कोशिंबिर

Submitted by रीया on 13 May, 2013 - 07:19

एकदा झाले काय
भाज्यांना फुटले पाय
टॉमॅटो लागला चालायला
बटाटा लागला पळायला
गाजराची लागली काकडीशी शर्यत
दोघेही निघाले धावत पळत
मिरच्यांनी पाहीली त्यांची गंमत
मटार आले उड्या मारत
विळीताईला पहाता मात्र
सगळे झाले गळित गात्र!
भा़ज्यांची अन मग फजिती झाली
जेवणात आमच्या कोशिंबिर आली.
____________
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

त.टी: ही माझी पहिली कविता! तिसरीत असताना केलेली. परवा सहज कपाटात आवरताना कुठल्याश्या वहीत सापडली. पोस्टताना अगदीच Blush वाटतय पण तरीही शशांकदादांच्या पाठिंब्याने हिंमत करतेय पोस्टायची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया तिसरीत असताना कविता छान लिहिलीस. Happy
अरे व्वा रीया, तिसरीत असताना तू छान कविता करायचीस . (मग आताच काय झालं ? स्मित) >>>>>>>>>>>>आता तिच लक्ष कवितेकडे नसेल Wink

तिसरीत? छानच.

तुझी नाव लिहायची पध्दत आवडली. आई - वडिलांच दोघांचही नाव लावलं आहेस म्हणून.

प्रियांका उज्ज्वला विकास फडणीस असे हवे ना ?

प्रियांका उज्वलाजी यांची व विकासजींची मुलगी आहे व उज्ज्वलाजी विकास्जींची पत्नी आहेत असा अर्थ एका दमात काढतायेतो

की तुझ्याप्रमाणे तुझे बाबाही तुझ्या आईचे नाव लावतात ....... श्री. विकास उज्ज्वला फडणीस ??

~युगप्रवर्तक !!!!

_/\_

वही सापडली ! बाप रे ! आता वाचकांची काय खैर नाही.

तिसरीत असताना लिहलेली असली तरीही कविता बाळबोध वाटत नाही. आम्ही तिसरीत असताना केवळ "आंधळी कोशिंबीर" खेळण्यात धन्यता मानली.

कविता छान जमलीय हे सांगणे न लगे. (ही कविता माझ्या भावी अपत्यांना ऐकवायला मला आवडेल. Wink )

अमित Happy
आर्च Happy मी नेहमीच असच नाव लावते Happy

वैवकु स्वतःच्या मनाला येतील ते तर्क नाही काढलेच तरी इथे नाही मांडले तरी चालतील.

Pages