Slumdog कि Millionaire ??

Submitted by मी मी on 20 May, 2013 - 12:59

Slumdog Millionaire बघून बाहेर पडतांना एक अनामिक उदासी दाटली होती मनात … भोवताल ची सर्व गर्दी सिनेमाच्या कौतुक सोहळ्यात मग्न असतांना माझ मन मात्र अजिबातच खुश नव्हतं …. कलाकारांचा अभिनय सोडता या सिनेमात पाहिलेली कुठली तरी बाब किंवा मग सगळंच काही आपल्याला खटकतंय अस सारखं जाणवत होतं ……
त्यानंतर सिनेमाचं जागतिक स्तरावर झालेलं कौतुक, आंतराष्ट्रीय पातळीचे अवार्डस, फिल्मच्या कलाकारांचे कौतुक, भारतीय संगीताची जगात वाढती ओढ आणि सन्मान या सर्वात देश डुंबून गेला …
खरा मुद्दा मात्र राहिला बाजूलाच ……

भारतीय कलाकार किंवा भारतीय संगीत एखाद्या पाश्चिमात्य सिनेमात वापरल गेलं आहे फक्त एवढीच एक बाब आपल्यासाठी समाधानाची किंवा आनंदाची गोष्ट कशी राहू शकते ?
म्हणजे सिनेमात भारतीय कलाकाराला भिक मागतांना का दाखवले नसेल पण तो भिकारी भारतीय आहे एवढ्यावर आपण आनंद मानून चक्क सेलिब्रेशन्स करतो ….
आपल्या आनंदाच्या कल्पना किंवा विचारांची उंची किती तोकडी किती निम्नस्तरीय असावी …
नाही ??

काय होते Slumdog Millionaire मध्ये :-

भारतातले ८०% पब्लिक हि स्लम मध्ये राहणारी आहे….
इतकी हपापलेली कि एखाद्या हिरो ला पाहायला घाणीच्या डबक्यात न्हाऊन निघायला तयार (यावर आपण पोटधरून हसलो ….हसलो म्हणजे मान्य केल्यासारखेच … हि बाब अलाहिदा)
स्लम मध्ये राहणारी सगळी मुलं एकतर चोर आणि वाईट प्रवृत्तीची निघतात नाहीतर त्यांना उडवून नेउन त्यांच्या बरोबर क्रूर कर्म करून त्यांना पाकीटमार किंवा भिकारी बनवले जातात ….
त्यातल्या त्यात यातला एखादा चुकून माखून हुशार निघू शकतो यावर बाहेरच्यांना तर सोडा भारतीय पोलिसांना सुद्धा विश्वास बसू शकत नाही ...
आणि इतकी अशक्य कोटीतली बुद्धी त्याने मिळवलीच कुठून
हे जाणून घ्यायला ते अश्या रेअर बुद्धिशाली मुलाला उचलून स्टेशन ला आणतात …….
त्याचा चोपून चुपून रिमांड घेतात ….

राहिलेली २०% जनता हि थोडी श्रीमंत झालेली
पण कशी तर क्रिकेट सारख्या गेम वर सट्टा लावून, किंवा मग मुली सप्लाय करून ….
यांची लाइफ़ स्टायील जी दाखवली आहे ते बघून खरे मानून आपण देखील हळहळलोच ……
त्यात चूक हि काय आहे म्हणा…. जे दाखवलं गेलं तेच भारतीय जीवनाचं सत्य आहे हे आपलेच लोक वेळोवेळी प्रुफ करत असतातच……
IPL सारख्या श्रीमंत खेळात भरगोस पैसा मिळूनही आणि
कितीतरी पटीने बाहेरचे खेळाडू खेळत असतांनाही …
पैशांसाठी आणि मुलींसाठी सट्टा लावून स्वतःचा इमान विकणारे खेळाडू शेवटी भारतीयच तर निघाले … त्यात एकही विदेशी कसा फसला नाही बरे ??….

सत्य परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे …
स्लम मध्ये मजबुरीची जिंदगी जगणारे, सटोरीये, मुलींचे व्यापारी किंवा तत्सम अनेक दयनीय किंवा लाजिरवाणे जिने जगनारयानपेक्षा ….
साधारण चांगल्या प्रतीचे जीवन जगणारे, मेहेनतीने श्रीमंत झालेले, वैचारिक, बुद्धिशाली आणि कोणाच्याही मध्यात न राहणारे मध्यम वर्गीयांची संख्या अनेक पटीने जास्त आहे
पण संख्या जास्त असूनही आपल्या अस्तित्वाची जाणीव याच महत्व नसल्याने
आणि मौन पाळल्यानेच Slumdog Millionaire सारखे सिनेमे
विदेशी निर्माते करू घालतात आणि
आपल्या इज्जतीचा भाजीपाला करून स्वतः इज्जत आणि पैसा कमावतात……

आणि आपले लोक काय करतात …??

आपले(?) लोक दिल्ली सारखे रेप केसेस, विदेशी महिलेंवर होणारे बलात्कार, IPL सट्टा, घोटाळे, भ्रष्टाचार, दंगे यातून त्यांची आपल्या बद्दल झालेली समज किंवा विचारांवर सत्यतेची पक्की मोहोर लावतात …।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चमन,

>> कोंबडं झाकलं म्हणून सूर्य दिसायचा रहात नाही.

मी वस्तुस्थिती नाकारत नाहीये. ती भडक प्रकारे चित्रित केलेली मला आवडत नाही.

आ.न.,
-गा.पै.

चमन,

>> सोपी गोष्टं आहे हो, डिवोर्स, ब्रोक, होमलेस आणि सिंगलमॉम पासून मल्टी बिलेनियर होणार्‍या
>> जे के रोलिंगवर काढलेला सिनेमा जास्त ईंप्रेसिव आणि मास अपील वाला असेल की नाही. आता
>> रोलिंग बाईंऐवजी जिच्यावर सिनेमा काढावा अशी मध्यमवर्गीय भारतीय लेखिका सांगा बरं.

हा प्रश्न दिग्दर्शकासाठी आहे.

आ.न.,
-गा.पै.

मी वस्तुस्थिती नाकारत नाहीये. ती भडक प्रकारे चित्रित केलेली मला आवडत नाही. > हो पण भडक आहे की नाही ठरवण्यासाठी तुम्ही आधी चित्रपट बघायला हवा की नाही. त्यात ग्राफिक्स वापरून काही अचाट आणि अतर्क्य गोष्टी असतील तर तेही कळवा. 'ह्या सीनमधली ही गोष्टं सत्यता नसून अतिशयोक्ति आहे' तसेही सांगा.

भडक म्हणायचे तर द्रोहकालपासून वास्तव, शूटआऊट वगैरे सारखे शेकडो पटींनी भडक सिनेमे शेकड्याने शेकडो वर्षांपासून बनतच आहेत की आपल्याकडे. मग ह्याच एकावर तुमची नाराजी का?

हा प्रश्न दिग्दर्शकासाठी आहे.>> नाही! तुमच्यासाठी आहे. जर स्लमडॉग ईट,प्रे, लव सारखा झोपला असता तो कधी आला आणि कधी गेला हेही तुम्हाला कळाले नसते, त्याला एकही अ‍ॅवार्ड मिळाला नसता तर तुम्ही त्याबद्दल बोलत असता का?

त्यांना भारताचं हे चित्रण खटकलं नाही>>>> वास्तवात आहे हो असं.
एक उदाहरण देतो.
हागणदारी मुक्त गाव अशी योजना आहे सरकारची.
कागदावर महाराष्ट्र मुक्त झाला असेल.
मुख्यमन्त्री खुष झाले असतीलही. पण मी मुख्यमन्त्र्यानादेखील पुणे - पिंपरी चिंचवड येथेदेखील उघड्यावर शौचास बसणारे लोकं दाखवु शकतो.
( ह्याचा अर्थ असा नव्हे की मी असे लोकं बघत बसतो. येता जाता वास येत असतो त्यावरुन कळत. उगाच कल्पनेच्या भरार्‍या नकोत )
छोट्या गावांमधील तर परिस्थिती अजुनच वेगळी.. अन वाइट..

