वर्षाविहार २०१३: संयोजक आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by admin on 22 March, 2013 - 00:13

यंदाचा (२०१३) वर्षाविहार हा आपला ११वा ववि आहे.. दहा वर्ष दणक्यात झालेल्या या उपक्रमात आता नवीन काहितरी भर टाकली पाहिजे , याचं स्वरुप बदललं पाहिजे असा विचार आहे. पण काय आणि कसं ते नक्की ठरलेलं नाही...

या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक आणि त्याचबरोबर नवीन कल्पना...आणि त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आजच धागा सुरू करत आहोत.

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजकांना काय काम असतं ते इथे सविस्तर लिहा, अथवा आधी कुठे लिहिलं असेल तर दुवा द्या इथे. म्हणजे उत्सुक नवीन संयोजक कामाचा आवाका पाहून ठरवू शकतील संयोजनात उडी मारायची की नाही ते.

>> +१००

संयोजकांच्या कामाच स्वरुप :

ववि च ठिकाण नक्की करण , त्याकरता ववि च्या आधी त्या ठिकाणी जाउन येण.
ववि च्या जाहिराती करण
ववि चा बाफ , त्यावरील लेखन , लोकांच्या प्रष्नांना उत्तर
सांस्कृतिक समिती ( असल्यास) लोकांचा वेळ कसा जाइल यावर काही खेळ ,
जाण्या येण्याची वाहन व्यवस्था
पिक अप पॉइंट्स
पैसे जमा करण
रिसॉर्ट मधील जेवण व्यवस्था बघणे

सगळ्यात महत्वाच म्हणजे नवीन आलेल्यांनी नव्नवीन कल्पना राबवण आणि त्यात पुढाकार घेण.

आपण दर वेळी स़ंयोजनात नवीन लोकांना घेतो , ते पहिल्या वर्षी असिस्ट ( जुन्या संयोजकांना )करतात , पुढच्या वर्षी लीड घेतात ... नवीन संयोजकांना मार्गदर्शन करतात

हा उपक्रम कसा होतो याकरता ववि चे बाफ वाचा , अजुन नीट लक्षात येइल.

सर्व वविउत्सुक माबो करांना नमस्कार,

अतिशय चांगल्या प्रकारे या बाफ वर सुचना, चर्चा चालु आहे.
काही गोष्टी मलाही सुचवाव्याशा वाटतात.
१. ठि़काणः माळशेज हे खरोखरीच मध्यवर्ती ठिकाण होउ शकतं.
गेल्या १० वर्षात , अनेकदा कर्जत खोपोली पट्टा फिरुन झाला आहे.
जर माळ्शेज असेल तर संयोजकांनाही नवीन एरिया कव्ह्रर करता येइल, आणि नाशिक, नगर, इथले माबोकर ही येउशकतील.
अनेकदा वविला पावसानी दडी मारली असाही होतं , पण माळ्शेज हा घाटपरीसर अस्ल्याने ती शक्यता कमी वाटते.
अनेक ट्रेकर माबोकरा,च्या मदतीने एखादा वेगळ्या वाटेकदचा धबधबा कव्हर करता येइल... रीसोर्ट्वर पुल असतोच.
२. सामाजिक कामाचा भाग : पिशवी स्याक हे ऑप्श्न योग्य आहेत , त्याच बरोबर ज्याकेट्चा पर्यायही बघता येइल.
३. संयोजनः हे मात्र अत्यावश्क आहे कारण नवीन संयोजक तीन्ही ठिकाणी असण, विशेषतः नाशिकला कारण संख्या आणि संयोजन अशा दोन्ही बाजुला जोर लावावा लागणार
एकंदरीत असलेला वेळ पाहात सांस ची गरज नक्की लागणार कारन नव्ख्या ठिकाणी किमान १०० जणांना एक्त्रीत आणि आनम्दी मूड्मधे एकत्रठेवण ही टास्कच असणार.

