Slumdog कि Millionaire ??

Submitted by मी मी on 20 May, 2013 - 12:59

Slumdog Millionaire बघून बाहेर पडतांना एक अनामिक उदासी दाटली होती मनात … भोवताल ची सर्व गर्दी सिनेमाच्या कौतुक सोहळ्यात मग्न असतांना माझ मन मात्र अजिबातच खुश नव्हतं …. कलाकारांचा अभिनय सोडता या सिनेमात पाहिलेली कुठली तरी बाब किंवा मग सगळंच काही आपल्याला खटकतंय अस सारखं जाणवत होतं ……
त्यानंतर सिनेमाचं जागतिक स्तरावर झालेलं कौतुक, आंतराष्ट्रीय पातळीचे अवार्डस, फिल्मच्या कलाकारांचे कौतुक, भारतीय संगीताची जगात वाढती ओढ आणि सन्मान या सर्वात देश डुंबून गेला …
खरा मुद्दा मात्र राहिला बाजूलाच ……

भारतीय कलाकार किंवा भारतीय संगीत एखाद्या पाश्चिमात्य सिनेमात वापरल गेलं आहे फक्त एवढीच एक बाब आपल्यासाठी समाधानाची किंवा आनंदाची गोष्ट कशी राहू शकते ?
म्हणजे सिनेमात भारतीय कलाकाराला भिक मागतांना का दाखवले नसेल पण तो भिकारी भारतीय आहे एवढ्यावर आपण आनंद मानून चक्क सेलिब्रेशन्स करतो ….
आपल्या आनंदाच्या कल्पना किंवा विचारांची उंची किती तोकडी किती निम्नस्तरीय असावी …
नाही ??

काय होते Slumdog Millionaire मध्ये :-

भारतातले ८०% पब्लिक हि स्लम मध्ये राहणारी आहे….
इतकी हपापलेली कि एखाद्या हिरो ला पाहायला घाणीच्या डबक्यात न्हाऊन निघायला तयार (यावर आपण पोटधरून हसलो ….हसलो म्हणजे मान्य केल्यासारखेच … हि बाब अलाहिदा)
स्लम मध्ये राहणारी सगळी मुलं एकतर चोर आणि वाईट प्रवृत्तीची निघतात नाहीतर त्यांना उडवून नेउन त्यांच्या बरोबर क्रूर कर्म करून त्यांना पाकीटमार किंवा भिकारी बनवले जातात ….
त्यातल्या त्यात यातला एखादा चुकून माखून हुशार निघू शकतो यावर बाहेरच्यांना तर सोडा भारतीय पोलिसांना सुद्धा विश्वास बसू शकत नाही ...
आणि इतकी अशक्य कोटीतली बुद्धी त्याने मिळवलीच कुठून
हे जाणून घ्यायला ते अश्या रेअर बुद्धिशाली मुलाला उचलून स्टेशन ला आणतात …….
त्याचा चोपून चुपून रिमांड घेतात ….

राहिलेली २०% जनता हि थोडी श्रीमंत झालेली
पण कशी तर क्रिकेट सारख्या गेम वर सट्टा लावून, किंवा मग मुली सप्लाय करून ….
यांची लाइफ़ स्टायील जी दाखवली आहे ते बघून खरे मानून आपण देखील हळहळलोच ……
त्यात चूक हि काय आहे म्हणा…. जे दाखवलं गेलं तेच भारतीय जीवनाचं सत्य आहे हे आपलेच लोक वेळोवेळी प्रुफ करत असतातच……
IPL सारख्या श्रीमंत खेळात भरगोस पैसा मिळूनही आणि
कितीतरी पटीने बाहेरचे खेळाडू खेळत असतांनाही …
पैशांसाठी आणि मुलींसाठी सट्टा लावून स्वतःचा इमान विकणारे खेळाडू शेवटी भारतीयच तर निघाले … त्यात एकही विदेशी कसा फसला नाही बरे ??….

सत्य परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे …
स्लम मध्ये मजबुरीची जिंदगी जगणारे, सटोरीये, मुलींचे व्यापारी किंवा तत्सम अनेक दयनीय किंवा लाजिरवाणे जिने जगनारयानपेक्षा ….
साधारण चांगल्या प्रतीचे जीवन जगणारे, मेहेनतीने श्रीमंत झालेले, वैचारिक, बुद्धिशाली आणि कोणाच्याही मध्यात न राहणारे मध्यम वर्गीयांची संख्या अनेक पटीने जास्त आहे
पण संख्या जास्त असूनही आपल्या अस्तित्वाची जाणीव याच महत्व नसल्याने
आणि मौन पाळल्यानेच Slumdog Millionaire सारखे सिनेमे
विदेशी निर्माते करू घालतात आणि
आपल्या इज्जतीचा भाजीपाला करून स्वतः इज्जत आणि पैसा कमावतात……

आणि आपले लोक काय करतात …??

