मँगो साल्सा

Submitted by अंजली on 15 May, 2013 - 11:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ साधारण पिकलेला आंबा
१ मध्यम रोमा टोमॅटो
१ मोठा चमचा बारीक चिरलेली लाल सिमला मिरची
१/२ वाटी ताजे उकडलेले मक्याचे दाणे (ऐच्छीक)
२-३ मध्यम पातीचे फक्त कांदे
३/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ बारीक चिरलेला पुदिना
२ हिरव्या मिरच्या (शक्यतो Jalapeño) बिया काढून बारीक चिरलेल्या
मीठ
मीरपूड

क्रमवार पाककृती: 

आंब्याची सालं काढून बारीक फोडी करून घ्या.
टोमॅटोच्या बिया काढून बारीक चिरून घ्या.
आवडत असल्यास लाल सिमला मिरची ग्रिल करून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
कांदा बारीक चिरून घ्या.
वरील आणि बाकी सर्व जिन्नस एकत्र करून फ्रीज मधे थंड करायला ठेवा.
कुठल्याही चिप्सबरोबर सर्व करा.

वाढणी/प्रमाण: 
एक मध्यम बाऊल भरून
माहितीचा स्रोत: 
एका रेस्टॉरंटमधे खाल्ला होता. त्यावरून घरी प्रयोग करून बघितला.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आलाय फोटो. अंबा वजा जाता उरलेले पदार्थ घालून कॉर्न सॅलेड नेहेमी करते. आता अंबा घालून पाहीन. ह्यात ब्लॅक बीन्स पण छान लागतील ना?

ह्यात ब्लॅक बीन्स पण छान लागतील ना>>> बहुतेक. मी कधी घालून बघितले नाहीत. पुढच्यावेळेस घालून बघेन. अ‍ॅव्हाकाडोपण चांगलं लागेल असं वाटतंय. पण त्याबरोबरच खूप चवी-फ्लेवर्स एकत्र केल्या तर आंब्याची मजा राहणार नाही.

लिंबू नयी पिळणे का. आंबा साधारण पिकलेला असल्याने किंचीत आंबट असेलच. शिवाय टोमॅटोचा आंबटपणापण आहे.
लाजो, करून बघ Wink

अंजली Happy मी आपलं इथल्या प्रथेप्रमाणे हे नाही तर ते चालेल का असं विचारलं Proud Lol

प्रॅडी Proud मग शेव्/फरसाण आणि वरतुन चिंचेची चटणी पण हवीच की Lol

आमच्याक्डे ना कैरी ना आंबा सिझन..... पण कैरी पेक्षा आंबाच छान लागेल याबद्दल दुमत नाही Happy

मस्त. नक्की करुन बघेन.
मी खाल्लेला बर्‍याचदा जरा अजून ओलसर असतो. बाहा फ्रेश आणि इतर १-२ ठिकाणी.
बादवे, ट्रेडर जोज चा कॉर्न-ब्लॅक बीन्स सालसा पण खूप आवडला होता. कॉर्न साल्सा पण सिमिलरली करतात का ?

आंब्याबरोबर टोमॅटो, हालापेनो व्.व. सभासद बघुन मला जरा नाक मुरडावेसे वाटलेले पण ऑन सेकंड थॉटस, तोतापुरी आंबा वापरुन हा प्रकार जबरी लागेल. आज करुन बघायलाच हवा.

मी खाल्लेला बर्‍याचदा जरा अजून ओलसर असतो. बाहा फ्रेश आणि इतर १-२ ठिकाणी.>>> बल्कमध्ये करून ठेवतात. त्यामुळे डिजे म्हणते तसं मीठामुळे पाणी सुटत असेल.
साधना, तोतापुरी आंब्याचा साल्सा मस्त लागेल. नक्की करून बघ.

मवा,
कॉर्न साल्सा असाच करायचा (मायनस आंबा). कणिस आधी ग्रिल करून घेतलं तर सुरेख चव येते.

रेस्टोरंटमध्ये हाच साल्सा ग्रिल्ड / ब्लॅकन्ड चिकनवर दिला होता. चव कशी लागली माहित नाही, खाणार्‍यांनी मिटक्या मारत खाल्ला. इथे रेसेपी आहे.

छान रेसीपी अंजली. मी सिमिलर रेसीपी वापरते. पण ब्लॅक बीन्स अ‍ॅड करते बरेचदा. आणि क्युमिन पावडर घालतेच.
साधना, साल्स्याला आम्ही इथे सहसा फ्रेस्को आंबे वापरतो. कच्चे असताना बरेचसे तोतापुरी सारखेच लागतात. तेच वापरून पहा.

Topasu. Chan.