कोशिंबिर

Submitted by रीया on 13 May, 2013 - 07:19

एकदा झाले काय
भाज्यांना फुटले पाय
टॉमॅटो लागला चालायला
बटाटा लागला पळायला
गाजराची लागली काकडीशी शर्यत
दोघेही निघाले धावत पळत
मिरच्यांनी पाहीली त्यांची गंमत
मटार आले उड्या मारत
विळीताईला पहाता मात्र
सगळे झाले गळित गात्र!
भा़ज्यांची अन मग फजिती झाली
जेवणात आमच्या कोशिंबिर आली.
____________
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

त.टी: ही माझी पहिली कविता! तिसरीत असताना केलेली. परवा सहज कपाटात आवरताना कुठल्याश्या वहीत सापडली. पोस्टताना अगदीच Blush वाटतय पण तरीही शशांकदादांच्या पाठिंब्याने हिंमत करतेय पोस्टायची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताही थोडा बदल करून रिया अशीच एक कविता करू शकेल.

कैलास लागले बागडायला

विदिपा लागले उडायला

भूषणदादा लागला नाचायला

वैवकु लागला उंडारायला

कर्दनकाळाला पाहून मात्रे सगळे गलितगात्र झाले

वगैरे!

आणि हे लिहून इश्य वगैरेही वाटणार नाही.

=========================

बाकी तिसरीतील कविता छान आहे.

पहिल्यांदा आपल्य लेखनाचा कुठला धागा वर आला तर आनंद होईचा
आज मला जामच Blush वाटतय Lol

चिमा Happy चॉकलेट नक्की दे हं! मी अजुन दहा बारा असल्या कविता लिहायला घेते.. मग तू चॉकलेटची संख्या +१ करत जा Proud

सगळ्यांना धन्स Happy

उदय मला नाही आठवत तिसरीतलं फारसं काही
पण माझ्या आईने मी त्या वेळेला जे काही खरडलं त्याला छान छान म्हणत सगळं एका वहीत तारखेसहित लिहुन ठेवलंय...कितवीत असताना ही कविता लिहिली, वगैरे पण आहे त्यात Happy
त्यादिवशी डायरी सापडली आणि आईचे एफर्ट्स पाहुन मन भरुन आलं Happy

भूषणदादा Rofl
सचिनदादा Angry

चिमा Proud
आता तिसरीत आहे असं समजलस तर नाही चालणार का??? Rofl

येस वर्षूतै! आई नेहमीच ग्रेट असते Happy

सामी jibh dakhavanari.gif

वा रियूडे वा

आजवर मोठ्यांनी केलेली बालगीते खूप वाचलीत माबोवर पण आज प्रथमच ३ रीतल्या चिमुरडीने केलेले काव्य वाचतोय

त्या कपाटाला धन्स सांग तुझ्यातली तिसरीलली रिया त्याने इतकी वर्षे (महीने ...नाही नाही दिवस .....नाहीच तास ...मिनिटे) जपून ठेवली Happy

रियुटले! आवडली कोशिंबीर!
लेकीला उद्या वाचुन दाखवते!

धन्स लोक्स Happy

लेकीला उद्या वाचुन दाखवते!
>>
यासाठी विशेष धन्स Happy

संपदा Happy
त्यावेळेला मला यमक जुळली की कविता झाली अस वाटायचं Lol
बर्‍याच आहेत अशा ट ला ट जोडलेल्या Lol

त्यावेळेला मला यमक जुळली की कविता झाली अस वाटायचं
बर्‍याच आहेत अशा ट ला ट जोडले >>>>>>>>>>>>>>>>>>>> काय सांगतेस..? Uhoh
इथे तर गझलांमधे "ट" ला "ट" बरोबर "म" ब" "र" काहीही जोडुन तयार करतात Biggrin

देवपूरकरांच्या कोशिंबीरीपेक्षा मस्त कोशिंबीर केलीस तू तेही तिसरीत असताना !!
उद्या गझलही त्यांच्यापेक्षा चांगली करशील असा विश्वास वाटतो !!! Wink

ही पहा देवसरांची कोशिंबीर .........

पाहिजे होतेच तोंडी लावण्यासाठीच काही!
चोंचले मजला तरी झालीच कोशिंबीर नाही!!

<<<<<हाहाहा

क्यूट Happy

मस्त Happy

Pages