Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(इंडियाला जाणार आहे समर
(इंडियाला जाणार आहे समर मध्ये) >> चांगली भरताची वांगी, करडई, चुका, चाकवत, यांच्या बिया माझ्या वाटणीच्या पण आणशील का ? मुंबैत /बंगळुरूमधे मला तरी कधी मिळाल्या नाहीत.
रिखवची पहिली भारतवारी ना? मज्जा करा
सीमा, भाज्यांचे फोटो नक्की
सीमा, भाज्यांचे फोटो नक्की टाकेन.
रच्याकने, तुझ्याकडून ईथे पोचलेला आंबट चुका गेली २ वर्षे मस्त येतोय. बिया लावयचीही आता गरज नाही, मागच्या वर्षीच्या जागी पुन्हा येत रहातो
मीपुणेकर, आंबट चुक्याच्या
मीपुणेकर, आंबट चुक्याच्या बिया लावल्या होत्या का?
आंबट चुक्याच्या बिया लावल्या
आंबट चुक्याच्या बिया लावल्या होत्या का? >> हो
तुमच्याकडे जी झाडं आहेत
तुमच्याकडे जी झाडं आहेत त्याला बिया येतात का? येत असल्यास मला मिळू शकतील का? मी जून मधे बे एरियात येणार आहे.
शुगोल, हो नक्की देईन
शुगोल, हो नक्की देईन
इंग्रोमधली ओली हळद लावली आहे
इंग्रोमधली ओली हळद लावली आहे का कोणी ? किती खोल पुरावे लागतात कंद ? पानं फुटायला किती दिवस लागतात ?
भरताची वांगी, करडई याच्या
भरताची वांगी, करडई याच्या बिया कोण आणतंय भारतातुन? मलापण थोड्या आणता येतील का? मी त्याचे पैसे देईन. दुधीच्या बिया कुठे मिळाल्या?
मी मागच्या वर्षी कुंडीत काही भेंडीची रोपं लावली होती. एक भाजी होण्यापुरती पण भेंडी आली नाही.
मेधा, मी लावते कुंडीत हळद.
मेधा, मी लावते कुंडीत हळद. साधारण दीड इंच पुरेसे आहे. साधारण १५ दिवसात कोंब येतात.
शिल्पा, दुधीच्या बीया मी सीड्स ऑफ इडियाकडून मागवल्या. त्यांच्याच कडून 'हरी' म्हणून भरतासाठीच्या वांग्याचे बी घेतले आहे.
माझ्याकडे रोमा आणि बीफस्टेक
माझ्याकडे रोमा आणि बीफस्टेक टोमॅटोची रोपं तयार होत आहेत. बाकी बनाना पेपर, सिमला मिरची,इंडियन तिखट मिरची 'अग्नी' च्या बीया लावल्यात सीड स्टार्टरमधे. बेसील, पर्सली, कादे लावलेत. त्याला छोटी पानं आलेत. रोझमेरी आणि पुदीनाची छोटी नवी रोप वाटण्यासाठी तयार होत आहेत. पालक, चार्ड आणि रॅडिश लावलाय. या आठवड्यात बीट, डील आणि फेनल कुंडीत आणि कोन फ्लॉवर, शास्ता डेझी, जेरेनियम बागेत लावेन.
पुदिना कुंडीतच लावा प्लीज. मी
पुदिना कुंडीतच लावा प्लीज. मी अंगणात लावून घोडचूक केलीय. दर ८-१५ दिवसांनी ६० ७० % उपटून काढावा लागतो तेंव्हा इतर झाडांना वाव मिळतो.
पार्सली बाय अॅनुअल आहे . - पहिल्यापेक्षा दुसर्या वर्षी जास्त चांगलं वाढतं रोप. त्यामुळे आता मी दोन दोन रोपे दर वर्षी लावते.
दुधीच्या बिया मला गार्डन वेब मधून एकाकडून सीड एक्स्चेंज मधे मिळाल्या होत्या. भरीताची वांगी भारतातून.
भेंडीची रोपं अंगणातच लावावी लागतील. ६ रोपांमधे भरपूर भेंड्या मिळालेल्या मागच्या वर्षी.
ह्यावेळी मी स्टार जस्मिन
ह्यावेळी मी स्टार जस्मिन आणली. मस्त सुगंध आहे.
हा जुना फोटो, या वर्षीच्या
हा जुना फोटो, या वर्षीच्या बागेचे जुलै मधे
अरे वा मस्तच .. दुधी ऑलमोस्ट
अरे वा मस्तच ..
दुधी ऑलमोस्ट पडवळच झाला आहे ..
मुंबईत कुठे मिळतात बिया?
मुंबईत कुठे मिळतात बिया? पूर्वी दादरला टिळक ब्रिजखाली नर्सरी होती एक - ती बंद झालेली दिसली.
मीपुणेकर, भारी.
