निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
सुगंधाची कॉपी कर्णारी झाडं..
सुगंधाची कॉपी कर्णारी झाडं.. किती गम्मत..
जकार्ताला एक केळ्याची वरायटी मिळे.. चांगली लांबलचक ,जाडीजुडी केळी होती पण त्यांना वनिला चा स्ट्राँग वास यायचा..खाववायची नाहीत अगदी!!!
प्रज्ञा,पाठव तुझी आय डी..
झाडात असे एकमेकांच्या
झाडात असे एकमेकांच्या सुगंधाची कॉपी करायची पद्धत आहे.>> दिनेशदा माझ्या कडे कुंड्यांमधे बी पडुन काही झाडं येतात, मी ती थोडी वाढू देतो कसली आहेत पहायला, अशीच दोन झाडं आली आहेत, त्याची पानं जरा जांभळाच्या झाडासारखी दिसताहेत पण पानाना अंब्यासारखा वास येतोय. कसली असतील ती?
जो-एस फोटो काढून टाका इथे
जो-एस फोटो काढून टाका इथे त्या झाडांचे.
यांचा आमच्या जामच्या झाडांवर फलाहार चालतो आणि टेरेसवर भोजन. ::स्मित:

जो_एस, वर्णनावरून मलाही फार
जो_एस, वर्णनावरून मलाही फार उत्सुकता वाटतेय.
वर्षू, व्हॅनिला बनानावरुन आठवले. ताज्या दूरियान चा वास, पाश्चात्य लोक सांगतात तेवढा खराच वाईट असतो का ?
मी थायलंड्मधे तळलेले गरे खाल्ले होते, त्याचा वास आपल्या फणसासारखाच होता.
वर्षूतै, तुझ्या मुलाखतीची
वर्षूतै, तुझ्या मुलाखतीची लिंक आमच्या घरच्या पी सी वर ओपन होत नाही...:अरेरे:
दिनेशदा ते वास कॉपी
दिनेशदा ते वास कॉपी करण्याबद्दलचं फारच इंटरेस्टिंग!
आमच्या कडे पॅशन फ्रूट होतं त्याला अगदी आंबा संत्र पाइनॅपल असा कन्फ्यूज करणारा मिक्स वास यायचा.
पण सरबत मात्र अप्रतीम चवीचं.
जागू खारूताईचा चांगला फराळ चाललाय!
शांकली मे ऐकली वर्षूची मुलाखत.(टुकटुक) खूपच छान! जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन अनेक उद्योग करून स्वतांचा वेळ आनंदात कारणी कसा लावायचा हे अगदी सहजी हसत हसत सांगते वर्षू.
आईग्ग्ग! जागूतै कसली लक्की
आईग्ग्ग! जागूतै कसली लक्की आहेस तू
मला खार हा एकच प्राणी आवडतो/आवडते आणि मला त्याला/तिला पाळायची जाम इच्छा आहे .
पोज पण कसली गोडुली दिलीये
मानुषी, आपल्याकडे हे
मानुषी, आपल्याकडे हे पॅशनफ्रुट अजून तेवढे माहीत नाही. इथे मात्र घरोघर वेल दिसतो. केशरी / पिवळा / किरमीजी अशा अनेक रंगातली फळेही दिसतात.. स्वादाला सगळ्यात मस्त ते किरमीजी, असे मला वाटते.
सुप्रभात
सुप्रभात मंडळी!

दिनेशदा...माझ्याकडचं पॅशनफ्रूट पिकल्यावर मस्त पिवळं असायचं. कच्चं हिरवं गार!
पण तो वेल नंतर गेला. मी सांगलीहून बीया आणून लावल्या होत्या.
आई त्याचं सरबत आणि सुधारस करायची. म्हणजे नेहेमीसारखा सुधारस करून त्यात अंदाजाने पॅ.फ्रूटचा रस घालाचा. आणि केळ्याचे काप..................आहाहा!
कडूलिबावरचा भारद्वाज.
वा! मस्त फोटो आहे हा, मानुषी.
वा! मस्त फोटो आहे हा, मानुषी.
हेच ना पॅशनफ्रुट? मी केरळात पहिल्यांदा खाल्लं. फारच छान लागतं.
मुन्नारच्या रस्त्यावर एका ठिकाणी कोकोचं फळही खाल्लं होतं. ते ही छान पिकलेलं आणि चविष्ट लागलं. त्याचा फोटो काढायचा होता पण विसरलेच.
परतीच्या वाटेवर काढू म्हटलं पण येताना दुसर्याच रस्त्यानं आलो.
ही एक लिंक सापडलीये : http://danifoods.com/photogallery.html
मस्त फोटो आहेत - मसाले, कॉफी, कोको वगैरेचे.
हो हो मामी हेच ते! पण तू ते
हो हो मामी हेच ते! पण तू ते खाल्लंस कसं? कारण नुस्तं कधी खाल्लं नाही. कारण फोडल्यावर आत बीयाच ना!
