वर्षाविहार २०१३: संयोजक आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by admin on 22 March, 2013 - 00:13

यंदाचा (२०१३) वर्षाविहार हा आपला ११वा ववि आहे.. दहा वर्ष दणक्यात झालेल्या या उपक्रमात आता नवीन काहितरी भर टाकली पाहिजे , याचं स्वरुप बदललं पाहिजे असा विचार आहे. पण काय आणि कसं ते नक्की ठरलेलं नाही...

या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक आणि त्याचबरोबर नवीन कल्पना...आणि त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आजच धागा सुरू करत आहोत.

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<मुंबई-नाशिक हाय वे वर एक शांग्रिला रिसॉर्ट आहे, तेही छानच आहे, सर्वांना सोयीचेही पडू शकेल<> अनुमोदन :-)>>>+१ Happy

लिम्बीच्या गावाला केल अस्त ववि, पण तिथे फाईव स्टारच काय, अर्धा-पाव स्टार इतपतही सोई-सुविधा नाहीत, लै हाल होतिल. बघू पुढे मागे.
लिम्बीच्या शेतात माझ खोपट उभ राहिल तर मात्र पडवी/मान्डव घालून बोलाविन Happy

संयोजक समिती तयार झाली की सांगा. शांग्रिला ला जायचे असल्यास मी अर्धीअधिक जबाबदारी घ्यायला तयार आहे. जसे बूकिंग वगैरे..

तेवढ अंतर ओके आहे पुणेकरांसाठी आणि नाशिकवालेही खूष होतील
( १७१ किमी -२ तासात - प्रॅक्टीकली अशक्य बसने तर निव्वळ अशक्य आपण ३ ते ३.५० तास धरुन चालू)

शांग्रीला साठी अनुमोदन

हम्म, ट्राफिकचा वगैरे वेळ आणि बसच्या वेगावर अवलंबून आहे ते. पण नाशिक व पुणे-मुंबईकरांना मध्यवर्ती आहे शांग्रीला.

शांग्रीला नक्की कुठे आहे...

पुण्यातून निघून जेमतेम खोपोली पर्यंत पोहोचायला सुद्धा ३ तास लागतात जे अंतर फक्त १२० किमी आहे.
१७१ किमी जायला किमान साडेचार तास लागतील... जाऊन येऊन ९ तास... प्रॅक्टीकली हा ऑप्शन शक्य नाही...

मंजूनं दिलेली लिंक पाहिली. तिथला पत्ता विकीमॅपियावर शोधला. अंतर मोजलं, तर ठाण्यातून भिवंडी बायपासवरून निघालं, की कळवा खाडी पार केल्यावर साधारण वीस कि.मी. वर ते रिसॉर्ट आहे असं दिसतंय. म्हणजे फार लांब नाहीये माझ्या मते.

पुण्याहुन फार लांब पडेल , या कारणास्तव तिकडचे लोक कमी होण्याचीही शक्यता आहे.

आपल्याला नाशिक अ‍ॅड करताना आधीच कोणी मायनस होत नाही ना याकडेही लक्श द्याव लागेल.

@ एस आर डी ... एका दिवसाचा प्रवास चिल्ल्यपिल्ल्यंना झेपेल असा असावा.

@ किरण कुमार ... संयोजक घसरले तर तुम्ही आणी आपण आहोत ना ....

माळशेज घाटात अजुन काही रिसॉर्ट आहेत का कोणाला माहिती ?

सगळ्यांन्च्या सोयीच होइल ते ठिकाण

ठिकाण नक्की करण्यासाठी मतदान घ्यावे नाहीतर....
कोणत्या ठिकाणासाठी किती मेंबर नक्की येणार याचा अंदाज येतो का ते पाहुया.

Pages