कोथरूडच्या सर्व्हे क्रमांक 44 वरील उद्यानाचे आरक्षण उठवून ती जागा निवासी / व्यापारी करण्यास विरोध

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 19 April, 2013 - 10:02

आजच्या सकाळमधील कोथरुडच्या सर्व्हे क्रमांक ४४ चे उद्यानाचे आरक्षण विकास आराखडा मंजूर करून घेताना नगरसेवकांनी कसे हातोहात बदलून ते ''व्यापारी'' केले याचे हे वृत्त.

कोथरूडकरांनो, उरले फक्त नऊ दिवस...!

पुण्याच्या विकास आराखड्याच्या झालेल्या भज्याच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आता केवळ नऊ दिवस उरले आहेत.

कोथरूडकरांपुरते बोलायचे तर सर्व्हे क्रमांक 44 वरील उद्यान त्यांना हवे असेल तर त्यांनी पालिकेच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील शहर अभियंत्यांच्या कार्यालयात लेखी हरकत नोंदवावी किंवा pmcmco@gmail.com, prashant.waghmare@punecorporation.org., pmctpo@rediffmail.com या संकेतस्थळांवरही पाठवावी. बाकी सर्व पुणेकरांनी एचसीएमटीआर वाचविण्यासाठीही याच पत्त्यावर आपली हरकत नोंदवावी आणि त्यांच्या सुनावणीसाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जागरूक पुणेकरांकडून करण्यात येत आहे....

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शंका आहे.
इमेल ची दखल / पोचपावती घेतली जाईल का ? किती इंमेल्स आले याचं रेकॉर्ड कसं ठेवणार आहेत हे लोक ?

जर आऊटलुक एक्स्प्रेसमधून इमेल केलेत तर रिक्वेस्ट रीड रिसिट पर्याय निवडून तसे इमेल पाठविता येते.

अन्यथा ते इमेल्सचा ट्रॅक कसा ठेवणार आहेत याबद्दल कल्पना नाही.

मी मोठ्या आशेने श्री रवी करंदीकरांच्या ब्लॉग वर पिंपरी चिंचवडचा आराखडा दिसतो का हे पहाण्याचा प्रयत्न केला. परंतु तो नाही किंवा नसावा.

आमच्या पिंपरी चिंचव्ड शहरात असल्या जागरुकतेची वानवाच आहे.विवेक वेलणकर असोत की रवी करंदीकर अश्या जागरुक व शहराच्या एकंदरीत स्वास्थ्याबाबत आस्था असलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांची सुध्दा वानवा आहे.

पिंपळे गुरव या भागात जलपर्णी आणि त्यामुळे दिवसा दिसणारे डेंग्युचे डास पाहुन किंवा चावुन कुणाला काही फरक पडत नाही. या कारणासाठी हॉस्पीटलमधे रहावे लागणे हा एक पुर्व जन्म दोष आहे असा समज करुन इथली जनता वावरत असते.

स्पिड ब्रेकर्स का व कुठे असावेत. त्याची नियमावली असते का ? असा प्रश्न जनतेला पडतच नाही. नवश्रीमंत कुत्र्यांना घेऊन रस्त्यावर फिरत असतात. कुत्री रस्त्यावर घाण करतात. या सारख्या अनेक बाबी कश्या व कुठे मांडाव्यात हे समजत नाही.

लिंक दिसत नाही मला.
कोथरुडच्या सर्व्हे क्रमांक ४४ म्हणजे नक्की कोणते ग अरुंधती ?

मृणाल१, त्या बातमीतच आहे ना << कोथरूडचा सर्व्हे क्रमांक 44 येतो पौड फाटा उड्डाणपुलाच्या लगतच्या टेकडीवर. सध्याच्या केळेवाडी झोपडपट्टीच्या वरच्या भागात हे आरक्षण असून, त्याच्या काही भागांत झोपडपट्टीही आहे. या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे काम सध्या सुरू आहे. >>