आहेत तोवर पाहून घ्या

Submitted by जो_एस on 16 April, 2013 - 06:22

आहेत तोवर पाहून घ्या
झाडं,... रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या
आहेत तोवर पाहून घ्या

झाडं तोडून प्रगती होते
विकासाला गती येते
परत एकदा विकासाची
व्याख्या तेवढी करून घ्या
आहेत तोवर……

झाडं तोडा रोलर फिरवा
स्टेडियम बिल्डींग सेझ उगवा
सगळ्यात आधी श्वासासाठी
मास्क तेवढा करून घ्या
आहेत तोवर …..

एकेकाळी पृथ्वी वरती
लहान मोठी झाडं होती
फोटो सहित इतिहासात
नोंद मात्र करून घ्या
आहेत तोवर…..

“झाडं लावा झाडं जगवा”
कागदावरती लिहून घ्या
त्या कागदांनी येताजाता
कृती विसंगत झाकुन घ्या
आहेत तोवर…..

प्रोजेक्ट लिहून भागणार नाही
कायदे करून वाचणार नाही
निसर्ग प्रेमाचा मनांमधे
अंकुर एखादा फुटू द्या
आहेत तोवर…..

सुधीर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर अभिव्यक्ति.
झाडांवर, निसर्गावर खरेखुरे प्रेम असलेलाच असे लिहू शकेल - हृदयातून..

प्रोजेक्ट लिहून भागणार नाही
कायदे करून वाचणार नाही
निसर्ग प्रेमाचा मनांमधे
अंकुर एखादा फुटू द्या >>>>>> सोला आने सच.

अनिल, आशिगो
धंन्यवाद
गेल्या काहि दिवसांत बरीच झाडं कमी झालेली दिसली त्यामुळे हे सुचलं
असच पुर्वी एक वृक्ष तोडलेला पाहून ही कविता लिहीली होती.
http://www.maayboli.com/node/7021

विक्रांत, भारती अभारी आहे
खरच आहे विक्रांत झाडं लावून जो आनंद मिळतो त्याला सिमा नाही. तो तर मिळवतच असतो. पण कित्त्येक वर्षांची झाडं तोडलेली पाहिली की तितकाच खेदही वाटतो.

आशय, विषय चांगला मांडलाय.

शेवटच्या कडव्यातला संदेश विशेष.