आपले(?) लोक दिल्ली सारखे रेप केसेस, विदेशी महिलेंवर होणारे बलात्कार, IPL सट्टा, घोटाळे, भ्रष्टाचार, दंगे यातून त्यांची आपल्या बद्दल झालेली समज किंवा विचारांवर सत्यतेची पक्की मोहोर लावतात …।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैद्यबुवा अनुमोदन!
हा एक मूर्ख सिनेमा आहे आणि तो पाहून भारत असाच आहे असे जर कोण्या परदेशी व्यक्तीला वाटले तर ते ही तितकेच गाढव ठरतात आणि अशा सिनेमाने आपल्या देशाची बदनामी होते हे अत्यंत हास्यास्पद लॉजिक आहे.
खालील परिच्छेद, http://greatbong.net/2008/12/29/slumdog-millionaire-the-review/ येथून साभार!
Let’s say I made a movie about the US where an African-American boy born in the hood, has his mother sell him to a pedophile pop icon, after which he gets molested by a priest from his church, following which he gets tied up to the back of a truck and dragged on the road by KKK clansmen. Then he is arrested and sodomized by a policeman with a rod, after which he is attacked by a gang of illegal immigrants, and then uses these life experiences to win “Beauty and The Geek”.

अमेरिकेत राहणा-या काही भारतियांच्या अशा प्रकारच्या भावना नव्या नाहीत. असे लेख पावसाळ्यात कुत्र्याची छती उगवावी तसे नेमाने उगवत असतात. भावना भडकवणारे आणि भडकणारे यातल्या कुठल्या कॅटॅगरीत धागाकर्ते मोडतात त्याप्रमाणे प्रतिसाद देता येईल. लेखकाने सत्य परिस्थिती म्हणून जे काही दिलंय ते त्याला वाटलं म्हणून. अशा पोकळ देशप्रेमामागे अमेरिकेतले लोक काय म्हणत असतील हा न्यूनगंड आहे. परदेशी लोकांना जे दिसतं ते आपल्याला दिसत नाही हा मुख्य प्रश्न आहे. आपण आपल्या मेंदूचा काही भाग व्यवस्थित बंद करून घेतला आहे. याला कोषावस्था असाही सुंदर शब्द आहे. समोर उकिरडा आहे पण दिसत नाही या अवस्थेला जे पोहोचतात त्यांचा सात्विक संताप हास्यास्पद आहे.

देशप्रेमाचं खरंच भरतं आलं असेल तर विदेशी पर्यटकांना हे चित्र दिसणार नाही याबद्दल काही करता येईल का हे सांगा. जे चित्र सहज व्हिजिबल आहे ते कॅमे-यात बंद केलं म्हणून भडकवाभडकवी थांबवा.

ब-याच वर्षांपुर्वी नर्गिसने 'भारतातील गरिबी परदेशात नेऊन उघडी पाडणा-या' सत्यजित रायांवर टिका केलेली ते आठवले. Happy

देशप्रेमाचं खरंच भरतं आलं असेल तर विदेशी पर्यटकांना हे चित्र दिसणार नाही याबद्दल काही करता येईल का हे सांगा. जे चित्र सहज व्हिजिबल आहे ते कॅमे-यात बंद केलं म्हणून भडकवाभडकवी थांबवा.

+१

स्लमडॉग बघून बरेचजण उदास झाले बिचारे त्यांची अब्रू जगाच्या वेशीवर टांगली गेली.आता आपल्याला नावे ठेवली जातील दुरदेशातले मित्र म्हणतील तुमचा भारत असा कसा गलिछ अशी चिंता समस्त मध्यमवर्गीय आणि श्रीमंत भारतीयांच्या मुखावर दिसू लागलीय. आता ह्या लोकांना भिकारी, झोपडपट्ट्या ह्यांच्याविषयी कळवळा आहे यातला भाग नाही यांना मुख्य चिंता आहे उत्तर काय द्यायचे.भारतात दारिद्र्य अफाट आहे भिकारी ही अफाट आहेत त्याबद्दल कोणाची तक्रार नाही पण जर कोणी येउन त्यांच्याबद्दल चित्रपट काढेल त्यांचे फोटो काढून प्रदर्शन भरवेल तर मात्र ह्यांचा तक्रारीचा सूर लागतो.ह्यांना झाकली मुठ झाकलेलीच ठेवायची असते कारण ह्यांची इज्जत. आता मला एक सांगा आपल्या घरात येउन कोणी घाण केली तर ती झाकून ठेवायची का साफ करायची. माझ्यामते साफ करायची आणि घाण साफ करायची असेल तर घाणीतच उतरावे लागते ह्याला किती जण तयार होतील त्यापेक्षा चित्रपटाला नाक मुरडणे सोप्पे.आम्ही एका झोपडपट्टीत काम करत होतो तेथल्या स्टोऱ्या एकूण नि बघून स्लमडॉग पांचट वाटायला लागला. ज्यांना काही शंका असेल त्यांनी एकाद्या अपंग किवा आंधळ्या भिकारी मुलाला विश्वासात घेऊन विचारले तर जे सत्य बाहेर येईल ते बघा .भिकारी झोपडपट्ट्या ही आपली काळी बाजू आहे आपण पांढरी बाजुच बघण्यात इतके मश्गुल आहोत कि कुणी ह्या काळ्या बाजूची जाणीव करून दिली कि तोच आपल्या संतापाचा धनी होतो.आणि हो महत्वाचे म्हणजे ह्या झोपडपट्टी वासियांना देशाची अस्मिता, आपली पुरातन थोर संस्कृती, इतिहास ह्याबद्दल काहीही घेणे नसते त्यांना एकच चिंता असते पोटाची खळगी भरण्याची.