दिनेश दा... दुरिअन ला थायलँड
दिनेश दा... दुरिअन ला थायलँड च्या राष्ट्रीय फळाचा मान मिळाला असला तरी थाय एअर वेज मधे, थायलँड मधील कोणत्याही हॉटेलात दुरियन आणायला मनाई केलेली आहे.. तसे बोर्ड्स लावलेले सापडतील तिकडे
खर्रच मला तरी दुरिअन च्या दुकानावरून सुद्धा जाववत नाही.. फॉर् दॅट मॅटर.. .फणसाबाबतीत पण मला असंच होतं
शांकली.. घरच्या कॉम्प वर रिअल प्लेअर डाऊन लोड केलेला आहे का प्रोग्राम?? असेल तर ऐकू यायला काही प्रॉब्लेम होणार नाही..
मानुषी.. टुक टुक करताना कशी दिसत असशील ते इमॅजिन करत होते..
जागु.. कसली ग्वाड दिस्तेय खारूताई.. भित्री तर अजिबात वाटत नाहीये..
हो, पण त्या बिया अगदी सहज
हो, पण त्या बिया अगदी सहज गिळता येतात. प्रचंड छान लागतं.
मानुषी.. भारद्वाज कसला
मानुषी.. भारद्वाज कसला भारदस्त दिस्तोय.. रॉयल बर्ड!!!
पॅशन फ्रूट , पनामा ला खूऊप मिळतात.. आंबट गोड चवीचं सरबत तर एकदम पॉप्युलर ड्रिंक आहे तिथे..
झतार मसाल्यात हे दोन पदार्थ
झतार मसाल्यात हे दोन पदार्थ दिसले म्हंजे वाचले.. पण अर्थ कळला नाही..
हे काय आहे बरं????
sumac आणी marjoram ???????
पण त्या बिया अगदी सहज गिळता
पण त्या बिया अगदी सहज गिळता येतात. प्रचंड छान लागतं.>>>>>>>>>>
काय सांगते मामी...........अगं जन्म गेला माझा त्या पॅ.फ्रूटात. पण हे गिळण्याचं कधी लक्षात नाही आलं.
गुड आयडिया!
नाहीतर किती ती उसाभर............फळ कापा, चमच्याने गर(बिया) चमच्याने ....टेढे चमचेसे... काढा. मस्लिन कपड्यात घालून रस पिळा ................इ.इ.
असो...........दोडकी, घोसाळी, दुधी, कारली ......सगळे वेल लावल्यापासून दीडेक महिन्यात सैरावैरा पळत सुटलेत. तरी प्रत्येकाला ताण लावलेत....लगेचच. काहीतरी उपाय करायला हवा. नाहीतर सगळ्यांचा "वेलू गेला गगनावरी" असं झालं तर ते दुधी, दोडके कसे तोडणार आणि खाणार?
फक्त टोमॅटो वेलू नसल्याने काम सोप्पं!
तरी पाकिटातून वाफ्यात जरा जास्तीच बीया(टोमॅटोच्या) पडल्या. बहुतेक टोमॅटोचं पीकच घ्यायला लागणार!( दात काढणारी बाहुली)
मानुषी>>>>>>>
मानुषी>>>>>>>
मानुषी, या बिया तर कुडूम
मानुषी, या बिया तर कुडूम कुडूम चावून खायच्या असतात. केनयाला केशरी गराचे आणि अंगोलात पिवळ्या गराचे मिळते. केळे मॅश करुन त्यावर पॅशन फ्रुट फोडून घालायचे किंवा हाच प्रयोग व्हॅनिला आईसक्रीमवर पण करता येतो.
वर्षू, मला तो गंध एकदा अनुभवायचा आहे. सिंगापूरमधे पण तसेच बोर्ड आहेत, सगळीकडे.
मानुषी, कारल्याच्या वेलाला कारली लागली आणि ती साधारण बोटभर झाली कि एक छोटासा दगड साध्या दोर्याने त्याच्या देठाच्या विरुद्ध टोकाला सैलसर बांधायचा. त्या वजनाचे ट्रॅक्शन होऊन, कारले छान लांबलचक होते शिवाय आतल्या बिया जरा ऐसपैस होतात, त्यामूळे त्या काढणे सोपे जाते. असाच प्रयोग पडवळावर पण करता येतो.
मांडवाच्या बाहेर येणारी टोके परत मांडवातच खुपसायची. एकदा कळलं कि पुढे वाढायला जागा नाही, कि वेल पसरत नाही. नाहीतर रात्री ( आपण झोपलो कि) तणाव्यांच्या सहाय्याने चाचपडत आधार शोधतात, ते वेल.
टोमॅटोला पण आधार दिला तर ते मातीत लोळणार नाहीत. ( गॉडफादर मधला तो सीन आठवतोय का ? तो छोट्या मुलासोबत पळता पळता कोसळतो तो ! )
केनयात, पॅशन फ्रुटचा ज्यूस
केनयात, पॅशन फ्रुटचा ज्यूस काढताना सगळा गरच ( + पाणी + साखर ) मिक्सरमधे घालून फिरवतात आणि मग गाळून घेतात.
