नाचते नार तोऱ्यात -

Submitted by विदेश on 2 May, 2013 - 11:12

नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा
चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा

ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते
होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते

हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी
ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी

चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या
मेखला खास झुलवून हात अदबीन हाती ये त्यांच्या

भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी
रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी

पापी ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची
थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची

.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बागुलबुवा, बेफिकीर, >>>>>>>>+१

चांगली लिहिली आहे..थोडीफार दुरुस्ती केली तर नटरंग - २ साठी अजय अतुलला देता येइल Happy

शुभेच्छा!