...dari2.jpgdari3.jpgkuposhan.jpgLE4YIECAL90EV2CA79U4GCCA1L7064CA0CD9KFCA7MZROBCAVJGAISCA7DNLEOCAB6AUY0CADSVX7PCAVS4GW7CAY03LA0CA71W7L4CARTA2BZCAUAZM8CCAGRVI3MCALFD1L3CANAOWPICA904U5OCACXNZ2Z.jpg

पिंटू,

>> ह्यांना झाकली मुठ झाकलेलीच ठेवायची असते कारण ह्यांची इज्जत.

आपला मुद्दा पोहोचला. मात्र हे वाक्य माझ्या बाबतीत लागू पडत नाही. मी निर्लज्ज आहे. मला झाकली मूठबिठ वगैरे काही ठेवायची नाहीये. माझा आक्षेप परत सांगतो. भारतातली गरीबी दाखवून त्यावर पैसे व मानमरातब मिळवावेत का, असा माझा प्रश्न आहे.

आपलं मत ऐकायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

>>भारतातली गरीबी दाखवून त्यावर पैसे व मानमरातब मिळवावेत का, असा माझा प्रश्न आहे.

खुद्द भारतातलेच लोक, तेही निवडून दिलेले, अगदी पशूंच्या चार्‍यातून देखिल तिजोरी भरायचे काम करत आहेत. त्यामूळे चित्रपट काढून, तिकीट लाऊन, एखाद्याने त्यावर पैसा कमावला तर 'व्यावहारीक' हरकत का म्हणून असावी?
भावनिक भाग जर अधोरेखित करायचा असेल, म्हणजे भारताची अशी चुकीची प्रतिमा दाखवणे योग्य आहे का तर, त्यावरही अलिकडच्या दिल्ली बलात्कार, घोटाळे, ई. प्रकरणांनी आधीच काळे फासून ठेवले आहे..

तेव्हा "झाकण्या एव्हडे" मुळात काहीच ऊरलेले नाहीये हे आधी मान्य करावे लागेल..

स्लमडॉग मध्ये खरे तर काल्पनिक बरेच कमी आणि रियालिटी जास्ती दाखवली आहे असे माझे वैयक्तीक मत!

बाकी, भारतातलीच नव्हे तर जगातील यच्चयावत गरीबी, दंगे, जातीय, धार्मीक, प्रांतीक वाद ई. वर अनेक 'ऊद्योग धंदे' वसलेले आहेत- शेवटी कुठल्याही वेष्टनात घालून दिले तरी जे मुळात कडू आहे ते गोड होत नाही.

फक्त पेशवा म्हणतो ते पटले- सारखा तोच एकांगी प्रचार करत राहिल्याने मात्र 'biased' निर्माण व्हायला व पसरायला अधिक मदत होते. त्यातही 'चित्रपट' हे सर्वात अधिक प्रभावी माध्यम असल्याने जनमानसावरील त्याचे परिणाम 'कळत नकळत' दीर्घकालीन स्वरूपाचे होतात.

रच्याकने:
>>आपल्या इज्जतीचा भाजीपाला करून स्वतः इज्जत आणि पैसा कमावतात……

छे छे! आपल्या ईज्ज्जतीचा भाजीपाला आपणच केला आहे त्याचा दोष दुसर्‍यांना नको..

>>फक्त पेशवा म्हणतो ते पटले- सारखा तोच एकांगी प्रचार करत राहिल्याने मात्र 'biased' निर्माण व्हायला व पसरायला अधिक मदत होते. त्यातही 'चित्रपट' हे सर्वात अधिक प्रभावी माध्यम असल्याने जनमानसावरील त्याचे परिणाम 'कळत नकळत' दीर्घकालीन स्वरूपाचे होतात.>>

१००% सहमत.

योग,

>> खुद्द भारतातलेच लोक, तेही निवडून दिलेले, अगदी पशूंच्या चार्‍यातून देखिल तिजोरी भरायचे काम करत
>> आहेत. त्यामूळे चित्रपट काढून, तिकीट लाऊन, एखाद्याने त्यावर पैसा कमावला तर 'व्यावहारीक' हरकत
>> का म्हणून असावी?

एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारावे का? उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. ज्यांचं उत्तर होकारार्थी आहे अशांना उद्देशून इथे म्हंटलंय की जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात!

आ.न.,
-गा.पै.

गरिबीवर चित्रपट काढला आणि पैसा कमावला म्हणताना, चित्रपट काढणे या सगळ्यात कष्ट, पैसा, बुद्धी काहीच खर्च होत नाही असे गृहित आहे का?
तुम्ही आम्ही इकडे तिकडे जाऊन चार फोटो मारून येतो आणि माबोवर टाकतो इतका सोप्पा प्रकार नसावा बहुतेक चित्रपट काढणं नाही का? म्हणजे मला काहीच कल्पना नाही. पण इथे अनेक सर्वज्ञ आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल ना?

