वर्षाविहार २०१३: संयोजक आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by admin on 22 March, 2013 - 00:13

यंदाचा (२०१३) वर्षाविहार हा आपला ११वा ववि आहे.. दहा वर्ष दणक्यात झालेल्या या उपक्रमात आता नवीन काहितरी भर टाकली पाहिजे , याचं स्वरुप बदललं पाहिजे असा विचार आहे. पण काय आणि कसं ते नक्की ठरलेलं नाही...

या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक आणि त्याचबरोबर नवीन कल्पना...आणि त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आजच धागा सुरू करत आहोत.

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माळशेज घाट पावसाळ्यात बरेचदा बंद असतो. संयोजकांनी हा मुद्दा लक्षात ठेवावा.

Pen Drive वर मायबोलीचं बोधचिन्ह आणि बोधवाक्य किंवा www.maayaboli.com छापून त्यांची विक्री करता येईल. ४ जीबी पेन ड्राईव्हची किंमत अंदाजे ३०० पासून सुरु होते. तसेच आज बहुतांशी non IT लोक्सही पेन ड्राईव्ह वापरतात.

(चित्र नेटवरुन साभार)
Wristband PD.jpg

मनगटी घड्याळासारखा दिसणारा वरिल Pen Drive पुरुष व महिला दोन्ही प्रकारात बनवता येऊ शकतो.

एकूण पूर्ण बाफ पुन्हा एकदा वाचल्यावर खालील लोकांनी संयोजनात सहभाग घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे.

पुणे :- आशु डी, पियु परी

मुंबई :- मंजु डी , गितांजली, टोकुरिका, योगेश कुलकर्णी

नाशिक :- विदीपा

मुंबईत घारु, नील , आनंद मैत्री , आनंदसुजु , अमित, इन्द्रा , किरु आणि बरेच जुने जाणते यांना गृहित धरुन आहे.

पुण्यात मयुरेश , हिम्या, मल्ली यांना ..
आणि बाकिची नाव येउ द्या

पुणे :- आशु डी, पियु परी

मुंबई :- मंजु डी , गितांजली, टोकुरिका, योगेश कुलकर्णी,मुग्धानंद

नाशिक :- विदीपा

मुंबईत घारु, नील , आनंद मैत्री , आनंदसुजु , अमित, इन्द्रा , किरु आणि बरेच जुने जाणते यांना गृहित धरुन आहे.

पुण्यात मयुरेश , हिम्या, मल्ली यांना ..

आणि बाकिची नाव येउ द्या

पुणे आणि मुंबईला सोयीस्कर - कर्नाळा किल्ला (पनवेल अलिबाग रस्त्यावर ) ववि चा आनंद लूटण्यासाठी उत्तम आहे किल्ला चढताना थोडी दमछाक होईल एवढच पण निसर्ग सौदर्य खच्चून भरलय

किरण कुमार हा ऑप्शन चांगलाच आहे, पण बच्चे कंपनी वगैरे बरोबर असताना किल्ला वगैरे चढणे सोयीचे असणार नाही. आणखी कुणाला सुचतायेत का ठिकाणं, जास्तीत जास्त ऑप्शन्समधून निवडूया ठिकाण. Happy
रच्याकने मुंबई-नाशिक हाय वे वर एक शांग्रिला रिसॉर्ट आहे, तेही छानच आहे, सर्वांना सोयीचेही पडू शकेल.

लवकरच समिती जाहीर होइल ...
सर्व इच्छुकांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. पण अजुनही नाशिक व पुणे येथुन संयोजकांची गरज आहे.

समिती स्थापन झाल्यावर तारिख , जागा आणि बाकी निर्णय घेतले जातील.

छत्री किंवा वॉटर बॅग देण्यास संमती असेल तर माझ्याकडे सप्लायरचा नंबर आहे. तोच टीशर्ट पण बनवून देतो. अनुभवी माणूस आहे. संयोजक लागल्यास मेल करा.