घारु + १

आपण गेली काही वर्षे मायबोली टी शर्ट करत आहोत.
टी शर्ट व्यतिरिक्त दुसर काही सुचतय का ... ? वर म्हणल्याप्रमाणे सॅक किंवा तत्सम काही ...

टी शर्ट चा उपयोग प्रसाराकरता खुप जास्त होतो .. तसच प्रभावी काही सुचतय का कोणाला ?

सॅकचा पर्याय दिलाच आहे ना वरती, अजूनही नवनवीन वस्तूंद्वारे प्रसार करू शकतो जसे...स्कार्फ्स, मोबाईल कव्हर्स इत्यादी. तसेच फाईल्स बनवता आल्या तर उत्तमच! उपयोगी वस्तू + माबो प्रसार Happy कस्काय वाट्टंय??

टिशर्टसारखं असं नाही पण माबोचा वॉलपेपर करून विकत किंवा बुकमार्क्स सारखा खरेदीसोबत फुकट देता येऊ शकतो.

टिशर्टच्या इतकं किंवा खालोखाल प्रभावी असं सॅक किंवा बॅग्जच आहेत.
पृथ्वीची ज्यूटची बॅग आहे ती फार मस्त आहे. लोगोवाल्या बॅग्ज इतर ठिकाणी वापरताना जरा विनोदी वाटतं पण तशी ती बॅग अजिबात वाटत नाही. त्या धर्तीवर काहीतरी करता येईल.

गाडीवर लावायची स्टिकर्स पण बनवता येतिल... गाडी न्याल तिथे जाहिरात... गाडी पार्क केलेली असेल तर आणखिनच जाहिरात Happy

मला या जाहिरात प्रकाराबद्दल शंका आहे थोडीशी.
आपण टिशर्टस शक्यतो माबोकर आणि त्यांची कुटुंबे एवढ्यांपुरतेच विकत होतो. या बाकीच्या वस्तूंसाठीही हेच धोरण असणारे का?
तसे असेल तर वस्तूंची संख्या मर्यादितच राहणार बल्कमधे १०० टिशर्टस होलसेल रेटने मिळतील पण इतर सगळ्याच वस्तूंमधे १०० हा आकडा होलसेलचा होईलच असे नाही.
याही गोष्टीचा विचार व्हावा.

सॅकसाठी +१
माबोचे टिशर्ट्स आपण रोज रोज घालून फिरत नाही. पण बॅग प्रत्येक जण कॅरी करतोच. मग सॅक्स आणि मुलिंना पर्स सारखी लटकवण्याची बॅग असे दोन प्रकार केले तर पुष्कळ होईल.
गाडीच्या स्टिकरविषयी मला शंका आहे, स्टिकरकडे इतकं कोणी निरखून पाहतं असं मला वाटत नाही.

छानशे लेदर किचेन्स पण चालतील.
कप(ऑफिसात कॉफी प्यायला विप्रोचा लिहिलेला कप वापरण्यपेक्षा मला मायबोली लिहीलेला कप वापरायला जास्त आवडेल)
पण टीशर्ट्स पण ठेवा ना... किमान या वर्षी तरी.. मला हवेत

बँग आणि सँक साठी अनुमोदन

आँफिससाठी लागण्यार्या बँगापण चालतील
तेवढाच एक चेँज रोजच्या आँफिसाच्या रुटीनमधे

नोकिया एक्सप्रेस आहे>>> बरं मग तुला 'अ‍ॅ' लिहायला मदत करते मी.
आधी 'अ' लिही, मग ९ हे बटण अर्धचंद्र येईपर्यंत प्रेस करत रहा. हेच बाकी बाराखडीबद्दलही.

स्वारी हां अ‍ॅडमिन, 'मोबाईलवर देवनागरी'मधली पोस्ट ववि २०१३ मधे टाकलीये Wink
येक डाव मापी द्यावी.

माळ्शेज घाट >> +१

पण हे जरा जास्तच हॉट ठिकाण आहे पावसाळ्याच... त्यामुळे बरीच गर्दी असेल; त्यातून मग जर हेच ठिकाण फायनलाईज करायचं झालं तर लगोलग करावं लागेल...

Pages