नीधप,

>> चित्रपट काढणे या सगळ्यात कष्ट, पैसा, बुद्धी काहीच खर्च होत नाही असे गृहित आहे का?

नाही. किंबहुना चित्रपट हे जनतेवर परिणाम करणारे अत्यंत सशक्त माध्यम असल्याने कबुपै डोळसपणे खर्च व्हावा अशी अपेक्षा आहे. अर्थात परदेशी दिग्दर्शकाकडून झालेलं भारताचं दर्शन त्याच्या दृष्टीकोनातून जे डोळस आहे त्याच पद्धतीने असणार आहे. मात्र जे भारतीय कलाकार यात काम करीत होते त्यांना भारताचं हे चित्रण खटकलं नाही. एकवेळ कलाकार पैशाचे मिंधे असतात असं समजून चालूया. पण प्रसारमाध्यमे देखील डोक्यावर घेतात?

काहीतरी गडबड वाटते नाही?

एक छोटीशी चाचणी करून पाहूया. स्वत:ला सिनेमातल्या हीरोच्या जागी कल्पणारे अनेक प्रेक्षक असतात. स्लमडॉगचा जो भारतीय प्रेक्षक आहे त्यापैकी किती जणांना हीरोचं झोपडपट्टीतलं आयुष्य प्रत्यक्षात जगायला आवडेल?

झोपडपट्टीतले लोक नाईलाजास्तव तसे राहतात हे गृहीत धरलेलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

मात्र जे भारतीय कलाकार यात काम करीत होते त्यांना भारताचं हे चित्रण खटकलं नाही. <<<
का खटकावं?
आपल्याला(वा कुणालाच) करण जोहर आणि तत्सम सगळ्या बॉलिवूडपटांमधलं गुळगुळीत आणि खोटं चित्रण खटकत नाही पण सत्य चित्रण मात्र खटकतं.
इथेच मोठा घोळ आहे.

अनेक बॉलिवूडी चित्रपट पाहून सर्व भारतीयांची लग्ने श्रीमंतीचे हिडीस प्रदर्शन करणारीच असतात, भारतीयांकडे सणवार, पुजाअर्चा आणि लग्ने यावर घालवायला भरपूर रिकामटेकडा वेळ असतो, भारतात सर्व स्त्रिया बचबचीत मेकप करूनच चोवीस तास वावरतात, सर्व भारतीय लोकांना भडक व चकचकीतच कपडे घालायला आवडतात, भारतीय लोक सामूहीकरित्या फॅमिली हनिमूनास जातात असे बरेच समज भारताबद्दल होऊ शकतात... (असे समज होतात याबद्दल थोडे अनुभवही आहेत.)

या असल्या बिंडोक गैरसमजांपेक्षा भारतामधे धारावी आहे, कचरा आहे, अस्वच्छता आहे हे सत्य गेले लोकांपुढे तर काय बिघडले?

एकवेळ कलाकार पैशाचे मिंधे असतात असं समजून चालूया. <<
कलाकारच का? प्रत्येकजणच आपल्याला जो पगार देतो त्याचा मिंधाच असतो की.

पण प्रसारमाध्यमे देखील डोक्यावर घेतात? << प्रसारमाध्यमे कुणालाही डोक्यावर घेतात त्यात नवल वाटावे असं काही नाही.

बाकी स्लमडॉग मिलिनेअर चित्रपट हा डिटेलिंग, अ‍ॅक्युरसी याबाबतीत बहुतेक सर्व हिंदी चित्रपटांपेक्षा फार जास्त वरच्या दर्जाचा होता असे माझे मत.

स्लमडॉगचा जो भारतीय प्रेक्षक आहे त्यापैकी किती जणांना हीरोचं झोपडपट्टीतलं आयुष्य प्रत्यक्षात जगायला आवडेल? <<
लोकांना बघायला, जगायला जे आवडेल तेच सिनेमाने दाखवावे असे आहे का?

नीधप,

१.
>> आपल्याला(वा कुणालाच) करण जोहर आणि तत्सम सगळ्या बॉलिवूडपटांमधलं गुळगुळीत आणि खोटं
>> चित्रण खटकत नाही पण सत्य चित्रण मात्र खटकतं.

त्याचं काय आहे की अन्नामध्ये मलांश असतो. पण म्हणून पाककृतीचं वर्णन देतांना विसर्जनानुभव कोणी देत नसतं. खाल्ल्यावर लगेच उलटलेलं पौष्टिक अन्न परत का खात नाहीत लोकं? ते पचायला हलकं असतं, शिवाय पौष्टिकही असतं.

झोपडपट्टीय सत्य स्वीकारायची माझी तयारी आहे. पण ते चित्रपटात बंदिस्त करून त्यावर कलाकृतीचा शिक्का मारणं मला पसंत नाही.

२.
>> या असल्या बिंडोक गैरसमजांपेक्षा भारतामधे धारावी आहे, कचरा आहे, अस्वच्छता आहे हे सत्य
>> गेले लोकांपुढे तर काय बिघडले?

