी चांगली कलाकृती दाखवून मिळवलाय. ती कलाकृती भारतातली गरिबी दाखवली आणि फक्त त्याच कारणामुळे लोकप्रिय झाली का? नाही. तो सिनेमा एका खुप चांगल्या कथेवर (भारतीयानी लिहिलेली) आधारित होता आणि त्याला चांगल्या दिग्दर्शनाची साथ लाभली आणि त्यामुळे इतका लोकप्रिय झाला.
हा मुद्दा जरा वेगळा आहे पण अहो वस्तुस्थितीचे दर्शन घडवेल अशी फक्त भारतातल्या गरिबीवर फोकस असणारी साधी डॉक्युमेंटरी बनवली तर एकवेळ भारताबाहेर तिला पैसे मिळतील, लोकं बघतील, चेष्टा म्हणून नाही पण माहिती म्हणून पण भारतात पैसे देऊन कोणी ती दुर्दशनवर लावणार नाही (कोणाला इंट्रेस्ट आहे इतक्या चांगल्या कौटुंबिक सिरियल सुरु असताना?).

बुवा +१. rags to riches हा formula सर्वत्रच वापरला जातो कारण तो विकला जाण्याची शक्यता नेहमीच अधिक आहे. हा सिनेमा काल्पनिक आहे हे न समजता त्यावर जर कोणी आपले मत ठरवणार असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याव्यतिरिक्त तुम्ही काहि करू शकत नाही. हि documentary म्हणून बनवलेली असती तर तुमच्या आक्षेपांना पूर्ण अनुमोदन.

बुवा +१००
बुवा तुम्ही लिहिले तेच मी आधी लिहिले होते. पण नंतर आधीची चर्चा आठवून खोडून टाकले. भावनेच्या भरात लिहिलेल्या लेखात आणि प्रतिसादांत सारासार विचाराची वानवा न जाणवेल तर नवलच.

"परस्युट ऑफ हॅपिनेस" मध्ये आशावाद आहे आणि मग "स्लमडॉग मिलेनियर" मध्ये काय आहे? "परस्युट ऑफ हॅपिनेस" ही खर्‍याखुर्‍या माणसाची कथा आहे आणि "स्लमडॉग मिलेनियर" काल्पनिक कथा आहे हे माहित आहे का? आता सिनेमा काल्पनिक कथेवर आहे म्हंटल्यावर तुम्हीच जगासमोर 'रिअ‍ॅलिटी दाखवलीये' म्हणून ढोल बडवत आहात. 'डिस्ट्रिक्ट ९' बघून दक्षिण अफ्रिकेत सगळे असेच असते असेही ठरवाल तुम्ही.

करण जोहर 'कभी खुषी कभी गम' मध्ये गर्भश्रीमंत लोक दाखवतो तेव्हा ही रिअ‍ॅलिटी नाही म्हणून कुणीच धागा नाही ऊघडत.

तुम्हाला नक्की काय खुपलंय?
१) जे दाखवलं ते - पण ते तर सत्य आहेच ना? मग ते कुणीही दाखवलं तरी काय फरक पडतो?
२)खोटं दाखवलंय ते - काय खोटं दाखवलंय?
३)तुमच्या देशात सगळं हे असंच आहे का? असं लोकं विचारतात म्हणून- मग 'नाही' म्हणून सांगा की ठणकाऊन, रडतरडत धागे कसले ऊघडतायेत!!

*

>> हि documentary म्हणून बनवलेली असती तर तुमच्या आक्षेपांना पूर्ण अनुमोदन.
का? म्हणजे एखाद्याने धारावीवर फीचर केलं तर?

का? म्हणजे एखाद्याने धारावीवर फीचर केलं तर? >> आक्षेप काय आहे ते बघा ईबा, आहे हिच फक्त reality नाहिये हे जर documentary मधे उतरले नसेल तर आक्षेप घ्यायला काय हरकत आहे ?

नाही, आक्षेप पैसे मिळवण्याला आहे. डॉक्युमेन्ट्रीत तेवढा पैसा नाही तेव्हा चालायला हवं. Proud

जोक्स अपार्ट, धारावीवर फीचर केलं म्हणजे भारताची फक्त तीच रिआलिटी आहे असं प्रमोट केल्यासारखं होतं का? इतकं भाबडं बघणार्‍यांपैकी कोणी असतं का? 'नो कन्ट्री फॉर ओल्ड मेन' बघून अमेरिकेत जो तो खून पाडत फिरतो असं वाटतं का? ब्रोकबॅक माउंटन बघून अमेरिकेतले यच्चयावत पुरुष गे आहेत असा किती जणांचा समज होतो?

धारावीवर फीचर केलं म्हणजे भारताची फक्त तीच रिआलिटी आहे असं प्रमोट केल्यासारखं होतं का? >> फीचर कोणी, कसे नि कशासाठी केलेय ह्यावर ठरणार नाहि का हे ?

