Submitted by admin on 22 March, 2013 - 00:13
यंदाचा (२०१३) वर्षाविहार हा आपला ११वा ववि आहे.. दहा वर्ष दणक्यात झालेल्या या उपक्रमात आता नवीन काहितरी भर टाकली पाहिजे , याचं स्वरुप बदललं पाहिजे असा विचार आहे. पण काय आणि कसं ते नक्की ठरलेलं नाही...
या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक आणि त्याचबरोबर नवीन कल्पना...आणि त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आजच धागा सुरू करत आहोत.
तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा.
संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्या नावडणार्या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<मुंबई-नाशिक हाय वे वर एक
<मुंबई-नाशिक हाय वे वर एक शांग्रिला रिसॉर्ट आहे, तेही छानच आहे, सर्वांना सोयीचेही पडू शकेल<> अनुमोदन :-)>>>+१
ठिकाण आणि तारीख ठरली का?
ठिकाण आणि तारीख ठरली का?
लिम्बीच्या गावाला केल अस्त
लिम्बीच्या गावाला केल अस्त ववि, पण तिथे फाईव स्टारच काय, अर्धा-पाव स्टार इतपतही सोई-सुविधा नाहीत, लै हाल होतिल. बघू पुढे मागे.
लिम्बीच्या शेतात माझ खोपट उभ राहिल तर मात्र पडवी/मान्डव घालून बोलाविन
आम्ही वाट पाहु, लिंबुभौ
आम्ही वाट पाहु, लिंबुभौ
संयोजक समिती तयार झाली की
संयोजक समिती तयार झाली की सांगा. शांग्रिला ला जायचे असल्यास मी अर्धीअधिक जबाबदारी घ्यायला तयार आहे. जसे बूकिंग वगैरे..
पुण्यापासून किती लांब आहे
पुण्यापासून किती लांब आहे शांग्रीला
१७१ किमी आहे. ट्रॅव्हल टाईम
१७१ किमी आहे. ट्रॅव्हल टाईम येईल २ तास अॅप्रॉक्स.
१७१ किमी आहे. ट्रॅव्हल टाईम
१७१ किमी आहे. ट्रॅव्हल टाईम येईल २ तास अॅप्रॉक्स.
>>>>>>>>>
कुठल्या वाहनाने २ तास?
फारफार तर अडीच तास
फारफार तर अडीच तास
तेवढ अंतर ओके आहे
तेवढ अंतर ओके आहे पुणेकरांसाठी आणि नाशिकवालेही खूष होतील
( १७१ किमी -२ तासात - प्रॅक्टीकली अशक्य बसने तर निव्वळ अशक्य आपण ३ ते ३.५० तास धरुन चालू)
शांग्रीला साठी अनुमोदन
हम्म, ट्राफिकचा वगैरे वेळ आणि
हम्म, ट्राफिकचा वगैरे वेळ आणि बसच्या वेगावर अवलंबून आहे ते. पण नाशिक व पुणे-मुंबईकरांना मध्यवर्ती आहे शांग्रीला.
हे नुसतं रीसॉर्ट नाहीये पण,
हे नुसतं रीसॉर्ट नाहीये पण, वॉटर पार्क आहे.
शांग्रीला नक्की कुठे आहे...
शांग्रीला नक्की कुठे आहे...
पुण्यातून निघून जेमतेम खोपोली पर्यंत पोहोचायला सुद्धा ३ तास लागतात जे अंतर फक्त १२० किमी आहे.
१७१ किमी जायला किमान साडेचार तास लागतील... जाऊन येऊन ९ तास... प्रॅक्टीकली हा ऑप्शन शक्य नाही...
शांग्रीला मुंबई-नाशिक हायवेवर
शांग्रीला मुंबई-नाशिक हायवेवर आहे. http://www.shangrilawaterpark.com
मंजूनं दिलेली लिंक पाहिली.
मंजूनं दिलेली लिंक पाहिली. तिथला पत्ता विकीमॅपियावर शोधला. अंतर मोजलं, तर ठाण्यातून भिवंडी बायपासवरून निघालं, की कळवा खाडी पार केल्यावर साधारण वीस कि.मी. वर ते रिसॉर्ट आहे असं दिसतंय. म्हणजे फार लांब नाहीये माझ्या मते.
ललीला अनुमोदन. भिवंडी
ललीला अनुमोदन. भिवंडी बायपासवरून अगदी जवळ आहे शांग्रीला.
मुंबई-ठाण्याहून फार लांब
मुंबई-ठाण्याहून फार लांब नाहीये, पण नाशिक - पुणेकरांचा जाऊन-येऊन वेळ ध्यानात घ्यायला हवा.
भिवंडी बायपासवरचा जो कल्याण
भिवंडी बायपासवरचा जो कल्याण नाका आहे, तिथून तर जेमतेम १० किमी वर येतं रिसॉर्ट
पुण्याहूनही येता येण्यासारखं
पुण्याहूनही येता येण्यासारखं आहे, नाशिकहून मात्र लांब पडेल.
नाशिकहूनपण पुण्याईतकाच वेळ
नाशिकहूनपण पुण्याईतकाच वेळ लागेल माझ्यामते
नाशिक मुंबई हा आता एकदम मस्का
नाशिक मुंबई हा आता एकदम मस्का रोड झालेला आहे तेव्हा वेळेची चिंता नको
हम्म, अगदीच मस्का रोड
हम्म, अगदीच मस्का रोड
पुण्याहुन फार लांब पडेल , या
पुण्याहुन फार लांब पडेल , या कारणास्तव तिकडचे लोक कमी होण्याचीही शक्यता आहे.
आपल्याला नाशिक अॅड करताना आधीच कोणी मायनस होत नाही ना याकडेही लक्श द्याव लागेल.
@ एस आर डी ... एका दिवसाचा प्रवास चिल्ल्यपिल्ल्यंना झेपेल असा असावा.
@ किरण कुमार ... संयोजक घसरले तर तुम्ही आणी आपण आहोत ना ....
माळशेज घाटात अजुन काही रिसॉर्ट आहेत का कोणाला माहिती ?
सगळ्यांन्च्या सोयीच होइल ते ठिकाण
ठिकाण नक्की करण्यासाठी मतदान
ठिकाण नक्की करण्यासाठी मतदान घ्यावे नाहीतर....
कोणत्या ठिकाणासाठी किती मेंबर नक्की येणार याचा अंदाज येतो का ते पाहुया.
संभावित स्थळं संयोजन समितीने
संभावित स्थळं संयोजन समितीने सविस्तररित्या सदस्यांना सांगावी.
संभावितपणे.
संभावितपणे.
संभावितपणे.>>> बाबु, संस
संभावितपणे.>>>
बाबु, संस मध्ये आहेस वाटते तू!
'संस' म्हणजे, 'संभावीत समीती'
'संस' म्हणजे, 'संभावीत समीती' का?
मतदान+१
मतदान+१
>>>>'संस' म्हणजे, 'संभावीत
>>>>'संस' म्हणजे, 'संभावीत समीती' का? <<<<
नाही
संस म्हणजे "संस्कार समिती"
Pages