कोणत्या लोकांपुढे? परदेशी? त्यांच्यासमोर जाऊन काय मोठा फरक पडणार आहे? आणि देशी लोकांना ते सत्य ठाऊक आहेच!

३.
>> कलाकारच का? प्रत्येकजणच आपल्याला जो पगार देतो त्याचा मिंधाच असतो की.

१००% सहमत. कधीकधी वाटतं प्रसारमाध्यमेही कुणाचीतरी मिंधी असावीत.

४.
>> प्रसारमाध्यमे कुणालाही डोक्यावर घेतात त्यात नवल वाटावे असं काही नाही.

मग वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या बोंबा मारायच्या कशाला? स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते याचं भान दिसंत नाही. ही नवलाईची गोष्ट नसून काळजीची आहे.

५.
>> बाकी स्लमडॉग मिलिनेअर चित्रपट हा डिटेलिंग, अ‍ॅक्युरसी याबाबतीत बहुतेक सर्व हिंदी चित्रपटांपेक्षा
>> फार जास्त वरच्या दर्जाचा होता असे माझे मत.

मी बघितला नाही. पण तुम्ही म्हणता त्यात तथ्य असावं.

६.
>> लोकांना बघायला, जगायला जे आवडेल तेच सिनेमाने दाखवावे असे आहे का?

गल्लाभरू चित्रपट असेल तर हो, लोकांना आवडेल तेच दाखवायला हवं. तसा नसेल तर बौद्धिक आव आणण्यासाठी भारतातील झोपडपट्टी कशाला पाहिजे? वैचारिक संदेश देण्यासाठी भारतात झोपडपट्टीपेक्षा अनेक चांगले विषय उपलब्ध आहेत.

आ.न.,
-गा.पै.

मी बघितला नाही. पण तुम्ही म्हणता त्यात तथ्य असावं<<< एखादा चित्रपट न बघता त्यावर अशी टीका करणे योग्य आहे का?

त्याचं काय आहे की अन्नामध्ये मलांश असतो. पण म्हणून पाककृतीचं वर्णन देतांना विसर्जनानुभव कोणी देत नसतं. खाल्ल्यावर लगेच उलटलेलं पौष्टिक अन्न परत का खात नाहीत लोकं? ते पचायला हलकं असतं, शिवाय पौष्टिकही असतं.>> अत्यंत घाणेरडी अ‍ॅनॉलॉजी. तेदेखील चित्रपट न पाहता.

झोपडपट्टीय सत्य स्वीकारायची माझी तयारी आहे. पण ते चित्रपटात बंदिस्त करून त्यावर कलाकृतीचा शिक्का मारणं मला पसंत नाही.

>>> लोकांनी माझ्या पसंतीचे सिनेमे बनवावेत असं म्हणणारा मी कोण? आपण या चित्रपटाचे फायनान्सर/प्रोड्युसर/दिग्दर्शक्/अभिनेते/तंत्रज्ञ गेलाबाजार (तिकीट विकत घेऊन पाहणारे) प्रेक्षक तरी आहात का?

खूप जुना चित्रपट आहे, मैत्रीणीबरोबर पाहिलेला, एकदा बघायला ठिक आहे, पहिल्यांदा पाहिले तेव्हा आवडला होता , पण पुन्हा बरेच वेळा लागला टीव्हीवर तेव्हा बघावासा वाटला नाही.. चित्रपटाला रीपीट वॅल्यू नाहिये.. असले चित्रपट पुन्हा पुन्हा बघवत नाहीत.. अर्थात ही अंड्याची आवड, अंड्याचे मत झाले.. पण जेवढा चांगला होता त्यापेक्षा जास्त ओवरहाईप केला होता एवढे मात्र नक्की..

सगळ्यात मोठा विनोद म्हणजे ए.आर.रेहमानला कसलेसे अ‍ॅवार्ड ही दिले होते त्यासाठी.. चित्रपटानंतर आजवर कधी मी त्या चित्रपटाचे एकही गाणे ऐकले नाही पुन्हा.. Sad

असो, चलता है, ज्याची त्याची आवड, लावला असेल कसलासा निकष..

पण ही सारी चर्चा आता का करत आहात???? शाहरुखला घेऊन करण जोहार याचा रिमेक बनवतोय का???? की अमिताभला घेऊन रामगोपाल वर्मा ??? Uhoh

सगळ्यात मोठा विनोद म्हणजे ए.आर.रेहमानला कसलेसे अ‍ॅवार्ड ही दिले होते त्यासाठी.. चित्रपटानंतर आजवर कधी मी त्या चित्रपटाचे एकही गाणे ऐकले नाही पुन्हा.. <<<
Rofl

सगळ्यात मोठा विनोद म्हणजे ए.आर.रेहमानला कसलेसे अ‍ॅवार्ड ही दिले होते त्यासाठी.. चित्रपटानंतर आजवर कधी मी त्या चित्रपटाचे एकही गाणे ऐकले नाही पुन्हा<<< जय हो. Lol

नंदिनी,

१.
>> एखादा चित्रपट न बघता त्यावर अशी टीका करणे योग्य आहे का?

