२ वाटे कोलंबी सोलून.
२-३ कांदे उभे चिरुन
३ टोमॅटोंची मिस्करमधून काढलेली प्युरी
१ बटाट्याच्या किंवा गरजेनुसार बटाट्याच्या फोडी
बासमती किंवा कोणताही जुना तांदूळ ४ वाट्या.
२ चमचे आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची कोथिंबीर पेस्ट
३-४ दालचीनीचे तुकडे
४-५ लवंगा
७-८ मिरी
२-३ वेलच्या
३-४ तमालपत्र
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल
(फोटोतील प्रमाण थोड्याफार फरकाने वेगळे आहे कृपया कोणी मिरीदाणे, लवंगा वगैरे मोजू नका :हाहा:)
१) तांदुळ धुवुन निथळून ठेवा. (जमल्यास १ तास आधी)
२) कोलंबीला आल्,लसुण, मिरची,कोथिंबीर पेस्ट लावून घ्या.
३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात प्रथम दालचीनी, वेलची, तमालपत्र, मिरी, लवंग टाकून त्यावर कांदा टाका व कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजू द्या. कांदा कुरकुरीत झाल्यास अजून चविष्ट लागतो पण त्यासाठी थोडे जास्त तेल वापरावे लागते.
४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला, कोलंबी व बटाटे घाला व चांगली एक वाफ येऊ द्या. (जर कुकर मध्ये करणार असाल तर बाकीचे सगळे एकत्र टाकले तरी चालते वाफ न आणता)
५) आता टोमॅटो प्युरी, घाला व जरा परतवा.
६) ह्या मिश्रणावर तांदूळ, मिठ घाला भात शिजवण्यासाठी लागते तेवढे पाणी घाला व ढवळून मध्यम आचेवर पुलाव शिजत ठेवा.
७) ७-८ मिनीटांनी ढवळा व पुन्हा शिजू द्या पाणी आटले की गॅस मंद करुन झाकण ठेवून पुलाव वाफेवर ठेवा. ( हे सगळी भात शिजवण्याचीच प्रोसेस करायची आहे.)
कुकरमध्ये अजुन सोपा पडतो फक्त पाण्याचे प्रमाण थोडे कमी करायचे.
बटाटे नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतात.
काजू घातले तरी अजुन छान लागतो. व्हेज वाल्यांनी कोलंबी ऐवजी काजू पुलाव करुन खाल्ला तरी चालेल काजू कोलंबीसारखेच दिसतात
मी साधा तांदूळ वापरला आहे. तुम्हाला आवडेल तो तांदूळ वापरा. फक्त नवीन नको.
वॉव! फोटो मस्तच .. रेसिपीही
वॉव! फोटो मस्तच .. रेसिपीही झणझणीत वाटतेय ..
आता अमेय ह्यांची रेसिपी आणि ही रेसिपी कम्पेअर करायला हवी ..
सशल अमेय यांचा पुलाव ग्रिन
सशल अमेय यांचा पुलाव ग्रिन मसाल्यातील आहे. मी वर दिलेला लाल मसाल्यातील आहे.
थँक्स् जागू .. हो टोमॅटो
थँक्स् जागू .. हो टोमॅटो प्युरी विसरलेच की मी ..
हे मला झेपेल असं दिसतय नक्की
हे मला झेपेल असं दिसतय
नक्की करणार!
जगू, २ चमचे मसाला लिहिला आहेस तो कोणता मसाला?
तो फेमस जागू मसाला. रेसिपी
तो फेमस जागू मसाला.
रेसिपी आणि फोटो मस्त, जागूताई.
जागू, भारी ! तोंपासु फोटो हा
जागू, भारी ! तोंपासु फोटो

हा मी चाखलेला पहिला सामिष पदार्थ. तेव्हा फक्त कोलंब्या वेचून खाल्या होत्या पुलावातल्या
मस्त! तोंपासु. कोलंबीची सर्व
मस्त! तोंपासु. कोलंबीची सर्व चव त्या भातात उतरते, त्यामुळे कोलंबी भात केला कि दुसरे काहीही करायला नको. कोलंबी पेक्षा करंदी ची जास्त छान चव येते ना जागू?
मस्त दिसतोय पुलाव नवर्याला
मस्त दिसतोय पुलाव
नवर्याला सीकेपी पद्धतीची कोलंबीची खिचडी जाम आवडते. नेक्स्ट टईम हा पुलाव करायला सांगेन...
एक सांग जागू, कोलम्बी एव्हढी शिजवली तर वातड नाही का होत? मी खात नाही पण कोलंबी जास्त शिजवायला लागत नाही एव्हढं माहितीये
जबरदस्त फोटो! चवीलाही छानच
जबरदस्त फोटो! चवीलाही छानच असणार!
वाह
वाह
जागू, मस्त रेसिपी आणि प्रची.
जागू, मस्त रेसिपी आणि प्रची.
यम्मी!
यम्मी!
स्लर>>>>>>>>पी!!!!!!!!!!!! को
स्लर>>>>>>>>पी!!!!!!!!!!!!
कोणी मिरीदाणे मोजू नका...........

