काळरात्री पाखरे ती .....

Submitted by जो_एस on 6 April, 2009 - 23:31

आठवे ते दृष्य फिरुनी, विसरता विसरेचना
सांगतो तुम्हास ते, घ्या जाणुनी त्या वेदना ||
- - - - - - - - -- - - - - - - - - -
बहरलेला वृक्ष तेव्हा तोडती ते निर्दयी
पाखरांचा कंठ दाटे, भरुन येई ऊरही ||
एक घरटे बांधलेले त्याच वृक्षाच्या वरी
दृष्य धूसर होत नेत्री लोटला तो पूरही ||
करित ती आकांत तेव्हां धाव घेती सत्वरी
विनविती त्या निष्ठुराना, शोधिती पिल्लांसही ||
ऐकवे आक्रोश ना, पण शांत होते निर्दयी
कान त्यांचे बंद अन् ते, निश्चल हृदय शून्यही ||
क्रूर त्यांचे घाव पडती पाखरां हृदयावरी
साहवेना घाव त्यांना आणि त्या वृक्षासही ||
दुर्बलांची कलकल अता विरुन जाई अंबरी
सबल करती राज्य येथे नियम हा सृष्टीसही ||
दिवसभर ती पाखरे झगडून थकली भागली
निपचित पहाती बिचारी वृक्ष त्यांच्या साथही ||
निघुन गेले दुष्ट त्यांच्या कार्य भागा साधुनी
विखुरले अवशेष सारे, पाखरांची आसही ||
सूर्य गेला पश्चिमेला रात्र ही अंधारली
काळरात्री पाखरे ती फक्त तेथे राहिली…..

सुधीर

गुलमोहर: 

भावपूर्ण. मन व्यथित झाले.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

आवडली.

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

आवडली.

ओह.. खुप हळवी.. व्यथित झालं मन!!!!

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
There are two eternities that can really break you down
Yesterday & Tomorrow
One is gone and the other doesn’t exist…So live today..

कल्पना आणि कविता, दोन्ही छान. आणखी थोडा हात फिरवलात तर छान वृत्तबध्दता येईल.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com

धन्यवाद मित्रांनो

सुधीर

सुधीर, कविता आवडली.
~~~~~~~~~

आवडली. विषय पण छान Happy

स्वर, कविता

धन्यवाद

सुधीर