हा मुद्दा चित्रपटाच्या सादरीकरणाबद्दल होता. या मुद्द्यावर मी नीधपशी सहमत आहे. स्लमि डीटेलिंग आणि अ‍ॅक्युरसीच्या बाबतीत हिंदी सिनेमांपेक्षा वरचढ आहे/असावा.

२.
>> अत्यंत घाणेरडी अ‍ॅनॉलॉजी. तेदेखील चित्रपट न पाहता.

नेमकं हेच डॅनी बॉईल यांच्याविषयी बोलता येईल. भारताची फारशी माहिती नसतांना गलिच्छ चित्रपट काढला म्हणून!

रच्याकने : आपण सर्वजण रोज सकाळी गलिच्छपणा करतो. तो केला नाही तर शरीरात विषाचा फैलाव होईल. हे सत्य मोकळ्या मनानं स्वीकारलेलं बरं, नाहीका?

३.
>> लोकांनी माझ्या पसंतीचे सिनेमे बनवावेत असं म्हणणारा मी कोण? आपण या चित्रपटाचे
>> फायनान्सर/प्रोड्युसर/दिग्दर्शक्/अभिनेते/तंत्रज्ञ गेलाबाजार (तिकीट विकत घेऊन पाहणारे) प्रेक्षक तरी
>> आहात का?

उत्तम प्रश्न. उत्तम अशासाठी की खरंच विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. माझी ओळख काय! तर मला काय आवडेल ते आधी सांगतो.

असं बघा की, कुण्या पाश्चात्य दिग्दर्शकाला भारतावर चित्रपट काढावासा वाटतोय. तेव्हा त्याला झोपडपट्टीची आठवण येऊ नये, असं झालेलं मला बघायला आवडेल. असं वाटणारा एक भारतीय नागरिक हीच माझी ओळख (आयडेंटिटी) समजा.

आ.न.,
-गा.पै.

गापै, तुमचा आक्षेप स्लमि वर आहे कि तो "बाहेरच्याने" बनवला यावर आहे? तसं असल्यास, गांधी चित्रपटाविषयीचं तुमचं मत जाणुन घ्यायला आवडेल.

बादवे, तुम्ही राणीच्या राज्यात राहता असं ऐकुन आहे. शेखर कपुर ने क्विन एलिझाबेथ वर सिनेमा बनवला. त्यावेळेस अशीच चर्चा (आमच्या राणीची "दुसरी" बाजुच का दाखवली, वगैरे) इंग्लंड मधे झाली होती का? Happy

राज,

माझा आक्षेप स्लमि वर नसून त्याचे भारतीयांनी कोडकौतुक करण्यावर व पैसा मिळवण्यावर आहे. 'बाहेरच्या' माणसाला भारताची माहिती नसेल असं गृहीत धरूया, पण 'आपल्या' माणसाला ही जाणीव हवी.

असं आपलं माझं मत.

एलिझाबेथचं म्हणाल तर चित्रपट अतिशय सुंदर आहे. तो संपल्यावर शेखर कपूरचं नाव दिग्दर्शक म्हणून आल्यावर तीनताड उडालो होतो. कॅथलिक लोकांनी जरा बोंबाबोंब केली, पण इंग्लंड प्रोटेस्टंट असल्याने कोणी लक्ष दिलं नाही.

आ.न.,
-गा.पै.

गापै
आजिबात लॉजि़क नाहीये तुमच्या ह्या धाग्यावरच्या प्रतिसादांत. बर्‍याच ठिकाणी तुमचे प्रतिसाद चांगले असतात आणि जेव्हा असतात तेव्हा तसं आवर्जून नमुदही केलं आहे.
ट्राफिक सिग्नल आणि प्रारंभ (विजय राज्-गौरी कर्णिक, ज्यांत स्लममधल्या भिकार्‍यांची प्रेमकथा होती) सारखे भारतीयांचे सिनेमेही स्लममधल्या वातावरणातले होते.
चांदणी बार सारखा सिनेमा तर समाजातल्या कित्येक काळ्या बाजू घेऊन तुम्हाला अशी चपराक मारतो की तुम्ही मनातून हलल्याशिवाय रहात नाहीत. मग तुम्ही तेव्हा असं म्हणणार का एका असाह्य,पिडीत बाईची कथा दाखवून गल्ला भरला. तुमच्या मते त्यातील कलाकारांना मिळालेले नॅशनल अ‍ॅवार्डसचा मान त्यांनी नाकारायला हवा होता. ट्राफिक सिग्नल आणि प्रारंभच्या टीमना जर कुठले अ‍ॅवार्ड्स मिळाले असतील आणि त्यांनी यदाकदाचित तिकिटविक्रीतून काही नफा मिळवला असेल तर तोही त्यांनी नाकारायला हवा.