अन्ड्या, रेहमानचं गाण माहिती नाही म्हणतोस???
ते ठीक आहे रे ते गाण फार फार ग्रेट नव्हतं जर रेहमानचा ग्राफ पाहिला तर पण बहुद्धा तु अन्ड्यात असशील (म्हणजे वय वर्षे १८ च्या आत रे) तेव्हा कॉन्ग्रेसने हे गाणं एका निवडणुकीच्या आधी कानाला वीट-दगड येइपर्यंत वाजवलं होतं प्रचारात... अर्थात तेव्हा तु मतदान पात्र नसल्याने ऐकलं नसशील, त्यामुळे बारकाइने लक्ष दिलं नसशील..

इथे चालू असलेल्या विषयासंदर्भात चर्चा चालू असताना एका जुन्या मायबोलीकराने वाहत्या बीबीवर पोस्ट टाकली होती, आणि ती मेधाने नंतर एका दुसर्‍या बीबीवर अर्काईव्ह केली होती, ती पोस्ट आठवली.

http://www.maayboli.com/node/4398?page=6
या पानावरची शेवटची पोस्ट.

चमन,

१.
>> भडक म्हणायचे तर द्रोहकालपासून वास्तव, शूटआऊट वगैरे सारखे शेकडो पटींनी भडक सिनेमे शेकड्याने
>> शेकडो वर्षांपासून बनतच आहेत की आपल्याकडे. मग ह्याच एकावर तुमची नाराजी का?

या एकावर नाराजी असास्तव की भारताचं (किंवा भारतीयांचं म्हणा) चित्रण नकारात्मक पद्धतीनं झालं आहे. धागाकर्तीने या कारणांची पूर्ण यादी दिली आहे.

२.
>> जर स्लमडॉग ईट,प्रे, लव सारखा झोपला असता तो कधी आला आणि कधी गेला हेही तुम्हाला कळाले
>> नसते, त्याला एकही अ‍ॅवार्ड मिळाला नसता तर तुम्ही त्याबद्दल बोलत असता का?

नसतो बोललो. पैशापासरी सिनेमे भरपूर येतात. पण एखादा चित्रपट जेव्हा लोकांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो तेव्हा त्याच्या लोकप्रियतेमागे भारताचं नकारात्मक चित्रण नसावं. एव्हढी छोटीशी अपेक्षा आहे माझी. मात्र तरीही भारतातली गलिच्छ वस्तुस्थिती मला पूर्णपणे मान्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

झकासराव,

>> वास्तवात आहे हो असं.

वास्तव असंच आहे, यात शंका नाही. मी केवळ चित्रणाबद्दल बोलत आहे. स्लमि मध्ये भारतासंबंधी जी नकारात्मक वस्तुस्थिती चित्रित झाली आहे ती प्रातिनिधिक नाहीये. जरी खरी असली तरी.

माझा मूळ आक्षेप भारतीयांनी या चित्रपटाला डोक्यावर घेण्यात आहे. चित्रपटावर जी काही स्तुतिसुमने उधळायची आहेत त्यामागे गांभीर्य असावं. गांभीर्य अशासाठी हवं की यात भारताचं नकारात्मक चित्रण आहे. हे भान भारतीय प्रसारमाध्यमांत व/वा कलाकारांत दिसतं का? नाहीना, मग माझा (म्हणजे सर्वसामान्य भारतप्रेमी प्रेक्षकाचा) कल मूळ चित्रण बदलायला पाहिजे याकडे झुकतो.

मेधा यांचा इथला संदेश वाचला (साजिरा, धन्यवाद!). मूळ संदेश slarti यांचा आहे. त्यांनी या संदेशात अनेक चित्रपटांची यादी दिली आहे. ते चित्रपट अमेरिकेची नकारात्मक बाजू दर्शवतात. या पार्श्वभूमीवर slarti यांना स्लमि मुळे भारताचा मानभंग होतोय असं वाटंत नाही.

एक मत म्हणून slarti यांचा आदर आहे. फक्त एक प्रश्न विचारावासा वाटतो. अमेरिकी किंवा युरोपीय चित्रपटांत यहुद्याचं (ज्यू माणसाचं) नकारात्मक वर्णन कधीच नसतं. प्रत्यक्षात अनेक उच्चपदस्थ ज्यू लाचखोर आहेत. दोन्ही महायुद्धांतली त्यांची भूमिका संशयास्पद आहे. तरीही यहुदी नेहमी सालस, पापभीरू दाखवला जातो. बहुतांश यहुदी तसेच आहेत, पण स्वत:ला ज्यू म्हणवून घेणारे खूपसे उच्चपदस्थ अनैतिक धंद्यांत गुंतलेले आहेत. मात्र असं कधी चित्रपटात बघितलंय का?

सांगण्याचा मुद्दा काय आहे की प्रत्येक देशाच्या नाजूक जागा असतात. तिचं नकारात्मक चित्रण त्या लोकांना सहन होत नाही. भारताच्याही नाजूक जागा आहेत याचं भान सुटलेलं दिसतंय. म्हणून का संवादप्रपंच.

आ.न.,
-गा.पै.

गामा_पैलवान, ती मूळ पोस्ट slarti यांची आहे. मेधा यांनी फक्त ती (वाहत्या बाफावर वाहून जाते म्हणून) अर्काईव्ह केली आहे. तेवढी फक्त दुरूस्ती हवी. Happy

स्लमि मध्ये भारतासंबंधी जी नकारात्मक वस्तुस्थिती चित्रित झाली आहे ती प्रातिनिधिक नाहीये. <<
सिनेमा न बघताच त्यात काय आणि कसे चित्रण आहे हे समजण्याइतकी प्रगल्भता बाळगणारे माबोवरचे तुम्ही दुसरे.

नीधप,

>> सिनेमा न बघताच त्यात काय आणि कसे चित्रण आहे हे समजण्याइतकी प्रगल्भता बाळगणारे
>> माबोवरचे तुम्ही दुसरे.

मी स्लमि बघितला नाहीये ही बाब खरी आहे. ही त्रुटी मला मान्य आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न करेन.

माझं मत प्रातिनिधिक आहे. माझ्यासारखाच विचार करणारे खूप लोक आहेत. मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर दोन्हीकडे. यापैकी कित्येक लोकांनी चित्रपट बघितलेला आहे. समजा जर त्यांनी माझं मत उधृत केलं तर तुमच्या युक्तिवादाची दिशा बदलावी लागेल.

आजून एक गोष्ट सांगायची म्हणजे माझ्यासारखा विचार करणे अनेक लोकं आहेत. त्यांना स्लमि बद्दल काहीतरी खटकतंय. पण नेमक्या शब्दांत मांडता येत नाहीये. अशांचे आणि माझे विचार सुस्पष्ट व्हावे हाही एक हेतू या संवादामागे आहे. माझ्या अपेक्षा आणि मते सर्वांना पटावीत असा माझा अजिबात आग्रह नाही. मात्र प्रत्येकाची मते आणि अपेक्षा निश्चित व्हाव्यात, असा आग्रह धरू इच्छितो.

आ.न.,
-गा.पै.

>>माझ्या अपेक्षा आणि मते सर्वांना पटावीत असा माझा अजिबात आग्रह नाही. मात्र प्रत्येकाची मते आणि अपेक्षा निश्चित व्हाव्यात, असा आग्रह धरू इच्छितो.