एक थोडी वेगळी शंका: पॅटिओ
एक थोडी वेगळी शंका: पॅटिओ फर्निचर लॉन मधे कसं ठेवता येईल? माझा पॅटिओ फार मोठा नाही, म्हणून मी ते बाहेर लॉन मधे हलवलं. पण खुर्च्यांचे आणी ग्लायडर चे पाय जमिनीत रुततात. शेवटचा पर्याय म्हणजे काँक्रीट बेस करून घेणं, पण त्यापेक्षा सोपी काही युक्ती आहे का?
सही आहे तो दुध्या. मला कोबी
सही आहे तो दुध्या.
मला कोबी आणी दुधीच्या झाडांचे/वेलांचे फोटो पण बघायला खूप आवडतील.
मीपुणेकर, वॉव मस्त फ्रेश
मीपुणेकर, वॉव मस्त फ्रेश भाज्या..
सही आहे तो दुध्या. >>> हा हा हा
मस्त दिसतायत भाज्या
मस्त दिसतायत भाज्या मीपु.
दुधी आणखीन लांब झाला तर लहान मुलांना जंप रोप म्हणून वापरता येईल
वॉव मीपु मस्त
वॉव मीपु मस्त फोटोज...यंदाच्या बागेचे पण टाका. दुधी मी कधीच लावला नाहीये. बिया कुठे मिळाल्या?
आणखी एक प्रश्न मोगरा होम्डीपोमध्ये मिळ्तो न? त्याचं इथलं नाव काय आहे?
(केवळ) एक पान पाठी गेलं तर
(केवळ) एक पान पाठी गेलं तर मीपु ने माहिती दिली होती ..
>> मोगर्याची झाडं आली आहेत (अरेबियन जास्मीन), ईच्छुकांनी होम डेपो गाठा
(मला सिरीयसली प्रश्न पडलाय की मायबोलीवर फक्त माहिती देणार्यांनां आणि तिचा उपयोग करून घेतलेल्यानांच किंवा माहितीचं ज्ञान असलेल्यानांच माहित असावं माहिती कुठे आहे ते .. नव्या माणसाला माहिती शोधणं महाकर्मकठिण काम असावं ..)
सशल हाबार्स.. काहीवेळा शंभरेक
सशल हाबार्स..
काहीवेळा शंभरेक पोस्ट्स पडल्या की नेमकं कामाचं पाहिलं जात नाही तसं झालं असेन...मी खरं फक्त तिच्या भाज्यांच्या फोटोचं कौतुक करायला लिहिलं आणि त्यावेळी जुना विचारायचा प्रश्न विचारून घेतला..
इन जनरल माबोवर काही शोधणं हे खरंच नेहमी ही साइट न वापरणार्यांना सहज शक्य होत्तंच असं नाही. फक्त प्रत्येकवेळी कुणी न ़कुणी शोधून देतं ..हिच कथा युसायुसू आणि पाकॄ सांगा इथली पण आहे...असो...आभार्स.
They are coming.. are you
They are coming.. are you ready?
http://www.cicadamania.com/where.html
अरारा, बिचारा दुधी जरा
अरारा, बिचारा दुधी जरा धष्टपुष्ट , अस्ताव्यस्त झाला तर पार पडवळ, जंप रोप करून टाकला

शूम्पी, घरी गेले कि कोबीच्या झाडाचे (?) आणि दुधी च्या वेलीचे फोटो टाकते
वेका, पहिल्यांदा दुधीच्या बिया ईथे लोकल नर्सरी मधे मिळाल्या. लोज मधे चेक करा.
दुधीच्या बिया मला लोज मधे
दुधीच्या बिया मला लोज मधे Italian Gourd नावाने मिळाल्या.
वा मस्त आहेत फोटो !!
वा मस्त आहेत फोटो !!
शूम्पी, हे बघ कोबी, दुधीचे
शूम्पी, हे बघ कोबी, दुधीचे फोटो
फोटो जुना आहे.
आणि दुधीची वेल
मस्त फोटो.वेली आणि भाज्यांचे
मस्त फोटो.वेली आणि भाज्यांचे फोटो पहायला खूप आवडतं,आणि तुझं मला नेहेमी खूप कौतूक वाटतं.काय सुंदर बाग फुलवतेस दर वर्षी!
Btw,दुधी भोपळा बिया/रोपं lowes/home depot\ मधे आली आहेत?मी परवा OSH मधे गेले होते तिथून वांगं,मिरची,घेवडा,बीट रोपं घेऊन आले,तिथे दुधी/काकडी वगैरे दिसली नाहीत अजून तरी.
यावर्षी कारल्याच्या बिया
यावर्षी कारल्याच्या बिया साठवुन लावल्या तर छान झाड आलंय.
मस्त फोटो मीपु. माझ्या
मस्त फोटो मीपु.
माझ्या पिकलिंग क्युकंबरची पानं पिवळी पडायला लागली आहेत. उन नीट मिळत आहे माझ्या मते. काल जरा गूगल वर शोधलं तर तिथे कुठेतरी म्हटलेलं की त्याला वरून पाणी नाही घालायचं...
आता तो काचेचा बल्ब मिळतो त्यात पाणी भरून मातीत खुपसून बघते फरक पडतो का ते.
बाकी कळवण्यास आनंद होतो की मी लावलेली तिन्ही झाडं अजूनही जिवंत आहेत
Pages