पाश्चात्य आणि भारतीय दिग्दर्शक हा फरक तर आजिबात कळला नाही. ह्या न्यायाने तर दिल चाहता है मधल्या प्रिती झिंटाचा ट्रेन स्टेशनवरचा दारूड्या भिकार्‍याबरोबरचा सीन धरून भारतीय दिग्दर्शकांनी पाश्चात्य जमिनीवर शूट केलेला प्रत्येक सिनेमा आणि एकेक सीन बाद करायला पाहिजे. ऑसीज म्हणतील आमच्या देशाचं विद्रूप प्रदर्शन करणारे तुम्ही कोण? आमच्या कडे भिकारी आणि दारूडे ट्रेन स्टेशनवर आहेत हे जगाला दाखवून देणारे तुम्ही कोण.
मग साऊथमधल्याने धारावी वर सिनेमा काढला की मुंबई आमची आहे तिचे धिंडवडे काढणारे तुम्ही कोण? मग मुंबईतल्या पंजाब्याने काढला तर मुंबई मराठी माणसाची आहे आणि त्यातलं काय दाखवायचं हे मराठी माणूसच दाखवणार. मग हा वाद सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईनपर्यंत पण वाढवता येईल.
एक सांगा, दिग्दर्शक भारतीय असता आणि चित्रपटाला भारताचे नॅशनल अ‍ॅवार्ड मिळाले असते तर तुमचा स्टँड काय असता?

चमन,

असं बघा की स्लमिचा जो परदेशी प्रेक्षक आहे, त्याला भारतातल्या विविध घटकांची जाणीव नसणार आहे. चित्रपटात जे दाखवले असेल ते त्याने जसेच्या तसे स्वीकारण्याचा संभव आहे.

याउलट चांदणी बारचा जो प्रेक्षक आहे तो इथला भारतीय आहे. त्याला चित्रपटातलं चित्रण प्रातिनिधिक नाही हे माहीत आहे.

आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो.

>> एक सांगा, दिग्दर्शक भारतीय असता आणि चित्रपटाला भारताचे नॅशनल अ‍ॅवार्ड मिळाले असते तर
>> तुमचा स्टँड काय असता?

मग स्लमिला मी विरोध केला नसता. तो इथल्या प्रेक्षकांसाठी आहे एव्हढं कारण मला पुरेसं आहे. मात्र तो इंग्रजीत परसंवादी (डब) करून प्रसिद्ध करण्यास आक्षेप घेतला असता. माझ्या या भूमिकेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर : घरच्या लोकांच्या हातचा मार परवडला पण बाहेरच्या लोकांची बोलणी नकोत.

ऑस्ट्रेलियातल्या भिकार्‍याचं म्हणाल तर तो केवळ एक प्रवेश आहे. पण स्लमि मध्ये पूर्ण कथा झोपडपट्टीभोवती गुंफलेली आहे.

आ.न.,
-गा.पै.

असं बघा की स्लमिचा जो परदेशी प्रेक्षक आहे, त्याला भारतातल्या विविध घटकांची जाणीव नसणार आहे. चित्रपटात जे दाखवले असेल ते त्याने जसेच्या तसे स्वीकारण्याचा संभव आहे. >> दिल्लीतल्या रस्त्यांवरून गाड्यांऐवजी हॉवरक्रॉफ्ट्स धावतायेत. मुंबईतल्या रस्त्यांवर दुतर्फा चेरी ब्लॉसम आहे. पेशवेपार्कात फॉलकलर्सची लयलूट आहे. नागपुरात आईसस्केटिंगच्या रिंक्सवर जोडपी हातात घालून 'हॅरी मेट सॅली' सारखे बागडतायेत. धारावीत मस्त छोटी छोटी ईग्लू टाईप्स रंगीबेरंगी घरे आहेत. लँडफिल्सच्या जागी हिरवी कुरणे आहेत त्यात मस्त घोडे आणि मेंढ्या चरतांना दिसत आहेत. लोकं भरजरी पोषाखात पगड्या, ऊपरणे, दागिने वगैरे घालुन मौजमजा करतायेत किंवा टाय, सूट ब्रीफकेस वगैरे घेऊन मंगळावरचं यानाचं लँडीग कंट्रोल करायला नासाला सपोर्ट करणारं सेंटर असलेल्या ऑफिसात चालले आहेत. सिनेमाचे नाव आहे 'मुंबईटायगर बिलेनियर'

असा सिनेमा आपण परदेषी पेक्षकांना दाखवला तर त्यांनी भारताबद्दल काय मत बनवण्याचा संभव आहे असे तुम्हाला वाटते.

चमन,

>> असा सिनेमा आपण परदेषी पेक्षकांना दाखवला तर त्यांनी भारताबद्दल काय मत बनवण्याचा संभव आहे
>> असे तुम्हाला वाटते.

चांगलं मत बनणार. मात्र ते वस्तुस्थितीला धरून नसणार. जर वस्तुस्थितीचं चित्रण करायचं असेल तर विषय काळजीपूर्वक निवडावा लागेल.

आ.न.,
-गा.पै.

चांगलं मत बनणार. मात्र ते वस्तुस्थितीला धरून नसणार. जर वस्तुस्थितीचं चित्रण करायचं असेल तर विषय काळजीपूर्वक निवडावा लागेल. >> मुंबईची वस्तुस्थिती काय आहे?