या पॅसिफ्लोरा कूळातल्या सर्वच
या पॅसिफ्लोरा कूळातल्या सर्वच वेलींना सुंदर फुलेही येतात.
आता तर यात अनेक हायब्रीड जाती आल्या आहेत.
नाहीतर रात्री ( आपण झोपलो कि)
नाहीतर रात्री ( आपण झोपलो कि) तणाव्यांच्या सहाय्याने चाचपडत आधार शोधतात, ते वेल>>>>>>:हाहा:
पॅ फ्रूट माहिती एकदम मस्त..
मानुषी अग वाढू दे एखादा वेल
मानुषी अग वाढू दे एखादा वेल चंद्रावर गेलाच तर यानातून जाऊन तुला भाज्या काढता येतील. नाहीतर त्या वेलीवर चढून चंद्रावर जाता येईल.
मानुषी अग वाढू दे एखादा वेल
मानुषी अग वाढू दे एखादा वेल चंद्रावर गेलाच तर यानातून जाऊन तुला भाज्या काढता येतील. नाहीतर त्या वेलीवर चढून चंद्रावर जाता येईल.
हे राधाने तिन वेळा एन्टर
हे राधाने तिन वेळा एन्टर केले.
हो ना जागू
हो ना जागू ............लहानपणी एक गोष्ट वाचली होती. मटाराचा वेल ...त्याला धरून आभाळात जाणारा मुलगा.......अंधुक आठवतंय!.कोणती ती गोष्ट? माझा अगदी ताबा घेतला होता तेव्हा या गोष्टीने पण आत्ता मात्र चुटपुट लगलीये आठवत नाही म्हणून.
दिनेशदा नीट वाचलंय सगळं. करीन सगळ्या आयड्या...कारल्याची तर भारीच!.............नाहीतर सगळे वेलू आपण झोपल्यावर उद्योग करून ठेवायचे. आणि मग जागूचं चंद्र आणि यान! व्वा!
पॅ. फ्रूटचीही माहिती इन्टरेस्टिंग!
गॉडफादरमधला सीनही आठवत नाही दिनेशदा.........(लानत है मेरी आठवणपे!)
वा गं वा जागू, उगाच का तिच्या
वा गं वा जागू, उगाच का तिच्या नावाने बिल फाडतेस ? आता संपादन करुन, दुसरे काहितरी लिही !
हो शांकली खरेच त्या वेली असे करतात. त्या तणाव्याचे दोन भाग असतात. एकीला आधार मिळाला कि एक भाग क्लॉकवाईज आणि दुसरा भाग अॅंटीक्लॉकवाईज गुंडाळला जातो आणि बंध भक्कम केला जातो.
बोगनवेलींना तणावे नसतात तर त्या काट्यांचा आधार घेतात.
आपण मात्र गाणे म्हणतो, वृक्षवेल या दोहींची, जोडी शोभते, कशी ही ( नाटक, संगीत शाकुंतल )
जागू -राधा स्पेशल... माय लेकी
जागू -राधा स्पेशल...
माय लेकी पी सी वर ..... पी सी वर
गप्पा रंगल्या नि ग वर .... नि ग वर
झाडे पाने फुले पहा .... फुले पहा
राधा जरा शांत रहा .... शांत रहा
एवढे पोस्ट करते मी .... करते मी
चळवळ जरा कर कमी .... कर कमी
मधेच लाऊ नको बोट ...... नको बोट
बघ पडली तिन्दा पोस्ट .... तिन्दा पोस्ट
की बोर्ड लवकर सोड सोड ..... सोड सोड
राधा हसली गोड गोड .... गोड गोड....
(राधाला पप्पी गोड ..... पप्पी गोड )
शुभ सकाळ नि. ग. कर्स. मी एक
शुभ सकाळ नि. ग. कर्स. मी एक दिवस चुकले तर ४/५ पानांची उडी. हि ४/५ पाने वचून पुन्हा भेटते.
शशांक शीघ्र कवी आहेस हं!
शशांक शीघ्र कवी आहेस हं! मस्त!
आनिल, मला खुपच कमी माहिती आहे
आनिल, मला खुपच कमी माहिती आहे हे येथे येउन कळाले. १०/१५ कुंड्या [आम्ही कुन्ड्याच लावतो थंडीच्या भितीमुळे] लाउन स्वःताला गार्डनर समजत होते. येथे येउन डोळे ऊघडले, नाही विस्फरले.
:). आता रोज येण्याचा प्रयत्न करेन.
दिनेशदा, ते वेगळे ओव्याचे झाड माझ्याकडे आहे. त्याची पाने काहीशी तुळशी सारखी वाटतात पण मोठी.
वास आणि चव मात्र छानच
Pages