मी नवीनच सभासद आहे कुठेही ठरवलेतरी येणार आहे .पुणे मुंबईच्या बाहेर वर्षाविहार करावा हे पटले .त्यांनी जागा सुचवाव्यात .मी काही जागा येथे देतो १.डहाणूजवळ बोर्डी .२ रत्नागिरीजवळ पावस .३इगतपुरीजवह भंडारदरा .४.माहेश्वर इंदौरजवळ ५.सापुतारा नाशिकपासून ९०किमि . नाहितर (अ)नेरळपासून २४ किमि वर पेठच्या किल्याजवळ वनविहार येथे .फोन 'शिवाजी' 9226093034 ,0214 683313 ,येथे एक लेणी आणि नदी आहे मागे भिमाशंकरचा डोंगर दिसतो . (ब) पनवेल पेण मार्गावर ११किमि कर्नाळा किल्याजवळ 'युसुफ मेहेरल्ली सेंटर येथे .

१.डहाणूजवळ बोर्डी .२ रत्नागिरीजवळ पावस .४.माहेश्वर इंदौरजवळ <<<
या सर्व जागांच्या इथे जाण्याचा प्रवास वेळ लक्षात घेतला आहे का?
सकाळी निघून संध्याकाळी परत येणे या प्लॅनमधे या बसतात का?

बोर्डी - मुंबईपासून १६३, पुण्यापासून २८८ किमी, नाशिकपासून १७४ किमी.
पावस - मुंबईपासून ३५३, पुण्यापासून ४७० किमी, नाशिकपासून ४८० किमी
माहेश्वर - मुंबईपासून ५१४, पुण्यापासून ५५३ किमी. नाशिकपासून ३५० किमी

मुंबई पुण्याच्या बाहेरच पडायचंय याचा अर्थ मुंबई-पुणे येथील माबोकरांना गैरसोयीचे होईल असंच ठिकाण शोधायचंय असं नाहीये.

@नीधप ,कोणी केरळ ,कोकण सुचवले म्हणून इतर ठिकाणे लिहिली .शेवटच्या दोन अ आणि ब जागा कमी खर्चाच्या व मुंबई पुणेकरांना सोयीच्या आहेत एक दिवस वाढवल्यास पेठ अथवा कर्नाळा करता येईल .या दोन ठिकाणी रिझॉटला असते तसे महागडे प्रवेश शुल्क नाही जेवण चहाचे शंभरच्या आत आहे ,मोठया ग्रुपसाठी योग्य .

<मुंबई-नाशिक हाय वे वर एक शांग्रिला रिसॉर्ट आहे, तेही छानच आहे, सर्वांना सोयीचेही पडू शकेल<> अनुमोदन.

ववि एक दिवसाचाच असतो. वविला जनरली ८०-१०० लोक असतात.
संयोजनाच्या दृष्टीने एवढ्या लोकांचे ओव्हरनाइट गटग हे तापदायक होऊ शकते.
तसेच अनेकांना खर्च, वेळ या दृष्टीनेही जमले नाही तर मिस करावे लागते.
त्यामुळे ववि सकाळी जाऊन रात्री परत याच स्वरूपात असतो.
देशात मेजॉरिटी मंडळी पुणे वा मुंबईमधली आहेत. त्यामुळे मुं-पु सोय बघितली जाते बाकी काही प्रांतिक अस्मिता नाही.

याचा अर्थ असा नाही की इतर ठिकाणच्या लोकांनी ववि करूच नये. मु-पु वाला ववि शक्य नसेल पण आपल्या शहराच्या आसपास माबोकर आणि ठिकाणे असतील तर ती ही प्रथा सुरू करायला हरकत नाही.

माझी खात्री आहे की मु-पु मधले काही उत्साही भटके माबोकरतरी तेवढ्यासाठी तिकडे नक्कीच येतील.

Pages