आधी चित्रपट बघून या ... तोपर्यंत तुमच्या सर्वच पोस्टी 'नोबॉल' म्हणून बाद करण्यात येत आहेत. Happy

योग,

>> आधी चित्रपट बघून या ... तोपर्यंत तुमच्या सर्वच पोस्टी 'नोबॉल' म्हणून बाद करण्यात येत आहेत. Happy

नोबॉल...? आँ...? माझी समजूत आहे की मी इथं फटकेबाजी करतोय! Proud Wink

पण तुमचं म्हणणं मान्य! फक्त एक गोष्ट नमूद करतो. माझा रोख आशयापेक्षा (content) उथळ हर्षोल्हासाकडे अधिक आहे. चित्रपट मित्राकडून मागवला आहे. आज रात्री (GMT) बघायचा विचार आहे.

आ.न.,
-गा.पै.

साजिरा,

>> ती मूळ पोस्ट slarti यांची आहे. मेधा यांनी फक्त ती (वाहत्या बाफावर वाहून जाते म्हणून) अर्काईव्ह केली
>> आहे. तेवढी फक्त दुरूस्ती हवी.

निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद! Happy योग्य तो बदल केला आहे!

आ.न.
-गा.पै.

एक मत म्हणून slarti यांचा आदर आहे. फक्त एक प्रश्न विचारावासा वाटतो. अमेरिकी किंवा युरोपीय चित्रपटांत यहुद्याचं (ज्यू माणसाचं) नकारात्मक वर्णन कधीच नसतं. प्रत्यक्षात अनेक उच्चपदस्थ ज्यू लाचखोर आहेत. दोन्ही महायुद्धांतली त्यांची भूमिका संशयास्पद आहे. तरीही यहुदी नेहमी सालस, पापभीरू दाखवला जातो. बहुतांश यहुदी तसेच आहेत, पण स्वत:ला ज्यू म्हणवून घेणारे खूपसे उच्चपदस्थ अनैतिक धंद्यांत गुंतलेले आहेत. मात्र असं कधी चित्रपटात बघितलंय का? >>> "वन्स अपॉन अ टाईम ईन अमेरिका" पाहिला आहे का? तुम्ही कुठला तरी हॉलिवुड सिनेमा पाहिला आहे का ह्याचीच आता शंका यायला लागलीये.

या एकावर नाराजी असास्तव की भारताचं (किंवा भारतीयांचं म्हणा) चित्रण नकारात्मक पद्धतीनं झालं आहे. >> म्हणजे नेमकं काय झालं आहे? स्लमडॉगच्या आधी भारताचे नकारात्मक चित्रण करणारा सिनेमा कुण्या पाश्चात्याने काढलाच नव्हता, त्यामुळे भारताबद्दल कसे एकदम सकारात्मक वातावरण पहिल्या आणि दुसर्‍या जगात होते. स्लमडॉग आला आणि सगळे चित्रच बदलले. ह्या सिनेमामुळे अचानक पहिल्या जगातल्या लोकांनी भारताला तिसर्‍या जगात ढकलले. त्यांचा द्वेष करणे चालू झाले. असे काही झाले आहे का?
दोन चार अज्ञ लोकांनी तुम्हाला तुमच्या देशाबद्दल काही प्रश्न विचारले तर तुम्ही त्याला 'भारताचे नकारात्मक चित्रण म्हणताये होय?

धागाकर्तीने या कारणांची पूर्ण यादी दिली आहे. >> मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे तो भावनेच्या भरात लिहिलेला लेख आहे आणि त्यात सारासार विचाराची वानवा आहे. त्यांनी नमूद केलेली माहितीही एकतर चुकीची नाहीतर अपुरी आहे. आणि अश्या माहितीवर तुम्ही आपल्या मतांचे ईमले बनवत आहात.

माझं मत प्रातिनिधिक आहे. माझ्यासारखाच विचार करणारे खूप लोक आहेत. मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर दोन्हीकडे. यापैकी कित्येक लोकांनी चित्रपट बघितलेला आहे. समजा जर त्यांनी माझं मत उधृत केलं तर तुमच्या युक्तिवादाची दिशा बदलावी लागेल. >> बरं. हा घ्या पुढचा युक्तिवाद.
आपण फिल्म फेडरेशन ऑफ ईंडिया ने ऑस्करसाठी पाठवलेले सिनेमे बघू.
२०१२ - बर्फी - हॉलिवुडपटातून जसेच्या तसे ऊचललेले सीन्स. ऑडॅसिटी किंवा अज्ञान तर बघा सिनेमा पाठवणार्‍यांचं.
२०१० - पीपली लाईव, पुन्हा भारतातली अतिशय गरिबी आणि निर्लज्ज्य मिडिया आणि भ्रष्टाचारी राजकारण ऊधृत केलं आहे.
२००८ - तारे जमीन पर- मध्यमवर्गीय पालक मुलांना समजून न घेता त्यांचा जाच करतात असं दाखवलंय.
२००६ - रंग दे बसंती - खोलवर रूजलेला भ्रष्टाचार आणि त्यात बरबटलेले राजकारणी आणि तरूण पिढीची होरपळ.
११९६ - ईंडियन - पुन्हा तेच भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार.
१९८८ - सलाम बॉम्बे - फुटपाथवरची मुलं आणि त्यांच हलाखीचं जीवन. (स्लमडॉग बघतांना 'सलाम बॉम्बे' आठवावा एवढी साम्यस्थळं आहेत दोन्ही सिनेमांमधे. हो! मीरा नायर पाशिमात्यच आहे असं आता म्हणून नका.)

आता हे सगळं तुम्हीच बाहेरच्या जगाला दाखवलंय, बर्फी, रंग दे बसंती, ईंडियन सारख्या सिनेमांनी तर गल्ला आणि मानमरातब दोम्ही कमावलंय.

मग १९८८ पासून आजपर्यंत अश्या सिनेमांनी भारताबद्दल नकारात्मक मत बनवले की नाही तुम्हीच सांगा.
ऊत्तर 'हो! मत बनवलंय' असं दिलं तर मी म्हणेन 'समुद्रात अजून एक लोटा खारट पाणी ओतल्याने आता अजून काय फरक पडणार आहे?'
ऊत्तर 'नाही! असं मत बनवलं नाहीये' असं दिलं तर मी म्हणेन 'जे मत १०-१२ सिनेमांनी बनलं नाहीये ते आता एकाच सिनेमाने कसं बनवलं बुवा?'

कोणी पाशिमात्य हा धागा वाचत असल्यास, ईतर अनेक वाईट गोष्टींबरोबर 'दुटप्पीपणाचं' ही नकारात्मक लेबल लावेल बरं तुम्हाला आणि पर्यायाने सगळ्याच भारतीयांना आणि भारत देशालासुद्धा. Wink

धन्यवाद मित्रांनो एवढी सलग चर्चा चालूये हे मला माहितीच नव्हतं खरतर …. पण दोन्ही बाजूच्या चर्चा आणि विशेष म्हणजे मत मांडण्याची एकेकाची शैली बघून जरा चक्रावलेच … मग सावरून ….माझ्या या धाग्याचा नेमका हेतू काय या बद्दल एकच प्रतिसाद खाली नमूद करते आहे ……।

>>>>>>>>>>>>>>>छे छे! आपल्या ईज्ज्जतीचा भाजीपाला आपणच केला आहे त्याचा दोष दुसर्‍यांना नको..'>>>>>>>>>>>>>>>
देशात वाईट परिस्थिती नाही किंवा त्यांनी दाखवलेले अगदीच खोटे आहे असे मी म्हणालेच नाहीये …जगात जी परिस्थिती आहे ती आपल्याच लोकांनी केलीय हे सुद्धा मान्य आहे …. पण
माझा मुद्दा हा आहे कि माझे भावंड मला शिव्या घालत असतील किंवा गालात हाणत असतील म्हणजे अक्ख्या समाजाला मी तो अधिकार दिलाय का हो ? कि कोणीही या आणि हाणून जा ??