एखाद्या गरीबीने होरपळलेल्या आणि परिस्थितीने छळलेल्या मुलाचा विषय सिनेमात दाखवण्यासाठी मलबार हिल्सवर एका छोट्याश्याच पण टुमदार घरात राहणार हीरो, अनाथ मुलांना बळजबरीने डेहराडूनच्या ईंटरनॅशनल शाळेत भरती करून, धाकद्पटशा दाखवून पौष्टिक जेवण जेवायला लावणारी निर्दयी टोळी, शेअर बाजाराचा अभ्यासकरून पैसा गुंतवणारी मॅनेजर्सची टोळी आणि त्यातला एक आपल्या हीरोचा डार्क साईड असलेला भाऊ, ५० लाख जिंकल्यानंतर पोलिस चौकीच्या उदघाटनाला आमंत्रण देण्यासाठी हीरोकडे आलेला ईन्स्पॅक्टर, डान्सिग विथ द स्टार्सच्या स्पर्धेमुळे हीरोपासून दुरावलेली हीरॉईन, परिस्थितीने गांजल्यामुळे नाईलाजास्तव मल्टीनॅशनल कंपनीत स्टारबक्स चालवणारा हीरो, असं चित्रपटात दाखवलं तर विषय काळजीपूर्वक हाताळला असं म्हणता येईल का?

चमन,

>> ...असं चित्रपटात दाखवलं तर विषय काळजीपूर्वक हाताळला असं म्हणता येईल का?

तुम्ही मध्यमवर्गीय विसरलात! असा एखादा नायक बघायला आवडेल. त्याच्याशी मी सुलिप्त (रीलेट) होऊ शकेन अशी अपेक्षा आहे. मी मध्यमवर्गीय आहे. साधारणत: म.व. आयुष्य फार भडक नसतं. आणि अँग्लोइंडियन प्रेक्षकाला बर्‍यापैकी समजतं. परिस्थितीशी झगडत मोठा झालेला नायक दाखवायचा असेल तर म.व. मध्ये बरेच पर्याय सापडतील.

असं असलं तरी माझा मूळ आक्षेप भारतीयांनी स्लमिला डोक्यावर घेऊन नाचण्यावर आहे. चित्रपटाचा नायक कसा असावा हे दिग्दर्शकाने ठरवायचं आहे. मी नाही. तरीपण मला माझ्या अपेक्षा पुर्‍या झालेल्या बघायला आवडतील. कारण मी सर्वसामान्य प्रेक्षक आहे.

आ.न.,
-गा.पै.

<<असं असलं तरी माझा मूळ आक्षेप भारतीयांनी स्लमिला डोक्यावर घेऊन नाचण्यावर आहे. चित्रपटाचा नायक कसा असावा हे दिग्दर्शकाने ठरवायचं आहे. मी नाही. तरीपण मला माझ्या अपेक्षा पुर्‍या झालेल्या बघायला आवडतील. कारण मी सर्वसामान्य प्रेक्षक आहे. >>

तर मग गापै, एकदा वेळ काढुन हा चित्रपट बघाच. उत्तरं सापडतील.... कदाचित.... Happy

आता रॅग्स टू रिचेस स्टोरी मध्यमवर्गीयापासून सुरू करायची म्हणता? बरं ठीक आहे, प्रयत्न करतो.

एखाद्या गरीबीने होरपळलेल्या आणि परिस्थितीने छळलेल्या मुलाचा विषय सिनेमात दाखवण्यासाठी कोथरूडमध्ये टू बीएचके घरात राहणारा हीरो, अनाथ मुलांना बळजबरीने नुमवि शाळेत भरती करून, धाकद्पटशा दाखवून सुवर्णरेखामध्ये जेवायला लावणारी निर्दयी टोळी, लोकांचे बळजबरीने विमा ऊतरावणारी गुंडांची टोळी आणि त्यातला एक आपल्या हीरोचा डार्क साईड असलेला भाऊ, ५० हजार जिंकल्यानंतर चिरीमिरी मागण्यासाठी हीरोकडे आलेला ईन्स्पॅक्टर, झी सारेगामा स्पर्धेत भाग घेतल्यामुळे हीरोपासून दुरावलेली हीरॉईन, तुळशीबागेत त्यांची झालेली ताटातुट, परिस्थितीने गांजल्यामुळे नाईलाजास्तव कंपनी स्टाफला डब्बे पुरवणारा हीरो, 'कोण बनेल लखपतीचा' कुटील होस्ट अतुल परचुरे, असं मध्यमवर्गीय वातावरण चित्रपटात दाखवलं तर विषय काळजीपूर्वक हाताळला असं म्हणता येईल का?

माझ्या या भूमिकेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर : घरच्या लोकांच्या हातचा मार परवडला पण बाहेरच्या लोकांची बोलणी नकोत. >> माझ्या या भूमिकेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर : कोंबडं झाकलं म्हणून सूर्य दिसायचा रहात नाही.

गापै

सोपी गोष्टं आहे हो, डिवोर्स, ब्रोक, होमलेस आणि सिंगलमॉम पासून मल्टी बिलेनियर होणार्‍या जे के रोलिंगवर काढलेला सिनेमा जास्त ईंप्रेसिव आणि मास अपील वाला असेल की नाही. आता रोलिंग बाईंऐवजी जिच्यावर सिनेमा काढावा अशी मध्यमवर्गीय भारतीय लेखिका सांगा बरं.

Pages