Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी गेल्या विकेंडला ग्रेप
मी गेल्या विकेंडला ग्रेप टोमॅटो, पिकलिंग क्युकंबर आणि पुदीना लावला.

आता ते सर्व जगवणे हाच मोठा चॅलेंज.
bulbs काढून divide करून बघा,
bulbs काढून divide करून बघा, काहि होतेय का ? >>> मग उजेड कसा पडेल ?
अहो उजेडासाठी तुम्हाला बल्ब कशाला? तुमच्या अकलेचा उजेड भरपूर आहे. मी तर पुष्कळदा रात्री मायबोली लावून, तुमचे लिहिलेले वाचतो. मग दिवे लावावे लागत नाहीत. तेव्हढीच वीजेची बचत. नाहीतर भारतातले लोक बोंबलायला लागायचे - इकडे वीजकपात नि तिकडे तुम्ही वीज वाया घालवता!

बाकी रात्री दिवे लावून मायबोली वाचणे म्हणजे वीज वाया घालवणे हे खरेच.
दोडक्याच्या बिया आहेत समजून
दोडक्याच्या बिया आहेत समजून होते. पाहिलं तर रिकामं पाकीट आहे फक्त. आता मागवून लावल्या तर सीझन संपेपर्यंत येतील का दोडके ? आमच्या इथे साधारण ऑ़क्टोबर १५ ला फ्रॉस्ट डेट असते ?
येतील. शेवटी शेवटी येतील
येतील. शेवटी शेवटी येतील मात्र.
मी मागच्या वर्षी कुंडीत
मी मागच्या वर्षी कुंडीत पुदिना लावला होता म्हणजे मग थंडीत घरात आणून लावू इ.इ. पण त्याला मी वेळेत आत आणायला विसरले त्यामुळे तो मेला किंवा मी मारलं असंच समजत होते पण काही दिवसांपुर्वी त्याच कुंडीत पुन्हा त्याला पानं येताना दिसत आहेत. हे असं होतं माहितच नव्हतं ..हुश नाहीतर उगाच आपण पुदिन्याला पण जगवू शकत नाहीचं शल्य होतं
वेका, पुदीना पेरीनीअल आहे.
वेका,
पुदीना पेरीनीअल आहे. शक्यतो मरत नाही. जमिनीत लावला तर नको नको होईपर्यंत वाढतो.
मी मेथीला मोड आणून ते पण
मी मेथीला मोड आणून ते पण कुंडीत टाकले आहेत. त्यांना पानं फुटलेली दिसली कालच.
समुद्र मेथी कर.
समुद्र मेथी कर.
पण मी ती कुंडीत लावली आहे.
पण मी ती कुंडीत लावली आहे. समुद्र मेथी बाटलीत करतात ना?
मी एकदा कुंडीत लावली होती.
मी एकदा कुंडीत लावली होती. खूप धुवावी लागते पण.
कुंडी का? मेथीच पेरून चालत
कुंडी का?
मेथीच पेरून चालत नाही का? त्याला मोड आणावेच लागतात का?
महिन्यापूर्वी मेथीच पेरली
महिन्यापूर्वी मेथीच पेरली होती पण नाही उगवली
मेथीचा दोष की माझा काही कल्पना नाही
मेथी नुसतीच पेरली तरी उगवते
मेथी नुसतीच पेरली तरी उगवते मस्त. पाणी जास्त नको व्हायला. मी सॅंडपिटसाठी मिळते ती वाळू आणून त्यात लावते मेथी.
यंदा तशाच वाळूत Mache लावून पहायचा विचार आहे.
बिया मागवल्या सीड्सॉफिंड्या मधून. निशिगंध पण मागवलेत.
शूम्पी..मी प्लॅस्टीक बॉक्स
शूम्पी..मी प्लॅस्टीक बॉक्स (टोमॅटो/फळे मिळतात तसा खाली होल्स असणारा ट्रान्सपरंट बॉक्स) मध्ये लावलीये मेथी आणि तो अक्खा बॉक्स एका ट्रे मध्ये ठेउन रोज थोडेसे पाणी घालतेय. एक दोन दिवसांनी भाजी करण्याएवढी (समुद्रमेथीसारखी) होईल.
मागे एकदा बाटली मेथी मारून झालिये 
कुंडित लावणार होते पण सिंडी म्हणतेय तशी माती निघून जाण्यासाठी खूप धुवायला लागेल.
लसणीची पात आली आहे. लसुण पहिल्यांदाच लावले आहेत. केव्हा मोठे/ पूर्ण होतिल कुणास ठाउक
बाकी झेंडू आणि तर बिया अंकुरल्या आहेत. टोमॅटो मिर्च्या झाडे वाढताहेत
अहा निशीगंध मला खूप आवडतो
अहा निशीगंध मला खूप आवडतो
डॅफोडिल्स, लसूण पात वापरत रहा
डॅफोडिल्स, लसूण पात वापरत रहा तोवर
अंजली,
बे एरिया (झोन ८ब)मध्ये मोगर्याची पाने आत्ताच तोडायची ना?
फुलांपैकी पिंक जास्मीन, डॅफोडिल्स (आयडी नाही ) छान फुललेत.
गुलाबाला पण भरपूर कळ्या आल्या आहेत.
गार्डनीयाचं झाडं मात्र गेलं, हिवाळ्यात कुंडी आत आणायची राहिली.
झेंडुची सगळी रोपं स्लग्ज ने खाऊन टाकली :(, काही उपाय आहे का?
भाज्यांमधे मेथी, मुळे, आंबट चुका, हरभरा, मटार वगैरे चांगले येत आहेत.
गेली २ वर्ष कोथींबीर आणि आलं काही येत नाहीये.
आता उन्हाळी भाज्या लावणे सुरु आहे.
बे एरिया (झोन ८ब)मध्ये
बे एरिया (झोन ८ब)मध्ये मोगर्याची पाने आत्ताच तोडायची ना? >>> आत्ता नको. साधारणपणे एप्रिल संपताना तोड. झाडं बाहेर ठेवण्याइतपत वॉर्म असेल तोपर्यंत. मी एका वर्षी मे महिन्याच्या शेवटी छाटणी आणि पानं तोडली होती तरीही काही प्रॉब्लेम आला नाही.
ओके, थांबते अजुन थोडे दिवस मग
ओके, थांबते अजुन थोडे दिवस मग
मीपुणेकर ,ओळखलंस का?मी बेकर
मीपुणेकर ,ओळखलंस का?मी बेकर वृषाली..कुठल्या उन्हाळी भाज्या लावायला सुरुवात करावी?
वृषाली, ओळखलं ना. बरेच
वृषाली, ओळखलं ना. बरेच दिवसांनी रोमातून बाहेर आलीस