राहिला प्रश्न यापूर्वी असे सिनेमे बनलेच नाहीयेत का ? लाख बनलेत पण ते बनलेले … खरे कि खोटे चांगले कि वाईट हा जोपर्यंत माझ्या घरचा प्रश्न होता तोपर्यंत ठीक होतं…… ….एखाद्या अनोळ्खीने येउन तुमच्या घरातली सगळी चांगली जागा लांघून जाउन नेमकी सेप्टिक tank च जगासमोर उघड करावी बाहेरचांनी त्यावर नाक मुरडावे आणि ती इतर कुणाच्या नाही तर माझ्या घरची घाण दाखवली म्हणून घरातल्या माणसाने खुश होऊन नाचावे असा हा भाग झाला अस मला वाटलं ……

आपल्या घरात जेव्हा शेजाऱ्याने सुद्धा डोकावलेले आपल्याला चालत नाही तुमच्या घरात कोण कुठल्या घाणीत लोळत आहे हे जगाला उघड करून दाखवण्याचा अधिकार बाहेरच्याला नाहीच आहे ते सेंट पर्सेंट खरे असले अगदी तरीही …. हो ना ?

तिसरी बाजू … ती एक काल्पनिक कथा आहे …>>>>>>>>>>> मित्रांनो मी या धाग्यात काय लिहिलंय नीट वाचलेले दिसत नाहीये …… जे दाखवला गेलं आहे हेच आमच सत्य आहे यावर अश्याच घटना घडवून आणून आपलीच लोकं शिक्का मोर्तब देखील करत असतात ……

जे आहे ते दिसल्याने किंवा दाखवल्याने किंवा काल्पनिक कथा या प्रमाणे गोवल्याने विपरीत काय होईल माहिती नाही …… पण आपले भलेहि नक्कीच होणार नाहीये ……ज्यात तुमच काहीही भलं नाहीये त्यात खुश होण्याचा काय सेन्स …. म्हणजेच कुणीतरी मेल्याच्या टाळू वरचं लोणी खातंय …. आणि फक्त टाळू भारतीय आहे म्हणून आपण खुश होतोय … Lol कसली भन्नाट आपली विचारांची पोच ….

प्रश्न आपल्या देशप्रेमी किंवा देशद्रोही होण्याचा नाहीये … आपल्या विचारांच्या तोक्डेपनाचा आहे ….मानसिक आनंदाच्या कल्पना किती निम्न स्तरीय आहेत …. मुख्य मुद्दा हा आहे …….

चमन,

१.
>> "वन्स अपॉन अ टाईम ईन अमेरिका" पाहिला आहे का? तुम्ही कुठला तरी हॉलिवुड सिनेमा पाहिला
>> आहे का ह्याचीच आता शंका यायला लागलीये.

तुमची शंका रास्त आहे. माझा हॉलीवूडचा या बाबतीतला आवाका अगदीच किरकोळ आहे. माझी ओळख एकदा सांगितली होती. परत सांगतो.

कुण्या पाश्चात्य दिग्दर्शकाला भारतावर चित्रपट काढावासा वाटतोय. तेव्हा त्याला झोपडपट्टीची आठवण येऊ नये, असं वाटणारा एक भारतीय माणूस एव्हढीच माझी ओळख आहे. इथे पाश्चात्यच्या जागी देशी दिग्दर्शक असला तरी चालेल.

हॉलीवूडचा व्यासंग माझ्या या ओळखीच्या अंतर्गत मोडत नाही. मी एक सर्वसामान्य भारतीय माणूस आहे.

२.
>> दोन चार अज्ञ लोकांनी तुम्हाला तुमच्या देशाबद्दल काही प्रश्न विचारले तर तुम्ही त्याला 'भारताचे
>> नकारात्मक चित्रण म्हणताये होय?

प्रश्न केवळ चित्रणाचा नाहीये. पेशवा म्हणतात तसा एक झुकाव (bias) नकळतपणे निर्माण होतो.

३.
>> मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे तो भावनेच्या भरात लिहिलेला लेख आहे आणि त्यात
>> सारासार विचाराची वानवा आहे. त्यांनी नमूद केलेली माहितीही एकतर चुकीची नाहीतर अपुरी आहे.
>> आणि अश्या माहितीवर तुम्ही आपल्या मतांचे ईमले बनवत आहात.

लेखिकेने एक प्रश्न विचारला आहे : आपल्या आनंदाच्या कल्पना किंवा विचारांची उंची किती तोकडी किती निम्नस्तरीय असावी …

यातला तोकडी आणि निम्नस्तरीय हे आरोपदर्शक शब्द काढून टाकूया. आनंदाच्या कल्पना आणि विचारांची उंची काय असावी, असा मग प्रश्न होतो. सारासार विचारांची वानवा असलेल्या लेखात असा प्रश्न संभवतो का?

तसंही पाहता लेखात असत्य असं काय लिहिलंय? तरीही आपण त्याला सारासार विचारांची वानवा असलेला म्हणत असाल, तर नेमका हाच आरोप स्लमि वरही होऊ शकतो. भारतीय आणि भारतीय वंशाच्या लोकांच्या प्रतिक्रिया इथे पाहायला मिळतील (इंग्रजी दुवा).

वरील दुव्यात प्रियदर्शन या निर्माता व दिग्दर्शकाने म्हंटलंय की : the Westerners loved it. All the Indian[s] hated it. स्लमि हा चुकीच्या धारणेवर आधारलेला चित्रपट आहे, तर मग तो आवडलेले बहुसंख्य पाश्चात्य लोक अपुर्‍या किंवा चुकीच्या माहितीवर मतांचे इमले बनवीत आहेत असं म्हणायला पाहिजे.

४.
>> मग १९८८ पासून आजपर्यंत अश्या सिनेमांनी भारताबद्दल नकारात्मक मत बनवले की नाही तुम्हीच सांगा.

हो आहेच. तेच नेमकं माझं दुखणं आहे.

आ.न.,
-गा.पै.

माझा मुद्दा हा आहे कि माझे भावंड मला शिव्या घालत असतील किंवा गालात हाणत असतील म्हणजे अक्ख्या समाजाला मी तो अधिकार दिलाय का हो ? कि कोणीही या आणि हाणून जा ?? >>
जे आहे ते दिसल्याने किंवा दाखवल्याने किंवा काल्पनिक कथा या प्रमाणे गोवल्याने विपरीत काय होईल माहिती नाही …… पण आपले भलेहि नक्कीच होणार नाहीये ……ज्यात तुमच काहीही भलं नाहीये त्यात खुश होण्याचा काय सेन्स …. म्हणजेच कुणीतरी मेल्याच्या टाळू वरचं लोणी खातंय …. आणि फक्त टाळू भारतीय आहे म्हणून आपण खुश होतोय … कसली भन्नाट आपली विचारांची पोच …. >>>>>
अतिशय पथेटिक अ‍ॅनालॉजी आणि पुन्हा अपुरी माहिती आणि अज्ञान प्रदर्शन. अहो ताई हे प्रॉब्लेम जगाला कळाले, आपलं सरकार त्याबाबतीत काही करत नाही, तेव्हाच बिल-मेलिंडा गेट्स सारखे हजारो फाऊंडेशन्सही आलेना मदतीला. तेव्हा नाही तुम्ही धागे ऊघडलेत "आम्ही आमचं निस्तरून घेऊ तुमच्या मदतीमुळे जगात आमची ईमेज खराब होतेय. " मदर तेरेसांना नोबेल मिळाले तेव्हा नाही तुम्ही खजील झालात," अरेरे जगासमोर भारतात कुष्ठरोगी आहेत ते ऊघडे पडले". बाबा आमटेंना मॅगेसेसे मिळाले तेव्हाही तुम्हाला फार लाजिरवाणे वाटले असेल नाही. जय हो तुमच्या ह्या दुटप्पी विचारसरणीची.