इतकं भाबडं बघणार्‍यांपैकी कोणी असतं का? >> एव्हढे सोपे असते का हे ? एक दुजे के लिये नंतर जोडप्यांनी आत्महत्या केल्या ना ? बेंगाझी, morning after pill चा गदारोळ बघा. कसला संबंध कुठे जोडला जाउ शकतो.

मी आक्षेप घेण्याला तुमचा आक्षेप का आहे ? Lol

मग तू पूर्ण अनुमोदन का देतोय्स?!

>> मी आक्षेप घेण्याला तुमचा आक्षेप का आहे
नाही, तू भाबडं असण्याला आहे. Lol

पूर्ण अनुमोदन का देतोय्स?! >> म्हटले ना कि स्लमडॉग जर फीचर म्हणून बनवली असती तर त्यात होणारे भारताचे चित्रीकरण योग्य नाहि (एकांगी आहे म्हणा हवे तर) असे मला वाटते आणि त्याला माझा आक्षेप असेल.

हे थोडे आत्याबाईला मिशा असत्या टाईप्स व्हायला लागलय Wink

जोक्स अपार्ट, धारावीवर फीचर केलं म्हणजे भारताची फक्त तीच रिआलिटी आहे असं प्रमोट केल्यासारखं होतं का? इतकं भाबडं बघणार्‍यांपैकी कोणी असतं का? 'नो कन्ट्री फॉर ओल्ड मेन' बघून अमेरिकेत जो तो खून पाडत फिरतो असं वाटतं का? ब्रोकबॅक माउंटन बघून अमेरिकेतले यच्चयावत पुरुष गे आहेत असा किती जणांचा समज होतो? >> असे 'कैच्याकै' कल्पना बाळगून असणार्‍या लोकांची कुठेच कमतरता नाहीये. मला एकानं विचारलं होतं, योगासारखं तुमच्याकडे कामसूत्र पण शिकवतात का शाळांमधून.

तो सिनेमा एका खुप चांगल्या कथेवर (भारतीयानी लिहिलेली) आधारित होता आणि त्याला चांगल्या दिग्दर्शनाची साथ लाभली आणि त्यामुळे इतका लोकप्रिय झाला. >>> त्यापेक्षाही चांगल्या कथा असलेले कैक सिनेमे भारतात बनलेत पण ह्यालाच इतकं डोक्यावर घेण्यासारखं काय आहे ?
"स्लमडॉग मिलेनियर" काल्पनिक कथा आहे हे माहित आहे का? >>> कथा काल्पनिक असुनही जेवढे महाभाग भेटले त्या सगळ्यांची ठाम समजुत झाली होती , की भारतात राजरोसपणे मुलांना अपंग / आंधळे बनवुन भीकेला लावलं जातं. कोणा कोणाला समजावुन सांगणार ?

पण अशा महाभागांचं काय मत आहे याची काळजी का करायची? ते मत काय करण जोहरचे सिनेमे किंवा देवदास बघून बदलणार आहे का?

पण अशा महाभागांचं काय मत आहे याची काळजी का करायची? >> अस कस हेच म्हाभाग मग एखाद्या देशीचे जीवन हराम करतात. डिस्क्रिमिनेशन करतात... हे जाणुनबुजुन होते तसेच अजाणताही. ईट बायसेस पिपल इन अ राँग वे... एकाच प्रकारच चित्रण होत असेल तर प्रोब्लेम आहेच...

सिनेमा पाहून काय संदेश घेता / संदेश घ्यायलाच हवा का हे टोटली अप टु एव्हरी इंडीव्हिज्युअल .
स्लमडॉग मिलिओनर ची कथा आणि सिनेमा दोन्ही आवडलं मला !
एखादा सिनेमा किंवा एखादी कथा अख्ख्या देशाची इमेज बन्वत नाही हे समजण्या इतकी जनता मॅचुअर्ड नसेल, कॉमन सेन्स नसेल तर लेट देम थंक व्हॉटेव्हर दे वाँट टु , हु केअर्स !

पेशवे, खरंच? डिस्क्रिमिनेशन सिनेमे बघून होतं का जॉब्ज गेले म्हणून होतं? जोवर कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्ट्रेस्ट होत नाही तोवर इंडिया इज द कन्ट्री ऑफ गॅन्धी अ‍ॅन्ड योगा अ‍ॅन्ड कामासूट्रा!

असे 'कैच्याकै' कल्पना बाळगून असणार्‍या लोकांची कुठेच कमतरता नाहीये. मला एकानं विचारलं होतं, योगासारखं तुमच्याकडे कामसूत्र पण शिकवतात का शाळांमधून.

खरय हे! हे एकदा मला एका अमेरिकन प्रोफेसरने विचारल होत. त्याला मी सांगितल "छे! आम्हाला कामसूत्र शिकायला लागतच नाही. आमच्या रक्तातच आहे ते". Wink

बावळट मेला!

बावळट मेला!>>>>> Rofl (हा बाफं इतकी कर्मणूक करेल असं आजिबात अपेक्षित नव्हतं मला!)

Pages