आत्ता काही दिवसांपूर्वी भेंडी,दुधी भोपळा ,काकडी बिया लावल्या आहेत.
अजून कारलं, बीन्स, वालपापडी, वांगी, तूर या बिया लावायचा विचार आहे.
सिमला मिर्ची, हालापिनो ची रोपं आणायचं म्हणतोय.
टोमॅटो ची रोपं आली आहेत मागच्या वर्षीच्या लॉट मधून.
फळांपैकी टरबुज, कलिंगड लावल्या आहेत बिया.
बघु यापैकी काय काय रुजेल ते
मोगर्याची झाडं आली आहेत
मोगर्याची झाडं आली आहेत (अरेबियन जास्मीन), ईच्छुकांनी होम डेपो गाठा
अरे वा लकी आहात तुम्ही, झाडे
अरे वा लकी आहात तुम्ही, झाडे लावलीत पण. आमच्याकडे मिशीगन मधे अजुन थंडच आहे.
दोन मिडियम साईज पॉट्स आणले
दोन मिडियम साईज पॉट्स आणले आहेत. फुलझाडांपैकी काय लावू जे नंतर घरात पण ठेवता येईल? सारखं सारखं लावायला कंटाळा येतो पण घरात एक्दा जास्वंद जगवायचा प्रयत्न फसला होता. May be I should try something easier this time
अंजली माझं बागकाम knowledge अगदीच बेसिकवर आहे
आमच्या फ्रंट यार्ड मधली झाडं
आमच्या फ्रंट यार्ड मधली झाडं उंच वाढल्याने तिथे बरेच तास म्हणजे जवळ जवळ दिवस्भर सावलीच असते. तिथले ग्रास पण मेलं आहे (बर्म्युडा), तिथे काय लावता येइल ज्याला उन्हाची गरज नाही असं?
शुम्पी, होस्ता लाव. अतिशय
शुम्पी, होस्ता लाव. अतिशय सुरेख दिसतात. पेरिनियल असल्यामुळ दरवर्षी परत येतात. फुलच लावयची असतील तर बेगोनिया. पण मी असते तर होस्ता लावेन.
मी बरेच पेरिनियल लावले
मी बरेच पेरिनियल लावले यावेळी. अजुन लावत आहे.
भाज्यां मध्ये दोडका ,दुधी अंबाडी एवढच लावेन यावेळी. (इंडियाला जाणार आहे समर मध्ये) बेझिल, पुदिना मेथी सेज, थाईम रोझमेरी आले आहे छान.
मोठी झाड मागे लावत आहे. क्रेप मिर्टल, जॅपनिज मॅपल आणि पीच लावणार आहे या w/e ला.
मीपुणेकर फोटो टाका गं यावेळी भाज्या आल्या कि.
सीमा बॅकयार्डचा फोटो टाक की.
सीमा बॅकयार्डचा फोटो टाक की. होस्ता चं स्पेलिंग काय?
अंबाडीच्या बीया लावणार की रोपं आहेत तुझ्याकडे? माझ्यासाठी आणशील का शनिवारी?
शुम्पे, (तु न सांगता)
शुम्पे, (तु न सांगता) तुझ्यासाठी बिया बांधल्या आहेत राणी.
बॅकयार्डचा फोटो झाड लावली कि टाकते गं. आता गुलाब आणि बारक्या हर्ब्ज शिवाय काही नाहीये.
होस्ता इथे बघ.
http://www.americanhostasociety.org/EstablishingHosta.html
मला फार आवडते. पण माझ्याकडे सावली अशी नाहीच आहे. त्यामुळ समर सुरु झाला कि टिकत नाही गं आपल्याकडच्या उन्हाला.
मी नवीनच बागकामाला सुरुवात
मी नवीनच बागकामाला सुरुवात करणारे. कोणी एप्रिल पासून ( अगदी वाफा तयार करण्यापासून किंवा कुंडीमध्ये ) कोणकोणती फळ्-फुलझाडं आणि भाज्या लावायच्या ते सांगेल का? आणि बिया कुठे मिळतात ते पण लिहा. - धन्यवाद!
वा वा सीमा. टडोपाच अगदी.
वा वा सीमा. टडोपाच अगदी.
Pages