माझ्या घरची घाण दाखवली म्हणून घरातल्या माणसाने खुश होऊन नाचावे असा हा भाग झाला अस मला वाटलं …… >>> प्रचंड गैरसमज झालाय तुमचा. रहमान वगैरे मंडळींना मानाचा ऑस्कर मिळाला त्याबद्दल खुषी झाली रसिक लोकांना. सिनेमात हाय डेफीनेशन कॅमेर्‍यातून आमचे स्लम बघता आले म्हणून नाही. स्लम बघून खुष होऊन नाचणारा माणूस ह्या जगात तुम्हाला कुठे सापडल्यास तू विकृत आहेस असे ठणकाऊन सांगा.

आपल्या घरात जेव्हा शेजाऱ्याने सुद्धा डोकावलेले आपल्याला चालत नाही तुमच्या घरात कोण कुठल्या घाणीत लोळत आहे हे जगाला उघड करून दाखवण्याचा अधिकार बाहेरच्याला नाहीच आहे ते सेंट पर्सेंट खरे असले अगदी तरीही …. हो ना ? >> अच्छा तुम्हाला घाणीत लोळण्याचा प्रॉब्लेम नाहीये पण जगाने तुम्हाला लोळतांना बघितल्याचा आहे. पुन्हा एकदा जय हो!

तुमच्या एका प्रतिसादात तुम्ही किमान तीन तरी मुद्दे मांडून 'माझा मुद्दा आहे की' असे म्हंटले. तुम्ही पहिले तुमचा मुद्दा नक्की करा. सिनेमामुळे तुम्हाला नक्की कसले दु:ख आणि कसला त्रास झाला आहे हे आधी तुम्ही नक्की करा.

कुण्या पाश्चात्य दिग्दर्शकाला भारतावर चित्रपट काढावासा वाटतोय. तेव्हा त्याला झोपडपट्टीची आठवण येऊ नये, असं वाटणारा एक भारतीय माणूस एव्हढीच माझी ओळख आहे. इथे पाश्चात्यच्या जागी देशी दिग्दर्शक असला तरी चालेल. >> अहो पण कथा झोपडपट्टीतल्या मुलाची आहे ना राव. मग ती झोपडपट्टीतूनच नाही का चालू होणार. सिनेमात मोठे मोठे कॉल सेंटर्स, फाईव स्टार हॉटेल, पन्नास मजली बिल्डिंग, मोठे बंगले, मोठ्या टीवी कार्यक्रमाचा स्टुडिओ, महागड्या गाड्या पण आहेत. गेला बाजार भारताची शान ताजमहाल सुद्धा दाखवला आहे. ना राव. असं काय करता? तुम्ही नुसती झोपडपट्टीच घेऊन बसलायेत. तुम्हाला पूर्ण सिनेमात तेचढीच दिसली का? तुमचीच अ‍ॅनालॉजी तुमच्यावर बुमरँग झाली बघा.

हॉलीवूडचा व्यासंग माझ्या या ओळखीच्या अंतर्गत मोडत नाही. मी एक सर्वसामान्य भारतीय माणूस आहे>> मग कशाला सिनेमांमध्ये ज्यू असा दाखवला आहेका वगैरे फुटकळ मुद्दे मांडत बसला आहात.?

प्रश्न केवळ चित्रणाचा नाहीये. पेशवा म्हणतात तसा एक झुकाव (bias) नकळतपणे निर्माण होतो >> भारतात काय चालले आहे आणि भारत देश कसा आहे ह्याबद्दल मत बनवण्यासाठी करोडो वेबसाईट्स, टीवी चॅनल्स आणि पुस्तकं आणि ईतर मिडीया हाताच्या बोटांवर ऊपलब्ध आहेत, त्यात एका सिनेमाने कुठल्याही मतांतराची त्सुनामी येत नाहीये की एका सिनेमामुळे कुणी भारतीयांच्या विरुद्ध प्रोवोक होत नाहीये. फुकटची काळजी सोडून द्या.

the Westerners loved it. All the Indian[s] hated it. >> आपण वाद घालत आहोत ह्याचाच अर्थ हे वाक्य खरं नाहीये असा होतो की नाही. तुम्ही तो सिनेमा म्हणून, एका परिस्थितीशी झगडणार्‍या मुलाची कथा म्हणून बघा की, ऊगीच जगाला भारतातल्या घाणीचं दर्शन घडवून भारताची नाचक्की करण्यासाठी काढलेली फिल्म असा गहन अर्थबोध करवून घेता आहात.हां सिनेमाच्या निर्मितीमूल्य आणि ईतर टेक्निकल बाबींवर नक्कीच वाद घालता येऊ शकतो आणि तिथे निश्चित मतभिन्नता असू शकते.

हो आहेच. तेच नेमकं माझं दुखणं आहे.
>> मग हवं तेवढं कण्हत बसा. अजून काय म्हणणार?

एक फुकटचा सल्ला देऊ का? ऊत्तर कोरियाचे नागरिक व्हा. आत काय चाललंय त्याचा बाहेरच्या जगाला आजिबात थांगपत्ता लागणार नाही. Happy

>>>तुम्ही नुसती झोपडपट्टीच घेऊन बसलायेत. तुम्हाला पूर्ण सिनेमात तेचढीच दिसली का? तुमचीच अ‍ॅनालॉजी तुमच्यावर बुमरँग झाली बघा. <<<

त्यांनी सिनेमा बघितलाच नसल्याचे वर कोठेतरी नमूद केले आहे. म्हणजेच फक्त सिनेमाचे नाव आणि चार टाळक्यांच्या जालावर झडलेल्या फुकाच्या चर्चा यावर प्रतिक्रिया बेतलेल्या असाव्यात. तेव्हा तुमचा मूळ प्रश्न, 'सिनेमात तेवढीच (झोपडपट्टी) दिसली का' अप्रस्तूत आहे.

मयी यांचे एकूण लिखाण भरकटलेले वाटते. तरीदेखिल 'विचारांच्या तोक्डेपनाचा प्रश्न' आणि 'मानसिक आनंदाच्या निम्न स्तरीय कल्पना' यावर तळ्मळीने बोल्ले पाय्ज्ये.

चमन,

१.
>> आपलं सरकार त्याबाबतीत काही करत नाही, तेव्हाच बिल-मेलिंडा गेट्स सारखे हजारो फाऊंडेशन्सही
>> आलेना मदतीला. तेव्हा नाही तुम्ही धागे ऊघडलेत "आम्ही आमचं निस्तरून घेऊ तुमच्या मदतीमुळे जगात
>> आमची ईमेज खराब होतेय. "

हा विचार माझ्याही मनात आला होता. पण त्यावेळी आंतरजालावर व्यासपीठे उपलब्ध नव्हती.

जपानने कोबे भूकंपाच्या वेळी मदत नाकारली होती. फार काय फुकुशिमाबद्दल जपानी सरकारने सुरवातीचे तीन महिने डेटा दाबून ठेवला होता (योग्यायोग्य काय ही बाब वेगळी). भारताचं एक उदाहरण आहे. २००४ डिसेंबरातल्या त्सुनामीच्या वेळी १०००० भारतीय बुडून मेलेले असतांनाही भारत सरकारने ५० खाटांचं नाविक रुग्णालय इंडोनेशियाला पाठवलं होतं. घटना वाईट असली तरी भरत सरकारचा प्रतिसाद अभिमानास्पद होता.