व्वा मस्त फोटो !
व्वा मस्त फोटो !
आलेच, तू फक्त पापड तळ मी आलेच
आलेच, तू फक्त पापड तळ मी आलेच मायबोली बंद करून
नवर्याला सीकेपी पद्धतीची
नवर्याला सीकेपी पद्धतीची कोलंबीची खिचडी जाम आवडते. नेक्स्ट टईम हा पुलाव करायला सांगेन...>>>>>>>>>>>>> कोणाला नवर्याला?????
पण जागु ताइ पुलाव दिसतोय लै भारी........... भूक लागली
काजू कोलंबीसारखेच दिसतात
काजू कोलंबीसारखेच दिसतात हाहा>>>>>>>


हपिसात बसून रेसिपी चाखल्याचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद 
बाकी फोटो मस्तय. एका दीराचे केळवण आहे घरी वीकेंडला त्याच्यावर करीन हा प्रयोग
लाजो कोलंबी फार नाहीच शिजवावी लागत, आणि फार शिजलीच तरी वातड नाही होत.म्हणूनच नुसती वाफेवर शिजवली आहे ना जागूच्या रेशिपीत
जागू पुलाव अगदी तोंपासू दिसतो आहे. तुमच्या रेश्प्यांचे फोटो बाकी झक्कास अस्तात...नयनसुख घेता येते अगदी
कोलंबी कुठल्याही रुपात मला
कोलंबी कुठल्याही रुपात मला तितकीच आवडते. आणि हा पुलाव तर खुपच लाडका आहे. माझी आई एकदम मस्त बनवते, वर तुझ्या फोटोत दिसतोय तसाच...
कोलंबीचे पदार्थ खायला आधी त्याची टेस्ट डेवलप करावी लागते. घरच्या मंडळींमध्ये याचा अभाव असल्याने ब-याच वर्षात मी बनवलाच नाहीय हा पुलाव. या रविवारीच शुभस्य शीघ्रम करते
जागुले तु एक हॉटेल काढ. मी
जागुले तु एक हॉटेल काढ. मी तिथे काम करिन.
कुफेहेपा? इतके सुंदर पदार्थ करतेस. मला तुझाही हेवा वाटतो.. (हे वाक्य दिनेशना टाकून झालय परवा)
दक्शिणा दी....तु मच्छी साफ
दक्शिणा दी....तु मच्छी साफ करायचं काम करणार हॉटेलात?????? मी पण करेन मदत तुला.....
मी हॉटेलात टेस्टींग टीम जॉइन
मी हॉटेलात टेस्टींग टीम जॉइन करेन
जागू मस्त रेसीपी.
झालं मग गिर्हाईक कंटाळून
झालं मग गिर्हाईक कंटाळून निघूनच जाईल.
फोटो मस्त!! पण फोटोच बघणार
फोटो मस्त!!
पण फोटोच बघणार नुसता
जागू, मी कुठलाही पुलाव/ बिर्याणी तुपात करते. खूप स्वादिष्ट लागतो भाताचा तो प्रकार.
माझी आई असाच करते फक्त टोमँटो
माझी आई असाच करते फक्त टोमँटो प्युरी नाही घालत. आता असा करुन बघते.
बाकी हॉटेलबद्दल म्हणाल तर खरच मनावर घ्या (फुकटचे सल्ले देणं किती सोप्प असतं नै ;-)) मीही मासे साफ करण्याचे काम बर्यापैकी करते. (I'll improve under your training :-)) पुण्यात शाखा काढल्यास मी जॉईन करेन.
जागुटले, संध्याकाळच्या
जागुटले, संध्याकाळच्या स्वयंपाकात काय करावे असा विचार भुकेल्या पोटी करत होते आणि ही रेसिपी!
पण पुर्वतयारी काहीच नाहीये! वीकांताला करणेत येइल!
मोबाईल हँग झाला आणि
मोबाईल हँग झाला आणि द्विरुक्ती (कुण्या माबोकराचा ढापलेला शब्द ;-)) झाली
जागुताई माझा पत्ता विपु केला
जागुताई माझा पत्ता विपु केला आहे, क्रुपया एक डब्बा पाठवुन देणे. (प्रचि तोंपासुच )
जागू, मस्त दिसतोय हा
जागू, मस्त दिसतोय हा पुलाव.
काजू कोलंबीसारखे दिसतात
पण चवीला जास्त चांगले असतात बरं 
सगळ्या सगळ्यांचे मनापासून
सगळ्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
लाजो कोलंबी ताजी असेल तर वातड नाही होणार. जेव्हा जाड्या कोलंब्या तळाव्या लागतात तेंव्हा जास्त वेळ शिजवाव्या लागतात. पण त्याही वातड नाही होत.
दिनेशदा तुमची पोस्ट पाहीली आणि गंमत म्हणून हा फोटो काढला. ह्या फोटोत सांगा काय चविष्ट आहे ते
पण दिवा घेऊन हं.
दिनेशदांसाठी काजूच चविष्ट
दिनेशदांसाठी काजूच चविष्ट असावेत, कारण ते व्हेजी आहेत (ना?)
त्या कोलंब्या पाहून पाणी सुटलं तोंडाला
Pages