Submitted by विदेश on 2 May, 2013 - 11:12
नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा
चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा
ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते
होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते
हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी
ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी
चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या
मेखला खास झुलवून हात अदबीन हाती ये त्यांच्या
भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी
रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी
पापी ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची
थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान वर्णन! थोडे आधिक तालात
छान वर्णन! थोडे आधिक तालात आले तर छान चालीत बांधता येईल!
व्वा ! छान वर्णन केलंय
व्वा ! छान वर्णन केलंय नर्तिकेचं.
के अंजली , उल्हास राव,
के अंजली ,
उल्हास राव,
प्रतिसादाबद्दल आपले आभार !
चांगली जमलीये. पण अजून
चांगली जमलीये. पण अजून फिनिशिंग टच द्यावा लागेल.
वा, सुरेखच ....
वा, सुरेखच ....
जमली आहे. बागुलबुवांशीही सहमत
जमली आहे. बागुलबुवांशीही सहमत आहे.
शुभेच्छा!
बागुलबुवा, बेफिकीर,
बागुलबुवा, बेफिकीर, >>>>>>>>+१
चांगली लिहिली आहे..थोडीफार दुरुस्ती केली तर नटरंग - २ साठी अजय अतुलला देता येइल
शुभेच्छा!