स्लमि मधल्या भारतीय कलाकारांचं वर्तन पाहता गांभीर्याचा अभाव सतत जाणवत राहतो.

२.
>> बाबा आमटेंना मॅगेसेसे मिळाले तेव्हाही तुम्हाला फार लाजिरवाणे वाटले असेल नाही. जय हो तुमच्या
>> ह्या दुटप्पी विचारसरणीची.

स्लमि मधले कलाकार बाबा आमट्यांसारखे सेवाभावी नाहीत.

३.
>> प्रचंड गैरसमज झालाय तुमचा. रहमान वगैरे मंडळींना मानाचा ऑस्कर मिळाला त्याबद्दल खुषी झाली

गैरसमज झालेला नाहीये. फक्त भास झालाय! Happy

कलाकारांना ऑस्कर मिळालं याचा आनंद साजरा करतांना थोडं गांभीर्य पाळायला हवं होतं.

४.
>> अच्छा तुम्हाला घाणीत लोळण्याचा प्रॉब्लेम नाहीये पण जगाने तुम्हाला लोळतांना बघितल्याचा आहे.
>> पुन्हा एकदा जय हो!

आम्ही घाणीत लोळणे ही एकमेव क्रिया करण्यालायक आहोत, असा अर्थ सूचित होतोय. ही समस्या आहे.

५.
>> सिनेमामुळे तुम्हाला नक्की कसले दु:ख आणि कसला त्रास झाला आहे हे आधी तुम्ही नक्की करा.

काल रात्री पहिला बरंका मी स्लमि. मला झालेले त्रास (महत्तेच्या उतरत्या क्रमाने) :

१. ऑस्करच्या उल्हासोत्सवात भारतीय कलाकारांचे व प्रसारमाध्यमांचे गांभीर्य नसणे.
२. चित्रणातून भारताची एकांगी प्रतिमा उभी राहते.
३. काही चित्रण वस्तुस्थितीला धरून नाही.

६.
>> अहो पण कथा झोपडपट्टीतल्या मुलाची आहे ना राव. मग ती झोपडपट्टीतूनच नाही का चालू होणार.

अगदी बरोबर. म्हणूनच झोपडपट्टीची आठवण न येऊ देणे हा एकमेव उपाय आहे. हा उपाय दीर्घकालीन आहे.

७.
>> सिनेमात मोठे मोठे कॉल सेंटर्स, फाईव स्टार हॉटेल, पन्नास मजली बिल्डिंग, मोठे बंगले, मोठ्या
>> टीवी कार्यक्रमाचा स्टुडिओ, महागड्या गाड्या पण आहेत. गेला बाजार भारताची शान ताजमहाल सुद्धा
>> दाखवला आहे. ना राव. असं काय करता? तुम्ही नुसती झोपडपट्टीच घेऊन बसलायेत. तुम्हाला पूर्ण
>> सिनेमात तेचढीच दिसली का? तुमचीच अ‍ॅनालॉजी तुमच्यावर बुमरँग झाली बघा.

छापा पडला तर मी जिंकलो, आणि काटा पडला तर तुम्ही हरलात. बघा या वाक्यात छापा-काटा, मी-तुम्ही, जिंकणे-हरणे सार्‍या जिन्नसांना स्थान आहे. पण अर्थ काय सूचित होतो? Wink

८.
>> मग कशाला सिनेमांमध्ये ज्यू असा दाखवला आहेका वगैरे फुटकळ मुद्दे मांडत बसला आहात.?

अमेरिकेस नाजूक जागा आहेत हे प्रतिपादन करण्यासाठी. तशाच भारताच्याही नाजूक जागा असू शकतात.

९.
>> भारतात काय चालले आहे आणि भारत देश कसा आहे ह्याबद्दल मत बनवण्यासाठी करोडो वेबसाईट्स,
>> टीवी चॅनल्स आणि पुस्तकं आणि ईतर मिडीया हाताच्या बोटांवर ऊपलब्ध आहेत, त्यात एका सिनेमाने
>> कुठल्याही मतांतराची त्सुनामी येत नाहीये की एका सिनेमामुळे कुणी भारतीयांच्या विरुद्ध प्रोवोक होत
>> नाहीये. फुकटची काळजी सोडून द्या.

एव्हढ्या कोट्यावधी मार्गांपैकी केवळ एका सिनेमाला अमाप प्रसिद्धी मिळाली. तो चित्रपट नेमका भारताचं विपर्यस्त चित्र सूचित करतो आहे. म्हणून काळजी वाटते.

१०.
>> तुम्ही तो सिनेमा म्हणून, एका परिस्थितीशी झगडणार्‍या मुलाची कथा म्हणून बघा की, ऊगीच जगाला
>> भारतातल्या घाणीचं दर्शन घडवून भारताची नाचक्की करण्यासाठी काढलेली फिल्म असा गहन अर्थबोध
>> करवून घेता आहात.

परिस्थितीशी झगडणार्‍या मुलाची कथा म्हणून चित्रपट बघणे मला शक्य आहे. मात्र सर्वांचाच तो दृष्टीकोन असेल असं नाही. दिग्दर्शकाला दाखवायचंय एक आणि प्रेक्षक भलताच अर्थ काढतात.

११.
>> मग हवं तेवढं कण्हत बसा. अजून काय म्हणणार?

आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. पण कण्हत बसल्याने फारसं काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा मायबोलीवर वादविवाद करावा की. Proud

१२.
>> एक फुकटचा सल्ला देऊ का? ऊत्तर कोरियाचे नागरिक व्हा. आत काय चाललंय त्याचा बाहेरच्या
>> जगाला आजिबात थांगपत्ता लागणार नाही. Happy

भारतीय कलाकारांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या हर्षोल्हासात गांभीर्याचा अभाव असणे ही मुख्य समस्या आहे. मी उत्तर कोरियाचं नागरिकत्व घेतल्याने ही समस्या कशीकाय सुटेल बरे? Wink

आ.न.,
-गा.पै.

अहो गा पै,शेवटी काल हा सिनेमा पाहणार होतात तो पाहिलात ना!
आम्हाला आमच्या रात्रभर तुम्ही हा सिनेमा तुमच्या रात्रीत पाहिलात की नाही या विचाराने झोप लागली नाही.
Wink

हा विचार माझ्याही मनात आला होता. पण त्यावेळी आंतरजालावर व्यासपीठे उपलब्ध नव्हती. >> हो पण, डाक्/पोस्त/ट्पाल/ ईमेल/ फोन पत्र लिहून का होईना कोणीतरी कळवलंच ना बाहेर, भारतात अमुक तमुक आहे म्हणून? झालीच ना मग नाचक्की.

जपानचा काय संबंध ईथे?

स्लमि मधले कलाकार बाबा आमट्यांसारखे सेवाभावी नाहीत. >> निम्मे कलाकार झोपडपट्टीतले आहेत त्या बिचार्‍यांचे खायचे वांदे ते कसे काय सेवाभाव दाखवणार? ऊरलेल्या स्टारकास्टने मिळालेल्या मानधनातून काय आणि किती सेवाभाव केला हे तुम्ही थोडं ईंटरनेट चाळलं तर कळेल. तुमच्या शोधासाठी ही खालची लाईन एक सुरुवात.

Slumdog Millionaire makers donate £500,000 to Mumbai charity.

कलाकारांना ऑस्कर मिळालं याचा आनंद साजरा करतांना थोडं गांभीर्य पाळायला हवं होतं >> म्हणजे? ऑस्कर सेरेमोनीला स्लममधल्यासारखी वेशभुषा करून जायची की ऑस्करची बाहुली खालमानेनं आणि जमल्यास तोंडाला काळं फडकं बांधून घ्यायची?

आम्ही घाणीत लोळणे ही एकमेव क्रिया करण्यालायक आहोत,असा अर्थ सूचित होतोय. >> कुणाला? तुम्हाला की तुमच्या सभोवतालच्या परदेशी लोकांना?

