वालाच्या डाळीची आमटी

Submitted by सायो on 26 April, 2013 - 15:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वालाची डाळ- एक वाटी,
फोडणीकरता- हिंग, हळद, मोहरी, जिरं(ऑप्शनल)
लसणीच्या पाकळ्या- ५,६ ठेचून,
कढिपत्त्याची पानं- ४,५
आमटीत घालायला-तिखट, मीठ, गूळ, आमसूल
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

वालाची डाळ तूरडाळीप्रमाणेच कुकरला शिजवून घ्यावी. शिजल्यावर तेलाची हिंग, हळद, मोहरी वगैरे फोडणी करुन त्यावर ठेचलेला लसूण परतावा. त्यावर कढिपत्ता घालून मग डाळ घोटून घालावी. उकळल्यावर चवीप्रमाणे मीठ, गूळ, तिखट, आमसूल घालवं. झाली तयार आमटी. गरम पोळ्या, भाताबरोबर ओरपावी.

वाढणी/प्रमाण: 
कल्पना नाही
अधिक टिपा: 

कोथिंबीर जर सशल जेवायला यायची असेल तरच घालावी अन्यथा न घालूनही चालेल.

माहितीचा स्रोत: 
ही रेसिपी शूम्पीची आहे. तिच्यावतीने फक्त इथे टाकली आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! ही डाळ मी चवीला कड्वे वालांसारखी लागेल म्हणून आणली होती. तीचे काय करावे याचा प्रश्न होता. आता ही आमटी करून बघेन.

वाह मस्त .. इंग्रो मधे नेहमी दिसते पण कशी करायची माहित नव्हते.
एक प्रश्न बिरड्या/डाळिंब्या म्हणजे हेच का?
अज्ञानाबद्दल क्षमस्व Happy

मस्त!

मी यात कधी कधी थोडा गोडा मसाला आणि ओलं खोबरं घालते. लसूण घालत नाही.

लसूण घातली तर ती वरतुन... लसूण + मोहरीची चुरचुरीत फोडणी करुन. आमटीत थोडा कांदा-लसूण मसाला घालते. जरा वेगळी चव... वालाचा उग्र वास कमी होतो.

राखी मी मगाशी खरे तर हेच लिहीणार होते की एकदा तुझ्यासाठी न विसरता आमसुलं घालून आणि सशलसाठी कोथींबीर, ओले खोबरे आणि कढीपत्ता घालून आमटी करून जेवायला बोलवीन.. Happy Happy

सायो, तयार आमटीचा फोटो???

मी लसूण नाही घालत. म्हणून की काय, गूळ अंमळ जास्तच घालावा लागतो तरच डाळीचा उग्रपणा कमी होतो. गॅसवर सुक्या खोबर्‍याचा तुकडा काळाकुट्ट होईपर्यंत भाजून आणि जिरं कोरडंच भाजू दोन्हीचं वाटण आमटीला लावते. मग वाफाळत्या भातावर तूप घालून वालीची आमटी घालून घालून ओर्पायचं!