काल रात्री पहिला बरंका मी स्लमि. मला झालेले त्रास (महत्तेच्या उतरत्या क्रमाने) :

१. ऑस्करच्या उल्हासोत्सवात भारतीय कलाकारांचे व प्रसारमाध्यमांचे गांभीर्य नसणे.
२. चित्रणातून भारताची एकांगी प्रतिमा उभी राहते.
३. काही चित्रण वस्तुस्थितीला धरून नाही.>>>
१. हो? ऑस्कर सोहळा तुम्हाला सिनेमात दिसला?
२. अहो महाराज सिनेमाची कथा भारतातल्या एका गरीब मुलाची आहे 'भारत दर्शन' कॅलिडोस्कोप, केल्याने देशाटन, भारत एक खोज, अशी काही फिल्म नाहीये ती भारताचं चित्र ऊभं रहायला !
३. हो वस्तुस्थितीपेक्षा कमीच दाखवलं नाही? राम तेरी गंगा मैली, मंदिरातल्या चेंगराचेंगरी, वारी गेल्यानंतरचे पुण्याचे फोटो हे दाखवायचं राहिलंच की.

अगदी बरोबर. म्हणूनच झोपडपट्टीची आठवण न येऊ देणे हा एकमेव उपाय आहे. हा उपाय दीर्घकालीन आहे. >>> त्या ऊपायांचा सिनेमाशी काय संबंध? करा की ऊपाय? सिनेमाने ऊपाय करायला आडकाठी केलीये का?

छापा पडला तर मी जिंकलो, आणि काटा पडला तर तुम्ही हरलात. बघा या वाक्यात छापा-काटा, मी-तुम्ही, जिंकणे-हरणे सार्‍या जिन्नसांना स्थान आहे. पण अर्थ काय सूचित होतो? >> हेच की तुम्ही तुमच्याच पायांत पाय अडकून पडलात.

अमेरिकेस नाजूक जागा आहेत हे प्रतिपादन करण्यासाठी. तशाच भारताच्याही नाजूक जागा असू शकतात. >> अहो पण जे आहे ते दाखवणे ह्यात कसले आलेय नाजूक आणि साजूक. फ्रीडम ऑफ स्पीच आहे राव. तुम्ही पण बनवा की अमेरिकतल्या गे लोकांच्या राईटसची काही लोकांकडून कशी पायममल्ली होतेय ह्यावर फिल्म. तुम्हाला कोणी अडवलेय का? तुम्ही लंडनवरच्या परवा झालेल्या हिंसाचारावर फिल्म बनवु शकता. कोणी अडवलेय का? नाजूक जागा -- काय पण एकेक अ‍ॅनालॉजी आहेत तुमच्या.

एव्हढ्या कोट्यावधी मार्गांपैकी केवळ एका सिनेमाला अमाप प्रसिद्धी मिळाली. तो चित्रपट नेमका भारताचं विपर्यस्त चित्र सूचित करतो आहे. म्हणून काळजी वाटते. >> विपर्यस्त? कुठवर फसवणार आहात स्वतःलाच? आणि धारावी दाखवली म्हणजे भारत दाखवणं असतं का हो? मग भारत बघायला आलेल्याने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून दिसणारा तुमचा भारत बघितला की त्याचे भारतभ्रमण झालेच की.

भारतीय कलाकारांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या हर्षोल्हासात गांभीर्याचा अभाव असणे ही मुख्य समस्या आहे. >>> अहो आता कितीवेळा तुमची मुख्य समस्या बदलणार आहे? ऑस्कर सोहळा कलाकृतीला पुरस्कार देण्यासाठी होता आणि त्याच्यानंतरचा हर्षोल्हास कलाकृतील पुरस्कार मिळाला म्हणून. भारतातले स्लम दाखवले म्हणून पुरस्कार मिळणार असता तर लग्नात विडीओ कॅसेट बनवणार्‍या कॅमेरामनने नाही स्लम शूट करून पाठवले असते?
स्लमवर सिनेमा का बनवला ईथपासून ऑस्कर सोहळ्यात गंभीर नव्हते ईथपर्यंत तुमची मुख्य समस्या हजार वेळा बदलून झालीये. मायबोलीकर वाचत आहेत ध्यानात असू द्या.

चमन,
अभिनंदन!
गापैंना पिन डाउन करायला पहाताहात. अहो तेल लावलेला पैलवान एकवेळ चितपट मारता येईल. किमाण तो खरी कुस्ती खेळत असतो. Wink गापै कठीण आहेत. आत्ता १०-१५ मिन्टात लंबा चौडा प्रतिसाद येईल तुमच्या प्रत्येक वाक्यास बगल देणारा Proud

ऑस्कर सोहळा कलाकृतीला पुरस्कार देण्यासाठी होता आणि त्याच्यानंतरचा हर्षोल्हास कलाकृतील पुरस्कार मिळाला म्हणून<<< +१

रहमान हा जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक आहे हे आम्हाला आधीपासून माहित होते. बाफ्ता, गोल्डन ग्लोब आणि ऑस्करमुळे इतर जगाला माहित पडले. आणि हो, रहमानने ऑस्करच्या स्टेजवर जाऊनदेखील तमिळमधून भाषण केले हे गापैंना अद्याप ठाऊक नाही का?

चमन,

१.
>> जपानचा काय संबंध ईथे?

तुम्ही एके ठिकाणी म्हणालात की "आम्ही आमचं निस्तरून घेऊ तुमच्या मदतीमुळे जगात आमची ईमेज खराब होतेय. ". या आआनिघे धोरणाच्या मर्यादा स्पष्ट व्हाव्यात म्हणून जपानचं उदाहरण दिलं. आपली स्वत:ची देशांतर्गत शक्ती कमी पडल्यास बाहेरून मदत मिळत असेल तर घ्यावी. फुकुशिमाच्या वेळी जपानने तशी मदत घेण्यात हयगय केली. कोबे भूकंपाच्या वेळी राबवलेलं आआनिघे धोरण फुकुशिमाच्या वेळी घातक ठरलं.

२.
>> झालीच ना मग नाचक्की.

हो झालीये. पण तेव्हा आंतरजाल उपलब्धी कमी असल्याने विस्तृत चर्चा करता आली नाही. तुम्ही विचारलं होतं की तेव्हा धागे का उघडले नाहीत. याचं उत्तर मी दिलंय.

स्वत:ची शक्ती कमी पडल्यामुळे बाहेरची मदत स्वीकारली तर नाचक्की होत नाही. परंतु भारतीय सरकार काहीही न करता स्वस्थ बसतं. मला भारताची स्वत:च्या समस्या स्वत:च सोडवायची शक्ती वाढलेली बघायला आवडेल.

३.
>> निम्मे कलाकार झोपडपट्टीतले आहेत त्या बिचार्‍यांचे खायचे वांदे ते कसे काय सेवाभाव दाखवणार?

बाबा आमट्यांच्या मॅगसेसे पुरस्काराचं उदाहरण तुम्ही दिलंत. मी आमटे आणि स्लमि कलाकार यांच्यातला फरक सांगितला. सेवाभावी मनुष्याचं उदाहरण सेवाभावी नसलेल्या मनुष्याला लागू पडत नाही. स्लमि चे कलाकार का सेवाभावी नाहीत हा प्रश्न वेगळा आहे.

४.
>> ऊरलेल्या स्टारकास्टने मिळालेल्या मानधनातून काय आणि किती सेवाभाव केला हे तुम्ही थोडं
>> ईंटरनेट चाळलं तर कळेल. तुमच्या शोधासाठी ही खालची लाईन एक सुरुवात.
>> Slumdog Millionaire makers donate £500,000 to Mumbai charity.

भारताचं विपर्यस्त चित्रण व्हायचं ते झालंच, वर देणगी देऊन उपकारही झाले नाही का भारतीय समाजावर! अर्थात, हा मला झालेला बोध आहे. तुम्हाला तसा झाला पाहिजे असा आग्रह मी घरु शकत नाही.

५.
>> म्हणजे? ऑस्कर सेरेमोनीला स्लममधल्यासारखी वेशभुषा करून जायची की ऑस्करची बाहुली
>> खालमानेनं आणि जमल्यास तोंडाला काळं फडकं बांधून घ्यायची?

हो. काय हरकत आहे! महात्मा फुले इंग्लंडच्या राजाला भेटायला गेले तेव्हा ऐटबाज पोशाख करून जायची पद्धत होती. मात्र फुले आपल्या देशी अवतारातच भेटीला गेले.

तुम्ही म्हणता तसं काळं फडकं बांधून गेले असते आपले कलाकार, तर या कृत्याची ताबडतोब दखल घेतली गेली असती. आजच्या घडीला ४ वर्षांनी आपण (दोघे) जे विचारमंथन करतोय ते त्याचवेळी लगोलग सुरू झालंही असतं कदाचित. मी आशावादी आहे.

६.
>> कुणाला? तुम्हाला की तुमच्या सभोवतालच्या परदेशी लोकांना?

आम्ही घाणीत लोळणे ही एकमेव क्रिया करण्यालायक आहोत,असा अर्थ सर्वसामान्य परदेशी प्रेक्षकाला सूचित होतोय.

७.

७.१
>> हो? ऑस्कर सोहळा तुम्हाला सिनेमात दिसला?

अहो, आता काय सांगायचं तुम्हाला! चित्रपट बघून पूर्ण झाल्यावर ऑस्कर सोहोळा आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेल उदोउदो परत आठवला.

७.२
>> अहो महाराज सिनेमाची कथा भारतातल्या एका गरीब मुलाची आहे 'भारत दर्शन' कॅलिडोस्कोप,
>> केल्याने देशाटन, भारत एक खोज, अशी काही फिल्म नाहीये ती भारताचं चित्र ऊभं रहायला !

असेलही तसं. पण चित्रपटात संवाद आहे की India is centre of the world and I am at the centre of the centre, Bhai! भले स्लमि ही भारत एक खोज सारखी फिल्म नसेल, पण सर्वसामान्य परदेशी प्रेक्षकाच्या मनात नकळत एक झुकाव (bias) उत्पन्न होतोच की.

७.३
>> हो वस्तुस्थितीपेक्षा कमीच दाखवलं नाही? राम तेरी गंगा मैली, मंदिरातल्या चेंगराचेंगरी, वारी
>> गेल्यानंतरचे पुण्याचे फोटो हे दाखवायचं राहिलंच की.

विषयांतर.

८.
>> त्या ऊपायांचा सिनेमाशी काय संबंध? करा की ऊपाय?

करतोच आहोत. त्यासाठी जनमानस पालटलं पाहिजे. तुमच्याशी वादविवाद करून तेच साध्य करू पाहतोय मी.

९.
>> सिनेमाने ऊपाय करायला आडकाठी केलीये का?

नाही. पण मी सिनेमातत्ज्ञ नाही. माझ्या धडपडीतून कोणी दिग्दर्शकाने स्फूर्ती घेतल्यास मला आवडेल!

१०.
>> हेच की तुम्ही तुमच्याच पायांत पाय अडकून पडलात.

तुमच्या मूळ संदेशातून सूचित होणरा अर्थ बरोब्बर ओळखलात! अभिनंदन!

११.
>> अहो पण जे आहे ते दाखवणे ह्यात कसले आलेय नाजूक आणि साजूक. फ्रीडम ऑफ स्पीच आहे राव.
>> तुम्ही पण बनवा की अमेरिकतल्या गे लोकांच्या राईटसची काही लोकांकडून कशी पायममल्ली होतेय
>> ह्यावर फिल्म. तुम्हाला कोणी अडवलेय का? तुम्ही लंडनवरच्या परवा झालेल्या हिंसाचारावर फिल्म
>> बनवु शकता. कोणी अडवलेय का? नाजूक जागा -- काय पण एकेक अ‍ॅनालॉजी आहेत तुमच्या.

इथे एक विधान सापडलं :

>> Say an Indian director travelled to New Orleans for a few months to film a movie about
>> Jamal Martin, an impoverished African American who lost his home in Hurricane Katrina,
>> who once had a promising basketball career, but who -- following a drive-by shooting --
>> now walks with a permanent limp, whose father is in jail for selling drugs, whose mother
>> is addicted to crack cocaine, whose younger sister was killed by gang-violence, whose
>> brother was arrested by corrupt cops, whose first born child has sickle cell anaemia, and
>> so on. The movie would be widely panned and laughed out of theatres.

अमेरिकेत जे घडू शकतं ते भारतात का घडत नाही, हा प्रश्न आहे. स्लमि ला उत्तर म्हणून हास्यास्पद चित्रपट निर्माण करायचा, हे मला पटत नाही.

१२.
>> विपर्यस्त? कुठवर फसवणार आहात स्वतःलाच? आणि धारावी दाखवली म्हणजे भारत दाखवणं असतं
>> का हो? मग भारत बघायला आलेल्याने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून दिसणारा तुमचा भारत बघितला
>> की त्याचे भारतभ्रमण झालेच की.

स्लमि मधलं विपर्यस्त चित्रण काय आहे ते इथे सापडेल : http://en.wikipedia.org/wiki/Reactions_from_India_and_the_Indian_diaspor...

१३.
>> भारतातले स्लम दाखवले म्हणून पुरस्कार मिळणार असता तर लग्नात विडीओ कॅसेट बनवणार्‍या
>> कॅमेरामनने नाही स्लम शूट करून पाठवले असते?

विपर्यस्त चित्रण केलेल्या सिनेमाला डोक्यावर चढवून ठेवलं जातंय. त्याकडे डोळेझाक करून झोपडपट्टीच्या चित्रणाला पुरस्कार दिला नाही अशी मखलाशी चालली आहे!

१४.
>> स्लमवर सिनेमा का बनवला ईथपासून ऑस्कर सोहळ्यात गंभीर नव्हते ईथपर्यंत तुमची मुख्य
>> समस्या हजार वेळा बदलून झालीये. मायबोलीकर वाचत आहेत ध्यानात असू द्या.

असेनाका! मला काय बघायला आवडेल ते इथे सांगितलं आहे. ते उद्दिष्ट परत सांगतो.

>> कुण्या पाश्चात्य (वा देशी) दिग्दर्शकाला भारतावर चित्रपट काढावासा वाटतोय. तेव्हा त्याला झोपडपट्टीची
>> आठवण येऊ नये, असं झालेलं मला बघायला आवडेल. असं वाटणारा एक भारतीय नागरिक हीच माझी
>> ओळख (आयडेंटिटी) समजा.

गलिच्छ वस्तीवर चित्रपट का बनवला ही मुख्य समस्या म्हणून धरली तर त्यावर दिग्दर्शकाची मुंबईशी अपरिचितता हे कारण पुढे करता येऊ शकेल. अशी सूट घेतल्यास भारतीय कलाकारांचं आणि प्रसारमाध्यमांचं गांभीर्यहीन वर्तन ही मुख्य समस्या बनते.

मुख्य समस्या हा एक छाप (लेबल) आहे. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वेगवेगळी अंगे मुख्य समस्या म्हणून दिसू शकतात. विविध अंगांवर ठरवलेले उपाय वरील उद्दिष्टाशी सुसंगत असावेत, एव्हढीच अपेक्षा आहे.

आ.न.,
-गा.पै.

Pages